Wednesday, 31 July 2013

ओबीसींची दिवसेंदिवस आत्मघाताकडेच वाटचाल (लेख ५)

 संजय सोनवणी, 

ओबीसी, जो निर्माणकर्ता घटक होता, त्याला आपल्या अस्तित्वाच्या जाणीवांनी एवढे भेडसावलेले आहे कि त्याला आपण ओबीसी आहोत हे सांगायची शरम वाटते. कोणी नसतांनाही स्वत:ला क्षत्रीय म्हनवुन घेतो तर कोणी दैवद्न्य होत ब्राह्मनांशी नाळ जुळवु पाहतात. पण हे धादांत असत्य आहे. निर्मानकर्त्यांना हिंदु धर्मव्यवस्थेने शुद्र आणि फक्त शुद्रच मानलेले आहे हे वास्तव पचवुन घ्यायला ओबीसींना जमत नाही. म्हणुनच कि काय ते आपल्याच जाती-अंतर्गत पोटजातींच्या निमित्ताने एक चातुर्वर्ण्य पाळतात, त्यातही उच्चनीचता पाळतात, तसेच ओबीसींतील अन्य जाती आपल्यापेक्षा हलक्या असल्याचे मानतात व तसा व्यवहारही करतात. म्हणजेच वांझ जाती-अभिमानाच्या पोटी स्वत:चाच नव्हे तर सर्वांचा घात करतात.
ज्या निर्माणाची या समाजाने पुरातन काळापासुन कास धरत संस्क्रुती/अर्थव्यवस्थेचे दिग्दर्शन करत अखिल समाजाची प्रगती साधली, त्यांचे जीवन सुसह्य केले ते आज कसलेही नव-निर्माण न करता, आपल्याच पुरातन व्यवसायांत आधुनिकता आणत प्रगती न साधता केवळ स्वजातीच्या अभिमानात चुर आहेत हे एक भयंकर कोडे आहे. या ओबीसींना निवडनुकांचा काळ वगळता तसे कुत्रे विचारत नाही अशी वास्तव स्थिती आहे. यांचा इतिहास पुसलेला आहे. यांनी तो जपला तर नाहीच, पण इतरांनी मात्र जपायला हवा होता अशा अवास्तव व अविवेकी अपेक्षा आहेत.
ओबीसींमद्धे आज जवळपास सव्वाचारशे जाती आहेत. प्रत्त्येक जातीच्या (पोटजातींच्याही) संघटनाही आहेत. या संघटना सामाजिक प्रश्नांसाठी काम करत असतील असा कोणाचाही (गैर) समज होवू शकतो. पण ते वास्तव नाही. या संघटनांचा एककलमी कार्यक्रम म्हणजे वधुवर मेळावे भरवणे. जणु लग्ने जुळवणे हीच काय ती या समाजाची मुख्य गरज आहे. यासोबत फारफारतर देवळे बांधणे, धर्मशाळा उभारने आणि कधी जमल्यास वस्तीग्रुहे बांधणे यापार हे लोक जातच नाहीत. प्रबोधनाची गरज आहे याची ना जाण आहे ना भान आहे. किमान आपापल्या समाजातील विचारवंतांना/समाजसेवकांना/साहित्तिकांना बळ दिले पाहिजे या भावनेची तर सर्वस्वी वानवा आहे. यामुळे बहुसंख्य ओबीसी लेखक जाणते/अजानतेपणे ब्राह्मणी गोटांची कास धरतात आणि आपल्या समाजालाच तुच्छ मानु लागतात...याला जबाबदार हेच ओबीसी आहेत. त्यामुळेच ओबीसी लेखक आपल्या जातींचे नायक करणे तर सोडाच उल्लेखही टाळतात हे एक वास्तव आहे.
इतिहासाची अक्षम्य हेळसांड हा तर रोगच जडलेला आहे. प्रत्त्येक जातीघटकाचा काही ना काही इतिहास हा असतोच! इतिहास नाही असा समाज असुच शकत नाही. धनगर, माळी, सुतार, तेली-तांबोळी ते पार वंजारी-पाथरवटांचा (वडा-यांचा) इतिहास आहे, त्या प्रत्त्येक जातेघटकाचे सामाज-संस्क्रुतीला पुरातन काळापासुन महत्वाचे योगदान आहे. कोनत्याही जातीला हीनत्वाने लेखावे असा कोणाचाही इतिहास नाही. इतिहासात फक्त राजे-रजवाडेच होवुन गेलेले असले तरच त्याला इतिहास म्हणायचे असा अनैतिहासिक समज लोकांचा आहे, पण ते खरे नाही. परंतु नवे इतिहासकार या द्रुष्टीकोनातुन इतिहासाकडे पहातच नसल्याने ते ज्यावर लिहुन लिहुन चोथा झाला आहे अशा अन्य महापुरुषांवरच लेखणी झिजवण्यात पुन्हा पुन्हा गर्क राहतात. त्यामुळे खरे नवनिर्माण होतच नाही. सर्वच समाजाला आत्मभान येईल असे लेखन होतच नाही. त्यामुळे जे आत्मभान/आत्मसन्मान आणि मुळातील एकतेची जाणीव या अवाढव्य समाजाला होत नाही. वाचनसंस्क्रुती अल्पांश आहे. धार्मिक गाथांचे पठण/सप्ताह साजरे करण्यापुरता बव्हंशी ओबीसींचा संबंध येतो. धर्माचे वेड यांच्यातच सर्वाधिक असुन ते सहजी बुवा-बापुंना बळी पडतात...एवढेच नव्हे तर हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रचाराला बळी पडन्यात व त्यांच्यात सहभागी होत त्यांना बळ पुरवण्यात हेच आघाडीवर असतात. पण यातुन आपला वापरच केला जात आहे व आपण नव्या शोषणाचा मार्ग उघडुन देतो आहोत याबाबत त्यांना जाण येत नाही.
जसे दलित साहित्य गतशतकात पुढे आले, एक विद्रोही चळवळ उभी राहिली व जागतिक साहित्यात प्रतिष्ठा मिळवली तशी ओबीसी साहित्य चळवळ का निर्माण झाली नाही, याचे उत्तर वरील विवेचनात आहे. या समाजाचे प्रश्न वेगळे आहेत, वेदना वेगळ्या आहेत, अन्यायाचे परिप्रेक्ष वेगळे आहेत, जातीय उतरंडीत त्यांना कोणताही सन्मान नाही. पण त्याचे सकस प्रतिबिंब पडेल असे साहित्यच नाही. (उद्धव शेळकेंची ’धग’ हे एकमेव उदाहरण मानता येईल...पण ती किती ओबीसींनी वाचली?) मल्हारराव होळकर एवढे पराक्रमी सरदार असुनही त्यांच्याबाबत पेशवे "शुद्र मातला आहे..." असे विधान करत हे किती जणांना माहित आहे? त्याची खंत वेदना कोणाला वाटते? कि यामागे ते धनगर होते...धनगर पाहुन घेतील, अशीच आप्पलपोट्टी व्रुत्ती आहे?
याच स्वकेंद्रित व्रुत्तीमुळे ओबीसींची सामाजिक/सांस्क्रुतीक व राजकीय हानी होत आहे. मी वारंवार स्पष्ट आणि सिद्ध केले आहे कि सारे ओबीसी मुलच्या एकाच समाजातुन व्यवसायाधिष्ठित कारणांमुळे वेगळे झाले आहेत, पण त्यांच्या संस्क्रुतीची मुळे एकच आहेत. आज तर बहुतेक व्यवसाय नष्ट झाले आहेत वा अन्यांच्या हाती गेले आहेत. भांडवलदारी व्यवस्थेत व औद्योगिकरणानंतर हे अपरिहार्य आहे असे मानले तरी त्यावर पर्याय शोधुन पुन्हा आर्थिक/सामाजिक व सांस्क्रुतीक इतिहास घडवण्यात या समाजाला घोर अपयश आलेले आहे. "वापरुन घेण्यासाठी जन्माला आलेला व तरीही वांझ अहंभावात जगणारा समाज" अशीच या समाजाची ओळख आहे.
