Sunday 21 December 2014

गिरीश कुबेर यांना खुले पत्र

गिरीश कुबेर यांना खुले पत्र
...................................
प्रति,
श्री. गिरीश कुबेरजी
स.न.
१६ डिसेंबरच्या ‘लोकसत्ता’ मध्ये आपण लिहलेले ‘बळीराजाची बोगस बोंब’ हे संपादकीय वाचले. संपादक गिरीष कुबेर यांच्या स्टंटबाजीचा हा भाग आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. अनेकदा अकारण वाद निर्माण करून, स्वत;कडे लक्ष वेधून घेण्याचा आपला प्रयत्न असतो. आताचा हा अग्रलेख याच रणनीतीचा भाग असावा. अन्यथा अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून स्वत:ची ओळख सांगणा-या आपल्यासारख्या संपादकाने एवढे बिनबुडाचे व पोरकटपणाचे लेखन करावे हे पटत नाही. हा अग्रलेखच असा आहे की, शेतक-यांच्या प्रश्नाशी संबंधित प्रत्येकाला याची दखल घ्यावीच लागते. या अर्थाने गिरीष कुबेरजी आपण ‘व्हिलन’ च्या रुपात का होईना, सर्व मिडीयात, विधीमंडळात गाजत आहात. एका दृष्टीने आपला चमकण्याचा हेतू सफल झालेला दिसतो.
मुळात कोणत्याही वृत्तपत्राला व त्याच्या संपादक, मालकाला शेतक-यांबद्दल प्रेम असण्याचे कारण नाही. कारण शेतकरी हा त्यांचा ग्राहकच नाही. वृत्तपत्र विकत घेऊन वाचणारे कोणी शेतकरी असतील तर, ते नक्कीच बडे शेतकरी असले पाहिजेत. जाहीरातीचा व्यवसाय शेतक-यांकडून मिळण्याची अजिबात शक्यता नाही. बहुतेक वृत्तपत्र मध्यवमर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, नोकरदार हेच विकत घेऊन वाचतात. त्यामुळे वृत्तपत्र याच वर्गाच्या मानसिकतेचं प्रतिनिधीत्त्व करतात. ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अग्रलेखात याच मानसिकतेचं जागो-जागी प्रतिबिंब दिसतं. संपादकीयाची सुरुवात करतानाच आपण नोंदवतात, ‘शेतकरी म्हटला की, तो गरीब बिचारा असायलाच हवा आणि तो नाडला जाणारच वा गेलेला असणारच असे मानण्याची प्रथा आपल्याकडे चांगलीच रूढ झाली आहे.’ हे विधान वेड पांघरून पेडगावला जाणारे आहे. कारण जे जळजळीत वास्तव आहे त्याला आपण प्रथा म्हणून दुर्लक्षू इच्छिता. मराठवाड्यातील कुठलंही एक गाव आपण निवडावं आणि शेतीवर अवलंबून असणा-या शेतक-यांची नेमकी काय परिस्थिती आहे ते डोळ्यांनी पाहावं म्हणजे आपल्याला नक्कीच स्वत;च्या विधानाची कीव करावी वाटेल. पुढे आपण नोंदवता, ‘शेतकरी प्रत्यक्षात लुटला गेलेला असो वा नसो. शेतकरी लुटण्यासाठीच असतात आणि आपण प्रत्येकजण त्या लुटीस हातभार लावण्याचेच काम करीत असतो, हा समज असतो.’ हा समज नाही तर हे वास्तव आहे. शेतीसाठीच्या बियाणे, खतापासून जी शेतक-यांची लूट होते, ती बाजारात माल आणेपर्यंत. आपला माल उत्पादीत करणारा प्रत्येक उत्पादक त्याच्या मालाची किंमत स्वत: ठरवत असतो. खर्चामध्ये नफा मिसळूनच ही किंमत ठरते. मात्र शेतीमालाच्या बाबतीत शेतक-यांच्या हातात काहीच नाही. कधीतरी चांगले पैसे मिळण्याची परिस्थिती तयार होते तेव्हा सरकार त्या शेतीमालाची आयात करुन भाव पाडते. हा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. कांदा भावाबद्दल ओरड करणारे सगळे मध्यम-उच्चवर्गीय शेतक-यांचे शत्रूच आहेत आणि शेतक-यांच्या लुटीत ते सर्वजण अप्रत्यक्षपणे सहभागी होतात हे वास्तव आहे. अनेक दशकांपासून चालू असलेली शेतक-यांची ही लुटमार अर्थतज्ज्ञ असणा-या आपल्यासारख्या विद्वानाला दिसत नाही असे थोडेच आहे? मात्र आपण जाणीवपूर्वक वेडेपणाचे हे सोंग घेतले आहे.
शेती हा किती जोखमीचा धंदा आहे, याचे सामान्यज्ञान आपल्यासारख्या अभ्यासू संपादकाला असू नये याचे आश्चर्य वाटते ! केवळ कोरडवाहू शेतीचा विचार केला तर, बियाणे, खते व कीटकनाशके यापासून फसवणूक सुरू होते. पेरणीसाठी आवश्यक असणा-या या वस्तु कधी चढ्या भावाने मिळतात तर कधी त्या बोगस मिळतात. बोगस बियाणे उगवत नाही तेव्हा वृत्तपत्रात बातम्या येतात पण प्रत्यक्षात किती जणांना नुकसानभरपाई मिळते? किती व्यापा-यांवर कारवाई होते? याचे उत्तर ‘नाही’ असेच मिळते. बियाणे न उगवल्याची किती मोठी किंमत त्या शेतक-याला मोजावी लागते, हे आपल्याला कसे कळणार? बियाणे पेरले तर त्याला वेळेवर व पुरेसा पाऊस पडावा लागतो. पाऊस पुरेसा झाला नाही तर, चिमण्या, कावळे, मोरं हे बियाणे उकरून खातात. गेल्या खरीप पेरणी हंगामात अचानकपणे गोगलगार्इंची प्रचंड प्रमाणात पैदास झाली. त्यांनी हजारो हेक्टरवरील बियाणे खाऊन फस्त केली. शेतक-यांना आधी या गोगलगाई मारण्याची मोहीम हाती घ्यावी लागली व दुस-यांदा पेरणी करावी लागली. याला काही सरकारने मदत केली नाही. जिथे एकदाच दर्जेदार बियाणे मिळण्याची खात्री नाही तिथे दुस-यांदा पेरणी करण्यासाठी बियाणे मिळवताना शेतक-यांचे काय हाल झाले असतील? याची कल्पना आपल्यासारख्या बाबुला कशी येणार? उगवण नीट झाली म्हणजे पीक हातात आले असे नाही. पीकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर रोगराईचे आक्रमण असते. त्याला नियंत्रणात आणण्या-साठी फवारणी करावी लागते. शिवाय प्रत्येक टप्प्यावर पाऊस पडावा लागतोच. बहुतेकदा वेळ चुकवून पाऊस पडतो. त्यामुळे उत्पादनात घट होते. कधी सोयाबिन काढणीच्या वेळी अतिवृष्टी होते, त्यामुळे मोठा फटका बसतो तर एखादा अवकाळी पाऊस पांढ-या शुभ्र ज्वारीचे रुपांतर काळ्या ज्वारीत करतो. अवर्षण, अनियमितता, अतिवृष्टी, वादळ, गारपीट ही संकटं नेहमी अचानकपणे उद्भवतात. एका तासात होत्याचे नव्हते होते. शेतीत ही जोखीम क्षणाक्षणाला आहे. याशिवाय उंदीर, मोरं, वानरं, रान-डुक्कर असे अनेक पशु-पक्षी हे आपापल्या परीने शेतीचे नुकसान करीत असतात. शेतकरी म्हणून हे त्याला आनंदाने सहन करावेच लागते.
‘होत्याचं नव्हतं होणं’ म्हणजे काय?हे आपल्याला कळण्याचं कारण नाही. दु:ख, दैन्य, दारिद्र्यता, पराधिनता, विवशता व लाचारीचा अनुभव हा फक्त शेतक-यांच्याच वाट्याला येतो. अंगावर दागदागिने घालून मिरवणारे शेतकरी आपण कुठे पाहिले आहेत, हे मला माहित नाही. पण दैन्यावस्थेत जगणारे, आजही मिरचीबरोबर भाकरी खाणारे, पायात प्लॅस्टिकचा बुट घातलेले किंवा नागड्या पायाचे, कळकट कपडे घातलेले व कसे-बसे आयुष्य ओढत चाललेले शेकडो शेतकरी मी आपल्याला गावोगाव दाखवू शकतो. त्यांच्या आयुष्यात जगणं हीच फक्त चैन आहे. ज्या बागायतदार शेतक-यांवर आपण तोंडसुख घेतले आहे, ते शेतकरी दरवर्षी किती मोठी जोखीम घेऊन शेती करतात, याची आपल्याला कल्पना नाही. पाच-पंचवीस लाखाची बाग उद्धवस्त होणा-या शेतक-याला हेक्टरी पंचवीस हजाराची मदत मिळते, हे वास्तव आपल्याला माहित नाही, असे थोडेच आहे. तरीही आपण धनदांडगे म्हणून त्यांना अवमानित करताय, ही नेमकी कुठली पत्रकारिता आहे? कुठल्या तरी मूठभर राजकारणी बागायतदारांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन आपण हे बोलत असाल तर स्वत:चीच फसवणूक करुन घेत आहात. तीन-चार वर्षे जीवापाड जपलेल्या बागेला गारपिठीचा फटका बसतो, लाखोचं नुकसान होतं, बाग नष्ट होते तेव्हा कुबेरसाहेब, त्या शेतक-याचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असतो. कॅमेरा दिसला म्हणून नाटक करायला शेतकरी काही सिनेकलाकार नाहीत !
