सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
विधायक दृष्टीचा अभाव ‘भाषा कूस बदलते आहे’ या प्रशांत असलेकर यांच्या लेखातील (लोकसत्ता, लोकरंग २३ सप्टेंबर) महात्मा फुले यांच्याबद्दलची म्हण आमच्यातरी ऐकण्यात नाही. कदाचित चारदोन ठिकाणी असे कुणी म्हणत असेल, तर ते चूक आहे, यात वादच नाही. संपूर्ण भारतात स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी सारे आयुष्य वेचणाऱ्या एका महापुरुषाबद्दल लेखकास यत्किंचितही माहिती नाही, असाच याचा अर्थ होतो. महात्मा फुले यांनी त्या काळातील सनातन समाजाच्या विरोधात जाऊन एका नव्या चळवळीचा प्रारंभ केला म्हणूनच आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला जे कर्तृत्व गाजवू शकत आहेत, याची जाणीव प्रत्येक पुरुषानेही ठेवणे आवश्यक आहे. ऊठसूट कोणत्याही महापुरुषाबद्दल समाजात असलेल्या आदराला हादरा देण्याची ही वृत्ती निश्चितच विधायक नाही. राजा राममोहन रॉय यांनी देशातील सतीची चाल बंद व्हावी यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच आंदोलन छेडले होते. स्त्रियांना शिक्षण देण्याची चळवळ घरापासूनच सुरू करणाऱ्या महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीलाच प्रथम शिक्षित केले आणि तिच्याकडेच विद्यादानाची जबाबदारीही सोपवली, त्यामुळेच १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. पुरोगामी राज्य असे बिरुद देशभर मिरवणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला याबद्दलचा इतिहास ज्ञात असणे आवश्यक आहे. प्रशांत असलेकर यांना तो माहीत नसावा असे दिसते. महात्मा फुले यांच्याबद्दल असे काही लिहिण्यापेक्षा त्यांनी अधिक विधायक दृष्टी अंगीकारणेच श्रेयस्कर आहे. - सुरेश माळोदे क्षमस्व २२ सप्टेंबर रोजी ‘लोकरंग’ पुरवणीत माझा ‘भाषा कूस बदलते आहे’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात अनवधानाने महात्मा फुले यांच्याबद्दल काही उल्लेख होता. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची माफी मागतो. तरुणाईच्या तोंडी हल्ली रुजलेल्या (पण, अभिजात भाषाप्रेमींना न पटणाऱ्या) शब्दांच्या यादीत तो उल्लेख होता आणि भाषेने घेतलेले हे वळण योग्य नाही, असाच लेखाचा एकूण सूर होता. तसेच, हे थोपवता येत नसल्याबद्दल लेखात खंतही व्यक्त केली होती. महात्मा जोतीबा फुले यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या पायाभरणीत त्यांचे फार मोठे योगदान आहे. मी स्वत:सुद्धा त्याच पायावर उभा आहे व त्यांचाच अनुयायी आहे, त्यांचा अनादर मी कसा करू शकेन? पुनश्च एकवार क्षमस्व. - प्रशांत असलेकर महाराष्ट्राला ‘महा’राष्ट्र करणाऱ्यांत थोर समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांचे नाव कायमच अग्रणी आहे, असे ‘लोकसत्ता’ मानते. प्रशांत असलेकर यांच्या लेखात, त्यांच्याबद्दल चुकीचा आणि अपमानकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. - संपादक |
Monday, 8 October 2012
आम्ही दिलगीर आहोत. - संपादक, ‘लोकसत्ता
Sunday, 7 October 2012
देशाचा अजेंडा बदलणारे खासदार : समीर भुजबळ
by: Prof. Hari Narke
९ आक्टोबर हा नाशिकचे लोकप्रिय आणि तरुण,तडफदार खासदार श्री.समीरभाऊ भुजबळ यांचा वाढदिवस.नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे खासदार समीरभाऊ यांची झेप फार मोठी आहे. त्यांच्या कामाचे अनेक पैलू आहेत.वाढदिवसाच्या निमित्ताने विचारवंत प्रा. हरी नरके यांनी त्यांच्या ओबीसीविषयक ऎतिहासिक योगदानावर टाकलेला एक प्रकाशझोत.....
देशातील सर्वात मोठा लोकसमुह हा ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गियांचा आहे.मंडल आयोगानुसार या समुदायाची देशभरात एकुण ५२% लोकसंख्या आहे.या प्रवर्गात राज्यात एकुण ३४६ जाती आहेत तर देशपातळीवर ही जातींची संख्या २०६३ एव्हढी आहे.आजघडीला देशात या जातींची लोकसंख्या म्हटले तर ६० कोटींच्या पुढे जाईल. एव्हढ्या प्रचंड लोकसंख्येच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारतर्फे अंदाजपत्रकात फार तुटपुंजी रक्कम ठेवली जाते. याचे कारण काय? असा प्रश्न विचारला की उत्तर मिळते, या लोकांची नेमकी लोकसंख्या सरकारला माहित नसल्याने तरतुद कशी करणार?ओबीसींना सरकारने १९९० साली मंडल आयोगानुसार केंद्रात २७% आरक्षण दिले तेव्हा इंद्र साहनी आणि इतर ८० जण त्याविरुध्द न्यायालयात गेले. न्यायालयाने सरकारला ओबीसींची संख्या विचारली तर सरकार म्हणाले माहित नाही. २००६ साली उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण आले, अशोककुमार ठाकुर आणि इतर लोक कोर्टात गेले. पुन्हा तोच प्रश्न.पुन्हा तेच उत्तर.
ओबीसी विद्यार्थ्यांना गेली काही वर्षे शिष्यवृत्त्या मिळालेल्या नाहीत.त्यामुळे लाखो मुलामुलींचे भवितव्य अंधारात आहे.असे का तर बजेट नाही. लाखो बेरोजगार ओबीसींना रोजगार धंदा करायचा आहे, पण त्यासाठी ओबीसी महामंडळाकडे कर्ज मागितले तरी मिळत नाही कारण महामंडळाला निधी नाही.रस्ते,वीज.पाणी,घरे,दवाखाणे हवेत पण पैसे नाहीत.सरकार म्हणते आम्हाला ओबीसींची नेमकी लोकसंख्या माहित नसल्याने आर्थिक तरतुद करता येत नाही.धोरणे ठरवता येत नाहीत.देशाचा नियोजन आयोग देशाच्या पंचवार्षिक योजनेची आखणी करतो.अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या अहवालात आयोगाने छापील कबुली दिली की आम्ही ओबीसींची जातवार जनगणना नसल्याने लोकसंख्येच्या व इतर माहितीच्या अभावी धोरणे आखु शकत नाही.१९५५ साली कालेलकर आयोग,१९८० साली मंडल आयोग,२००८साली रेणके आयोग या सर्वांनी जनगणनेची मागणी केलेली होती.खरे तर पहिल्यांदा ही मागणी केली होती १९४६ साली भारतरत्न डा.बाबासाहेब आंबेडकरांनी.पण ल्क्षात कोण घेतो?
सुमित्रा महाजन ह्यांच्या अध्यक्षतेखालील खासदारांच्या संसदीय स्थायी समितीने आपल्या अहवालात सरकारला एकमुखाने ओबीसींची माहिती मिळावी यासाठी त्यांची जनगणना करण्याची शिफारस केली. महात्मा फुले समता परिषदेने गेली २०वर्षे ही मागणी लावुन धरलेली होती.समता परिषद त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही गेली होती.
बाहेर रस्त्यावर वातावरण तापत होते. अश्यावेळी संसदेत ६मे २०१० रोजी प्रथमच या विषयावर एक आवाज गुंजला.सा-या लोकसभेला त्याची दखल घ्यावी लागली.तो आवाज होता नाशिकचे खासदार श्री.समीरभाऊ भुजबळ यांचा.त्यांनी ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची लोकसभेत मागणी केली.त्याला खासदार गोपीनाथ मुंडे, शरद यादव, लालुप्रसाद,मुलायम सिंग, नारायण सामी, विराप्पा मोईली,अजित सिंग अश्या अनेक दिग्गजांनी पाठिंबा दिला. सरकार तयार नव्हते. खासदार अडुन बसले.सरकार नमले.१९३१ नंतर तब्बल ८० वर्षांनी अशी जनगणना करण्याची घोषणा सरकारने केली.सरकार का नमले? कारण यामागणीमागे समीरभाऊंनी फार मोठी नैतिक आणि घटनात्मक ताकद उभी केली होती. घटनेच्या कलम ३४०नुसार सरकारची ही जबाबदारी असल्याची जाणीव सरकारला प्रथमच करुन देण्यात आली.
लालू,मुलायम,शरद हे तिन्ही यादव अनेक वेळा केंद्रात मंत्री होते. पण त्यांच्या डोक्यात हा अजेंडाच नव्हता.तो त्यांच्या डोक्यात भरवला खासदार समीरभाऊंनी.वयाने सगळ्यात लहान असलेले भाऊ हे करु शकले ते मा.नेते छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनामुळे.आज भाऊंच्या आग्रहामुळे सरकारने प्रथमच ओबीसी कल्याणासाठी खासदारांची संसदीय स्थायी समिती स्थापन केली आहे.समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक मताने समीरभाऊ निवडले गेले.गेली दोन वर्षे ओबीसींसाठी सरकारने दरडोयी दररोज निधीची केलेली व्यवस्था होती अनुक्रमे आधी एक पैसा आणि आता दोन पैसे.हीच रक्कम अनुसुचित जाती आणि जमातींसाठी असते उपघटक योजनेनुसार दरडोयी दरवर्षी सुमारे रुपये सहा हजार! आणि ओबीसींसाठी मात्र अवघी साडेचार रुपये आणि नऊ रुपये.
समीरभाऊंच्यामुळे २ आक्टोबर २०११ रोजी ऎतिहासिक जातवार जनगणना सुरु झालेली आहे. सरकारचे हे काम वर्ष झाले तरी धिम्या गतीने चालु आहे.हा रडीचा डाव आहे. हे काम सरकारने लौकर पुर्ण करावे यासाठी भाऊ प्रयत्नशील आहेत. हे काम झाले की ओबीसींच्या विकासाचे पुढचे २५ वर्षांचे चक्र गतिमान होईल.
ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, ओबीसी महिलांना विधानसभा व लोकसभेत महिला आरक्षणांतर्गत आरक्षण मिळावे,ओबीसी उपघटक योजना सुरु करुन लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात वाटा मिळावा, ओबीसी कायदा व्हावा अश्या आणि ईतर अनेक गोष्टींसाठी भाऊ प्रयत्नशील आहेत.त्यांच्या प्रयत्नांना जनतेची आणि सरकारची साथ मिळो आणि ओबीसींच्या अजेंड्याचे नवे संकल्पचित्र देशाला मिळो हीच शुभेच्छा!नाशिकचा आणि ओबीसींचा सर्वांगीण विकास त्यांचा श्वास आहे.त्याला सुयश लाभो!
...........................................................................................................................................................