या समाजातुन किती अवाढव्य उद्योग उभारणारे जन्माला आले? परंपरागत व्यवसायांना आधुनिकतेची जोड किती जणांनी दिली? शेतकरी तरी नवनवे प्रयोग करतात...यांनी काय केले? यांची कल्पकता/उद्यमशीलता/नवनिर्माणाची उर्मी कोठे गेली? पुर्वी गांवगाड्यात ओबीसीही दासच होता...बलुतेदारच होता. अस्प्रुश्य नव्हता एवढेच. पण जीणे लाजीरवाणेच होते. स्वातंत्र्योत्तर काळातही या स्थितीत विशेष फरक पडलेला नाही. शैक्षणिक/आर्थिक व सामाजिक पातळीवर हा समाज आजही मागासलेलाच आहे. सरकारी नोक-यांत या समाजाचे एकुणातील प्रमाण हे फक्त ४..८% एवढेच आहे. (सविस्तर आकडेवारी मी या लेखमालिकेत पुढे देनारच आहे.) ही टक्केवारी नक्कीच लाजीरवाणी आहे. बावीस टक्के जागा, मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारुन २० वर्ष झाली तरी, अजुनही भरल्या जात नाहीत, याबाबत कोणाला फारशी खंत असल्याचे दिसुन येत नाही. त्यात या कोट्यातील साडेचार टक्के आरक्षण मुस्लिमांना देण्याचे घाटत आहे. आधीच मुस्लिम ओबीसी या ओबीसी कोट्यात सामाविष्ट आहेतच, त्यात ही नवी भर पडली तर ओबीसींना ती किती महागात पडेल यावर हे लोक कधी चिंतन करनार?
सरकारला ओबीसींचे कसलीही चिंता नाही. ज्यांना वाटते ते सातत्याने यावर बोलतात. उदा. प्रा. हरी नरके यावर जेवढे जागरण करण्याचा प्रयत्न करतात व ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करतात तेवढा कोणीही करत नाही...पण येणारा एकुणातील प्रतिसाद शुण्य आहे असे म्हटले तरी चालेल.

थोडक्यात ओबीसींची दिवसेंदिवस आत्मघाताकडेच वाटचाल सुरु आहे. राजकारणाचे बोलावे तर एकट्या पुण्यात राष्ट्रवादीचे निवडुन आलेल्या नगरसेवकांची संख्या पाहिली तर त्यात ८०% मराठे आहेत व उर्वरीत ओबीसी/बीसी/मुस्लिम असे आहेत. आपल्याच संकुचित आणि मुढपणामुळे सर्वच क्षेत्रांत आपली पीछेहाट होत आहे व नव्या गुलामीच्या दिशेने द्रुतगतीने वातचाल सुरु आहे याचे भान या ओबीसींना कधी येणार?

ओबीसींनो...बळीराजाचे फक्त अर्धे पावूल उचला! (लेख ६)

संजय सोनवणी, 

औद्योगिक क्रांतीमुळे निर्मानकर्त्यांच्या उद्योगव्यवसायांवर कशी भिषण अवकळा आली याचे ओझरते उल्लेख मी आधीच्या लेखांत केलेले आहेत. या अवकळेचे तसे तीन टप्पे पडतात. त्याबाबत येथे विचार करायचा आहे.
इ.स.च्या पहिल्या सहस्त्रकाच्या शेवटापर्यंत (सन १०००) भारतातील खरे सुवर्णयुग क्रमश: संपत आले. तत्पुर्वी भारतात देशांतर्गत व देशाबाहेर मोठ्या प्रमाणावर व्यापार चालु असे. या उत्पादकतेच्या व व्यापाराच्या कालाची सुरुवात इसपुर्व साडेतीन हजार वर्षांपुर्वी, म्हणजे सिंधु संस्क्रुतीच्या काळापासुन झालेली पुराव्यासह स्पष्ट दिसते. सिंधु संस्क्रुतीचे जे अवशेष आता जवळपास देशभर मिळाले आहेत त्यावरुन वस्त्रे, मातीची भांडी, मौलिक मण्यांचे अलंकार, रेशीम, हस्तीदंती वस्तु, धातुंच्या वस्तु/मुर्ती/प्रतिमा, सुवर्णाचे दागिणे, कातड्याच्या वस्तु ते लाकडाच्या ग्रुहोपयोगी वस्तुंची निर्यात होत असे. सिंधु संस्क्रुतीच्या आपल्याच पुर्वजांनी उत्पादनच नव्हे तर अन्य तंत्रद्न्यानांत एवआढी प्रगती केली होती कि त्यांनी लोथल येथे क्रुत्रीम गोदीही बांधली. आजही जगात क्रुत्रीम गोद्या अल्प आहेत...आणि ही जगातील पहिली क्रुत्रीम गोदी. तंत्रद्न्यानाची ती कमालच होती. हे लोक जशा वर सांगितलेल्या व धान्य-फळादि अन्य वस्तुही निर्यात करत असत तशीच आयातही होत असे. त्या सागर व्यापारासाठी लागणारी (शंभर ते हजार) वल्ह्यांची व शिडांची जहाजे बनवण्याची कला आपल्याच सुतार/लोहार/धातुकारांनी विकसीत केलेली होती. अन्यथा असा व्यापार असंभव होता. विदेश व्यापार ज्सा भरात होता तसाच देशांतर्गत व्यापारही तेजीत होता. भारतात प्रादेशिक विविधतेमुळे प्रत्त्येक प्रांताचे काहीनाकाही विशेष उत्पादन कौशल्य होते. आसमंतातील उपलब्ध नैसर्गिक साधनस्त्रोतांचा जीवनोपयोगी वस्तुंत बदल घडवण्याचे अथक कार्य त्यांनी केले. त्यामुळे केरळातील माल उत्तर भारतात तर बंगालमधील माल मध्य भारतात...दक्षिणेत सहज येत असे. त्यासाठी बैलगाड्यांचा शोध अर्थातच महत्वाचा ठरला. आजही अपल्या बैलगाड्या या सिंधु सम्स्क्रुतीत सापडलेल्या डिझाईननुसारच बनतात...तीच बाब नौकांची. ग्रुहबांधणीसाठी भजक्या वीटांचा शोधही तत्कालीन गवंड्यांनी लावला. आजही सिंधु संस्क्रुतीची (त्यात महाराष्ट्रातील जोर्वे, सावळदा इ. ते पार दाक्षिणात्य प्रदेशही आले.) नगररचना व ग्रुहरचना आदर्श मानली जाते.
विदेश व्यापारामुळे आर्थिक संम्रुद्धी तर आलेली होतीच परंतु बाह्य जगाशी नित्य संबंध येत गेल्याने सांस्क्रुतीक देवाण-घेवाणही होत होती. त्यामुळे येथील जनता नव्या द्न्यानाला पारखी नव्हती. अर्थातच त्यामुळे संकुचीतपणाला वावही नव्हता. सातवाहन काळातील माहिती मिळते ती अशी कि राज्या-राज्यांतले उत्पादक आपापला माल घेवुन देशांतरगतही मुख्य बाजारपेठांत जात असत. त्यांच्या व व्यापा-यांच्या सर्वच मुख्य श्रेण्याही असत. (आजच्या भाषेत आपण ब्यंका म्हणतो). या व्यापारासाठी जातांना चोर-लुटारुंचा उपद्रव होवु नये म्हणुन रक्षक दलेही असत. सातवाहन काळात त्यांना महारक्ख म्हटले जायचे. हाच समाज काही काळापुर्वीपर्यंत महार म्हणुन ओळखला जात होता.
यामुळे दोन बाबी साध्य झाल्या. एक तर निर्माणकर्त्यांची आपसुक आर्थिक भरभराट झाली. अधिकाधिक उत्पादने करण्याची, नवे शोध लावण्याची गरज निर्माण झाली. मोठमोठी नगरे, किल्ले, वाडे बांधण्याची व नवी गांवे वसवायची पद्धत आल्याने पार गवंडी ते सुतार/लोहार/चर्मकार/तांबट/वीणकर/साळी/कोष्टी/तेली असे जवळपास सारेच उत्पादक घटक मागणीच्या परिप्रेक्षात आर्थिक सत्तेचेही मोठे निर्माते झाले. या लाटेत कथित वैश्यही (व्यापारी वर्ग) मालामाल झाले.राजसत्तेला कर देणे आणि धर्मसत्तेला दान/दक्षिणा देणे यापलीकडे त्यांना आपल्या व्यवसायांशिवाय अन्यत्र पाहण्याची गरजही नव्हती. तत्कालीन स्थितीत शेत-जमीनींच्या मालक्या या राजे, सरदार, सरंजामदार वा जमीनदारांच्या ताब्यात असुन त्या कुळाने कसनारा क्रुषक वर्गसुद्धा खुप मोठा होता. त्यांना जमीनी गहाण ठेवण्याचा वा विक्रयाचाही अधिकार नव्हता. कारण त्यांची मुळात मालकीच नव्हती.मालकीची भावनाच नसल्याने शेतीउद्योगात नवी तंत्रे विकसीत करण्याची त्यांना भावनीक गरज भासणे अशक्यप्राय होते. तसेच झाले. त्यामुळे आज जरी कुळकायद्यामुळे सात-बा-यावर आपली नांवे लागली असली तरी मनोव्रुत्ती तीच राहिलेली आहे.