कुबेरसाहेब आपण अर्थतज्ज्ञ आहात. इतर व्यावसायिकाइतकेच शेती व्यवसायातही धोके आहेत असे म्हणता. असे मोघम विधान करु नका. शेतीइतकी जीवघेणी जोखीम असणारे कोणकोणते व्यवसाय आहेत त्याची यादी द्या. कोणता व्यवसाय अवर्षणाने, अतिवृष्टीने, वादळाने, गारपिटीने, रोगराईने संपूष्टात येतो ते सांगा? शेतक-यां-एवढी फसवणूक कोणत्या व्यावसायिकांची होते ते सांगा? शेतक-यांच्या कर्जमाफीबद्दल आपण वारंवार गळा काढताय, स्वत: अर्थतज्ज्ञ आहात. आकडेवारीने सांगा की, आतापर्यंत शेतक-यांना किती वेळा आणि किती रकमेची कर्जमाफी दिली व उद्योजकांना किती कर्जमाफी दिली. तेही सांगा. उद्योजकांची कर्जमाफी आणि शेतक-यांची कर्जमाफी याची तुलनात्मक आकडेवारी द्या पण आपण हे करणार नाही. कारण इथे तुमचे ढोंग उघडे पडते. शेतक-यांना फक्त एक-दोन वेळा कर्जमाफी दिली आहे ती ही ठराविक दहा-पंधरा हजाराच्या रकमेपर्यंतची. दुष्काळसदृश्य परिस्थिती म्हणून सरकारने कर्जावरील व्याजमाफी दिली आहे.त्यामुळेही आपल्या पोटात दुखते आहे. परंतु ५० हजारांपर्यंतचे शेतीसाठीचे कर्ज व्याजमूक्त असेल अशी घोषणा यापूर्वीच्या सरकारनेच केली होती. तेव्हा शेतक-यांच्या नेमक्या कोणत्या कर्जाला व्याजमाफी मिळणार? वीजबीलाच्या माफीचेही असेच गौडबंगाल आहे. मुळातच शेतीसाठीची वीज पाच-सहा तास मिळते. प्रत्यक्षात वीजबिल आकारणी मात्र चोवीस तासाची होते. दुष्काळामुळे आधीच पाणीटंचाई त्यात वीजमोटारीचा वापर तो किती होणार? वीजेचे बील तरी किती असणार? पण आपल्याला मात्र ही वीजबीलमाफी म्हणजे शेतक-यांसाठी असलेली मेजवानी वाटत असावी.
शेतक-यांच्या आत्महत्येचा मुद्दा आपण अतिशय कोडगेपणाने मांडला आहे. आपण केलेली तुलना चुकीची व गैरलागू आहे. शेतकरी आत्महत्येची धमकी देत नाहीत तर तो आत्महत्या करतोय. गेल्या ८-१० वर्षात देशभरातील लाखो शेतक-यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाच्या कारणावरून आत्महत्या केल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता बदल होऊनही या आत्महत्या सुरूच आहेत. पुरोगामी महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे, इतर व्यवसायातही शेती-इतकेच धोके असतील तर इतर कोणत्याही उद्योग व्यवसायात अपवादानेही आत्महत्या का होत नाहीत? आपल्या दृष्टिप्रमाणे, शेती हा श्रीमंतीचा व चैनीचा व्यवसाय असेल तर करोडो शेतकरी शेतीतून का बाहेर पडत आहेत? दिवसेंदिवस शेती का ओस पडत आहे? शेतीसाठी मनुष्यबळ का उपलब्ध होत नाही? शेतक-याच्या घरातला मुलगा शेती करायला का तयार नाही? याची उत्तरं आपण कधी शोधली आहेत का? ती शोधली असती तर ख-या अर्थानं आपण शेतीप्रश्नाची चिकीत्सा करू शकला असता. परंतु.....
लेखाचा समारोप करताना आपण वापरलेली भाषा आपल्या शेतक-यां-विषयीच्या विकृत मनोवृत्तीची द्योतक म्हणावी लागेल. ‘कथित बळीराजाचे खरे अश्रू कोणते अन् बनावट कोणते हे शोधण्याचा प्रामाणिकपणा सरकारने दाखवावा आणि नुकसान भरपाया आणि कर्जमाफ्या जाहीर करीत हिंडायची प्रथा बंद करावी. स्वतःच्या मुर्खपणामुळे कोणत्या तरी जत्रेत चेंगराचेंगरी होऊन कोणी गेले दे आर्थिक मदत. वादळात, गारपिटीत पीक पडले रे दे आर्थिक मदत, ही प्रथा भिकेला लावणारी आहे. ज्यांना ती पाळायची आहे त्यांनी स्वतःच्या खिशातून मदत देऊन पाळावी या कथित बळीराजाची बोंब देखील बोगस असू शकते हे मान्य करण्याचे धैर्य सरकारने दाखवावे आणि जनतेचा पैसा वाया घालवणे थांबवावे.’ ही आपली भाषा अत्यंत उद्दामपणाची व अहंकारी आहे. शेतक-यांना पुन्हा पुन्हा कथित बळीराजा म्हणून हिनवण्याचे धाडस आपल्यासारखा शेतकरी-द्वेष्टाच करू शकतो. शेतकरी हा काही स्वतःला बळीराजा म्हणवून घेत नाही. राजा म्हणवून घेण्याची त्याची ऐपतही नाही. त्याच्याच जीवावर जगणारी सगळी बांडगूळं मात्र राजासारखी जगतात. आपणही एक बांडगूळच आहात. शेतकरी एका दाण्यापासून हजार दाण्याची निर्मिती करतो. काळ्या मातीतून नवं उत्पादन काढतो. यासाठी तो अहोरात्र कष्ट घेतो. पैसा निर्मिती तर शेतकरीच करतो. शेतक-यांनी शेती सोडली तर आपली ही सगळी बांडगूळी व्यवस्था संपायला फारसा वेळ लागणार नाही.
वादळ,गारपीट, अतिवृष्टी व अवकाळी पाऊस शेतक-यांच्या मुर्खपणामुळे येत नाही. या आपत्तीशी शेतक-याचा काहीही संबंध नाही. ही नैसर्गिक आपत्ती आहे. या आपत्तीत शेतक-यांना मदत करणे हे लोकशाहीतील प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे. भारतातच नाही तर जगभरात अशा आपत्तीत शेतक-यांना ते-ते सरकार मदते. याची आपल्याला माहिती नसावी हे ही एक आश्चर्यच. अशा आपत्तीत शेतक-यांना मदत करू नये असे म्हणणे म्हणजे सरळसरळ शेतक-यांना शेती व्यवसाय सोडा म्हणून सांगण्यासारखे आहे. हे परवडणारे आहे काय? याचा सरकारने जरूर विचार करावा. खरे शेतकरी कोणते? खोटे कोणते? कथित बळीराजा कोणता? याचा शोध कुबेरसाहेब आपल्यासारख्या ख्यातनाम पत्रकारांनी नक्कीच घ्यायला हवा. मात्र आपल्या लेखणीची खाज जिरवून घेण्यासाठी मिळून मिळून आपल्याला बिचारा शेतकरीच मिळावा हे आपले दुर्दैवच ! अस्मानी आणि सुलतानी संकटाने जो आधीच मरून पडलाय त्याचं आणखी काय उघडून बघणार? आपल्यासारख्या वृत्तींच्या लोकांमुळे जर शेती व्यवसाय संपलाच तर आपल्याला लोकसत्तेची पानं खाऊनच जगावं लागेल ! आपण पत्रकार आहात. लोकसत्तेसारख्या वृत्तपत्राचे संपादक आहात त्यामुळे महान आहातच ! प्रत्येक विषयाप्रमाणे शेतकरी व शेतीची चिकीत्सा करण्याचा आपल्याला अधिकार आहेच. तशी ती व्हायलाही हवी. मात्र आपला हेतू चिकीत्सा करण्याचा नाही तर शेतक-यांची टिंगल-टवाळी करण्याचा, त्यांना अप्रामाणिक, खोटारडे ठरवण्याचा, सरकारकडून अनुदान लाटून मजा करणारे, खोट्या दुःखाचं भांडवल करणारे आहेत असे दाखवण्याचा आहे. त्यामुळेच आपण शेत-क-यांबद्दल अत्यंत सवंग, बालिश विधाने केली आहेत. निरुपाय म्हणून, नैराश्यग्रस्त बनून आत्महत्या करणा-या शेतक-यांची खिल्ली उडवली आहे. प्रत्येक सजीवाला आपला जीव सर्वात प्रिय असतो. माणसांना तर जीवापेक्षा दुसरे काहीच प्रिय नसते. असे असताना लाखो शेतकरी सरकारी मदत लाटण्यासाठी आत्महत्या करताहेत असे आपल्याला वाटणे हेच आपल्या विकृत बुद्धीचे लक्षण आहे. आत्महत्या करणा-या शेतक-याच्या जागी आपण स्वतःला कल्पिला असतात तर असा आगाऊपणा करण्याचे धाडस आपल्याला झाले नसते. वृत्तपत्र मोठे असते म्हणजे त्याचा संपादक मोठा असतोच असे नाही. उलट अनेक कद्रुही अशा पदावर जात असतात हेच आपण या लेखनाने दाखवून दिले आहे. शेतक-यांबाबतची एवढी असंवेदनशीलता माझ्या पाहण्यात यापूर्वी आलेली नाही.
एक शेतकरी म्हणून मी आपल्या या लेखनाचा जाहीर निषेध करतो ! आपण शेतकरीद्वेष्टे आहात याची खात्री पटली असल्यामुळे आपण संपादक असेपर्यंत मी ‘लोकसत्ता’ हा पेपर हातातही धरणार नाही. मला माहित आहे यामुळे आपल्याला काही फरक पडणार नाही. पण निषेध करण्याचा एवढाच मार्ग माझ्यापुढे शिल्लक आहे.
...........................
- महारूद्र मंगनाळे
लातूर
मो.9422469339
* महारूद्र मंगनाळे हे महाराष्ट्र टाइम्स आणि चित्रलेखाचे माजी प्रतिनिधी असून,सध्या त्यांचे बातमी मागची बातमी नावाचे साप्ताहिक सुरू आहे.त्याचबरोबर त्यांनी आधुनिक शेती सुरू केली आहे
Maharudra Mangnale