प्रा.हरी नरके/ विभागप्रमुख-महात्मा फुले अध्यासन,पुणे विद्यापिठ,पुणे ७
महात्मा फुल्यांची बदनामी करणारा हाच तो लेख
{सौजन्य:लोकसत्ता,लोकरंग,रविवार दि.२३ सप्टें.२०१२} भाषा कूस बदलते आहे.. |
आमच्या लहानपणी मध्यमवर्गीय जीवनशैलीतले जे अनेक शब्द आम्ही वापरत होतो, ते शब्द आजच्या मुलांना समजत नाहीत. काही शब्द अस्तंगत झालेत. नव्या जीवनशैलीत त्यांना काही स्थानच उरलेलं नाही. तर काही जुन्या शब्दांची जागा नवीन शब्दांनी घेतलीय. पण त्यातली जुनी खुमारी मात्र पार निघून गेलीय..
परवा दिवशीची गोष्ट! माझ्या मुलीला तिच्या काही मैत्रिणी बोलवायला आल्या. तिला घेऊन त्यांना कुठेतरी बाहेर जायचे होते. माझी मुलगी तेव्हा अगदी घरगुती अवतारात होती. तिचे केस विस्कटलेले होते. मैत्रिणी आल्या म्हणून आणि बाहेर जायचंय म्हणूनसुद्धा तिला खूप आनंद झाला. तिची धांदल उडाली. तिने पटापट कसातरी स्वत:चा अवतार आवरला. केसांवर फक्त हात फिरवून चाप लावला आणि ती गडबडीने बाहेर जायला निघाली. तिचा तो अवतार बघून मी तिला म्हणालो, ‘‘अगं, अशी कशी बाहेर जातेस? जरा सरसं कर!’’ माझी मुलगी गोंधळली, ‘सरसं कर’ हा शब्द तिला समजला नाही. तिच्या मैत्रिणींनाही तो शब्द कळला नाही. नीट समजावून सांगितल्यावर तिच्या भाषेत ‘हेअरस्टाईल’ ठीकठाक करून ती निघून गेली.
हल्ली असं वारंवार घडतंय. आमच्या लहानपणी मध्यमवर्गीय जीवनशैलीतले जे अनेक शब्द आम्ही वापरत होतो, ते शब्द आजच्या मुलांना समजत नाहीत. काही शब्द अस्तंगत झालेत. नव्या जीवनशैलीत त्यांना काही स्थानच उरलेलं नाही. तर काही जुन्या शब्दांची जागा नवीन शब्दांनी घेतलीय, पण त्यातली जुनी खुमारी मात्र पार निघून गेलीय. या ठिकाणी १९५० वगैरेचे नॉस्टेल्जिक काळ अभिप्रेत नाही, तर अगदी अलीकडचा- गेल्या २५-३० वर्षांचा काळ अभिप्रेत आहे. वाढते शहरीकरण, इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव, बदलती जीवनशैली, समाजजीवन यामुळे आपल्या बोलीभाषेत कळत-नकळत बदल घडताहेत. मराठी भाषेत यापुढे अनेक शब्द असे उरतील, की ते संदर्भ, वाक्प्रचार म्हणून वापरले जातील; पण त्यांचा अर्थ कळण्यासाठी भावी पिढय़ांना शब्दकोश चाळावे लागतील. सीमेंट-काँक्रीटच्या आजच्या चेहराहीन जगात ‘घर सारवणे’, ‘भिंती लिंपून घेणे’, ‘अंगणात सडा घालणे’ वगैरे गोष्टी कालबाह्य़ झाल्यात. त्यामुळे या क्रियांशी संबंधित जे वाक्प्रचार आहेत ते पुढच्या पिढीला सहजपणे कळणार नाहीत. चुकांसाठी सबबी सांगणे, कारणे देणे याला आपण ‘सारवासारवी’ म्हणतो. प्राजक्ताच्या फुलांचा सकाळी जमिनीवर जो खच पडतो त्याला आपण ‘फुलांचा सडा’ म्हणतो. एखाद्या कामातल्या चुका दुरुस्त करण्याला मराठी व हिंदीत ‘लिपापोती’ म्हणतात. भिंती जशा सारवून घेतल्या जायच्या, तसं चुलींना चिखलात फडकं भिजवून ‘पोतेरं’ केलं जायचं. त्या फडक्याची अवस्था दयनीय व्हायची. म्हणून एखाद्याचा खूप अपमान केला की, ‘त्याचं पोतेरं केलं’ असं म्हटलं जायचं. यापुढे मराठी भाषेत ‘सारवासारवी’, ‘सडा पडणे’, ‘लिपापोती’, ‘पोतेरं केलं’ हे शब्द राहतील; पण त्यांचा अर्थ सहजासहजी कळणार नाही. कारण हे शब्द ज्या क्रियांमधून उद्भवतात त्या गोष्टीच जीवनशैलीतून बाद झालेल्या आहेत. काही जुन्या शब्दांची जागा नव्या इंग्रजी शब्दांनी घेतलीय. पण त्यातली खुमारी मात्र निघून गेलीय. ‘साबण मोरीत ठेवलाय’ असं सांगितलं की मुलांना समजत नाही. जुन्या सवयीनुसार मी कधी ‘मोरी’ हा शब्द वापरला की माझी मुलं बुचकळ्यात पडतात. बाथरूम म्हटलं की त्यांच्या लगेच लक्षात येतं. (कार्टी जशी काही इंग्लंडलाच जन्माला आलीत!) लहानपणीची अंधारी, थंडगार, नरक चतुर्दशीला आणि केस कापल्यावर आईने खसाखसा घातलेल्या आंघोळीची आठवण करून देणारी ‘मोरी’ चाळीबरोबरच पाडली गेली आणि कायमची हरपली. ‘स्वयंपाकघर’ हा फोडणीच्या वासाची, ठसक्याची, खकाण्याची आठवण करून देणारा अगडबंब, पण वैशिष्टय़पूर्ण शब्दही असाच लयाला गेलाय. त्याची जागा कुठलाच चेहरामोहरा नसलेल्या ‘किचन’ने घेतलीय. स्वयंपाकघर म्हटलं की जिभेला पाणी सुटायचं. किचन म्हटलं की कुठलेच भाव मनात उमटत नाहीत. मी कधी चुकून ‘स्वयंपाकघर’ हा शब्द उच्चारला तर माझी मुलं, ‘हा कोण भोटमामा आम्हाला बाप म्हणून नशिबी आलाय?’ अशा नजरेने माझ्याकडे बघतात. ‘पन्नास पान सहज उठेल’ अशा परिमाणात जिचं क्षेत्रफळ सांगितलं जायचं ती ‘बैठकीची खोली’ ही अशीच अंतर्धान पावली आहे. ताईचं लग्न ठरलं तेव्हा तिने दाजींकडे टाकलेले चोरटे कटाक्ष ज्या बैठकीच्या खोलीने अनुभवले ती आता ‘हॉल’ झाली आणि तिच्यातली गंमतच निघून गेली. आजीच्या उबदार गोधडीची आठवण करून देणारी ‘आतली खोली’ आता ‘बेडरूम’ झालीय. नावातूनच ती फक्त झोपण्याशी नातं सांगते. शेणानं सारवलेल्या अंधाऱ्या ‘आतल्या खोलीत’ एक अंगभूत थंडावा असायचा. तिथे आजीच्या कुशीत शिरलं की पटकन् झोप लागायची. तिचं बेडरूम झाल्यापासून एसी लावूनसुद्धा फॉल्स सीलिंगवरचे रेडियमचे चंद्रतारे झोप आणत नाहीत. लहानपणी आजोबा व्हरांडय़ात आरामखुर्चीत बसून पेपर वाचायचे. व्हरांडा हे आजोबांचं साम्राज्य होतं. ‘व्हरांडा’ हा शब्द उच्चारताच आजोबांच्या धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा भास व्हायचा. त्याची सर चवळीच्या शेंगेसारख्या ‘गॅलरी’ला कुठली? तिचा उपयोग फक्त वॉशिंग मशीन ठेवण्यापुरताच! नववधू म्हणे उंबऱ्यावरचं धान्याचं माप लवंडून घरात प्रवेश करते. त्यातलं ‘धान्याचं माप’ पन्नास-पाऊणशे वर्षांपूर्वीच मोडीत निघालं. हल्लीच्या नववधूंना धान्य भरलेला ग्लास ओलांडायला तरी ‘उंबरा’ कुठेय? उंबरा हे काय प्रकरण असायचं ते येणाऱ्या पिढीला समजावून सांगावं लागेल. हीच गोष्ट ‘मांडणी’, ‘कोनाडे’, ‘फडताळं’, ‘खुंटाळे’, ‘ताटाळे’ वगैरे शब्दांबाबत. मॉडय़ुलर किचनच्या जमान्यातल्या मुलांना हे शब्द समजणारच नाहीत. नव्या गृहरचनेत त्यांना काही स्थानच उरलेलं नाही. पाणी पिण्याची भांडी रचून ठेवण्यासाठी पूर्वी ‘घडवंची’ असायची. कांदे ठेवायचं ‘शिंकाळं’ असायचं. चटणी वाटायला ‘पाटा-वरवंटा’, शेंगदाणे कुटायला ‘खलबत्ता’ असायचा. आजोबांचा ‘बटवा’, तर आजीची ‘चंची’ असायची. आजोबा अंगात बिनबाह्य़ाचा सदरा घालायचे त्याला ‘कोपरी’ म्हणायचे. आजीच्या नऊवारी साडीच्या काष्टय़ाच्या फुलोऱ्याला ‘कमळ’ म्हणायचे. आजोबा कोपरीच्या आतल्या खिशात व आजी कमळात पैसे ठेवायची. चुलीला ‘वैल’ असायचा. भाकरीला ‘पातोडा’ असायचा. घराला ‘आढं’ असायचं. उरलेलं अन्न काढून ठेवायला ‘शकुंतला भांडं’ असायचं. तुपासाठी ‘सतेलं’ असायचं. तेलाची ‘बुधली’, माठ ठेवण्यासाठी ‘तिपाई’, लहान बाळांना पाणी पाजायला ‘बुडकुलं’, मोठय़ांसाठी ‘फुलपात्रं’ असायचं. उभा तो ‘गंज’ आणि पसरट तो ‘कुंडा’ असयाचा. फुलांची ‘परडी’ असायची. दुपारी पडायला ‘बारदान’, ‘गोणपाट’, ‘चटई’ वापरायचे. स्टोव्हमध्ये रॉकेल भरण्यासाठी ‘नरसाळं’ व स्टोव्ह पेटवण्यासाठी ‘काकडा’ असायचा. तीच गोष्ट ‘अंबाडा’, ‘गंगावन’, ‘खोपा’, ‘केसांची जाळी’ वगैरे गोष्टींबाबत. आजच्या मुलींना ‘गंगावन’ हा शब्द कितपत कळेल याबद्दल शंकाच वाटते. पैसा मुबलक झाल्यामुळे कपडे फाटेपर्यंत वापरले जात नाहीत, त्यामुळे ‘ठिगळ’, ‘रफू’ हे शब्दही विरून गेलेत. घरांची रचना, पोशाखपद्धती, राहणीमान आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हे सारे शब्द आता लोप पावले आहेत. एकीकडे हे शब्द लयाला गेलेत, तर काही नवीन शब्द उदयालाही येत आहेत. ग्रॅन्ड फिनाले (स्पर्धेची अंतिम फेरी), फॅसेड (दर्शनी भाग), ग्रोमो (ट्रेलरचा नवा अवतार), अब्रा-का-डब्रा (कुठल्याही विषयातलं प्राथमिक ज्ञान), आरएसव्हीपी (समारंभाला किती माणसे उपस्थित राहणार, हे आगाऊ कळवणे), पसरी खाणे (दिलेला शब्द फिरवणे), डबल ढोलकी (दोन्ही बाजूने बोलणारा माणूस), चवल्या वारणे (खोटं बोलणे), कॅलेन्डर छापणे (गरोदर होणे), चमकेश (समारंभात मिरवणारे लोक), वंटास हो (चल निघ), चिरीमिरी (लाच), मांडवली/ तोडपाणी (समेट), शानपत्ती (शहाणपणा), फाटय़ावर मारणे (किंमत न देणे), किक् बसणे (नशा चढणे), वन टू का फोर (नाहीसे होणे), मकडीछाप, लपूट (बावळट मनुष्य), डाव- छावी- आयटेम (जिच्यावर प्रेम करतो ती मुलगी), जीपीएल (हिचा अर्थ सर्वश्रुत आहे), आडेतीर (चुकीची औषध उपाययोजना), चमाट (चापट), हड्डीकट (लो-वेस्ट जीन्स) असे काही नवीन शब्द जन्माला आले आहेत. भाषेच्या वापराबाबतही काही नव्या समजुती रूढ होत आहेत. ‘मी तुमचं धन्यवाद करतो’ (आभार मानतो) यात कुणाला फारसं गैर वाटेनासं झालंय. ‘मिळणे’ या अर्थाने ‘भेटणे’ हे क्रियापद तर इतकं सर्वमान्य झालंय, की (पाचवी गाडी ‘भेटली’, नव्वद टक्के मार्क ‘भेटले’, अॅडमिशन ‘भेटली’, चान्स ‘भेटला’ वगैरे) ‘मिळणे’ हे शुद्ध क्रियापद वापरणारा आता बावळट ठरू लागलाय. सुशिक्षित लोकांच्या तोंडीही ‘मिळणे’ अशा अर्थाने ‘भेटणे’ हे क्रियापद रुळलंय. त्यात कुणाला गैरही वाटेनासं झालंय. त्याचप्रमाणे ‘रिकामा/ रिकामी’ या शब्दासाठी ‘खाली’ हा शब्दही सर्वमान्य झालाय. उदा. आज गाडी ‘खाली’ होती. रस्ता ‘खाली’ होता. कुशल कामगारांसाठी ‘कारागीर’ हा शब्द रूढ झालाय. गियर बदलताना अॅक्सेलेटर बंद करावा लागतो त्याबाबत ‘मोसम’ हा शब्द वेग, त्वरण या अर्थाने रूढ झालाय. गाडीने ‘मोसम’ पकडला, गियर टाकताना गाडीचा ‘मोसम’ तुटला, ही भाषा रूढ झालीये. ‘काम लागतंजुगतं झालं की येतो’ याऐवजी ‘कामाला चाल भेटली की येतो’ असं म्हटलं तरी कुणाला त्यात वावगं वाटत नाही. एसेमेस, चॅटिंगची स्वत:ची अशी एक वेगळी लघुभाषा तर निर्माण झालीच आहे. प्रत्येक व्यवसायाची वेगळी परिभाषा असते. तीही बदलतेय. शिवाय भाषेची काही वैशिष्टय़े शहरांपुरतीही असतात. ठाणे जिल्ह्य़ात ‘ठाण्याला नेलं पाहिजे’ म्हणजे (तिथे मेंटल हॉस्पिटल असल्यामुळे) वेडय़ाच्या इस्पितळात भरती केलं पाहिजे असा अर्थ समजला जातो. नागपुरात ‘फजूल फोके’ म्हणजे पोकळ बढाया, तर पुण्यात ‘निघतो’ अशा अर्थाने ‘सुटतो’ हा शब्द वापरतात. (खूप उशीर झाला, मी आता ‘सुटतो’.) मुंबईच्या पश्चिम उपनगरात ‘बस आली’ यासाठी ‘माझी लैला आली’ म्हणतात. भाषेची ही प्रादेशिक वैशिष्टय़ं बदलत नसतील कशावरून? सगळ्यात जास्त नवल वाटतं ते दोन शब्दांचं! ‘मला बावळट समजतोस का?’ अशा अर्थाने ‘मी काय अलिबागहून आलेलो आहे का?’ असं विचारतात, ते का? आणि खूप बोलणाऱ्या माणसासाठी सर्रास ‘बोलबच्चन’ हा शब्द वापरला जातो, तो कसा? ‘अलिबागवरून येणे’ व ‘बोलबच्चन’ हे दोन्ही शब्द पंधरा वर्षांपूर्वी नव्हते. त्यांचा उगम कसा झाला? १२ मैलांवर भाषा बदलते म्हणतात तशी दर १२ वर्षांनंतरही भाषा बदलत जाते का? ही कोडी कधीच उलगडणारी नाहीयेत. जे आज नवं आहे, रुचत नाहीये, तेसुद्धा उद्या जुनं होणार आहे. उद्या तेही विलयाला जाणार आहे. शेवटी खंत तरी कशाची बाळगायची? ज्ञानेश्वरीतील मराठी कळत नाही म्हणून आम्ही तक्रार करायचो. लोकहितवादींची, आगरकरांची, ‘काळ’कर्ते शिवरामपंत पराजपेंची मराठी आम्हाला अवघड वाटायची. हे लोक असं अवघड का लिहायचे, असा प्रश्न तरुणपणी पडायचा. गेल्या २५-३० वर्षांत मराठी भाषेनं घेतलेलं वळण बघितल्यावर वाटू लागलंय की, आज आपण जे लिहितोय तेही काही काळाने दुर्गम्यच होणार आहे. आपल्या कळत-नकळत भाषा कूस बदलते आहे. ते थोपवणंही आपल्या हातात नाही. ......................................................................................................... टिप:.... "हले डुले महात्मा फुले" अशी नवी म्हण मध्यमवर्गियांमध्ये वापरली जात असल्याची माहिती असलेकारांनी दिलेली आहे.या म्हणीचा अरथ "खिळखिळीत निसटती वस्तु"असा त्यांनी दिलेला आहे. सदर मजकुर छापील लेखात आहे.मात्र वाद निर्माण झाल्यानंतर हातचलाखीने तो नेटवरुन उडविण्यात आला आहे....
..............................................................................................................
|
Thursday, 27 September 2012
What’s Wrong With Blasphemy?
By ANDREW F. MARCH
The Stone is a forum for contemporary philosophers on issues both timely and timeless.
Suppose there had not been a single riot in response to the now infamous video “The Innocence of Muslims,” Not a single car burned, not a single embassy breached, not a single human being physically hurt. Would the makers of this risible little clip have done anything wrong? If so, to whom, and why?
These questions are now at the center of an international debate. President Obama himself touched on the issue in his speech to the United Nations General Assembly on Tuesday, in which he directly addressed the violent reaction in the Muslim world to the “crude and disgusting video.” But does philosophy have anything to say to the view that many people have that there is something about this kind of speech itself — not just its harm to public order or its adding of insult to the injury of imperialism and war — that should not be uttered or produced?
Do our rights extend to speech that mocks, insults or lies about things that others hold sacred?
Obviously, we think this about many other kinds of speech. Most of us think that it is wrong for white people to use the “n-word.” (Use it? I can’t even bring myself to mentionit.) Personally, I would feel a shiver of guilt and shame if that word crossed my mind as a thought about another person. And it’s not hard to account for that feeling. It is a word that is intimately associated with a chain of some of humanity’s greatest historical evils — the trans-Atlantic slave trade, the practice of chattel slavery and countless legal, social and psychological practices aiming at the effective dehumanization of persons of black African origin. To perpetuate it publicly is to harm other persons, and this matters objectively even if I don’t personally, subjectively care about the persons in question. But my feelings about this word are even deeper than this: I don’t even want to participate in the history that produced it and its meanings by letting it grow roots in my own mind.
This word is just an archetype to fix our thoughts. I feel that way about a lot of other words, even if nothing can quite rise to the level of emotion as that one. I can account in a very similar way for my disgust at similar epithets that seek to target for exclusion, suffering and disrespect gays, Jews, Arabs, Muslims, women and others. The suffering and disadvantage of humans matters, and I am doing nothing important in the world when I use such an epithet without considering the well-being of other humans. Even when it should be legal to so, I have good — often decisive — reasons for not using such speech.
This word is just an archetype to fix our thoughts. I feel that way about a lot of other words, even if nothing can quite rise to the level of emotion as that one. I can account in a very similar way for my disgust at similar epithets that seek to target for exclusion, suffering and disrespect gays, Jews, Arabs, Muslims, women and others. The suffering and disadvantage of humans matters, and I am doing nothing important in the world when I use such an epithet without considering the well-being of other humans. Even when it should be legal to so, I have good — often decisive — reasons for not using such speech.
Can the same be said not about epithets but about speech that mocks, insults or tells lies about things that others hold sacred, whether they be texts, human prophets or physical objects? What reasons do we have to censor ourselves (something we do all the time, and often for very good reasons) in how we speak about things other people hold sacred?
Most secular philosophical approaches to the morality of speech about the sacred are going to begin with three starting-points:
— Human beings have very strong interests in being free to express themselves.
— The “sacred” is an object of human construction and thus the fact that something is called “sacred” is insufficient itself to explain why all humans ought to respect it.
— Respect is owed to persons but not everything they value or venerate, even if other persons themselves do not uphold such a difference between their selves and their attachments.
These three premises make it hard for some common arguments about speech and the sacred to fully persuade. Here are six I find to be common.
1. Blasphemy transgresses a boundary and violates the sacred.
From the perspective of the religious, this is greatest harm in blasphemy. In Islamic law, for example, both God and the Prophet Muhammad not only have value for the believers, but also have interests and rights themselves. But what reason does this give others not to violate the sacred if they do not agree that x or y is sacred or has such awesome value? No reason at all.
2. We should respect whatever people regard as “sacred” or treat as religious.
I have no objection to this as one principle of the morality of speech. Certainly, the fact that X is called “sacred” by someone else should give me some reason to rethink what I am about to say. But there are two obvious problems here: (a) this gives other persons wide latitude to claim a veto over my speech by calling “sacred” things I find anything but: the American flag, David Miscavige, Mormon underpants; (b) and it is so easy to think of examples where I am doing valuable and important things in speaking that outweigh the otherwise regrettable fact that others are injured or pained as an unintended consequence of my speech.
3. People are deeply hurt and injured by violations of the sacred or objects of love.
This matters. The pain of others always matters. But pain alone cannot explain the totality of our moral relationships. People are pained by all kinds of things. People attach themselves to all kinds of histories, symbols and institutions. Pain is sometimes deserved. At the very least, it is sometimes a reasonable cost to bear for other things we value. The religious know this better than most of us.