या काळात धनगर ते गोपाल हा पशुपालक समाज, जो सर्वात प्राचीन व मानवी संस्क्रुतीचा आरंभ बिंदू आहे, त्याचेही जीवन संम्रुद्ध होते. इतके कि आजही पुज्य असलेल्या बव्हंशी देवता या धनगर/गोपाल निर्मित वा त्यांच्याच पुर्वजांच्या स्म्रुती आहेत. अनेक राजघराणी आजच्या ओबीसींमधुन निर्माण झाली हाही एक इतिहास आहे. चंद्रगुप्त मौर्य, बिंबीसार, सातवाहन, भारनाग, पांड्य अशी शेकडो राजघराणी किमान सहाव्या शतकापर्यंत तरी होवुन गेली. ती घराणी हिंदु धर्माप्रमाने शुद्र (ओबीसी) मानली गेलेली आहेत. सम्राट अशोकाचा नातु ब्रुहद्रथ याचा खुन पुष्यमित्र श्रुंगाने केला त्यामागे ब्रुहद्रथ हा बौद्ध धर्मानुयायी होता हे मुळ कारण नसुन तो शुद्र असल्याने त्याला राज्यावर बसण्याचा अधिकार नाही अशी त्याची वैदिक भावना होती म्हणुन. इसच्या दुस-या शतकापासुन एका प्रदेशिक मर्यादेत वाढलेला वैदिक धर्म पुन्हा उचल खायला लागला त्याची ही परिणती होती.
दहाव्या शतकापर्यंत क्रमश: ओबीसींची महत्ता संपुष्टात येवु लागली. त्याला मी अवनतीची पहिली पायरी म्हणतो. येथे महार/मातंग/रामोशी इ. घटक तेंव्हा फक्त शुद्रच गणले जात असत हे येथे लक्षात ठेवायला हवे.पाचवा वर्ण अस्तित्वात नव्हता. चांडाळ/डोंब/श्वपक या काही अंत्यज जाती सोडता कोणाला अस्प्रुष्य मानले जात नव्हते. महार समाज हा रक्षणकर्ता समाज होता व तो सम्म्रुद्ध खेड्यांचा व व्यापारी ते पार किल्ले/राजवाडे इ.चे रक्षण करण्याची जबाबदारी पेलत होता.
या अवनतीची कारणे थोडक्यात खालीलप्रमाणे सांगता येतील:
१. समुद्र बंदीची घोषणा पुराणकारांनी केली व मुस्लिम शासकांच्या मदतीने तिची अंम्मलबजावणीही केली. परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापार थांबला.
२. देशांतर्गत देशीय सत्ता एकापाठोपाठ नामोहरम होवू लागल्याने उत्पादक व व्यापा-यांचे संरक्षक छत्र नष्ट झाले. थोडक्यात देशांतर्गत व्यापार हा अत्यंत जोखमीचा/धोक्याचा बनला. स्वत:च प्रचंड प्रमानावर संरक्षणाची सोय केली नसेल तर दुरचा प्रवासही अशक्य झाला. ही अवस्था अशी बिकट होती कि काशी यात्रेला जाणारे आपले मरण ठरलेलेच आहे असे समजुन चक्क जीवंतपणी श्राद्ध करुनच यात्रेला जात.
३. या सर्वांचा एकत्रीत परिनाम म्हणजे निर्माणकर्त्याचे काम कमी झाले...कारण स्थानिक बाजारपेठा सोडल्या तर अन्यत्र मालाची मागणी अगदी अपवाद वगळता उरलीच नाही. पर्यायाने आर्थिक स्त्रोत आटत गेले. बाह्य जगाशी संपर्क तुटला. इतका कि तो फार फारतर पंचक्रोशीपुरताच सीमित होवू लागला.
४. त्याच वेळीस परकीय सत्तांचे अन्याय/अत्याचार, सातत्याने होणारी युद्धे व त्यात पराजित होत त्यांना सामील होणारे एतद्देशीय सत्ताधारी यांच्या कचाट्यात ज्यांच्याजवळ जे थोडेफारही धन उरले होते ते लुटले जात राहिले. परिणामी हा वर्ग कंगाल होत गेला.
५. राजसत्ता नेहमीच धर्मसत्तेच्या अनुषंगाने जात असल्याने काशी/कांची/पैठणच्या वैदिक धर्मसत्तेने नव्या मुस्लिम राजसत्तेशी जुळवुन घेतले, पण सर्वसामान्य ब्राह्मनांचेही अंतत: अहितच केले. या ब्राह्मणांनी आपला सुड शुद्रांवर (ओबीसींवर) उगवला तो असा कि त्यांनी निर्माणकर्त्यांतीलच समाज फोडला. महार/मांग/चांभार/रामोशी अशा अनेक जातींना अस्प्रुष्य ठरवुन टाकले. त्यासाठी त्यांना सन १००० ते १६६० पर्यंत सातत्याने पडलेल्या शेकडो भिषण दुष्काळात नुसती मढीच काय...पार नरमांसही खाण्याचे निमित्त पुरले. सत्य असे आहे कि या कालात ब्राह्मण काय कि क्षत्रीय काय यांनाही अन्नच उपलब्ध नव्हते. त्यांनी पोट भरण्याचा हाच मार्ग पत्करला. त्यांनीही नरमांस खाल्ले तसेच म्रुत जनावरांचेही मांस खाल्ले. पण ब्राह्मणांसाठी तो म्हणे आपद्धर्म होता...नाही काय? पुराणात विश्वामित्राने नाही का दुष्काळात म्रुत कुत्र्याची तंगडी खावुन प्रण वाचवले? ऋषि-मुनींना सामान्य मानसांचे नियम लागु होत नसतात...आणि हे सारेच ब्राह्मण लगोलग जणु ऋषि-महर्षि होत त्या पातकातुन सुटुनही गेले...ही कथा त्यांच्या कामी आली. त्यांचा तो आपद्धर्म होता...पण इतरांसाठी तो नियम ते कसा लावतील? त्यात महार/मांगांच्या परंपरागत सेवेची त्यांना गरजही उरलेली नव्हती. लोकच एवढे भिकारी झाले होते कि रक्षणाची गरजच केवढी होती? मातंगांच्या सेवा त्यांच्यासाठी कवडीमोल झाल्या कारण त्याचे दाम देण्याची ऐपतच समाज हरपुन बसला होता.
काहीही झाले तरी त्यांना मात्र सुतार/लोहार/तेली/गवळी/धनगर इ. घटकांची त्यांच्याही जगण्यासाठी अनिवार्य गरज होती, त्यामुळे ते तेवढे अस्पुष्यतेतुन सुटले....पण हीनतेतुन सुटका मात्र केली नाही. ती त्यांचीही (सरंजामशाहीवाले आणि धर्मसत्तेवाले) जगण्याची गरज होती हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. खरे ब्रोकन मेन तेच होते. सत्ताधारी एकामागुन एक पराजित होत आपापल्या घरांतील स्त्रीया जेत्यांकडे पाठवण्यात धन्य होत क्रुपाद्रुष्टी प्राप्त करण्यात तत्पर बनले होते. राजपुतांचे उदाहरण सर्वांनाच माहित आहे. ते तसे सर्वत्रच घडले. य ब्रोकन म्यन्सनी (आत्मसन्मान व नैतीक प्रतिष्ठा हरपुन बसलेल्यांनी) जेत्यांना खुष करण्यासाठी आपल्याच समाजबांधवांना लक्ष्य केले. गुलामीची महत्ता पुराणांतील भविष्यवाण्या सांगत हे कार्य जसे ब्राह्मणांनी केले तसेच उत्तरकाळात जन्माला आलेल्या, नवसरंजामदारीतील सौख्ये भोगु इच्छिणा-या स्वार्थासाठी लाचार अशा मुस्लिम सत्ताधा-यांचे हस्तक अशा समाजानेही केले. आपल्याच गांवांना, आपल्याच समाजांना लुटण्यात त्यांनी कसलीही कसर सोडली नाही.