Wednesday 26 November 2014

मराठा आरक्षणाला स्थगिती का?

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=12
...............
दै.लोकमत, मुंबई दि.२६ नोव्हेंबर २०१४ संपादकीय पानावरील लेख
मराठा आरक्षणाला स्थगिती का?
- प्रा. अशोक बुद्धिवंत 
[आरक्षण प्रश्नाचे अभ्यासक]



मुंबई उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबरला मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. अवघ्या चारच महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने दिलेले १६ टक्के मराठा आरक्षण या निकालाद्वारे काढून घेण्यात आल्याने मराठा समाजात नैराश्याची भावना पसरली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा आणि न्या. एम.एस. सोनक यांच्या घटनापीठाने हे ९५ पानी निकालपत्र तयार केलेले आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी राणे समितीने व सरकारने काटेकोर कायदेशीर दक्षता घेतल्याची ग्वाही वारंवार देण्यात आली होती. ती या अंतरिम निकालाने फोल ठरली.

या निकालाला सरकार आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले जात आहे. राणे अहवालात व आरक्षण अध्यादेशात राहिलेल्या त्रुटी दूर करणार, नागपूर अधिवेशनात त्याबाबतचा नवा परिपूर्ण कायदा करणार, आम्ही दिलेला अहवाल व काढलेला अध्यादेश परिपूर्ण होता; पण न्यायालयात बाजू नीट मांडली गेली नसल्याने स्थगिती मिळाली असेही दावे केले जात आहेत.

पहिली गोष्ट न्यायालयाने दिलेली ही स्थगिती तांत्रिक मुद्दय़ांवर दिलेली नसून अतिशय सखोल घटनात्मक मुद्दय़ांवर आणि सज्जड कारणांनी दिलेली असल्याने सर्वोच्च न्यायालयात जाऊनही यात काहीही बदल होण्याची शक्यता नाही. मुळात हे आरक्षण घटनाबाह्य मार्गाने दिलेले असल्याने ते न्यायालयात टिकणार नाही, असे तज्ज्ञ सांगत होते; पण त्या वेळी कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

उच्च न्यायालयाने हा अंतरिम स्थगिती आदेश देताना जी कारणे नमूद केलेली आहेत, त्यांची गुणवत्ता पाहता अंतिम निकाल काय लागेल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. ५ जानेवारीला सुनावणी पुढे सुरू होईल. या प्रकरणातला पहिला दावा २00९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे, त्याचा हा अंतरिम निकाल आहे, हे लक्षात घेता अंतिम निकाल यायला किती अवधी लागेल याचाही अंदाज करता येऊ शकतो.

स्थगितीसाठी उच्च न्यायालयाने दिलेली पुढील कारणे इतकी भक्कम आहेत, की त्यात सर्वोच्च न्यायालयही हस्तक्षेप करू शकेल असे वाटत नाही. निवडणुकीच्या तोंडावर मराठा मतबँक डोळ्यांसमोर ठेवून कोणतेही तातडीचे कारण नसताना, हा मराठा आरक्षण अध्यादेश काढणे हे असंवैधानिक पाऊल होते असे खडे बोल न्यायालयाने या निकालपत्रात सुनावले आहेत.

१. सर्वोच्च न्यायालयाने १९६३ सालच्या बालाजी प्रकरणापासून वारंवार घालून दिलेल्या दंडकानुसार आरक्षण ५0 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच ही ५0 टक्के र्मयादा नसेल तर समतेच्या तत्त्वाचा भंग होईल असे घटना परिषदेत ३0 नोव्हेंबर १९४८ रोजी सांगितलेले होते.
सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यांमध्ये याचा पुनरुच्चार केलेला आहे. तथापि अतिअपवादात्मक परिस्थितीत खास बाब म्हणून आरक्षण ५0 टक्केपेक्षा जास्त ठेवता येऊ शकेल असेही सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र मराठा समाज हा प्रगत आणि सत्ताधारी समाज असल्याने व तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला नसल्याने त्याच्यासाठी ही र्मयादा ओलांडण्याचे कोणतेही कारण नाही असे उच्च न्यायालय म्हणते. घटनेनुसार (कलम १५-४ आणि १६-४) आरक्षणासाठी सामाजिक मागासलेपणा हा मुख्य निकष आहे. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित असल्याने त्याला अशाप्रकारचा अपवाद करून आरक्षण देता येणार नसल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

२. न्यायालय पुढे म्हणते, “मंडल आयोगाने १९८0 सालीच मराठा समाजाला प्रगत आणि प्रभावशाली समाज घोषित करून मराठा जातीला ओबीसी आरक्षणासाठी अपात्र ठरवले आहे. तसेच २५ फेब्रुवारी २000 रोजी भारत सरकारच्या केंद्रीय मागासवर्गीय आयोगानेही मराठा समाजाला तो प्रगत व सत्ताधारी असल्याने आरक्षण देता येणार नाही असे स्पष्ट केलेले आहे.” या दोन्ही अहवालांमध्ये आता बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही.

३. राज्य सरकारने नेमलेल्या न्या. बापट आयोगाने (राज्य मागासवर्ग आयोग, २00८) मराठा समाजाला आरक्षण देणे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा अहवाल दिलेला आहे. या अहवालाचा फेरविचार करण्याचे कोणतेही सयुक्तिक कारण नसल्याचे सांगून विद्यमान न्या. भाटिया आयोगानेही अशा फेरविचाराला स्पष्ट नकार दिलेला असल्याने राज्य आयोग, केंद्रीय आयोग आणि मंडल आयोग या तिन्हींनी मराठा आरक्षण नाकारल्याने उच्च न्यायालयाने हा राज्य सरकारचा अध्यादेश रद्दबातल ठरवला आहे. न्या. बापट आयोगाचा हा अहवाल राज्य सरकारने राणे समितीच्या शिफारशींवरून अंशत: फेटाळला असला, तरी २००८ पासून आजपर्यंत सरकारने तो विधीमंडळासमोर सादर केलेला नाही. तसेच राणे समितीचा अहवालही विधीमंडळासमोर ठेवलेला नाही, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केलेले आहे. राज्यपालांनी अध्यादेश काढण्याची कोणतीही तातडीची बाब नव्हती असेही न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.

४. मा. सर्वोच्च न्यायालयाने १६ नोव्हें. १९९२ रोजी मंडल आयोगाच्या निकालात यापुढे आरक्षण देण्याची शिफारस फक्त वैधानिक आयोगालाच करता येईल असे स्पष्ट केलेले आहे. या आदेशाचे उल्लंघन करून राणे समिती नेमण्यात आली. राणे समिती म्हणजे राज्य व केंद्रीय मागासवर्ग आयोगांचे अधिकार डावलून सरकारने टाकलेले घटनाबाह्य पाऊल असल्याने त्या अहवालाला घटनात्मकदृष्ट्या काहीही स्थान नाही असे न्यायालयाचे मत आहे.
राणे समितीने दिलेला अहवाल अतिशय सदोष आहे. आधीच मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्याला पोषक अहवाल तयार करण्याची ही कृती होती. राणे कमेटीचा अहवाल अकरा दिवसांच्या घाईघाईत केलेल्या, अशास्त्रीय शासकीय पाहणीवर आधारित असून, त्यासाठी चुकीचा नमुना घेतलेला होता. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याचा कोणताही पुरावा या अहवालात दिलेला नाही.
शासनाने राणे समितीची निर्मिती सर्वोच्च न्यायालयाने याआधीच अधिक्रमित केलेल्या निकालाच्या आधारे केली होती. उच्च न्यायालयाने हा संपूर्ण राणे अहवाल ५ ठोस कारणे देऊन फेटाळून लावला आहे.

५. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी राज्य सरकारतर्फे एक महिन्याची मुदत मागण्यात आली. तोवर सदर स्थगितीचा निर्णय रोखून धरावा अशी विनंती उच्च न्यायालयाला करण्यात आली. तीही उच्च न्यायालयाने सपशेल फॆटाळून लावली. यावरून हा अध्यादेश न्यायालयाने संपूर्णपणे मोडीत काढल्याचे स्पष्ट होते.

मराठा जातीची संघटित, आक्रमक आणि विशेष उपद्रवमुल्य असलेली मतब्यांक लक्षात घेऊन न्यायालयीन निर्णयातील हे कटू सत्य मराठा समाजाला सांगण्याचे धैर्य मराठा आरक्षण समर्थक, मराठा समाजाचे राजकीय नेते आणि नवे सरकार यापैकी कोणाकडेही असल्याचे दिसत नाही.
मुळात आम्ही आरक्षण दिले होते पण न्यायालयाने ते रद्द केले त्याला आम्ही काय करणार? असे भासवण्याचा हा सगळा खटाटोप नी राजकीय उद्योग होता आणि आजही तो पुढे चालू असल्याचे दिसते.

जनतेच्या न्यायालयाने राणे समितीतील खुद्द राणे यांच्यासह समितीचे सदस्य आणि तत्कालीन मंत्री सर्वश्री शिवाजीराव मोघे, बबन पाचपुते, सचिन आहीर या सर्वांना निवडणूकीत पराभूत केले. जनतेने मराठा आरक्षण समर्थक सरकारही घालवले. मराठा आरक्षणाचे प्रवक्ते विनायक मेटे, रेखा पुरूषोत्तम खेडेकर, हर्षवर्धन पाटील यांच्यासह बहुतेक सर्वांना निवडणुकीत पराभूत झाल्याचे पाहावे लागले. हरियानात जाटांना आरक्षण देणारे जाट सरकार गेले. महाराष्ट्रातील मराठा सरकारही असेच गेले.

भारतीय संविधानातील आरक्षणविषयक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे याबाबतचे विविध निकाल, विविध मागावर्गीय आयोगांचे अहवाल या सर्वांचे उल्लंघन करून मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आल्याने तो रद्द करण्यात आला व त्याची अंमलबजावणी तातडीने स्थगित करण्यात आली हे या निकालपत्रावरून स्पष्ट होते.
http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=12
......................................................................

मराठा आरक्षणाला स्थगिती का?

http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=12
...............
दै.लोकमत, मुंबई दि.२६ नोव्हेंबर २०१४ संपादकीय पानावरील लेख
मराठा आरक्षणाला स्थगिती का?
- प्रा. अशोक बुद्धिवंत
[आरक्षण प्रश्नाचे अभ्यासक]

मुंबई उच्च न्यायालयाने १४ नोव्हेंबरला मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. अवघ्या चारच महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने दिलेले १६ टक्के मराठा आरक्षण या निकालाद्वारे काढून घेण्यात आल्याने मराठा समाजात नैराश्याची भावना पसरली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा आणि न्या. एम.एस. सोनक यांच्या घटनापीठाने हे ९५ पानी निकालपत्र तयार केलेले आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी राणे समितीने व सरकारने काटेकोर कायदेशीर दक्षता घेतल्याची ग्वाही वारंवार देण्यात आली होती. ती या अंतरिम निकालाने फोल ठरली.
या निकालाला सरकार आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले जात आहे. राणे अहवालात व आरक्षण अध्यादेशात राहिलेल्या त्रुटी दूर करणार, नागपूर अधिवेशनात त्याबाबतचा नवा परिपूर्ण कायदा करणार, आम्ही दिलेला अहवाल व काढलेला अध्यादेश परिपूर्ण होता; पण न्यायालयात बाजू नीट मांडली गेली नसल्याने स्थगिती मिळाली असेही दावे केले जात आहेत.
पहिली गोष्ट न्यायालयाने दिलेली ही स्थगिती तांत्रिक मुद्दय़ांवर दिलेली नसून अतिशय सखोल घटनात्मक मुद्दय़ांवर आणि सज्जड कारणांनी दिलेली असल्याने सर्वोच्च न्यायालयात जाऊनही यात काहीही बदल होण्याची शक्यता नाही. मुळात हे आरक्षण घटनाबाह्य मार्गाने दिलेले असल्याने ते न्यायालयात टिकणार नाही, असे तज्ज्ञ सांगत होते; पण त्या वेळी कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
उच्च न्यायालयाने हा अंतरिम स्थगिती आदेश देताना जी कारणे नमूद केलेली आहेत, त्यांची गुणवत्ता पाहता अंतिम निकाल काय लागेल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. ५ जानेवारीला सुनावणी पुढे सुरू होईल. या प्रकरणातला पहिला दावा २00९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे, त्याचा हा अंतरिम निकाल आहे, हे लक्षात घेता अंतिम निकाल यायला किती अवधी लागेल याचाही अंदाज करता येऊ शकतो.
स्थगितीसाठी उच्च न्यायालयाने दिलेली पुढील कारणे इतकी भक्कम आहेत, की त्यात सर्वोच्च न्यायालयही हस्तक्षेप करू शकेल असे वाटत नाही. निवडणुकीच्या तोंडावर मराठा मतबँक डोळ्यांसमोर ठेवून कोणतेही तातडीचे कारण नसताना, हा मराठा आरक्षण अध्यादेश काढणे हे असंवैधानिक पाऊल होते असे खडे बोल न्यायालयाने या निकालपत्रात सुनावले आहेत.
१. सर्वोच्च न्यायालयाने १९६३ सालच्या बालाजी प्रकरणापासून वारंवार घालून दिलेल्या दंडकानुसार आरक्षण ५0 टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीच ही ५0 टक्के र्मयादा नसेल तर समतेच्या तत्त्वाचा भंग होईल असे घटना परिषदेत ३0 नोव्हेंबर १९४८ रोजी सांगितलेले होते.
सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यांमध्ये याचा पुनरुच्चार केलेला आहे. तथापि अतिअपवादात्मक परिस्थितीत खास बाब म्हणून आरक्षण ५0 टक्केपेक्षा जास्त ठेवता येऊ शकेल असेही सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मात्र मराठा समाज हा प्रगत आणि सत्ताधारी समाज असल्याने व तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला नसल्याने त्याच्यासाठी ही र्मयादा ओलांडण्याचे कोणतेही कारण नाही असे उच्च न्यायालय म्हणते. घटनेनुसार (कलम १५-४ आणि १६-४) आरक्षणासाठी सामाजिक मागासलेपणा हा मुख्य निकष आहे. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित असल्याने त्याला अशाप्रकारचा अपवाद करून आरक्षण देता येणार नसल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
२. न्यायालय पुढे म्हणते, “मंडल आयोगाने १९८0 सालीच मराठा समाजाला प्रगत आणि प्रभावशाली समाज घोषित करून मराठा जातीला ओबीसी आरक्षणासाठी अपात्र ठरवले आहे. तसेच २५ फेब्रुवारी २000 रोजी भारत सरकारच्या केंद्रीय मागासवर्गीय आयोगानेही मराठा समाजाला तो प्रगत व सत्ताधारी असल्याने आरक्षण देता येणार नाही असे स्पष्ट केलेले आहे.” या दोन्ही अहवालांमध्ये आता बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही.
३. राज्य सरकारने नेमलेल्या न्या. बापट आयोगाने (राज्य मागासवर्ग आयोग, २00८) मराठा समाजाला आरक्षण देणे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा अहवाल दिलेला आहे. या अहवालाचा फेरविचार करण्याचे कोणतेही सयुक्तिक कारण नसल्याचे सांगून विद्यमान न्या. भाटिया आयोगानेही अशा फेरविचाराला स्पष्ट नकार दिलेला असल्याने राज्य आयोग, केंद्रीय आयोग आणि मंडल आयोग या तिन्हींनी मराठा आरक्षण नाकारल्याने उच्च न्यायालयाने हा राज्य सरकारचा अध्यादेश रद्दबातल ठरवला आहे. न्या. बापट आयोगाचा हा अहवाल राज्य सरकारने राणे समितीच्या शिफारशींवरून अंशत: फेटाळला असला, तरी २००८ पासून आजपर्यंत सरकारने तो विधीमंडळासमोर सादर केलेला नाही. तसेच राणे समितीचा अहवालही विधीमंडळासमोर ठेवलेला नाही,  असेही न्यायालयाने आदेशात नमूद केलेले आहे. राज्यपालांनी अध्यादेश काढण्याची कोणतीही तातडीची बाब नव्हती असेही न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.