4. Blasphemy is dangerous.
The great Thomas Hobbes went so far as to declare insults to be a violation of natural law, even before we enter the social contract. He would not have been surprised at the reaction to the Danish cartoons, the “Innocence of Muslims” film or any bar fight: “Any sign of hatred and contempt is more provocative of quarrels and fighting than anything else, so that most men prefer to lose their peace and even lives rather than suffer insult.” So, yes, the fact that an offensive word will contribute to an outbreak of violence is a very good reason not to utter it, often a decisive and sufficient reason. The problem is: what kind of reason? If we think that our words were reasonable and not meant to provoke, and we still censor ourselves, we are acting out of prudence or fear, and in a way treating the other as irrational. Aren’t humans capable of more inspiring terms of association than mutual fear?
5. Blasphemy is hate speech.
There is no question that many in the West today use speech about Muhammad and “Islam” as cover for expressing hatred toward Muslims. They know that if they are talking about “religion” they can deny they are talking about persons. Many people doing this — from Geert Wilders to those behind “Innocence of Muslims” — are indeed hate-mongers. But we should avoid the all-too-common conclusion that because much speech about Muhammad is de facto barely coded hate speech about Muslims (and much of it is), all such speech is. Many believers will in good faith testify that no one who expresses hatred for Islam’s doctrines and prophet can respect them as persons. I believe them. But from a secular moral perspective, there is no way to completely eliminate the gap between whatever qualities or value we imagine all humans to have and the many valuable attachments and beliefs actual humans are made of. After all, many religious thinkers will say that they despise secular materialism or atheism and yet still respect the misguided humans enslaved to those doctrines. I believe them then, too.
6. Blasphemy disrupts social harmony.
This is a different argument from the one that blasphemy is dangerous. Let us return to the “N-word.” A plausible case can be made that the widespread public use of this word does more than offend, harm or intimidate African-Americans. It harms a certain kind of public good that many Americans are striving hard to attain — the public good of a society where people feel safe, valued and at home in their social home. There is a way in which all Americans are the victims of such speech; for I as a white American have an interest in an America where my sense of belonging is not achieved at the expense of others. In Europe and North America today, lots of public blasphemy about Islam (especially in visual form) performs this function. It serves to tell Muslims: “We don’t trust you, we don’t like you, and it’s your job to change.” All we have to do is remember speech about Catholicism in this country until quite recently. Cartoons of Catholic bishops as crocodiles coming to devour potentially Protestant children were much worse than an assault on the institution of the Bishopric or a theological disputation about where Christ’s ecclesia is embodied. It was Protestant nativism directed at Catholics as persons, not only as believers.
For all the instinctive talk about the need for “respect for religion” or “sensitivity toward the sacred,” this I think is what most people find most troubling about everything from the “Innocence of Muslims” to the (much worse) “Muslim Rage” Newsweek cover of last week. And I agree. But there are at least two caveats: (a) it leaves us with the conclusion that there is absolutely nothing wrong with the blasphemous content of such speech per se (nothing about Catholics bishops or the Prophet Muhammad that should never be maligned) and (b) we have to explain what kinds of social relationships we are obligated to care for in this way. Yes, I have an obligation not to make my Scientologist neighbor feel unwelcome … but Tom Cruise? Bombs away.
~~~~
What I have tried to argue is that none of these common arguments alone gives us sufficient reason to refrain from blasphemous speech, merely because it is blasphemous, the way that I do feel I have more than sufficient reason to never use (and to try to never think) the n-word. But that doesn’t mean that none of the above were reasons not to violate what others hold sacred. They were reasons, just ones that might be outweighed by the value of the things I want to say.
So are we left with some crude felicific arithmetic: (amount of emotional pain) – (value of blasphemous speech uttered) = net morality of this or that utterance? I think there is something more to be said here.
We all too often speak about the harms of speech either in abstract terms (the speech is wrong) or in attribute-sensitive terms (one should not be mocked for this). But what is missing here is the sense of relational duties that so many of us feel. The view that one just says whatever one wishes regardless of the company one is keeping is not virtuous honesty or moral heroism, but a kind of moral autism. The content of speech is just one element of its morality; the recipient is another.
While certain aspects of morality ought to apply without regard for the identity of other persons and any relationships I may have with them, many other aspects of morality are precisely relational. I care about specific persons and my relationship with them. This increases the costs to my own conscience, moral costs, in saying things that I otherwise think are worth saying. There are lots of things I would normally say that I do not say to or around specific people. This is sometimes because I am scared of them, or scared of experiencing social awkwardness. Other times it is because I care about them and our relationship. They matter to me, and our relationship is a good worth sacrificing for. This is why we don’t tell lies, or do tell lies, to certain people.
Could the morality of blasphemy be something like this? No — there is no abstract, relation-independent wrong in mocking someone else’s prophet, even to the extent that I think there is wrong in using speech like the N-word. Instead, given the awareness of the impact such speech on others whom you might care about (even if you think it is wrong or silly for such speech to impact them in this way), the value you place on this relationships alters your moral judgment about such speech. The emotional world of someone about whom you care, or with whom you have a social relationship about which you care, matters to you when you speak.
Now, this is not a short-cut to merely condemning blasphemy. I may continue to judge my friends to be over-sensitive, or my speech to be so important, as to outweigh their emotional pain. And, of course, fellow citizens do not usually matter as much to me as people in my day-to-day life. And distant strangers matter still less. But, nonetheless, I think there is something for philosophy to encourage us to think about beyond the recycled clichés that emerge on all sides each time some new utterance creates an international crisis. At the very least, it encourages us to see conflicts over such speech not only as a conflict between the value of free speech and the value of sensitivity, but also in terms of social and political relationships that we have some obligation to care for.
Andrew F. March is an associate professor of political science at Yale University. He is the author of the book “Islam and Liberal Citizenship: The Search for an Overlapping Consensus” and a recent paper on free speech and religion in Political Theory.
Monday, 24 September 2012
‘Treat us like human beings’
“Yes, we steal at times, but when the only other option is to die of hunger, what else can you do? Treat us like human beings.”
So says Balkrishna Renke, Chairman for the National Commission for Denotified, Nomadic & Semi-Nomadic Tribes. He knows what he is talking about. Belonging to the Gondhri tribe in Karnataka, he is the son of a mendicant. His father earned his living as an itinerant singer. He never had a house to call his own, or an identity to prove his backwardness to the authorities and extract privileges. Struggling as a “general category” student, traversing the tough “earn and learn mode”, Renke, however, succeeded in acquiring an education. He became the first graduate from his community in the late 1960s. He lived for a while on a railway platform in Dadar, Mumbai, as he looked out for a job. He got appointed as a senior scientific officer in a forensic science laboratory in Mumbai where he worked for a few years. He left the job to organise his community to fight for a better life.
In 1972, the first ever convention of nomadic tribes was organised in Mumbai. Despite his meagre resources, Renke was able to gather 25,000 people from the nomadic tribes for the convention, which was inaugurated by the then Chief Minister of Maharashtra, V.P. Naik. Thus began his journey to ensure that crores of homeless people like him got their rightful share in society and a life of dignity.
He was appointed Chairman of the commission in 2005, and he submitted his report in 2008, 45 days ahead of the due date. But he is disappointed that the government has completely ignored it. Determined not to give up, he continues the struggle. Excerpts from an interview he gave Frontline:
Why in your opinion is the government ignoring the plight of such a huge section of people?
We are scattered, so we are not a vote bank for anyone. Besides, we have no forceful political personality who has come from among us, so we remain unheard. It is also the mindset. Though we have been denotified, people still treat us as criminal tribes. They suspect us. And because we are not treated as a separate class, we fail to avail ourselves of the benefits of S.C.\S.T.\OBC reservation either, whereas other, more powerful communities manage to pocket all the benefits. We have to struggle not only for benefits but for basic survival. Our traditional sources of livelihood having been banned, we are left with nothing to support us. That leads many of us into begging, rag-picking, miscellaneous odd jobs and also, yes, to theft. When one is left with no option, why wouldn’t one steal? If it becomes a matter of life and death because of hunger, then what is the option? It is the socio-political system that has turned us into thieves and beggars.
What should be done to lift the community out of its misery?
Count us separately, give us constitutional status, and provide us reservation in accordance with our numbers in education, jobs and politics. Give us our share in political participation, provide education and health services to our people, and last but not the least, give us a dignified identity. We are no longer criminal tribes, but the police continue to treat us so. Treat us as part of you, not as outcasts. Treat us like human beings.
How do you plan to achieve this, especially when the political class has remained indifferent to you all these years?
We will take to the streets. We are organising nationwide awareness campaigns. If we are living in a truly democratic country, then I am sure our combined numbers will one day become our strength and the political class will be forced to listen to us.
|
Midnight’s children
Indro Devi and her husband, Sarvnath, in a shelter of polythene and rags, on the outskirts of Delhi.
Emaciated, eyes sunken deep into sockets, skin hanging loose, almost gasping for breath, Indro Devi and Sarvnath, a couple in their eighties, lie on polythene sheets in an 8×10 square-foot tent made of rags, by a stinking nullah on the outskirts of Delhi. They have no means of supporting themselves: no income or old age pension, no access to government hospitals for treatment, no access to subsidised ration, no drinking water, no house to shield them from rain or chill, and no identity card to enable them to avail themselves of any government-run welfare schemes. They have been living in Delhi for 60-odd years but have nothing to call their own. Sixty-five years of development in free India has simply passed by them.
They are not alone in their mind-numbing misery. There are roughly 13.5 crore helpless people like them, enough to populate an entire State. And the Indian state has simply forgotten them.
They are the members of denotified, nomadic and semi-nomadic tribes who have lived in independent India for decades without any identity. Having no land to call their own, no place to call their own, no rights and no support from the government, forced to live in abject poverty, often harassed by the police, they are aliens in their own country. Their su-human existence forced the United Progressive Alliance (UPA) government to constitute a commission in March 2005, called the National Commission for Denotified, Nomadic & Semi-Nomadic Tribes, to study their condition and recommend remedial measures. The commission submitted its exhaustive, two-volume report to the government in June 2008.
The government has not taken any action on the report; it has not even made it public, which would have at least initiated a debate on this marginalised section. The report, of which Frontline has a copy, was prepared by a three-member team: Balkrishna Renke, who headed the commission; Laxman Bhai Patni, former Congress MLA from Gujarat; and Laxmichand, a retired IAS officer. A copy was presented to the then Social Justice Minister Meira Kumar (now the Lok Sabha Speaker), on July 2, 2008, and then to the Prime Minister on August 8. The Prime Minister wrote: “Process and prepare a note for Cabinet within two months.” Nothing happened. A presentation was made to the National Advisory Council led by Sonia Gandhi, but there has been no action from that quarter either.
The denotified tribes are those which were designated as criminal tribes by the colonial administration in 1871, mainly for committing crimes against the British Empire, which included participating in the 1857 rebellion. The Criminal Tribes Act was repealed in 1952, but the stigma attached to their past stuck to these tribes. Their nomadic habits ensured that they had no place to identify as their “native place”. Even when they tried settling down, they were treated as outcasts by the rest of society and were not allowed to mingle with the mainstream population. Deprived of their traditional sources of livelihood by a series of laws and prevented by their lack of education from making use of welfare schemes, they were pushed to the fringes of society.