याची परिणती म्हणजे निर्मानकर्ता आपली निर्मितीची उर्जा हरवु लागला. गांवगाड्यात, गांवातच मिळेल त्या उत्पन्नात/बलुत्यात आपला चरितार्थ चालवु लागला. प्रगतीचा, नवनवीन निर्मितीचा पहिला टप्पा संपुन हा नवा गुलामीचा टप्पा सुरु झाला तो जवळपास सन १००० पासुन. या टप्प्याने समाज हीनदीन झाला. त्याची उर्मी संपली. नवी संशोधने थांबली. (या निर्मानकर्त्यांनी लावलेले एकुणातील शोध हा एक स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे.) खरे तर हा टप्पा आला नसता तर कदाचित पहिली औद्योगिक क्रांती याच निर्मानकर्त्यांनी केली असती. जगाला देण्यासारखे खुप काही होत आपण आज रुढार्थाने द्न्यानसत्ता व अर्थसत्ता बनलो असतो. एके काळी होतोच. त्यामुळे ती परंपरा पुढे सुरु राहिली असती तर मी म्हणतो झालेच असते याबद्दल कोणाच्या मनात शंका असु नये.
पण ते तसे व्हायचे नव्हते. नाण्यांत आपल्या सर्जनाची किंमत वसुल करणारा बलुत्याच्या भिकेवर आला तर त्याच्या प्रेरणांची हत्या होनार नाही तर काय? ज्यांनी सर्वच समाजाची रातंदिस रक्षण केले त्यांनाच धर्मबाह्य करत अस्प्रुष्य ठरवले तर कोणते इमान मिळणार? नामदेव चोखा मेळ्याला समजावुन घेवू शकत होता. वेशीच्या पडल्या बांधकामाखाली दडपलेल्या त्याच्या अस्थी शोधु शकत होता...त्याची समाधी करु शकत होता...तेंव्हा हे तथाकथित उच्चवर्णीय कोठे होते? आपले हक्क आणि अधिकाराचे वाद आदिलशहा ते निजामाच्या दरबारात लढत होते. आपल्या जहागि-या कशा रक्षित राहतील यासाठी कोनत्याही थरावर उतरत होते, प्रसंगी भाऊबंदांच्या उरावर बसत त्यांच्याहे कत्तली करण्यात कसुर करत नव्हते.
कुणब्यांची हालत त्याहुन कमी नव्हती. दुष्काळ पडो कि अन्य काही राजकीय आपत्ती येवो, या बिचा-यांना आपल्या पोरी/बायका बटकीनी ते कुणबीनी म्हणुन अक्षरशा विकाव्या लागत...पेशवाईत तर कुनबीनींचे बाजार भरवले जात कारण पोटाचा प्रश्नच तेवढा भयानक होता. म. फुलेंचे शेतक-यांचा आसुड अवश्य वाचा...हे पुस्तक त्यांनी जमीनदारांसाठी नव्हे तर या कसलीही मालकी नसलेल्या स्व-भुमीहीन नागवल्या गेलेल्या प्रजेसाठी लिहिलेले आहे. (अर्थात आज हेच कुणबी स्वत:ला उच्चवर्णीय मराठे समजतात हा भाग वेगळा!)
हा साराच इतिहास उद्विग्न व खिन्न करणारा आहे...तरीही अनेक लोक त्यातही सुवर्णपाने शोधतात त्यांच्या अक्कलेची कीव करावी तेवढी थोडीच आहे!
असो.
हे मध्ययुग एकंदरीत सर्वच निर्माणकर्त्यांना क्रमाक्रमाने संपवत नेणारे ठरले. इज्जत संपली. आत्मसन्मान संपला. हताशा आणि निराशेच्या भरात एक तर रक्तरंजित क्रांती तरी घडते किंवा लोक नियतीशरण होत जेही काही घडते आहे ती इश्वरेच्छा आहे असे मानत गुलामीलाच धर्मतर्क जोडत वांझ जीवन जगु लागतात. भारतात नेमके दुसरे घडले. तुकोबारायांना बायको-मुलगा मेल्याचे दु:ख नाही तर उलट आपल्या अध्यात्ममार्गातील धोंड दुर झाल्याचे सुख आहे. हीण जातीत जन्माला आलो म्हणुन ही रया आहे असा सुर बव्हंशी संतांच्या अभंगांत आहे. बव्हंशी सारेच संत एवढे त्यागमुर्ती आणि संसाराला तुच्छ मानणारे असुनही ते एवढे पराकोटीचे स्वकेंद्रितच का राहिले हा माझा नेहमीचा प्रश्न आहे आणि अद्याप तरी त्यावर कोणी उत्तर दिलेले नाही. खरे तर समाज व विचारक्रांती ते करु शकत होते...किमान तसे विचार तरी देवु शकत होते. वेदविरोध (तोही शक्यतो लटका) सोडला तर पुराणांत व अन्य हिंदु धर्मग्रंथांत सांगितले त्यापेक्षा अभिनव म्हनता येईल असे वेगळे तत्वद्न्यान एकाही संताने दिलेले नाही हे वास्तव आम्हाला समजावुन घ्यायला लागणार आहे. एका अर्थाने ते पौराणिक धर्मतत्वांचेच पाठीराखे होते. धर्मातील काही अश्लाघ्य बाबींबद्दल त्यांची तक्रार होती, पण तिचे निवारणही त्यांनी ईश्वरावरच सोपवले हेच काय ते सत्य आहे.
या सर्वांची अपरिहार्य परिणती म्हनजे समाज धार्मिक आखाड्यातील एक अविभाज्य खेळाडू बनला. त्यांत भर पडणे स्वाभाविक होते. कारण मुस्लिमांचे राज्य गेले आणि इंग्रजांचे आले. ते नुसते मुस्लिमांसारखे राज्य नव्हते. मुस्लिमांचे राज्य हे औरंगझेबानंतर येतद्देशीय हिंदु सुलतानांचे राज्य बनलेले होते. पण आर्थिक पाया हा जवळपास हजार वर्ष होता त्याहीपेक्षा ढासळलेला होता. औद्योगिक क्रांती जर युरोपात झाली नसती तर इंग्रज हा देश कधीच सोडुन गेले असते. पण औद्योगिक क्रांतीमुळे इंग्रजांना तीन गोष्टी समजल्या त्या अशा...एक तर विपुल कच्चा माल जो आज वापरात नाही...अत्यंत स्वस्त मजुर...आणि भारतियांची गुलामी व्रुत्ती...
तिसरी अवनती येथे सुरु झाली. जसे भारतात आधुनिक तंत्रद्न्यानाचे उद्योग सुरु झाले, तसे येथील निर्माणकर्त्यांचे होते ते उरले-सुरले व्यवसाय/उद्योगही क्रमश: बसु लागले. याचा फटका तेल्यापासुन ते वीणकरापर्यंत बसला. इतका की रेडीमेड स्वस्त आणि मस्त चपला बुट येवू लागल्यावर चांभारांनाही बसला. ज्या गोष्टी अद्याप नवीन तंत्रद्न्यानामुळे उपलब्ध नव्हत्या तेवढ्याच बाबतीत गांवगाडा जरा चौकस राहिला. बकी ज्यांनी गांवाचे सेवा केली त्यांचे उद्योग संपले म्हणुन लाड करण्याचे काय कारण होते? तसे ते कोणी केलेही नाहीत. हळु हळु हा उपसर्ग, सुपातले जात्यात या नियमाप्रमाणे, जवळपास सर्वांनाच बसला...व जे काम कधी केलेच नव्हते ते काम पोटासाठी करण्याचा प्रसंग गुदरला.
आणि हे काम म्हणजे शहरांकडे पळणे, हमाली ते कामगार ही बिरुदे मिरवणे. रात्री पुन्हा भजने म्हणणे किंवा कामानंतर दारु पिवून आणि घरी जावुन बायकोला/पोरांना निराशेपोटी झोडपणे. या सर्व वर वर्णिलेल्या इतिहासात पुरुषांपेक्षा मायमाउलींचा इतिहास अधिकच विदारक आहे.. इतका कि पाषाणालाही आसवे उगवतील!
असो. मी निर्माणकर्त्यांचा -हास कसा झाला हे येथे सांगितले. तीन टप्प्यांत त्याने तीन पावले जमीन चालली...जी त्याला पावलापावलाने क्रमशा पाताळात गाडण्यासाठीच होती...आता उरलेले अर्धे वामनावतारी पावुल त्याचे पुरेपुर पाताळात जाण्यासाठीच आहे. अशा घोर अंधकारमय पाताळात कि पुन्हा कोणता द्न्यानाचा, स्वातंत्र्याचा सुर्य कधीही त्याला दिसणारच नाही. वामनाचे व्रत घेतले तर असे होणारच याबाबत तीळमात्र शंका असण्याचे कारण नाही.