४. मा. सर्वोच्च न्यायालयाने १६ नोव्हें. १९९२ रोजी मंडल आयोगाच्या  निकालात यापुढे आरक्षण देण्याची शिफारस फक्त वैधानिक आयोगालाच करता येईल असे स्पष्ट  केलेले आहे. या आदेशाचे उल्लंघन करून राणे समिती नेमण्यात आली. राणे समिती म्हणजे राज्य व केंद्रीय मागासवर्ग आयोगांचे अधिकार डावलून सरकारने टाकलेले घटनाबाह्य पाऊल असल्याने त्या अहवालाला घटनात्मकदृष्ट्या काहीही स्थान नाही असे न्यायालयाचे मत आहे.
 राणे समितीने दिलेला अहवाल अतिशय सदोष आहे. आधीच मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्याला पोषक अहवाल तयार करण्याची ही कृती होती.  राणे कमेटीचा अहवाल अकरा दिवसांच्या घाईघाईत केलेल्या, अशास्त्रीय शासकीय पाहणीवर आधारित असून, त्यासाठी चुकीचा नमुना घेतलेला होता. मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याचा कोणताही पुरावा या अहवालात दिलेला नाही.
 शासनाने राणे समितीची निर्मिती सर्वोच्च न्यायालयाने याआधीच अधिक्रमित केलेल्या निकालाच्या आधारे केली होती.  उच्च न्यायालयाने हा संपूर्ण राणे अहवाल  ५ ठोस कारणे देऊन फेटाळून लावला आहे.


५.  या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी राज्य सरकारतर्फे एक महिन्याची मुदत मागण्यात आली. तोवर सदर स्थगितीचा निर्णय रोखून धरावा अशी विनंती उच्च न्यायालयाला करण्यात आली. तीही उच्च न्यायालयाने सपशेल फॆटाळून लावली. यावरून हा अध्यादेश न्यायालयाने संपूर्णपणे मोडीत काढल्याचे स्पष्ट होते.

 मराठा जातीची संघटित, आक्रमक आणि विशेष उपद्रवमुल्य असलेली मतब्यांक लक्षात घेऊन न्यायालयीन निर्णयातील हे कटू सत्य मराठा समाजाला सांगण्याचे धैर्य मराठा आरक्षण समर्थक, मराठा समाजाचे राजकीय नेते आणि नवे सरकार यापैकी कोणाकडेही असल्याचे दिसत नाही.
मुळात आम्ही आरक्षण दिले होते पण न्यायालयाने ते रद्द केले त्याला आम्ही काय करणार? असे भासवण्याचा हा सगळा खटाटोप नी राजकीय उद्योग होता आणि आजही तो पुढे चालू असल्याचे दिसते.

जनतेच्या न्यायालयाने राणे समितीतील खुद्द राणे यांच्यासह समितीचे सदस्य आणि तत्कालीन मंत्री सर्वश्री शिवाजीराव मोघे, बबन पाचपुते, सचिन आहीर या सर्वांना निवडणूकीत पराभूत केले. जनतेने मराठा आरक्षण समर्थक सरकारही घालवले. मराठा आरक्षणाचे प्रवक्ते विनायक मेटे, रेखा पुरूषोत्तम खेडेकर, हर्षवर्धन पाटील यांच्यासह बहुतेक सर्वांना निवडणुकीत पराभूत झाल्याचे पाहावे लागले. हरियानात जाटांना आरक्षण देणारे जाट सरकार गेले. महाराष्ट्रातील मराठा सरकारही असेच गेले.

भारतीय संविधानातील आरक्षणविषयक तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाचे याबाबतचे  विविध निकाल, विविध मागावर्गीय आयोगांचे अहवाल या सर्वांचे उल्लंघन करून मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आल्याने तो रद्द करण्यात आला व त्याची अंमलबजावणी तातडीने स्थगित करण्यात आली हे या निकालपत्रावरून स्पष्ट होते.
http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=12
......................................................................

Monday 24 November 2014

Muslims, dalits and tribals make up 53% of all prisoners in India

http://timesofindia.indiatimes.com/india/Muslims-dalits-and-tribals-make-up-53-of-all-prisoners-in-India/articleshow/45253329.cms

Muslims, dalits and tribals make up 53% of all prisoners in India


Muslims, dalits and tribals make up 53% of all prisoners in India
A relative meets a prisoner in a Punjab jail. According to a report, India had 4.2 lakh people in prison in 2013.

NEW DELHI: Muslims, dalits and adivasis — three of the most vulnerable sections of Indian society — make up more than half of India's prison population, according to an official report on prisons released this month. Although the proportion of these three communities in India adds up to about 39%, their share amongst prisoners is considerably higher at 53%.

India had 4.2 lakh people in prison in 2013. Nearly 20% of them were Muslims although the share of Muslims in India's population is about 13% according to Census 2001. Religion-wise data from Census 2011 is yet to be released but it is unlikely to be much different. Dalits make up 22% of prisoners, almost one in four. Their proportion in population is about 17% according to Census 2011. While adivasis make up 11% of prisoners, their share in the general population is 9%.

Most experts say that this disturbing trend is not because these communities commit more crimes. Rather, it arises because they are economically and socially under-privileged, unable to fight costly cases or often even pay for bail. Some say that these communities are targeted with false cases.


Former chief justice of Delhi high court Rajinder Sachar, who headed the committee that brought out a report on the condition of Muslim community in India in 2006, pointed out that there had been several cases of Muslim youths being acquitted after years in prison.

"Poverty is more prevalent among these three communities and that becomes an obstacle in dealing with the legal system," said Colin Gonsalves, human rights activist and lawyer.

"Our system has an ingrained communal and casteist bias. Also, the proportion of these communities in the police officers and even judiciary is less. These are key factors behind this shocking imbalance," he added.

Pointing out that nearly 68% of the prisoners are undertrials, Abusaleh Sharif, who was member-secretary of the Sachar Committee and later brought out an updated report on the conditions of Muslims, said that they had to remain behind bars because of inability to negotiate the hostile system.


An inmate working at a workshop in Tihar Jail.

"Among those in prison under preventive detention laws, nearly half are Muslims. This is the kind of thing that the government needs to speedily investigate and resolve," Sharif said.

Ramesh Nathan of the National Dalit Movement for Justice alleged that false cases are filed against dalits in order to intimidate them, causing this disturbingly high number of prisoners among vulnerable sections.

"In my experience as a lawyer, whenever a dalit person files a case under the Atrocities Act, a false countercase under some penal code provision is filed by the culprits," he said.

Prison statistics are published annually by the National Crime Records Bureau since 1995, although caste breakup is available since 1999. The proportions of Muslims, dalits and adivasis have remained virtually unchanged over the past 15 years indicating that this is a systemic problem.

http://timesofindia.indiatimes.com/india/Muslims-dalits-and-tribals-make-up-53-of-all-prisoners-in-India/articleshow/45253329.cms