The commission put the number of such tribes at 829, including 148 Scheduled Tribes (S.Ts), 260 Scheduled Castes (S.Cs), and 301 Other Backward Classes (OBCs). Going by figures provided by the governments of States, Union Territories and independent research bodies, the commission concluded that the total number of such people was 13.51 crore, which is a conservative estimate. The commission found that their main occupations were acrobatics, puppetry, singing, dancing, acting, snake charming, showing tricks with monkeys or bears, hunting, fortune-telling, selling herbal medicines, brewing liquor, begging, making handicrafts, doing construction work, and fishing. Many of these, however, have become criminal offences with the enactment of legislation such as the Wildlife Protection Act, the Prevention of Cruelty to Animals Act, the Environment Protection and Biodiversity Conservation Act, the Drugs and Magic Remedies Prohibition Act, and the Prevention of Beggary Act. Shorn of their traditional sources of livelihood and with nothing else to fall back on, they beg, rag-pick, sell themselves into prostitution, vend traditional craft items on the streets, and push their children into child labour. Singing and dancing at marriages remains a major occupation for many, but that is hardly enough.
Risha Devi, a Sapera community member, and her husband, Padam.
According to a national rapid survey done by the commission, the socio-economic status of these people remains pathetic: 94 per cent had no below poverty line (BPL) cards; 98 per cent were landless; 57 per cent lived in rag tents; and 72 per cent had no ration cards. Most of them lived in slums, they had no access to safe drinking water or affordable health services. Most of them reported harassment by the police; women reported sexual harassment. Most had no record of birth; there were no records of death, either.
A study of the Van Gujjar (S.T.) community from Himachal Pradesh provides an example. There were 850 families, and the commission found that none from these had attended school. None of them was enrolled on the voters’ list, none held a ration card or a government job, and the community had no political representation.
Other pastoral, nomadic communities such as the Bakharwals, Gaddis, Raikas, Gaikas and Rebaris do not fare any better. The Nutt community, with a population of 75,885 in Chhattisgarh, and others such as the Dombari, Masanjogi, Sapera and Madari communities are in a similar situation. The commission recommended a comprehensive survey on these communities, saying that lack of information was what chiefly came in the way of any meaningful intervention. It also recommended, in view of the extreme backwardness of these communities, that they should be taken out of the existing categories of S.Cs, S.Ts and OBCs and given separate constitutional status with a quota in education, jobs and elected posts. The commission also recommended that separate funds be earmarked for the development of these communities, an aggressive sensitisation campaign to create among them an awareness of their rights, and provision of training programmes to enable them to earn their living.
According to Renke, it is not as if governments are not doing anything. In Maharashtra, Gujarat, Madhya Pradesh, Delhi and Rajasthan, some welfare measures for these tribes have been initiated. For instance, residential schools have been set up for their children and scholarships have been instituted. But it is too little. “What we need is concerted action on the part of the government and separate reservation across the board,” he says. He has been mobilising members of these communities to demand their rights in Maharashtra since 1972. Now he plans to pitchfork his campaign to the national level.
A series of round table conferences are under way and will be followed by a nationwide Jan Jagran Yatra next year, to culminate in a rally in Delhi towards the end of 2013.
“Our community should get its dignity. We are not asking for anything more than our rights,” he says.
Channu Ram Bavaria is the founder head of the All India Bavaria Samaj Sangathan in Haryana, an organisation of the denotified Bavaria tribe which was famed for its military and hunting prowess—it helped native Indian kings fight the Mughals and then the British. The colonial government treated the tribe’s members as criminals. Bavaria laments that so many years after the colonial rulers left, real freedom still eludes the community. “Even today our community remains one of the most backward; we have been excluded from all welfare programmes of the government because we have been clubbed with the S.Cs, and most of the welfare benefits get pocketed by the better-off Chamars, who are the most dominant S.C. community. Nothing comes our way. We should be taken out of the S.C. list and given separate reservation; that is the only thing that can lift us out of our present misery,” he says. “And for this, if we have to take the route of active agitation, so be it.”
|
Tuesday, 18 September 2012
डा. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र...
BY COURTESY OF: SHREE. SANJAY SONAWANI
प्रा. हरी नरके संपादित "डा. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र" हा ब्रुहत्खंड मुळात शासनाचे प्रकाशन वाटत नाही एवढ्या देखण्या स्वरुपात प्रसिद्ध झाला आहे. अशा अभिजात चित्र-चरित्राच्या संपादनाबद्दल व प्रकाशनाबद्दल शासनाचे आणि संपादक प्रा. हरी नरके व त्यांच्या सहका-यांचे अभिनंदन करणे भाग आहे. त्याच ब
रोबर डा. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचीव प्रा. दत्ता भगत आणि तत्कालीन कार्यासन अधिकारी शुद्धोदन आहेर यांच्या योगदानाबदल त्यांचेही अभिनंदन केलेच पाहिजे एवढे उच्च दर्जाचे कार्य य ग्रंथरुपाने झाले आहे हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांना दिलेली एक अभिनव विनम्र मानवंदना आहे. उण्यापु-या अत्यंत दुर्मीळ अशा अडिचशे छायाचित्रांतुन व त्यासोबत दिलेल्या बाबासाहेबांच्या बहुमोल वचनांतुन एक विलक्षण असा जीवनपट उलगडणारा हा ग्रंथ म्हनजे सर्वांसाठी एक पर्वणीच आहे. आणि अवघ्या देशातुन इंग्रजी आवृत्तीला तर महाराष्ट्रातुन मराठी आवृत्तीला एवढा प्रतिसाद लाभला आहे, इतका कि प्रथम प्रकाशनानंतर ( १४ एप्रिल २०१०) या चित्रचरित्राच्या मराठी आवृत्तीच्या तीन हजार प्रती व इंग्रजी आवृत्तीच्या दोन हजार प्रती हातोहात संपल्या आहेत.
डा. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या शोषितांसाठी अविरत संघर्षरत राहणा-या, कालांधाराला आपल्या प्रज्ञासुर्याने दूर हटवत नवे आत्मभान देणा-या महामानवाचे समग्र साहित्य, त्यांची सर्व भाषणे, पत्रव्यवहार पुढच्या पिढ्यांसाठी एक चिरंतन दीपस्तंभ म्हणुन उपलब्ध करुन देणे हे अत्यंत आवश्यक असेच होते. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी डा. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीची १५ मार्च १९७६ मद्ध्ये स्थापना केली. "डा. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे" या शिर्षकाखाली क्रमा-क्रमाने अडचणींना तोंड देत अनेक खंड प्रकाशित होत राहिले. हे सर्व होत असतांना बाबासाहेबांचे चित्रमय चरित्रही प्रकाशित झाले पाहिजे या भावनेने शासनाने १९९५ साली त्यासाठी एक उपसमिती निर्माण केली. २००२ साली या समितीची धुरा महाराष्ट्रातील आघाडीचे विचारवंत प्रा, हरी नरकेंकडे आली. तत्पुर्वी बराचसा काळ हा छायाचित्रे मिळवण्यातच व्यतीत झाला होता.
यातील अनेक छायाचित्रे ही जुनी असल्याने फिक्कट झालेली, सुरकुत्या पडलेली वा पिवळट पडलेली अशी होती. अनेक छायाचित्रे तर प्रिंटवरुन रीप्रिंट मारलेली असल्याने छापण्यास योग्यच नव्हती. अशा स्थितीत हार न मानता चित्रमय चरित्राला अग्रक्रम देण्याचे ठरवत प्रा. नरके यांनी या अंधुक/खराब झालेल्या अथवा आकार वाढवला तर धुरकट होणा-या फोटोंना जणु अलिकडेच काढलेत असे वाटावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यायचे ठरवले.
डा. बाबासाहेब लेखन आणि भाषणे या ग्रंथमालिकेतील बाविसावा खंड म्हनजे हा "डा. बाबासाहेब आंबेडकर: चित्रमय चरित्र". या चित्रमय चरित्रातील प्रक्रिया करुन अत्यंत आधुनिक छपाई तंत्रज्ञानाने छापलेली बाबासाहेबांची छायाचित्रे पाहिली तर लक्षात येते कि बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील भव्यता, प्रगल्भता आणि तेजस्वीपणा प्रत्येक छायचित्रातुन ओथंबुन वाहतो आहे. बाबासाहेबांच्या माणुसकीचा, करुणेचा आणि समतेचा हा अक्षय्य झरा पानापानातुन ओसंडुन वाहतांना दिसतो...आणि प्रत्येक छायाचित्रासोबत बाबासाहेबांचे महत्वपुर्ण विचारही दिले असल्याने ग्रंथाची उंचीही वाढतांना दिसते. छायाचित्रांवर तांत्रिक संस्कार करणारे श्री. संजु हिंगे आणि चित्रमय चरित्रासाठीचे लेखन करणा-या संगिता पवार यांच्याही कार्याला या निमित्ताने दाद दिलीच पाहिजे. या सर्वांमुळे व प्रा. नरकेंच्या अहोरात्र कष्ट घेत केलेल्या साक्षेपी संपादनामुळे एक जागतीक दर्जाचा चित्रमय ग्रंथ प्रसिद्ध होवू शकला आहे.
बाबासाहेबांचे समग्र जीवन हा अथक संघर्षाचा एक प्रवास आहे. हा विलक्षण प्रवास छायाचित्रांच्या मदतीने क्रमा-क्रमाने उलगडला जातो. त्यांच्या जीवनातील विविधांगी प्रसंग छायाचित्रांच्या रुपाने उलगडत जातात. फार क्वचित त्यांना फुरसतीचे, हास्य-विनोदाचे क्षण लाभले आहेत. परंतु या ग्रंथात बाबासाहेबांच्या तब्बल १२ हस-या मुद्रा आहेत.हे या ग्रंथाचे अतुलनीय वैशिष्ट्य आहे. एवढी हास्यमुद्रा असणारी छायाचित्रे आजवर बाबासाहेबांवरील प्रसिद्ध झालेल्या कोनत्यही ग्रंथात नाहीत. प्रसन्नतेचा शिडकावा करणारे बाबासाहेबांचे हास्य पाहिले कि पाहणारा नकळत भावूक होवून जातो आणि त्या महामानवासमोर नतमस्तक होतो.
बाबासाहेब हे आजच्या-पुढच्या पिढ्यांसाठीचे अक्षय्य उर्जास्त्रोत आहेत. या ग्रंथमालेमुळे एक अनमोल ठेवा एकत्रीत संचित झाला आहे. प्रा. नरके यांनी बाबासाहेबांच्या या मालिकेतील अन्यही ग्रंथांचे संपादन केले असून तब्बल ९ ब्रुहत्खंड त्यांच्या कारकिर्दीत प्रकाशित झाले आहेत. राज्यभरातुन प्रा. नरकेंचे कौतुकच झाले आहे. बाबासाहेबांचे समग्र व्यक्तिमत्व पेलने हेच मुळात एक अशक्यप्राय कार्य. हितसंबंधियांचा अनवरत त्रास. शासकीय अडचणी...जागा-निधी इ. ची चणचण. अशाही स्थितीत मार्ग काढत हे जे एक अतुलनीय चित्रमय चरित्र प्रकाशित झाले आहे त्यासाठी प्रा. नरके अभिनंदनास पात्र आहेत.