लोकशाही यांना समजलीच नाही हेच खरे. हेच लोक भारतीय स्वातंत्र्याचे आणि आजच्या लोकशाहीचे निर्माते होते. म. गांधींच्या मागे हाच समाज अवाढव्य प्रमाणात स्वातंत्र्यासाठी उभा होता. यांनी लाठ्या खाल्या...तुरुंगवास भोगले. पण स्वातंत्र्य खेचुन आनले. म. गांधींना कदाचित त्यांच्या सहस्त्रकातील क्रमाने झालेली पडझड माहित असावी. त्यांनी भारतीय बदललेल्या मानसिकतेला हवा तसा आपला "सांतिक" चेहरा बनवला. तो यशस्वी झाला. उलट रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न पाहणारे, पण जे गेली हजार वर्ष षंढ होवुन बसले होते, त्यांना एकाएकी रक्तरंजित क्रांती सुचु लागली. त्यांच्या रक्तरंजित क्रांतीचा मतितार्थ एवढाच कि त्यांनी गांधींना गोळी घालुन मारण्याचा विराट पराक्रम केला!
मग लोकशाहीवर (त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही...भारतीय राज्यघटनेवर विश्वास नाही...त्यांचा राष्ट्रगीतावर विश्वास नाही...किती सांगु?) डल्ला मारण्याचा अविरत प्रयत्न केला आणि ज्या पिडीत समाजांनी गांधी व बाबासाहेबांना खरे बळ पुरवले त्यांचा धुव्वा उडवण्याचा चंग विविध पक्षांच्या मार्फत यांनीच स्वातंत्र्योत्तर काळात बांधला. बाबासाहेब हे फक्त महार समाजाचे तर फुले हे फक्त माळ्यांचे. गांधी बनिया...म्हणजे तेही ओबीसी...(हिंदु धर्मानुसार कलियुगात जसे क्षत्रिय नाहीत तसेच बैश्यही नाहीत...कधी विसरु नका हे...हिंदु धर्मशास्त्रांनुसार कलियुगात फक्त दोनच वर्ण असतात आणि ते म्हणजे ब्राह्मण आणि शुद्र...उरलेले अवर्ण...) शुद्र गांधींचे नेत्रुत्व वा त्यांच्या यशाला सलाम हे कसे करणार? त्यांची हत्या जशी अपरिहार्य होती...(ते कारणे काहीही देवुद्यात...!) तशीच ओबीसींची हत्या शिर्कान स्वातंत्र्योत्तर काळात होणारच याबाबतहे शंका असुच शकत नव्हती आणि ती चक्क त्यांनी करुन दाखवलीच आहे आणि याची लाज ओबीसींना नाही, त्याचे गांभिर्य नाही. आणि ज्यांनी आत्मघातच करुन घेत जागायचेच नाही असेच ठरवले असेल तर त्याला कोण वाचवणार बरे?
तेंव्हा फुकाचे अभिमान सोडा...हातानेच तुम्ही आपल्या गळ्याचे माप इतरांना दिले...त्यांनी बरोबर अगदी मापात गळफास बनवला...आता त्यांनी तुम्हालाच फासावर लटकवत गुदमरवुन टाकले असेल तर दोष तुमचाच आहे. कशाला गळे काढता मग? काय अधिकार आहे तुमचा? भिका-यांना निवडीचा अधिकार नसतो. जे थाळीत वाढले जाते ते निमुट घ्यावे हा नियम. अन्यथा जगावे तर उत्तम..काय झाले एक दोन पीढ्या सहनकर्त्या झाल्या तर? शेकडो पीढ्या दैन्यात गेल्या..झगडल्या...मेल्या...त्यांची नोंद कोणीही ठेवलेली नाही वा ठेवायची गरजही भासलेली नाही. कोनत्या भुषणाचे वांझ फुत्कार तुम्ही सोडता मग?
तीन पावलांबाबत मी आधीच लिहिले ज्यांनी अवनती आणली. त्याबाबत व्यवस्थेला/परिस्थितीला एकवेळ दोष देता येईल कदाचित...
पण आज?
पुढचे अर्धे पावुल हे खरे तुमचेच आहे...जागतिकीकरणाचे आहे. एक सहस्त्र वर्षांपुर्वी तुम्ही खरे जागतीकिकरणाचे खरे अध्वर्यु होता...अरबस्तानपासुन ते इजिप्तपर्यंत, ग्रीकांपासुन ते रोमपर्यंत, इंडोनेशियापासुन ते पार मेक्सिकोपर्यंत खरे तत्कालीन स्थितीतील जागतीकीकरण तुम्ही अनुभवले, जगले व लाभार्थीही झाले... प्रादेशिक संस्क्रुतीला जागतीक संस्क्रुती बनवलेत...
विसरु नका...उचला हे उरलेले अर्धे पावुल...ते खरे बळीराजाचे पावुल...
वामन हा खुजा...मग तो मनोव्रुत्तीने असो कि क्रुतीने...बळी हा नेहमीच आकाशव्यापी असतो...तो कोणाचा घात करत नाही...तो उदारच असतो...कनवाळुच असतो...क्षमाशीलच असतो...
मानवतेची सारी मुलतत्वे ध्यानी घेत हे उरलेले अर्धे पावुल उचला...आधीची तुमची तीन पावले तुम्हालाच विनाशापर्यंत घेवुन आलेलीच आहेत...पण तो तुमचा नव्हे तर एकंदरीत व्यवस्थेचा पराभव होता. ते खरे ब्रोकन मेन होते...पराजयांसाठीच ते जन्माला आलेले होते.
तीन पावले आजवर तुम्हीही पराभुतांपाठीच उचलली...
पण हे स्वत:चे...अगदी स्वत:चे...आत्माभिमानाचे...नि फार नव्हे...फक्त अर्धे पावूल....
बस...विजयासाठी उचला!
जग तुमचेच आहे!

ओबीसींनो "शुद्र" शब्दाचा अर्थ माहित आहे काय? (लेख ७)

संजय सोनवणी, 

गेली काही हजार वर्ष ओबीसी (निर्माणकर्ते) "शुद्र" म्हणुन संबोधले जातात. हीणवले जातात. परंतू आजतागायत शुद्र शब्दाची व्युत्पत्ती मात्र शोधण्याचा आपण प्रयत्न केला काय? शुद्र म्हणजे नेमके काय? शुद्र शब्द संस्क्रुतात आला कोठुन आणि त्या शब्दाचा नेमका अर्थ काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु पाणिनी ते सर्वच सम्स्क्रुते व्याकरनकारांनी नेमक्या याच शब्दाची नेमकी व्युत्पत्ती आणि अर्थ दिलेला नाही. या शब्दाचे मुळ (Root) काय? हा शब्द कसा बनला आणि त्याचा नेमका अर्थ काय, याबाबत ते मौन पाळुन आहेत. का बरे?
आपण उच्चवर्णीयांबाबत मात्र त्यांच्या वर्णाची मुळे व अर्थ दिलेला आहे हे सरळ पाहु शकतो. उदा: ब्राह्मण: या शब्दाच्या कालौघात दोन व्युत्पत्त्या बनलेल्या आहेत वा दिलेल्या आहेत.
ऋग्वैदिक अर्थाप्रमाणे "जो मंत्र (ब्रह्म या शब्दाचा वैदिक अर्थ मंत्र असा होतो.) रचतो तो ब्राह्मण.
औपनिषदिक अर्थाने जो विश्वाचे मुळकारण (येथे ब्रह्म म्हणजे विश्वोत्पत्तीचा कारक) जाणतो तो ब्राह्मण.
क्षत्रियांबाबत खालील उपपत्त्या आहेत.
१. "क्षत्र" म्हणजे राज्यकर्ता वा लढवैय्या. जो ही कर्मे करतो तो क्षत्रीय.
२. "क्षत्र" हा शब्द "क्षत"...या मुळापासुन बनला असू शकतो. क्षत म्हणजे क्षती पोहोचवणारा, हत्या करनारा रक्षण करणारा यातुन क्षत्रीय हा शब्द विकसीत झालेला असु शकतो.
वैश्यांबाबत खालील उपपत्त्या देता येतात:
१. ऋग्वैदिक अर्थाने "विश" म्हणजे ग्राम. ग्रामांत राहणारे ते सारे वैश्य.
२. मनुस्म्रुतीनुसार शेती/पशुपालन करणारे, वस्तुंचे निर्माते व व्यापार करणारे ते वैश्य. येथे "विश" हा शब्द "व्रुद्धी करनारे ते विश" या अर्थाने येतो.