Sunday 23 November 2014

मराठ्यांची पिछेहाट

Kalamnaama, 16 Nov.2014http://kalamnaama.com/marathyanchi-pichhehat/
By  on November 16, 2014
0
feature size
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्यावेळी दि. यशवंतराव चव्हाणांनी हे राज्य मराठी असेल, फक्त मराठ्यांचं असणार नाही असं म्हटलं होतं. परंतु नंतरच्या भविष्यकाळात महाराष्ट्राचा राज्यकारभार मराठ्यांच्या हाती एकवटला. महाराष्ट्रात राहणारा तो मराठा असा व्यापक विचार न करता, केवळ शहाण्णव कुळी मराठे म्हणजेच मराठे असा विचार करणारा महाराष्ट्रातील एक वर्ग नातेसंबंधांनी एकमेकांशी बांधला जात जात सत्तेच्या राजकारणातही बांधला जात होता. हा सत्तेच्याभोवती जमा झालेला मराठा समाज अल्पकाळात उच्चभ्रू झाला. उच्चभ्रू झाल्यानंतर हळूहळू तो सत्ता गृहीत धरू लागला आणि सत्ताही आपतः आपल्याकडेच येणार असं समजून वावरू लागला. याची अनेक कारणं होती. त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे या समाजाने सहकाराच्या माध्यमातून राज्याच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती राहतील याची खबरदारी घेतलेली होती. मराठा समाजाच्या घट्ट विणल्या गेलेल्या राजकारणाला या निवडणुकीत पहिल्यांदाच निर्णायक शह दिला गेला. त्याचं श्रेय जसं नरेंद्र मोदींच्या प्रचारयंत्रणेला जातं तसंच ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या अकर्तृत्ववान कार्यशैलीलाही जातं. अर्थात ते पराभवाचं तत्कालीन कारण म्हणावं लागेल, त्यांनी आपल्या नाकर्तेपणाने या पडझडीवर शेवटचा दिवा लावला, हे खरंच आहे. या पडझडीचा प्रारंभ तब्बल वीस वर्षांपूर्वीच झालेला होता. त्याची चाहूल शरद पवार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याला तेव्हाच लागली होती. परंतु जरी कळलं तरी त्यांनाही वळलं नाही, हेही तितकंच खरं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वसंतराव भागवत, पुण्याचे बौद्धिक प्रमुख श्रीपती शास्त्री, प्रमोद महाजन आदींनी १९८०च्या दशकात जाणिवपूर्वक घेतलेल्या निर्णयांचा परिपाक म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा कार्यकर्ता घडला आणि सार्वजनिक जीवनात आला. त्यांचं राजकारणात येणं हा मराठ्यांच्या राजकारणाला शह देण्याचा प्रारंभ होता. सत्तेसाठी केवळ ब्राह्मण समाजाचं संघटन उपयोगाचं नाही, तर त्यात बहुजन समाजाला बरोबर घेऊन पुढे जावं लागेल हा विचार तेव्हाच्या जनसंघाच्या आणि नंतरच्या काळातील भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या डोक्यात रुजवणं ही गोष्ट सहज सोपी नव्हती. परंतु वसंतराव भागवत यांनी ते केलं आणि संघाच्या मुशीतून तयार झालेल्या लोकांना अशी माणसं आपल्या बरोबर आणण्यासाठी भाग पाडलं. त्याचा परिणाम म्हणून विधिमंडळातील राम नाईक, रामभाऊ म्हाळगी हे लोक मागे पडून त्यांच्याजागी गोपीनाथ मुंडे, ना. स. फरांदे, अण्णा डांगे, पांडुरंग फुंडकर यांच्यासारखे ब्राह्मणेतर आणि मराठेतर लोक निवडून आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे रंग बदलू लागले.
परंतु आपला प्रभाव कमी होतो आहे, सत्ता आपल्या हातून निसटते आहे याची जाणीव काँग्रेसमध्ये प्रस्थापित झालेल्या उच्चभ्रू नेत्यांना नव्हती. जो तो आपापल्या साम्राज्यात मश्गूल होता. सहकाराची कुरणं चरून झाली तसे ते शैक्षणिक साम्राज्य उभारणीच्या कामाला लागले. वास्तवात ते काम समाजाच्या उपयोगाचं होतं. परंतु त्याचा उपयोग नेतेमंडळी आपापल्या तुंबड्या भरण्यासाठी किंवा आपापल्या मतदारसंघाचाच विचार करण्यासाठी करू लागल्यानंतर लोकांच्या विशेषतः बहुजनांच्या मनातून ते उतरण्याची सुरुवात झाली.
१९८५च्या विधानसभा निवडणुकीत जे निकाल आले त्यातून एका नव्या सामाजिक समीकरणाचा प्रवास सुरू झालेला होता. त्याचवेळी विलेपार्ले मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि नवजात भाजपा हे पक्ष तथाकथित हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आले. यातून भाजपाला राज्यात शिवसेनेच्या माध्यमातून व्यापक बहुजन समाजाचा समावेश असलेला पाया प्राप्त झाला. यात गरीब मराठा (आणि ब्याण्णव कुळी मराठा), माळी, तेली, कुणबी, चांभार, लिंगायत, आग्री, वंजारा असे मराठेतर समाज बरोबर आले. याचा परिणाम म्हणून १९९०च्या निवडणुकीत मंडल आयोगाच्या शिफारशीच्या पार्श्वभूमीवर (बाळासाहेब ठाकरे यांनी मंडल आयोगाच्याविरोधी भूमिका घेऊनही) शिवसेना-भाजपा युती ही सत्तेच्या जवळ आली. परंतु त्यांना काहीच जागा कमी पडल्या आणि सत्ता येणं हुकलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना याचं भान होतं परंतु ते अगतिक होते. त्यामुळे विरोधीपक्ष नेतेपद त्यांनी मनोहर जोशी यांना दिलं. परंतु शरद पवार यांनी पक्षात जोरदार मागणी असूनही मुख्यमंत्रिपदावर वंजारी असलेल्या सुधाकरराव नाईक यांची निवड केली जाईल अशी व्यवस्था केली. हे गणित समजून घेण्याची क्षमता मात्र त्यांच्या सहकार्यांमध्ये नव्हती. त्यामुळे डॉ. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारखे मराठा नेते नाराजच राहिले होते. हे गणित जुळवण्याच्या हेतूने शरद पवार यांनी राज्यातील बहुजन समाजाचं धुरीणत्व स्वीकारण्याच्या परिस्थितीत असलेल्या छगन भुजबळ यांच्याशी बोलणी सुरू केली आणि त्यांना यशस्वीपणे काँग्रेसच्या तंबूत आणलं. परंतु १९९२-९३च्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या १९९५च्या निवडणुकीत मतांचं ध्रुवीकरण शिवसेना-भाजपाच्या बाजूने झालं. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा लक्षणीय प्रमाणात घटलेल्या पहायला मिळाल्या. कारण मराठा मतदार काँग्रेसपासून दुरावत तर होताच पण इतरेजनही त्यांच्यापासून दूर होत चालले होते. हे लक्षात घेऊन शरद पवार यांनी धोरणीपणाने दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपदांवर मराठेतरांची म्हणजे भुजबळ आणि पिचड यांची नियुक्ती केली. अर्थात शिवसेना-भाजपाबरोबर सभागृहात दोन हात करण्याची तेव्हाच्या एकाही मराठा नेत्याची तयारी नव्हती हा भाग वेगळा. त्या निवडणुकीत शिवसेनेने आणि भाजपाने केलेली रणनीतिही लक्षात घेण्यासारखी होती. लोकसभेला मराठा उमेदवार असेल तर विधानसभेसाठी मराठेतर बहुजन समाजाचा उमेदवार आणि विधानसभेसाठी मराठा समाजाचे उमेदवार उभे केले तर लोकसभेसाठी मराठेतर बहुजन समाजाचा उमेदवार देऊन तोल साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. भाजपाने मात्र सजगपणे मराठा समाजाला बाजूला ठेवून बहुजनांचं जाणिवपूर्वक राजकारण अंमलात आणण्याची भूमिका बजावली. त्याचा प्रयोग मुंडे यांनी सर्वप्रथम स्वतःच्या बीड जिल्ह्यातच करून पाहिला होता.
काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर मराठा नेतृत्वाचीही शकलं झाली आणि काही नेते पवारांच्याबरोबर तर काही त्यांच्या विरोधात असं विभाजन झालं. ते महाराष्ट्रात त्या आधीपासूनही होतंच. परंतु आताच्या विभाजनात परंपरेने शरद पवार यांच्याबरोबर राहणारा मराठवाड्यातील मराठा समाज बाजूला झालेला होता. त्याची जागा पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेली होती. विभक्तपणे लढवलेल्या त्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागा आणखी घटल्या. त्यात दुरावलेल्या मराठा समाजाचा वाटा मोठा होता. मराठा समाज केवळ दुरावलेला नव्हता तर तो विखुरलेला पण होता. सत्तेच्या जवळ राहण्याचं तंत्र विकसित केलेल्या मराठा कुटुंबांतील लोक भाजपाकडे अपेक्षेने पाहू लागलेले होते. उदाहरणार्थ, विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू थेट भाजपाच्या डेर्यातच दाखल झाले होते. तर शरद पवार यांचे पुतणे आणि ‘सकाळ’ उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पवार यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचे मनसुबे रचले होते. हे चित्र एका बाजूला असतानाच बाळासाहेब विखे पाटील यांचं वेगळंच गणित सुरू होतं. त्यांनी शिवसेनेची वाट धरली होती. उत्तर महाराष्ट्रात भाजपाने आपलं बस्तान आधीच बसवलेलं होतं. मराठवाड्यातली माती भाजपाच्या वाढीला पोषक होतीच. त्याला बीज टाकण्याचीच खोटी होती.
त्यामुळे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारताना या पक्षांवर असलेल्या मराठा समाजाचा पगडा लक्षात घेऊन त्यांना नाकारलेलं आहे, हे त्या पक्षाने विसरून चालणार नाही.
भाजपाने ज्या पद्धतीने लोकांना आपल्याबरोबर घेतलं, त्यासाठी जाणिवपूर्वक जे प्रयत्न केले त्याची दखल काँग्रेसच्या नेतृत्वाने कधीच घेतली नाही. त्यांना तेवढा वेळही कधी मिळाला नाही. काँग्रेस पक्षात महत्त्वाची भूमिका बजावणार्या परंतु समाजात संख्येने कमी असलेल्या ब्राह्मण समाजाला गेल्या ६० वर्षांच्या काळात यशस्वीपणे दूर केलं गेलं. उदाहरण, विठ्ठलराव गाडगीळ यांचं देता येईल. त्यांच्या पश्चात अनंत गाडगीळ यांनाही पुढे जाता येऊ नये अशी तजवीज राज्यातील मराठा नेतृत्व करत असे. पण हे केवळ त्यांच्यापुरतं मर्यादित न ठेवता आपल्याला डोईजड होईल अशी शक्यता निर्माण होताच त्याचा काटा काढण्याची कार्यपद्धती विकसित केली गेली. त्या पद्धतीने धुळ्याच्या रोहिदास पाटील यांना विलासराव देशमुख यांनी बाजूला केलं. तर छगन भुजबळ राज्यात आणि बाहेर जाऊन मराठेतरांच्या सभा जरा जास्तच गाजवताहेत असं लक्षात येताच त्यांचे पंख कापण्याची व्यवस्था खुद्द शरद पवार यांनीच केली. परंतु कालांतराने हे आपल्यावर बूमरँग होईल याची जाणीव या नेत्यांना नव्हती.
पक्षात आपल्यापेक्षा हुशार, शिकलेले किंवा अभ्यासू लोक येणार नाहीत याची खबरदारी घेणारे अनेक मराठा नेते काळाच्या पडद्याआड जातील तेव्हा निर्माण होणारी पोकळी मोठी असणार आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टीला पर्याय कोणता असा प्रश्न मतदारांच्या समोर असेल. तोपर्यंत मराठा समाज एकसंधपणे एका पक्षाच्या मागे उभा राहणार नाही. तोही विखुरलेला असेल. महाराष्ट्राचं राजकारण एका जोखमीच्या वळणावर आलेलं आहे, हेच खरं.
http://kalamnaama.com/marathyanchi-pichhehat/
मराठ्यांची पिछेहाटPosted 1 week ago
By धनंजय कर्णिक on November 16, 2014

Monday 17 November 2014

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती का दिली?