प्रत्येक भारतीयाच्या संग्रही असायलाच हवे असे हे चित्रमय चरित्र. एवढेच नव्हे तर जगभरात या चित्रमय चरित्राचा प्रसार व्हायला हवा. या ग्रंथाची पुढील आवृत्ती प्रतीक्षीत आहे ती यासाठीच.
Posted by Sanjay Sonawani at 7:45 PM
डा. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या शोषितांसाठी अविरत संघर्षरत राहणा-या, कालांधाराला आपल्या प्रज्ञासुर्याने दूर हटवत नवे आत्मभान देणा-या महामानवाचे समग्र साहित्य, त्यांची सर्व भाषणे, पत्रव्यवहार पुढच्या पिढ्यांसाठी एक चिरंतन दीपस्तंभ म्हणुन उपलब्ध करुन देणे हे अत्यंत आवश्यक असेच होते. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी डा. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीची १५ मार्च १९७६ मद्ध्ये स्थापना केली. "डा. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे" या शिर्षकाखाली क्रमा-क्रमाने अडचणींना तोंड देत अनेक खंड प्रकाशित होत राहिले. हे सर्व होत असतांना बाबासाहेबांचे चित्रमय चरित्रही प्रकाशित झाले पाहिजे या भावनेने शासनाने १९९५ साली त्यासाठी एक उपसमिती निर्माण केली. २००२ साली या समितीची धुरा महाराष्ट्रातील आघाडीचे विचारवंत प्रा, हरी नरकेंकडे आली. तत्पुर्वी बराचसा काळ हा छायाचित्रे मिळवण्यातच व्यतीत झाला होता.
यातील अनेक छायाचित्रे ही जुनी असल्याने फिक्कट झालेली, सुरकुत्या पडलेली वा पिवळट पडलेली अशी होती. अनेक छायाचित्रे तर प्रिंटवरुन रीप्रिंट मारलेली असल्याने छापण्यास योग्यच नव्हती. अशा स्थितीत हार न मानता चित्रमय चरित्राला अग्रक्रम देण्याचे ठरवत प्रा. नरके यांनी या अंधुक/खराब झालेल्या अथवा आकार वाढवला तर धुरकट होणा-या फोटोंना जणु अलिकडेच काढलेत असे वाटावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यायचे ठरवले.
डा. बाबासाहेब लेखन आणि भाषणे या ग्रंथमालिकेतील बाविसावा खंड म्हनजे हा "डा. बाबासाहेब आंबेडकर: चित्रमय चरित्र". या चित्रमय चरित्रातील प्रक्रिया करुन अत्यंत आधुनिक छपाई तंत्रज्ञानाने छापलेली बाबासाहेबांची छायाचित्रे पाहिली तर लक्षात येते कि बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील भव्यता, प्रगल्भता आणि तेजस्वीपणा प्रत्येक छायचित्रातुन ओथंबुन वाहतो आहे. बाबासाहेबांच्या माणुसकीचा, करुणेचा आणि समतेचा हा अक्षय्य झरा पानापानातुन ओसंडुन वाहतांना दिसतो...आणि प्रत्येक छायाचित्रासोबत बाबासाहेबांचे महत्वपुर्ण विचारही दिले असल्याने ग्रंथाची उंचीही वाढतांना दिसते. छायाचित्रांवर तांत्रिक संस्कार करणारे श्री. संजु हिंगे आणि चित्रमय चरित्रासाठीचे लेखन करणा-या संगिता पवार यांच्याही कार्याला या निमित्ताने दाद दिलीच पाहिजे. या सर्वांमुळे व प्रा. नरकेंच्या अहोरात्र कष्ट घेत केलेल्या साक्षेपी संपादनामुळे एक जागतीक दर्जाचा चित्रमय ग्रंथ प्रसिद्ध होवू शकला आहे.
बाबासाहेबांचे समग्र जीवन हा अथक संघर्षाचा एक प्रवास आहे. हा विलक्षण प्रवास छायाचित्रांच्या मदतीने क्रमा-क्रमाने उलगडला जातो. त्यांच्या जीवनातील विविधांगी प्रसंग छायाचित्रांच्या रुपाने उलगडत जातात. फार क्वचित त्यांना फुरसतीचे, हास्य-विनोदाचे क्षण लाभले आहेत. परंतु या ग्रंथात बाबासाहेबांच्या तब्बल १२ हस-या मुद्रा आहेत.हे या ग्रंथाचे अतुलनीय वैशिष्ट्य आहे. एवढी हास्यमुद्रा असणारी छायाचित्रे आजवर बाबासाहेबांवरील प्रसिद्ध झालेल्या कोनत्यही ग्रंथात नाहीत. प्रसन्नतेचा शिडकावा करणारे बाबासाहेबांचे हास्य पाहिले कि पाहणारा नकळत भावूक होवून जातो आणि त्या महामानवासमोर नतमस्तक होतो.
बाबासाहेब हे आजच्या-पुढच्या पिढ्यांसाठीचे अक्षय्य उर्जास्त्रोत आहेत. या ग्रंथमालेमुळे एक अनमोल ठेवा एकत्रीत संचित झाला आहे. प्रा. नरके यांनी बाबासाहेबांच्या या मालिकेतील अन्यही ग्रंथांचे संपादन केले असून तब्बल ९ ब्रुहत्खंड त्यांच्या कारकिर्दीत प्रकाशित झाले आहेत. राज्यभरातुन प्रा. नरकेंचे कौतुकच झाले आहे. बाबासाहेबांचे समग्र व्यक्तिमत्व पेलने हेच मुळात एक अशक्यप्राय कार्य. हितसंबंधियांचा अनवरत त्रास. शासकीय अडचणी...जागा-निधी इ. ची चणचण. अशाही स्थितीत मार्ग काढत हे जे एक अतुलनीय चित्रमय चरित्र प्रकाशित झाले आहे त्यासाठी प्रा. नरके अभिनंदनास पात्र आहेत.
प्रत्येक भारतीयाच्या संग्रही असायलाच हवे असे हे चित्रमय चरित्र. एवढेच नव्हे तर जगभरात या चित्रमय चरित्राचा प्रसार व्हायला हवा. या ग्रंथाची पुढील आवृत्ती प्रतीक्षीत आहे ती यासाठीच.
Posted by Sanjay Sonawani at 7:45 PM
Monday, 17 September 2012
Sunday, 16 September 2012
संमेलनांचे वाद
Divya Marathi, Rashik, Sunday, 16 Seot.2012.
Arun Jakhade
Arun Jakhade
स ध्या दोन संमेलनांचे वाद चच्रेत आहेत. संमेलनांपूर्वीच हे वाद बहुचर्चित झाले. त्यांपैकी पहिला वाद हा विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झाला. टोरांटोचे संयोजक, अ. भा. सा. महामंडळ व इच्छुक साहित्यिक वा बिगर साहित्यिक (प्रवासी) मंडळी या तिघांच्या संबंधाने भरपूर शोभेची दारू उडाली; तर आता चिपळूण येथील 86व्या साहित्य-संमेलनाच्या निमित्ताने जातीय तणाव निर्माण होईल, अशा पद्धतीचा बॉम्ब पेरला गेला आहे. आता ही दोन संमेलने व त्यांचे संमेलनपूर्व वाद यांमध्ये प्रत्येकाची म्हणून स्वत:ची काही बाजू असेल. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत आहे ती म्हणजे, एकूण समाजास साहित्यिकांविषयी वाटणारी घृणा वाढत चालली आहे. सांस्कृतिकदृष्ट्या ही चिंतेची बाब आहे. एकेकाळी साहित्यिकांचा एक प्रकारचा नैतिक दबाव शासनावर आणि समाजावर होता. अनेक वेळा त्यांनी समाजाचे नेतृत्वही केले; परंतु आणीबाणीनंतर साहित्यिकांच्या प्रतिष्ठेची इतकी घसरगुंडी झाली, की जो तो उठतो तो साहित्यिकांवर घसरू लागला, असे का? याचे आत्मपरीक्षण प्रत्येक साहित्यिकाने केले पाहिजे. पहिल्या विश्व संमेलनापूर्वी महामंडळाचे अ. भा. साहित्य संमेलनच परदेशात भरवण्यासंबंधी काही मत-मतांतरे व वाद झाले. आता हे वाद सामोपचाराने (?) संपले आहेत आणि विश्व साहित्य संमेलनाची कल्पना आपण सर्वमान्य केली आहे. तथापि त्या त्या राष्ट्रातील संयोजन समितीप्रमाणेच, त्यांच्या एम्बसी व एम्बसीच्या कल्चरल सेंटरला मध्यस्थाच्या भूमिकेत घेतले, तर ही संमेलने नक्कीच यशस्वी होतील व त्यांतून सांस्कृतिक देवाणघेवाणही वाढेल, याचा अनुभव आम्ही प्रकाशक मंडळी, वल्र्ड बुक फेअर, फँकफर्ट बुक फेअर, लंडन बुक फेअर येथे घेत असतो. महामंडळाच्या पदाधिकार्यांनी निर्णयप्रक्रियेत महामंडळाच्या कार्यकारिणीव्यतिरिक्त बाहेरच्या साहित्यव्यवहारातील जबाबदार व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले, तर अशा हास्यास्पद गोष्टी होणार नाहीत. शासनाने फक्त 25 लाख रु. दिले. यापूर्वी 50 लाख रु. दिले होते. यात शासनाचाही कोतेपणा दिसून येतो. येथे भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. शासनव्यवस्था व सरकारे प्रचंड खर्च करत असताना 25 लाखांसाठी हात आखडता घेणे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभणारे नाही. एका सिनेमासाठी तीस लाख रु. देणार्या शासनाला - दरवर्षी अनेक निर्मात्यांना करोडो रुपये द्यावे लागतात, येथे तर एका समूहाला फक्त 50 लाख द्यायचे आहेत, अशा अनेक गोष्टी सांगता येतील; परंतु टोरांटोसाठी हात आखडते घेणार्या व दुष्काळाचे कारण समोर करून आरडाओरड करणार्यांनी दुष्काळासाठी काय केले व इतरत्र खर्चाची किती कपात केली, याचीही आकडेवारी द्यायला हवी. महामंडळानेही बाहेर पाठवणार्या साहित्यिकांची व पदाधिकार्यांची यादी दर्जा राखणारी, पारदर्शी बनवली तर वाद कमी होऊ शकतील. पण येथे दर्जेदार कोणाला म्हणायचे, हाच प्रo्न निर्माण होईल. तीच-ती नावे पुन्हा दिसल्यामुळे समाजात जो संदेश गेला, त्याची प्रतिक्रिया दाहक येणारच. दरवर्षी विश्व साहित्य संमेलन आयोजित केले पाहिजे, असा हट्टही नसावा. कारण अ. भा. मराठी साहित्य संमेलन, प्रत्येक घटकसंस्थांची विभागीय संमेलने आणि विश्व संमेलन अशा विविध संमेलनांच्या आयोजनातच महामंडळाचा व घटकसंस्थांचा वेळ आणि शक्ती जात आहे. मूलभूत व ठोस वाड्मयीन कार्याकडे त्यामुळे दुर्लक्ष होऊन केवळ 'इव्हेंट मॅनेजमेंट'चे काम मंडळाला करावे लागत आहे. भारताबाहेर गेलेला समाज हा उच्चशिक्षित व स्कॉलर आहे. त्यांना दुय्यम दर्जाचे काय आहे, ते समजते. त्यामुळे कोणाला गृहीत धरून मनमानी प्रकार करणे अवघड आहे आणि त्यांना समजत नसेल तर आपण त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन दुय्यम गोष्टी त्यांना देऊ नये. असे दुय्यम देऊन फसवणे हे अनैतिक आहे आणि संस्कृतीच्या चार गोष्टी शिकवणार्यांना ते शोभणारे आहे का? आता हा टोरांटोचा वाद चच्रेत असतानाच चिपळूण येथील 86 व्या संमेलनाचा नवा वाद निर्माण झाला आहे, तो या संमेलनातील अध्यक्षपदाचे एक उमेदवार ह. मो. मराठे यांच्या पत्रामुळे. ह. मो. मराठे हे साहित्यिक आहेत, पत्रकारही होते. पत्रकारितेच्या क्षेत्रात 'संपादन' या गोष्टीचे महत्त्व त्यांना माहीत असेलच; तरीही या पत्रात एक मजकूर इतका पाल्हाळीक लिहिला आहे, की ज्यामुळे सगळा जुना इतिहास व गाडलेला कलह उघड्यावर आला आहे. तो त्यांना संक्षिप्त व सूचक शब्दांत लिहिता आला नाही. खरे तर त्याची येथे गरजच नाही. त्याची प्रतिक्रिया म्हणून शुक्रवार, 7 सप्टेंबर 2012 रोजी म. सा. प. पुणे शाखेवर संभाजी बिग्रेडचा मोर्चाही आला होता. त्या मोर्चाला विरोध करणारा गटही म.सा.प.ला भेटून गेला. ह. मो. मराठे यांनी वाड्मयीन कर्तृत्वाचा आलेख मांडला असता तर तेवढेच उचित ठरले असते. ही निवडणूक वाड्मयीन पातळीवर व्हावी, अशीच अपेक्षा असते. आपल्या
Sunday, 9 September 2012
हेच ते हमोंचे प्रचारपत्र
जात दाखवुन अवलक्षण..