मेगास्थेनीसने लिहुन ठेवले आहे कि भारतात त्याकाळी वैश्य वर्णीयांची संख्या सर्वाधिक होती. वैश्यांना उपनयनाचीही अनुमती होती. हे मी येथे नोंदवुन अशासाठी ठेवतो आहे कि वस्तु उत्पादक, शेतकरी, पशुपालक, व्यापारी हे सारेच एकेकाळी वैश्य मानले जात होते. नंतर व्यापारी वगळता सारेच शुद्र मानले जावू लागले हेही एक ऐतिहासिक वास्तव आहे.
आता आपण शुद्रांकडे वळुयात. हा एकमेव शब्द असा आहे कि याचे मुळ/कुळ व मुलार्थ माहित होत नाही व ह शब्द मुळात सम्स्क्रुतातही नाही, असता तर त्याचे मुळ व अर्थ नक्कीच सांगता आला असता. याचाच दुसरा अर्थ असा कि शुद्र हा शब्द प्राक्रुतातुन आलेला आहे व तो तसाच्या तसा वापरला गेला आहे.
क्षुद्र या शब्दापासुन शुद्र हा शब्द आला असावा असे काही तद्न्यांचे मत आहे पण ते मत कधीच फेटाळुन लावले गेलेले आहे. मुळात संस्क्रुतात क्षुद्र हा शब्द होताच, तर मग तो तसाच्या तसा राहण्यात अडचण नव्हती.
तरीही आधुनिक भाषातद्न्यांनी शुद्र शब्दाचे मुळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा आपण आधी आढावा घेवुयात.
१. "सुत्र" या शब्दापासुन शुद्र हा शब्द निर्माण झाला असे एक मत आहे. "सुत्र" म्हणजे धागा. "ज्यांना धाग्याने बांधुन ठेवले आहे (Bonded) ते शुद्र अशी एक व्युपपत्ती आहे.
२. "शुच" (म्हणजे पवित्र करणे) व मुळ "चा" (म्हणजे बदलवणे) "दा" झाला, म्हनजे या शुचिदा पासुन शुद्र हा शब्द बनला असावा असा छादोग्य उपनिषदाचा हवाला देत हे मत मांडले गेले आहे. :" पवित्र करुन घेत बदलवले गेले ते शुद्र" अशी ही एक व्युत्पत्ती आहे.
३. मुळ इराणी शब्द "सुद्रेह" या शब्दापासुन शुद्र शब्द आला असावा असेही एक मत आहे. पण या भाषेत सुद्रेह हा पुजारी/पुरोहितासाठी वापरला गेल्याचे दिसते.
४. शुभा...म्हणजे वेदना...वेदना देनारा तो शुद्र अशीही एक व्युत्पत्ती आहे.
५. ऋग्वेदातील "जुद्रा" या (ऋ. १०.९०) शब्दापासुन शुद्र हा शब्द आला असावा असेही एक मत आहे. जुद्रा या शब्दाचा अर्थ चवथा असा होतो. परंतु हा शब्द काही ठिकाणी राजांसाठीही वापरलेला आहे असे दिसते.
६. शुद्र हा शब्द द्राविडीयन वा मध्य अशियातील काही भाषांमधुनही आलेला असु शकतो, पण त्या भाषा आज म्रुत असल्याने निश्चित असे मत देता येत नाही अशी हारही भाषातद्न्यांनी मानलेली आहे.
आता वरील तशी एकही व्याख्या "शुद्र" या शब्दाची समर्पक अशी व्युत्पत्ती देत नाही हे लक्षात आले असेलच. संस्क्रुत भाषेत या शब्दाला काहीएक अर्थ नाही हेही आपण पाहिलेच आहे. मग ज्या शब्दाला काही अर्थच नाही तो शब्द एका विशाल समाजाला चिकटवत त्याची धार्मिक, आर्थिक व सामाजिक घोर फसवणुक कशी व का केली गेली असेल हेही पाहणे क्रमप्राप्त आहे.
त्याहुन महत्वाचे म्हनजे व्यापार वगळता क्रुषिकर्म, पशुपालन, उत्पादन, कलादि क्षेत्रातील लोकांना मुळात वैश्यच मानले जात होते. हिंदु धर्म हा मुळात त्रैवर्णिकच आहे अशीच पुराणांचीही बव्हंशी समजुत आहे. ऋग्वेदातील पुरुषसुक्त व त्यातील चातुर्वर्ण्य निर्मान झाल्याची माहिती देणा-या त्या दोन ऋचा कशा बनावट व नंतर कोणीतरी घुसवुन दिलेल्या आहेत याबाबत मी आधी माहिती दिलेलीच आहे. त्यामुळे व शुद्र शब्दाची व्युत्पत्तीच मुळात उपलब्ध नसल्याने येथे वेगळेच चिंतन करणे भाग आहे.
-------------२---------------
पहिली बाब येथे मी स्पष्ट करतो ती ही कि भारतात सर्वात बलाढ्य अशी असुर संस्क्रुती होती. या संस्क्रुतीने सिंधु समाज घडवला. असुर हे मुलता: शैव होते. वैदिक जनही मुळचे याच संस्क्रुतीचे म्हणुन ऋग्वेद रचनेच्या आरंभ कालात ते आपापल्या दैवतांना "असुर वरुण, असुर इंद्र, असुर अग्नि" असे सन्मानाने संबोधत असत. परंतु या मंडळीने शैव सिद्धांत नाकारत नवीन धर्म स्थापन केला. तो यद्न्याच्या माध्यमातुन अमुर्त देवतांना हवि देण्याचा धर्म होता. वर्णव्यवस्था ऋग्वेदाने मांडलेली नाही...पुरुषसुक्त मात्र अपवाद आहे व वर्णव्यवस्थेला पावित्र्य देण्यासाठी तो उद्योग मनुस्म्रुतीच्या काळानंतर केलेला आहे हे मी वारंवार स्पष्ट केलेले आहे. उर्वरीत ऋग्वेदात ब्राह्मण, क्षत्र, विश एवढेच शब्द येतात व ते वर्ण म्हणुन नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. हा धर्म/संस्क्रुती फक्त सरस्वती नदीच्या काठावरच्या मर्यादित प्रदेशात निर्माण झाली. उर्वरीत भारत मात्र असुर संस्क्रुतीने व्यापलेला होता.
आजही आपण तीच संस्क्रुती जपत आहोत व म्हणुनच हा सर्वच शैव प्रदेश भाषा व प्रादेशिक संस्क्रुत्या वेगळ्या असुनही अभंग राहिला. यद्न्य संस्क्रुती विशिष्ट समाज वगळता कोणीही जपली नाही. ऋग्वेदाने जे केले नाही ते मात्र नंतर झाले. म्हनजे तीन वर्णीय वाटणारे...पण तसे नसनारे शब्द मात्र वर्णांना लागु केले गेले. परंतु मग तीनच वर्ण होते...
येथे लक्षात घ्यायला हवे ते हे कि वैदिक धर्म न पाळणारे, असुर संस्क्रुतीचे लोक हेच बहुसंख्य होते. त्यांचे विराट सम्राट होते, शासक होते. त्यामुळे वेदबाह्य, वैदिक संस्क्रुती न पाळणा-या लोकांना काहीतरी संबोधणे आवश्यकच होते आणि ते त्यांनी केले. ते स्वाभाविक असेच होते.
आता जी संस्क्रुती आपल्यापेक्षा वेगळी, वेगळ्या धर्मतत्वांवर चालते आणि अवाढव्य आहे अशा संस्क्रुतीतील लोकांकडे हीनत्वाने पाहणे व त्यांची यथास्थित निंदा करणे स्वाभाविक होते. हे आपण जागतीक धर्मेतिहासात स्पष्टपणे पाहु शकतो. मग या असुरांना (याच संस्क्रुतीतुन पुढे वैदिक धर्माचे मारेकरी असे जैन व बौद्ध धर्मही निर्माण झाले.) ते कसे व काय उल्लेखत असतील?
शुद्र या शब्दाची व्युत्पत्ती यातच सामावलेली आहे असे माझे स्पष्ट मत आहे....ते असे...
शुद्र हा शब्द मुळात कोणत्याही व्यवसायाशी निगडीत नाही. असता तर असंख्य शुद्र राजे झाले नसते.
शेतकरी, उत्पादक, पशुपालक, जो वैदिक व्यवस्थेत, त्यांच्या समधर्मी समाजात वैश्य होता त्याला शुद्र म्हटले गेले नसते. ही त्यांच्याच धर्मातील विसंगती ठरली असती.
असुर संस्क्रुतीतील राजे, व्यापारी, उत्पादक, शेतकरी ते चाकरदार वर्ग हे त्यांच्या द्रुष्टीने परकेच असल्याने त्यांच्याबाबत ते हीनतापुर्वक शब्द वापरणार हे उघड आहे. एका धर्माचा माणुस अन्य धर्मियांबद्दल शेवटी कितपत मानवतावादी द्रुष्टीकोन वापरतो?