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती का दिली?

प्रा.अशोक बुद्धीवंत

{लेखक आरक्षण प्रश्नाचे अभ्यासक आहेत.}

ashok.buddhivant@gmail.com

१४ नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. अवघ्या चारच महिन्यांपुर्वी निवडणुकीच्या तोंडावर राज्यसरकारने दिलेले १६% मराठा आरक्षण काढून घेण्यात आल्याने मराठा समाजात नैराश्याची भावना पसरली आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकावे यासाठी काटेकोर दक्षता घेण्यात आल्याची ग्वाही आरक्षण  समर्थक नेते वारंवार देत होते.
आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले जात आहे. राहिलेल्या त्रुटी दूर करणार, नागपूर अधिवेशनात परिपूर्ण कायदा करणार, आम्ही दिलेला अहवाल सर्वोत्तम होता पण न्यायालयात बाजू नीट मांडली गेली नसल्याने स्थगिती मिळाली असेही सांगितले जात आहे.

पहिली गोष्ट न्यायालयाने दिलेली ही स्थगिती तांत्रिक मुद्द्यांवर दिलेली नसून अतिशय सखोल घटनात्मक मुद्द्यांवर आणि सज्जड कारणांनी दिलेली असल्याने सर्वोच्च न्यायालयात जाऊन काहीही उपयोग होणार नाही.पण लक्षात कोण घेतो? हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असे तज्ञ सांगत होते पण मंडळी ऎकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

मा.  उच्च न्यायालयाने हा अंतरिम स्थगिती आदेश देताना जी कारणे नमूद केलेली आहेत त्यांची गुणवत्ता पाहता अंतिम निकाल  काय लागेल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. ५ जानेवारीला सुनावणी पुढे सुरू होईल. या प्रकरणातला पहिला दावा २००९ साली मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे नी त्याचा हा अंतरिम निकाल आहे, हे लक्षात घेता अंतिम निकाल यायला किती अवधी लागेल याचा अंदाज करायला हरकत नाही.

न्यायालयाने दिलेली पुढील कारणे इतकी भक्कम आहेत की त्यात मा. सर्वोच्च न्यायालयही हस्तक्षेप करू शकणार नाही.

१. सर्वोच्च न्यायालयाने १९६३ सालच्या बालाजी प्रकरणापासून वारंवार घालून दिलेल्या दंडकानुसार आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये. अति अपवादात्मक परिस्थितीत खास बाब म्हणून आरक्षण ५०% पेक्षा जास्त ठेवताही येते मात्र मराठा समाज हा प्रगत नी सत्ताधारी समाज असल्याने  व तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला नसल्याने त्याच्यासाठी ही मर्यादा ओलांडण्याचे कोणतेही कारण नाही असे न्यायालय म्हणते. ही राणे अहवालातील त्रुटी नसून ते समाज वास्तव आहे. त्यात कसा बदल करणार?

२.न्यायालय म्हणते,  " मंडल आयोगाने १९८० सालीच मराठा समाजाला प्रगत आणि प्रभावशाली समाज घोषित करून मराठा जातीला ओबीसी आरक्षणासाठी अपात्र ठरवले आहे. तसेच २५ फेब्रुवारी २००० रोजी केंद्रीय मागासवर्गीय आयोगानेही मराठा समाजाला तो प्रगत नी सत्ताधारी असल्याने आरक्षण देता येणार नाही असे स्पष्ट केलेले आहे."  या दोन्हींमध्ये आता बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही. राज्य सरकार तरी त्याबाबतीत काय करू शकणार?

३. न्या. बापट आयोगाने { राज्य मागासवर्ग आयोग, २००८ } मराठा समाजाला आरक्षण देणे सामाजिक दृष्ट्या अयोग्य असल्याचा अहवाल दिलेला आहे. या अहवालाचा फेरविचार करण्याचे कोणतेही संयुक्तीक कारण नसल्याचे सांगून  विद्यमान न्या. भाटीया आयोगाने अशा फेरविचाराला स्पष्ट नकार दिलेला असल्याने राज्य आयोग, केंद्रीय आयोग आणि मंडल आयोग या तिन्हींमध्ये आता कोणताही बदल शक्य नाही. शिवाय हा न्या.बापट आयोगाचा अहवाल राज्य सरकारने राणे समितीच्या शिफारशींवरून अंशत: फेटाळला असला तरी २००८ पासून आजपर्यंत सरकारने तो विधीमंडळासमोर सादर केलेला नाही. तसेच राणे समितीचा अहवालही विधीमंडळासमोर ठेवलेला नाही.

४. मा. सर्वोच्च न्यायालयाने १९९२ साली मंडल आयोगाच्या  निकालात यापुढे आरक्षण देण्याची शिफारस फक्त वैधानिक आयोगालाच करता येईल असे स्पष्ट  केलेले आहे. या आदेशाचे उल्लंघन करून राणे समिती नेमण्यात आली. समितीने दिलेला अहवाल अतिशय सदोष आहे. आधीच मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्याला पोषक अहवाल तयार करण्याची ही कृती होती. राणे समिती म्हणजे राज्य व केंद्रीय मागासवर्ग आयोगांचे अधिकार डावलून सरकारने टाकलेले घटनाबाह्य पाऊल असल्याने त्या अहवालाला घटनात्मकदृष्ट्या काहीही स्थान नाही.  मुळात ही राणे कमेटी जशी अवैध होती तसाच तिचा अहवालही अकरा दिवसांच्या घाईघाईत केलेल्या, चुकीचा नमुना घेतलेल्या, अशास्त्रीय शासकीय पाहणीवर आधारित असून, त्यात मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही. शिवाय राणे समितीची निर्मितीच सर्वोच्च न्यायालयाने याआधीच अधिक्रमित केलेल्या निकालाचा हवाला देऊन करण्यात आलेली असल्याने उच्च न्यायालयाने हा संपूर्ण राणे अहवाल  ५ सज्जड कारणे देऊन फेटाळून लावला आहे.

५. निवडणुकीच्या तोंडावर मराठा मतब्यांक डोळ्यासमोर ठेऊन कोणतेही तातडीचे कारण नसताना हा मराठा आरक्षण अध्यादेश  काढणे हे असंवैधानिक पाऊल होते असे न्यायालय म्हणते.

६.  या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी राज्य सरकारतर्फे एक महिन्याची मुदत मागण्यात आली. तोवर सदर स्थगितीचा निर्णय रोखून धरावा अशी विनंती उच्च न्यायालयाला करण्यात आली. तीही न्यायालयाने सपशेल फॆटाळून लावली. यावरून हा अध्यादेश न्यायालयाने संपूर्णपणे मोडीत काढल्याचे स्पष्ट होते.

असे असले तरी मराठा जातीची संघटित, आक्रमक आणि उपद्रवमुल्य असलेली मतब्यांक लक्षात घेऊन हे सत्य मराठा समाजाला सांगण्याचे धैर्य मराठा आरक्षण समर्थक, मराठा समाजाचे राजकीय नेते आणि नवे सरकार यापैकी कोणाकडेही नाही.

मुळात आम्ही आरक्षण दिले पण न्यायालयाने ते रद्द केले त्याला आम्ही काय करणार असे भासवण्याचा हा सगळा खटाटोप नी राजकीय उद्योग होता आणि आजही आहे.

सुज्ञ मराठा विचारवंत, लेखक आणि पत्रकार यांनी ह्या निकालाकडे दुषित पुर्वग्रह बाजूला ठेऊन पाहावे आणि हे सत्य समाजाला सांगण्याचे धैर्य दाखवावे असे नम्र आवाहन करावेसे वाटते.