सौजन्य:दै.लोकमत, दि.९ सप्टे.२०१२,पान ४ व ५,महाराष्ट्रातील सर्व आवृत्या
..............................................................................................................................
अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक आणि वाद हे समीकरणच बनू गेले आहे. ८६व्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘जात’वाद उफाळून आला आहे. त्याला कारणीभूत ठरले ते एक उमेदवार ह. मो. मराठे यांनी प्रचारासाठी काढलेले एक पत्रक. या पत्रकाला साहित्य वतरुळातून आक्षेप घेतले जात असतानाच संभाजी ब्रिगेड या संघटनेने थेट मराठे यांनी माघार घ्यावी, अशी मागणी केली. एवढेच नव्हे, तर ते अध्यक्षपदी निवडून आले तरी काम करू देणार नाही, राज्यात फिरू देणार नाही, अशी भूमिका घेतली.
...............................................................................................................................................................
ह. मो. मराठे यांच्या प्रचार पत्रातील वादग्रस्त भाग-[ ज्यामुळे सर्व वाद सुरू झाला.ह.मो.मराठे यांच्या वादग्रस्त भुमिकेतील काही अंश..]
‘ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?’ हा माझा प्रदीर्घ लेख ‘किस्त्रीम’च्या २00४च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. ब्राह्मणांविषयीच्या अपप्रचाराला नवे उधाण येत असल्याचे मला जाणवत होतेच. पण, ५ जानेवारी २00४ रोजी पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर ‘संभाजी ब्रिगेड’ने हल्ला केला. त्यानंतर हा प्रचार हिंसक वळण घेणार असे भय मला वाटू लागले. जेम्स लेन नामक तथाकथित इतिहासकाराने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या पुस्तकात म्हटले की, {‘‘xxxxxxxxxxxxxxxxxxx" जेम्स लेनचे शिवराय आणि जिजाऊ यांचे चारित्र्यहनन करणारे ते विषारी विधान हमोंनी याठिकाणी जसेच्या तसे दिले आहे, ते मी वगळले आहे..} भांडारकर संस्थेतील ब्राह्मण संशोधकांनीच वरील प्रमाणे लिहायला लेनला सांगितले असा समज करून घेऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वरील हल्ला केला होता. दुसर्या दिवशी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील हे पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले की, समस्त ब्राह्मण समाजाला नजरेसमोर ठेवून ब्राह्मणेतर सर्व जातीतील उच्चशिक्षित तरुणांनी हा हल्ला केला. पुढे जेम्स लेनचे पुस्तक व तो स्वत: यांची भारताच्या सुप्रीम कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. त्याच किंवा त्याच्या दुसर्या दिवशी एका चॅनेलवरील चर्चेत भाग घेताना संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी प्रवीण गायकवाड म्हणाले की, २00४ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोनियांच्या काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसला जास्त जागा मिळवायच्या होत्या, म्हणून आमचा वापर करून घेण्यात आला आणि नंतर आम्हाला वार्यावर सोडण्यात आले. ब्राह्मण समाजाविषयी किंवा कोणत्याही धर्म-जातीविषयी या प्रकारे हिंसक वातावरण तयार करून त्यावर राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेणे ही अनिष्ट प्रवृत्ती आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेषाचे वातावरण पद्धतशीरपणे तयार करण्यात येत असून, सध्या त्याचा कळस गाठण्यात येत आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या छापील पुस्तिकेत ब्राह्मणांच्या सर्रास कत्तली केल्या पाहिजेत आणि त्या कामी मराठा तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी चिथावणी अगदी उघडपणे दिली आहे. हिंसक वातावरण तयार करण्याच्या या प्रयत्नांविरुद्ध ब्राह्मण समाजाने संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे, हा माझ्या भूमिकेचा एक भाग आहे. ब्राह्मणांना भारतीय समाजाचे एक नंबरचे शत्रू ठरविण्याचे प्रयत्न विविध लेखांतून व पुस्तकांतून करण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे खून ब्राह्मणांनीच केले असे सांगितले जाऊ लागले आहे. या द्वेषमूलक अपप्रचाराला साधार आणि तर्कशुद्ध उत्तरे देणे आवश्यकच झाले आहे. ब्राह्मणांनी भारतीय समाजाची जडणघडण, सामाजिक सुधारणा, अस्पृश्यता निवारण, स्वातंत्र्यलढा इत्यादी क्षेत्रात केलेले कार्यही बहुजन समाजातील नवशिक्षित तरुण पिढीसमोर आणण्याची गरज निर्माण झाली आहे. माझी एकूण भूमिका ब्राह्मण श्रेष्ठत्वाची किंवा चातुर्वण्र्याची तरफदारी करण्याची नाहीच नाही, इतर जातींच्या विरोधातही नाही. हजारो जाती, धर्म, पंथ, भाषा, सांस्कृतिक परंपरा असलेल्या संमिश्र भारतीय समाजात जातीजातीत निर्वैर सामंजस्य नांदले पाहिजे, तरच भारतीय समाज एकसंध राहू शकेल अशी माझी भूमिका आहे.
............................................................................................................................................................
ह.मो.मराठे यांची मुलाखत..
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीत चालली असताना अचानक हा वाद उफाळून कसा आला?
माझी शंका खरी करत पुन्हा माध्यमांनी हा मुद्दा चुकीच्या पद्धतीने चव्हाट्यावर मांडला आहे. हा वाद म्हणजे केवळ माझी प्रतिमा मलिन करण्याचा कुटिल डाव आहे. माध्यमांनी रचलेले कुभांड आहे. हा डाव माझ्याविरुद्ध मुद्दाम रचला गेला आहे. माझी भूमिका पहिल्यापासून कधीच जातीयवादी नव्हती. उलट जातीयवादी साहित्यिक हल्ले होऊ नयेत म्हणून तर्कशास्त्राच्या आधारे त्याविषयी जागरूकता निर्माण करून या हल्ल्यांचा विरोधच केला होता. हे काम मी गेली ७-८ वर्षे करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे उकरून माझ्या विरोधी विपर्यास्त प्रचारासाठी त्याचा वापर होऊ शकतो, अशी शंका वाटली. म्हणूनच ही भूमिका स्पष्टपणे मांडली. मी जर ही भूमिका मांडली नसती तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझे साहित्य नीट न वाचताच उगाच नको ते तर्क करतही हा वाद उकरून काढला असता. आज मी माझी भूमिका स्पष्ट केली तरीही मला ब्राह्मणवादी ठरवून मोकळे झाले. हा केवळ ‘मीडिया ट्रॅप’ आहे ज्यात माध्यमेच वाद काढतात व तेच निकाल लावून मोकळे होतात. माझ्या साहित्याविषयी माझ्या मतदारांची दिशाभूल होऊ नये म्हणूनच ही स्पष्ट भूमिका मांडली आहे.
’ आपल्या प्रचारपत्रकामुळेच वाद निर्माण झाला, अशी टीका केली जात आहे, यावर आपले मत काय?
ही निवडणूक साहित्य संमेलनाची आहे. त्यामुळे माझा संबंध केवळ माझ्या मतदारांशी आहे. हे प्रचार पत्र माझ्या १ हजार ६८ मतदारांसाठी आहे. हा आमच्यातील खासगी संवाद असून, यात कोणत्याही माध्यमाने हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नाही. हे पत्र प्रत्येक मतदारापर्यंत पोहचूनही कोणत्याही मतदाराने याविषयी शंका व्यक्त केलेली नाही. मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीस उभा राहणार हे दीड महिन्यापूर्वीच जाहीर केलेले असताना आता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यावरच हा वाद कसा निर्माण झाला? याचाच अर्थ याच वेळेची वाट बघून हा डाव साधण्यात आला आहे. अपप्रचार करायचा असे ठरवूनच जणू सगळी पावले उचलली जात आहेत. माझे बरेच हितचिंतक असे म्हणत आहेत की, माध्यम कोणीही असले तरी सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. मात्र, अशी शंका मी व्यक्त करणार नाही. मला कोणावरही बोट उचलायचे नाही. माझे जे मतदार आहेत ते मलाच मते देतील.
’ पण मुळात साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘जात’ यावीच कशाला, असेही विचारले जात आहे?
माझे साहित्य वाचून मी काय जातीयता केली हे माझ्या वाचकांनीच ठरवावे. माझ्यातल्या लेखकाला जात नसली तरी माणूस म्हणून मला जात आहेच. आरक्षणानंतर जातींचे पुनरुज्जीवन झाले आहे. भारताने स्वीकारलेल्या जातींच्या आधारावरील आरक्षण व्यवस्थेमुळे सरकारनेच जात प्रत्येकाच्या माथी मारली आहे. मग, मी जर ब्राह्मणविरोधी प्रक्षोभक लेखनाला तर्कशुद्ध उत्तरे देत ही जातीयता योग्य नाही अशी माझी भूमिका मांडत असेन तर यात जातीयवाद कोठे आला? साहित्यिक निवडणुकीत हा मुद्दा कशाला हवा असे जर कोणाला वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करावे. माझ्या साहित्याची माहिती देणारा दोन पाने मजकूर दिला आहे, तो लक्षात घ्यावा. जो वाद उठवला गेला आहे तो दूषित पूर्वग्रहातून निर्माण केला आहे.