असुर संस्क्रुतीची भाषा ही पुरातन काळापासुन प्राक्रुत आहे. ऋग्वेद या भाषिकांना "मुघ्रवाच" (अनुनासिक व विसंगत भाषा बोलनारे असे संबोधतो.) असुर हा शब्द सम्स्क्रुताने स्वीकारला तो जसाच्या तसा कि बदल करुन?
संस्क्रुतने ऋग्वेदातील "पवमान" सारखे शब्द प्राक्रुतातुन जसेच्या तसे उचलले आहेत, पण बव्हंशी शब्दांवर संस्क्रुत कलमे केलेली आहेत. पवमान म्हणजे आजच्या (पाणिनीच्या) संस्क्रुतात "प्रवाहमान." पवमान शब्द मात्र मुळचा प्राक्रुत आहे. सम्स्क्रुत हीच मुळात प्राक्रुताचे संस्कारित रुप असल्याने व ऋग्वेद हा पाणिनीपुर्व असल्याने त्यात प्राक्रुत शब्दांची रेलचेल आहे, एवढेच येथे लक्षात घ्या.
संस्क्रुताने असुर हा शब्द पुढे बदलुन घेतला. असुर हा शब्द त्यांनी असुरांना बदनाम करण्यासाठी अवाढव्य कथांची पौराणिक रेलचेल करत बदनाम केला, पण क्रुष्ण हा आईच्या बाजुने असुर तर होताच पण त्याचा नातवाने, अनिरुद्धाने बाणासुराच्या कन्येशी, उषेशी, विवाह तर केलाच पण त्याचसोबत अनेक यादवांनी असुर कन्यांशी विवाह केले. अर्जुनाने नागकन्या उलुपीशी तर जरत्कारुने नागकन्या जरत्कारुशीच विवाह केला. भिमाने हिडिंबेशी कंत्राटी विवाह केला.
आता हे वर्णाभिमानी वैदिकांना सहन कसे होणार? त्यामुळेच कि काय वर्णसंकराची व्यथा वारंवार नुसत्या महाभारतात नव्हे तर खुद्द गीतेतही येते. वर्णसंकरामुळे कुलक्षय कसा होतो म्हणुन तो कसा टाळावा याबाबत विवेचने असुर क्रुष्णाच्याच तोंडी टाकुन या महाभागांनी आपला कार्यभाग साधला.
हे विषय बदलाचे साधन नाही. शुद्र शब्द कसा आणि कसा निर्माण केला गेला याबाबतचेच हे विवेचन आहे.
शुद्र शब्दाची कसलीही व्युत्पत्ती संस्क्रुत व्याकरणकार देत नाहीत हे आपण पाहिलेच आहे. मग हा शब्द आला तरी कोठुन?
व्याकरणाने पहायला जवे तर शुद्र शब्दाची फोड अशी होते...
"शुद,,," या शब्दाला लागलेली विभक्ती म्हणजे "द्र".
शुद या मुळापासुन शुद्ध हा शब्द बनला असु शकेल, पण ते संस्क्रुतात. सर्वच भाषा काही संस्क्रुताचे मुळ भषिक रुप पाळत नाहीत. त्यामुळे हेच मुळ प्राक्रुतातच पहावे लागते कारण तीच मुळची भाषा आहे. पण समजा ही व्युत्पत्ती ग्रुहित धरली तर त्याचा अर्थ असा होईल कि जे मुळचे शुद्धच होते ते म्हणजे शुद्र. पण वैदिकजन एवढे क्रुपाळु वा उदार नव्हते हेही येथे लक्षात घ्यायला हवे. असुर हे नेहमीच त्यांचे शत्रु होते.
त्यामुळे माझ्या मते, असुर...द्र (असुरद्र), म्हणजे जे असुर संस्क्रुतीचे ते. परकीय संस्क्रुतीचे ते. पुढे याच वैदिक संस्क्रुतीने "सुर" हा शब्द शोधुन काढला जो संस्क्रुतात मुळीच अर्थवाही नाही असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात. याचाच एक अर्थ असा कि असुर शब्दाला विरोधी म्हणुन सुर हा शब्द निर्माण केला गेला. असे जर असेल तर आणि अशा भाषिक कोलांट-उड्या वैदिक धर्मियांनी मारल्या आहेतच तर...त्यांनी असुरातील अ काढुन टाकला आणि सुरद्रला शुद्र करुन टाकले असे म्हनणे क्रमप्राप्त आहे. कारण हा शब्द ऋग्वेदात नाही....तो अत्यंत उत्तरकालात, म्हणजे ऋग्वेदनिर्मितीनंतर दोन हजार वर्षानंतर आलेला शब्द आहे....वर्ण म्हणुन...
असुरद्र याच शब्दाचा कालौघातील संक्षेप म्हणजे शुद्र होय! (सुरद्र...सुद्र..शुद्र...)
एकार्थाने शुद्र असने हीच एक अभिमानास्पद बाब आहे. आपल्या पुरातन सांस्क्रुतीक ठेव्याची, विजयांची नि पराभवांची नित्य आठवण देणारी ही ठेव आहे...
वर्ण:
भारतात वर्णव्यवस्था आहे. होती. ते जावुद्या, पण "वर्ण" शब्दाचा सरळ संस्क्रुत अर्थ रंग असा आहे. त्यानुसार जेवढी याबाबत चर्चा झाली आहे तिचा मतितार्थ थोडक्यात असा:
ब्राह्मण हे गोरे, नीळ्या डोळ्यांचे, उंच आणि धिप्पाड आणि सत्वगुणी असतात.
क्षत्रीय हे रक्तवर्णाचे तामसी स्वभावाचे असे लढावू असतात.
वैश्य हे गहु वर्णाचे व्यापारी व्रुत्तीचे असतात.
शुद्र हे तमोगुणी, सेवाव्रुत्तीचे आणि काळ्या रंगाचे असतत.
आता जर तुमच्यासमोर माणसे उभे करुन त्यांचा धार्मिक वर्ण सांगा म्हटले तर तुमची पंचाईत होईल. खुद्द ऋग्वेदात काळ्याकुट्ट लोकांने ऋचा लिहिल्या आहेत. क्रुष्ण हा काळाच होता. आज बव्हंशी ब्राह्मण काळे वा गहुवर्णीय आहेत. त्याच वेळीस शुद्रातीशुद्र हे अत्यंत गोरे व उंच धिप्पाड आहेत. थोडक्यात रंग म्हनजे वैदिक वर्ण ही व्याख्या मुळात लाथाडुन टाकता येईल अशीच आहे.
मग वर्ण म्हणजे नेमके काय यांना अभिप्रेत होते बरे? व्यासही काळा, वाल्मिकीही काळा, रामही काळा अन क्रुष्नही काळा...विट्ठलही काळा...यादी अवाढव्य आहे.
म्हनजेच त्वचेचा रंग हे काही वैदिक/अवैदिक ठरवण्याचे साधन नाही. वंशविभेदाचे साधन नाही. मग चातुवर्ण्य हा मुढ शब्द यांनी कोठुन आणला, हेही शोधणे आवश्यक आहे.
पण ते पुढील लेखात.

ओबीसींनो, हरामखोरांना हरामखोरीनेच उत्तर द्या! (लेख ८)


ओबीसींना कालजेयी व्हायचे असेल, जर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था आणि संस्क्रुतीचे नवनिर्माते बनायचे असेल, जर राज्य करायचे असेल तर त्यांना पुन्हा निर्माणकर्त्याच्याच भुमिकेत शिरावे लागणार आहे. त्यासाठी अत्यंत व्यापक स्वप्ने आणि पराकोटीच्या प्रयत्नांची गरज आहे. त्याही आधी सारे निर्मानकर्ते हे मुळचे एकच आहेत, धनगरापेक्षा वंजारी वा सोनारापेक्षा माळी वेगळा आहे या समजाला पुरेपुर तिलांजली द्यावी लागणार आहे.
हे कसे करायचे? मी यावर स्पष्ट विचार येथे मांडनार आहे. ते कदाचित धक्कादायक वाटतील, पण त्याला इलाज नाही. आपली मानसिकता त्याखेरीज बदलणार नाही.
ओबीसी सध्या किमान संख्येने ५२% आहेत. आताच्या जातवार जनगणनेनंतर अजुन चित्र स्पष्ट होईल. ते काहीही असले तरी जो समाजघटक संख्येने अर्ध्याहुन अधिक आहे तोच सत्तेचा चालक बनु शकतो. त्यात काहीएक अशक्य नाही. पण महाराष्ट्रात ओबीसींचा सध्या तरी एकच पक्ष आहे. त्याला बळ देता आले तर उत्तमच, नाही तर सर्वच पक्षांत शिरकाव करुन घ्या.