जनतेच्या न्यायालयाने राणे समितीतील खुद्द राणे यांच्यासह समितीचे सदस्य आणि तत्कालीन मंत्री शिवाजीराव मोघे, बबन पाचपुते, सचिन आहीर या सर्वांना निवडणूकीत पराभूत केले. जनतेने मराठा आरक्षण समर्थक सरकार घालवले. मराठा आरक्षणाचे प्रवक्ते विनायक मेटे, रेखा पुरूषोत्तम खेडेकर, हर्षवर्धन पाटील यांच्यासह बहुतेक सर्वांना निवडणुकीत पराभूत झाल्याचे पाहावे लागले. हरियानात जाटांना आरक्षण देणारे जाट सरकार गेले. महाराष्ट्रातील मराठा सरकारही असेच गेले. "सत्तेचे तेल गेले नी आता न्यायालयाने आरक्षणाचे तूपही काढून घेतले." याचा बोध कोणी घेतील काय?
................................


Sunday 16 November 2014

खरे आव्हान निराळेच




मुळात आरक्षण हे गरिबी दूर करण्याचे माध्यम नाही, हे या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे. ज्या समाजावर कर्मविपाक सिद्धांत लादून ज्ञान, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यापासून ज्यांना दूर ठेवण्यात आले, त्यांना जीवनाच्या मूलभूत प्रवाहात आणणे व त्यांना सामाजिक, आर्थिक अधिकारांमधील हिस्सा देणे हा आरक्षणाचा मूळ हेतू होता. 

आजही महाराष्ट्रातील जवळपास ५४ टक्के रोजगार निर्मिती ही शेतीशी संबंधित आहे. अधिकाधिक रोजगार हे शेतीबाह्य क्षेत्रांतून निर्माण होणे हे आधुनिक युगात प्रगतीचे लक्षण समजले जाते. मात्र, तशा प्रकारची प्रगती आपल्याकडे न झाल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या मराठा समाजाचे प्रश्न अत्यंत बिकट होत गेले. त्यातच शेतीतून बाहेर पडून शहरांमध्ये गेलेल्या मराठा समाजातील पिढीला शहरातील आधुनिक जगात म्हणावे तितके स्थान न मिळाल्याने त्यांना आरक्षणाचा मार्ग खुणावू लागला. यातून योग्य मार्ग काढणे हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतो असे सांगत राज्यशकट हाकणाऱ्यांचे कर्तव्यच होते. त्यासाठी पडीक शासकीय जमिनी लागवडीखाली आणणे, शेतमालाला रास्त भाव देणे, रोजगारप्रधान कारखानदारीला प्रोत्साहन देणे, शिक्षण व आरोग्याच्या सोयींमध्ये समानता आणणे आणि त्यांचा दर्जा वाढवणे, सार्वजनिक वितरणव्यवस्था शेतकऱ्यांवर अन्याय न करता सक्षम करणे, यांसारख्या गोष्टी अंमलात आणता आल्या असत्या. मात्र, राज्यकर्त्यांनी स्वतःचे आर्थिक हितसंबंध लक्षात घेऊन आरक्षणाचा मार्ग निवडला. यातून खरा प्रश्न सुटणे शक्य नसले तरी मराठा समाजातील तरुण पिढी व्यवस्थेविरोधात संघर्षाच्या भूमिकेत उभी राहणार नाही, याची काळजी मात्र घेतली गेली. 
.....................................................................


मुंबई हायकोर्टाने आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला दिल्या गेलेल्या १६ टक्के आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यातून महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनात मोठ्या उलथापालथी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, या विषयावरील मतमतांतरे लक्षात घेऊन लोकशाही मार्गानेच यातून मार्ग काढणे यथोचित ठरेल. मुळात आरक्षण हे गरिबी दूर करण्याचे माध्यम नाही, हे या निमित्ताने लक्षात घ्यायला हवे. ज्या समाजावर कर्मविपाक सिद्धांत लादून ज्ञान, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यापासून ज्यांना दूर ठेवण्यात आले, त्यांना जीवनाच्या मूलभूत प्रवाहात आणणे व त्यांना सामाजिक, आर्थिक अधिकारांमधील हिस्सा देणे हा आरक्षणाचा मूळ हेतू होता. कष्टकरी समाजाला ज्ञान, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा या गोष्टींमध्ये त्यांचा अधिकार मिळावा यासाठी त्या समाजाला स्वतःचा बुद्धिजीवी वर्ग निर्माण करावा लागतो, असे अंतोनिओ ग्रामची यांचे म्हणणे होते. भारतात हा बुद्धिजीवी वर्ग निर्माण व्हावा यासाठी आरक्षणाची गरज प्रथम महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली. पुढे राजर्षी शाहूंनी त्यांच्या राज्यात या संकल्पनेची अंमलबजावणी केली. तर डॉ. आंबेडकरांनी त्याला घटनात्मक स्वरूप दिले. मात्र, स्वातंत्र्यानंतर दुर्दैवाने देशातील राज्यकर्त्यांनी या धोरणाची योग्य अंमलबजावणी न करता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. त्यातच नव्वदच्या दशकात भारताने कल्याणकारी राज्य व्यवस्थेपासून दूर जात खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाची कास धरली. जागतिकीकरणाची भूमिका स्वीकारल्यानंतर 'नाही रे' वर्गासमोरील विषमतेचे प्रश्न उग्र व गुंतागुंतीचे बनले. त्यातून मग आर्थिक प्रश्नांची उकल करण्याचे माध्यम म्हणून आरक्षणाकडे पाहण्याचा नेत्यांचा कल वाढू लागला. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी वंजारी, धनगर आदी समाजांचा भटक्या विमुक्तांमध्ये समावेश केला आणि आता तर या समाजाची स्वतःच्या जातींचा समावेश आदिवासी प्रवर्गात करून घेण्याची मागणी पुढे आली आहे. दुसरीकडे याच दरम्यान मराठा समाजातूनही स्वतःला मागास म्हणवून घेण्यासाठी आंदोलन उभे राहिले. 

कृषक समाजातील या सर्व जातींचे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत, यात काहीच वाद नाही. महाराष्ट्रात तर शेतीमध्ये रयतवारी पद्धत असल्यामुळे मराठ्यांमधील बहुतांश शेतकरी हा अल्पभूधारक किंवा मध्यम शेतकरीच आहे. वेगाने शहरीकरण होणाऱ्या देशातील काही मोजक्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक लागतो. औद्योगिकीकरणातही महाराष्ट्रापेक्षा आम्हीच पुढे, अशीच बढाई शेजारील गुजरात कायम मारत असतो. मात्र तरी, आजही महाराष्ट्रातील जवळपास ५४ टक्के रोजगार निर्मिती ही शेतीशी संबंधित आहे. अधिकाधिक रोजगार हे शेतीबाह्य क्षेत्रांतून निर्माण होणे हे आधुनिक युगात प्रगतीचे लक्षण समजले जाते. मात्र, तशा प्रकारची प्रगती आपल्याकडे न झाल्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या मराठा समाजाचे प्रश्न अत्यंत बिकट होत गेले. त्यातच शेतीतून बाहेर पडून शहरांमध्ये गेलेल्या मराठा समाजातील पिढीला शहरातील आधुनिक जगात म्हणावे तितके स्थान न मिळाल्याने त्यांना आरक्षणाचा मार्ग खुणावू लागला. यातून योग्य मार्ग काढणे हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतो असे सांगत राज्यशकट हाकणाऱ्यांचे कर्तव्यच होते. त्यासाठी पडीक शासकीय जमिनी लागवडीखाली आणणे, शेतमालाला रास्त भाव देणे, रोजगारप्रधान कारखानदारीला प्रोत्साहन देणे, शिक्षण व आरोग्याच्या सोयींमध्ये समानता आणणे आणि त्यांचा दर्जा वाढवणे, सार्वजनिक वितरणव्यवस्था शेतकऱ्यांवर अन्याय न करता सक्षम करणे, यांसारख्या गोष्टी अंमलात आणता आल्या असत्या. मात्र, राज्यकर्त्यांनी स्वतःचे आर्थिक हितसंबंध लक्षात घेऊन आरक्षणाचा मार्ग निवडला. यातून खरा प्रश्न सुटणे शक्य नसले तरी मराठा समाजातील तरुण पिढी व्यवस्थेविरोधात संघर्षाच्या भूमिकेत उभी राहणार नाही, याची काळजी मात्र घेतली गेली. त्यामुळेच आज मराठा, वंजारी, धनगर वा बहुजन समाजातील तरुण पिढीसमोर उभे राहिलेले प्रश्न सोडवायचे असल्यास या समाजातील होतकरू तरुण पिढीने बनचुक्या राजकीय नेतृत्वाला झुगारून सर्व प्रकारच्या विषमतेविरोधात संघर्षशील होणे गरजेचे आहे. शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, नोकऱ्या यांमधील संधी शोधून त्या मिळवण्यासाठी पुढे आले पाहिजे. जातीव्यवस्था समूळ नष्ट होण्यासाठीच्या लढाईचे नेतृत्व केले पाहिजे. मराठा समाजाबद्दल उर्वरित बहुजन समाजात असलेला दुरावा नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आरक्षण देणे वेगळे आणि जातीनिहाय आरक्षण असणे वेगळे. या सगळ्यांचा 'व्होट बँक' म्हणून वापर करण्यापेक्षा त्यांचे सामाजिक, आर्थिक स्थान कसे सुधारेल, याकडे लक्ष देण्याची अधिक गरज आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/editorial/hc-mumbai-maratha-reservation/articleshow/45170987.cms