’ ब्राह्मण मते मिळविण्यासाठी आपण पत्रक काढले असेही म्हटले जाते?
साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवड ही साहित्यिकांची पात्रता व योग्यतेतूनच व्हावी. मात्र, या निवडणूक घेण्याच्या प्रक्रियेलाच माझा विरोध आहे. निवडणूक म्हटली की असे प्रकार सुरू होतात. ज्या मुद्दय़ांचा काहीही संबंध नाही, तर्कसंगत नाही असे मुद्दे समोर आणले जातात. परंतु, माझ्या या भूमिकेला मराठा, ओबीसी, मागासवर्गीय सर्वांचा पाठिंबा आहे. माझ्या मतदारांपैकी केवळ ४0 टक्केच ब्राह्मण आहेत. उर्वरित ६0 टक्के ब्राह्मणेतरच आहेत. त्यामुळे हा ब्राह्मण मते मिळविण्याचा प्रकार कोणास वाटत असेल तर तसे अजिबातच नाही.
माझी भूमिका कधीही जातीवादी नव्हती हे मी वेळोवेळी माझ्या लेखनातून सिद्ध केलेच आहे. सोलापूर ‘लोकमंगल’ दिवाळी अंक २00९मध्ये छापून आलेला ‘वाढत्या जातीवादाचा विषारी विळखा’ हा लेख यंदाच्या किलरेस्कर मासिकात पुनर्मुद्रित करण्यात आला आहे. त्यातील शेवटच्या परिच्छेदात म्हटले होते की, ‘‘जातवार आरक्षण, सामाजिक न्याय आणि सामाजिक समतोल यांच्या नावाखाली निर्माण करण्यात आलेली दहशत, गुणवत्तेशी तडजोड, राजकीय पक्षांनी घेतलेला जातींचा आधार अशा अनेक कारणांमुळे जातीय जाणिवा तीव्र झाल्या. जातीजातींमधला खिलाडूपणा संपला. सामाजिक स्नेहभाव संपत आला आणि निर्माण झाला तो विखार आणि अविश्वास! नव्याने तयार होऊ लागलेले हे वातावरण भारतीय समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अजिबातच स्वागतार्ह नाही. भारतीय समाजात केवळ हिंदू समाजामध्ये साडेचार हजारांपेक्षा जास्त जाती आहेत. सगळा हिशोब मांडला तर भारतामध्ये पाच हजार जाती असाव्यात. या सर्व जातींनी आणि धर्मांनी, सर्व सांस्कृतिक प्रवाहांनी, सर्व भाषिकांनी भारतात सुखाने, सलोख्याने आणि सामंजस्याने नांदणे आवश्यक आहे. तरच भारत देश प्रगती करू शकेल. अनेक संघर्षामुळे भारत देशाची पुष्कळ शक्ती वाया गेली आहे. यापुढे ती जातीय युद्धांनी वाया जायला नको!
..............................................................................................................................................................
प्रतिक्रिया....
जातीय प्रचाराचा मान हमोंकडे
-प्रा. हरी नरके, ज्येष्ठ विचारवंत
साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत मराठे यांनी वाड्मयीन गुणवत्तेवर मते मागायला हवी होती. मात्र, त्यांनी जातीय प्रचार करून या निवडणुकीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रूप आणले आहे. गेल्या ८५ संमेलनांत अनेक वाद घडले; पण, जातीय प्रचाराचा मान हमोंकडेच जातो. हमो यांनी मतदारांचे स्वरूप बघून हा पवित्रा घेतलेला असल्याचे दिसत आहे. जेम्स लेनच्या शिवरायांविषयी लिहिलेल्या पुस्तकावरची बंदी उठवली म्हणजे जेम्स लेनला निर्दोष मुक्त केले असा अर्थ होत नाही. मुळात खटला पुस्तकबंदीबाबत होता, तो जेम्स लेनविरुद्ध नव्हता. या संमेलनात पहिल्यांदाच जातीय प्रचार झाला हे निषेधार्थ आहे.
...................................................................................................................................................................
Friday, 17 August 2012
गाथासप्तशती अभिजाततेचा बहुमूल्य पुरावा
Sunday, June 24, 2012, Divya Marathi
गाथासप्तशती अभिजाततेचा बहुमूल्य पुरावा
{सौजन्य: श्री.अरुण जाखडे, दिव्य मराठी,रविवार, दि.२५ जुन
२०१२}गेल्या दहा
वर्षांत भाषांविषयक ज्या महत्त्वाच्या घडामोडी भारतात झाल्या, त्यापैकी
महत्त्वाची म्हणजे भारत सरकारने संस्कृत, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या चार
भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. या चार भाषांइतकीच मराठी ही अभिजात
भाषा असून तिला असा दर्जा मिळायला हवा, अशी इच्छा आपण मराठी भाषकांची असणे
योग्यच आहे. पंतप्रधान कार्यालयातून वरील चार भाषांना अभिजात भाषांचा
दर्जा मान्य झाला त्या वेळी सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे
पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री होते. ‘लोकराज्य’च्या दिवाळी अंकात हरी नरके
यांनी मराठी अभिजात भाषा असल्याबद्दलचा लेख लिहिला होता आणि तेथून ही चर्चा
ऐरणीवर येत गेली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयातून चार
भाषांना अभिजाततेचे प्रमाणपत्र दिले, पण आता त्यांना मात्र मराठी ही अभिजात
भाषा आहे, असे वाटले तरी केंद्र सरकारकडे त्यासंबंधी काही पुराव्यांसह
मांडणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली
त्यांनी एक समिती नेमली आहे. हरी नरके हे समितीचे समन्वयक तर डॉ. श्रीकांत
बहुलकर, डॉ. मैत्रेयी देशपांडे, डॉ. कल्याण काळे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले,
डॉ. मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर असे सदस्य आहेत. वर्तमानपत्रातून या
बातम्या आपण वाचल्या; परंतु अभिजात भाषा म्हणजे काय? त्याचे कोणते निकष
आहेत, त्या निकषावर मराठी ही कशी अभिजात आहे, हे जाणून घ्यायला हवे. अभिजात
भाषेचे चार निकष आहेत
1. भाषेचे वय 1500 ते 2500 वर्षे असावे.
2. त्या भाषेत श्रेष्ठ दर्जाचे साहित्य असावे.
3. भाषेने स्वत:च्या मूळ रूपांपासून आजपर्यंत केलेल्या प्रवासात अंतर अथवा खंडितता आली असेल तरीही, भाषेची चौकट कायम असेल आणि ती भाषा बोलणा-यांनी लिखित स्वरूपात फार मोठे साहित्य निर्माण केलेले असले पाहिजे.
4. त्या भाषेत सातत्याने लिखित स्वरूपात साहित्य लिहिलेले असावे. वरील चार निकष मराठी भाषा पूर्ण करत आहे. त्यासाठी समिती ज्या मुद्द्यांचा आधार घेत आहे, त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे -
- जुन्नरजवळील नाणे घाटातील शिलालेख, ज्यावर ब्राह्मी लिपीत ‘महारथी’ असा उल्लेख आढळतो.
- 2500 वर्षांपूर्वीच्या ‘विनयपिटक’ या बौद्ध धर्मग्रंथात असलेला महाराष्ट्राचा उल्लेख.
- श्रीलंकेतील सिंहली लिपीतील ‘दीपवंश’ आणि ‘महावंश’ या 1500 वर्षांपूर्वीच्या ग्रंथात महाराष्ट्री भाषेचा असलेला उल्लेख.
- वररुची या पाणिनीच्या समकालीन विद्वानाने प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्याने शोरशनी, पैशाची, अर्धमागधी, महाराष्ट्री या प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे, त्याने ‘शेषमहाराष्ट्रीवत’ हा ठळक नियम केला आहे. त्यानुसार सर्व प्राकृत भाषांचे उरलेले नियम मराठीप्रमाणे होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत असलेली 80 हस्तलिखिते ही प्राचीन आहेत आणि या पुराव्यांना बळकटी देणारी आहेत.
- संपूर्ण भारतात 1000 लेणी आहेत. त्यातील 800 एकट्या महाराष्ट्रात आहेत. या लेण्यांतील सर्व शिलालेख जुन्या मराठीत आहेत.
- ‘गाथासप्तशती’ हा मराठातील आद्यग्रंथ आहे. तो हाल सातवाहनाच्या काळातील आहे.
या सर्व पुराव्यांतून स्पष्ट होते की मराठी भाषा ही पुरातन भाषा असून ती जुनी मराठी, मध्य मराठी आणि अर्वाचीन मराठी अशा तीन काळांतून प्रवाहित राहिली आहे. पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मदतीस महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे ‘हाल सातवाहनाची गाथासप्तशती’.‘गाथासप्तशती’ हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मराठीतील आद्यग्रंथ होय. अस्सल मराठमोळे नागरी, ग्रामीण व वन्य लोकजीवन या गाथेत ललितमधुर सौंदर्याने नटलेले आहे. शृंगाराबरोबरच जीवनाची करुण, दारुण व हृद्य अशी सर्व अंगे सारख्याच कुशलतेने गाथासप्तशतीत रेखाटलेली आहेत. मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांचा पुरस्कार करणारा हा आद्य मराठीतील श्रेष्ठ ग्रंथ होय.
कै. स. आ. जोगळेकर यांची प्रदीर्घ अभ्यासपूर्ण चारशे पन्नास पानांची प्रस्तावना, संपादन, भाषांतर व टीका हे या ग्रंथाचे आणखी वेगळे वैशिष्ट्य आहे. हा ग्रंथ 1956 ला प्रकाशित झाला, त्यानंतर तो अद्याप उपलब्ध नव्हता. पद्मगंधा प्रकाशनाने तो आता प्रकाशित केला आहे.
या ग्रंथामुळे मराठी भाषा अभिजात भाषा सिद्ध झाली व तसा दर्जा मिळाला तर मराठीला केंद्र सरकारकडून दरवर्षी किमान 500 कोटी मिळतील. ही रक्कम मराठी भाषेच्या विकासासाठी, उपक्रमांसाठी वापरली जाऊ शकते.
Labels:
अभिजात मराठी
3 comments:
- Abhijeet Pandit: dear sir......... ur great.... all obc,s love sooooooooooooooo much ............ ur second babasaheb for them....... sir, minor casts madhe divide zalelya samast obc,s sathi kayam satark aahat karyarat aahat...... he obc jamat jevha jaagi hoil kahi warshanantar techa tya jamatila aaple mothepan ka karya kharya arthane kalel........... aaj aapan tyanchya sathi chandana sarkhe zizta aahat pan ha chandanacha suwas samast minority casts ne banlelya majority obc,s madhe kayam darwalat rahil............... jay ho.....Reply
June 25 at 10:26pm · Like
Illa Ranade :great sir!
11 hours ago · · 1
Hari Narke Guruprasad Kanitkar; u r most welcome.
4 hours ago · Edited · Like · 1
Vikram Gaikwad :abhinandan {FROM:FACEBOOK} - गाथा सप्तशती आणि नवरात्रा
त जे सप्तशतीचे पाठ करतात यात काय फरक आहे?
Subscribe to:
Posts (Atom)
June 25 at 8:41pm {FROM:FACEBOOK}