हा शिरकाव फुकटे कार्यकर्ते म्हणुन नव्हे तर पदाधिकारी म्हणुनच करा. पदे/तिकिटे मिळनार नसली तर लाथ मारा. संधी देईल अशाच पक्षात जा.
राजकारणात निर्लज्जता असावीच लागते. शब्द कठोर वाटला तर त्याला लवचिकता असा वाचा. सत्ता हातात येण्यासाठी कोणत्याही स्तरावर उतरायला कचरु नका. त्याचवेळीस ही सत्ता कोणासाठी आणि का मिळवायची आहे हेही विसरु नका. आजवरच्या सर्वच सत्ताधा-यांनी सत्तासंपादनासाठी अगदी हेच केले आहे. उगा शहाजोगपणा करण्यात अर्थ नाही.
दुस-यांना वापरायला शिका आणि आपल्याला कोणी वापरणार नाही याची काटेकोर काळजी घ्या.
सध्याच्या सत्ताधारी जमातींना सत्तेबाहेर हाकलण्यासाठी सर्व पिडीत समाजांची मदत घ्या आणि त्यांच्याशी न्यायाचे वर्तन करा.
स्वत:च्याच जातीचे धिंडोरे पिटवणे सर्वप्रथम बंद करा आणि शुद्रातीशुद्र मानले गेलेले सारेच एकमेव सत्ताकारणाचे ध्येय आहे आणि तेच निर्माणकर्त्यांची संपुर्ण सत्ता अस्तित्वात/वास्तवात आणु शकतात हे विसरु नका.
गांव पातळी ते राष्ट्र पातळीपर्यंत लहान-मोठ्या संघटना स्थापन करा, प्रबोधने करत रहा, सर्व ओबीसी संघटनांत संवाद ठेवा.
मतदान करतांना ओबीसी उमेदवार असेल किंवा ओबीसींनी ठरवलेला उमेदवार असेल तरच मतदान करा. मग तो कोणत्याही पक्षाचा असो वा अपक्ष असो. अन्यथा मतदानावर बहिष्कार टाका.
जो पक्ष ओबीसींना किमान ५०% उमेदवा-या देत नाही त्या पक्षांवर बहिष्कार घाला. राजकीय पक्ष म्हनजे जर समाजाचा चेहरा असेल आणि तोच बहुसंख्यांना डावलत आपल्या सत्तीय मदांधता वाढवण्यासाठी तुमचा वापर करुन घेत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवुन द्या. त्यांची कितीही उदात्त भुमिका असली तरी त्यांना खड्ड्यात घाला. राजकारणात उदात्तता हे नाटकच असते आणि ते ओबामापासुन गांधी घराण्यातले असोत कि बीजेपीवाले असोत, करतच असतात. नाटकांना बळी पडणे आणि फालतु नौटंकी भाषणांनी प्रभावित होत माकड बनण्याची बेवकुफी करणे प्रथम बंद करा.
राजकारणासाठी पैसा लागतो हा एक समज आहे. हरामखोर नेत्यांची ती गरज असते हेही खरे आहे. लोक सर्वांकडुन पैसे घेतात आणि मत ज्याला द्यायचे त्यालाच देतात हे अलीकडच्या निवडनुकींनीही सिद्ध करुन दाखवले आहे. निर्मानकर्त्यांचे प्रबोधन करा, त्यासाठी लागेल तो खर्च अवश्य करा, पण त्यात सातत्य ठेवा. फक्त निवडनुकीच्या तोंडावर ओबीसी कळवळ्याच्या नौटंक्या करु नका.
साहसी बना. तुमचे हेतु दडवायची काहीएक गरज नाही. कोणाच्या दडपनांना बळी पडायची गरज नाही. त्यासाठी लढावु ओबीसींना तयार ठेवा. गुद्द्याचे उतर गुद्द्याने तर मुद्द्याचे उत्तर मुद्द्याने द्यायची तयारी ठेवा. आमच्या पाठीशी आमची माणसे आहेत व प्रसंगी ते धावुन येतात हे खेड्यापाड्यातील एखाददुसरे घर असना-या ओबीसी कुटुंबाला समजु द्या. त्याच वेळीस वैचारिक कोणताही मुद्दा कोणी उपस्थित करत असेल तर त्याला उत्तर द्यायची बौद्धिक शक्ती वापरा, आपली नसेल तर आपल्याच स्वबांधवांना मदतीस घ्या.
राजकारणातुन पैसे कमवा! खुशाल कमवा. पैसा हा आधुनिक युगातील सर्व समस्या सोडवण्याचा राजमार्ग आहे. तो आतापर्यंतच्या सत्ताधा-यांनी जर निर्लज्ज होत वापरलाच आहे तर आपण त्यात नैतिकतेचे प्रश्न उपस्थित करत "मी नाही त्यातला" असे दाखवत पायावर कशाला कु-हाड मारुन घेता? मला स्वत:ला नैतिकतेने अपरंपार खड्ड्यात नेले आहे. आदर्शवाद हा बोलायला नेहमीच चांगला असतो पण आचरणात आणला कि कडेलोट पक्का असतो हे मी स्वानुभवाने सांगतो. त्यामुळे धनवान व्हाच आणि स्वबांधवांनाही धनवान होण्याचे मार्ग उपलब्ध करुन द्या.
तुम्ही जर बाजुला झाला तर एकही राजकीय पक्ष टिकुच शकत नाही. त्यांनी दिलेला/लादलेला एकही उमेदवार निवडुन येवुच शकत नाही. तुम्हाला डावलण्याची त्यांची शक्तीच नाही. ते डावलतात आणि तुम्ही मुर्खासारखे डावलुन घेता म्हणुन आणि म्हणुनच ते टिकुन आहेत, एवढेच.
हिंदुत्ववाद्यांच्या अपप्रचारांना तर मुळीच बळी पडु नका. त्यांचा फार तर वापर करुन घ्या. हे हिंदुत्ववादी तुम्हाला शुद्रच समजतात आणि उपकारकर्त्याचा आव आणतात. तुम्हाला कोनाच्याही उपकारांची गरजच मुळात नाही कारण या धर्माचे निर्माते तुम्हीच आहात तेंव्हा तुम्ही आचरता तोच हिंदु धर्म आहे. तुम्हालाच तुमचा धर्म सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही.
तेंव्हा हिंदुत्ववादी नव्हे तर ओबीसीवादी बना. निर्मानकर्तेवादी बना. खरे हिंदु तुम्हीच आहात. तुम्ही आहात म्हणुनच या वा-या काय किंवा भिक्षुकांचे काय ते चालते. अर्ध्या चड्ड्या घालायचा उद्योग करु नका. उद्या तुमची अर्धी मानगुटही राहणार नाही. मेंदु शाबुत ठेवा...बौद्धिक गुलामी ठोकरुन लावा.
सत्ताकारण साधायचे आणि ओबीसींचे राज्य आणायचे तर तुम्हाला वरील मार्ग अनुसरावा लागेल. नैतीकतेचे ढोल बडवनारे सत्तेत येवु शकत नाहीत कारण तशी आजची व्यवस्था नाही. व्यवस्था बदलेल तेंव्हा व्युवनीतिही बदलावी लागेल.
हिंस्त्र लांडग्यांच्या झुंडीशी जेंव्हा सामना असतो तेंव्हा त्यांचीच नीति वापरत संघर्ष करावा लागतो. आताची सत्ताधारी जमात या लांडग्यांपेक्षा क्रुर आणि कोल्ह्यांपेक्षा चतुर आहे. नैतीकतेचे बुरखे घेवुन तुम्ही कधीही सत्तेच्या पटलावर आपले नांव कोरू शकत नाही हे कटु वास्तव आहे. हे लोक मुंडे-भुजबळ स्वार्थी नाहीत काय? असा प्रश्न विचारतात. मी म्हणतो त्यांना इतर जाणते राजे आणि त्यांचे अनुयायी काय करतात हे का दिसत नाही? त्यांची सामाजिक क्रुतघ्नता का दिसत नाही? नैतीक असण्याचा ठेका फक्त मुंडे, भुजबळांनीच का घ्यावा?
काही गरज नाही. हरामखोरांना उत्तर तोडीस तोड हरामखोरीनेच द्यावे लागते आणि ते आता दिलेच पाहिजे.
आणि माझ्या मते त्यालाच राजकारण म्हणतात!
नाहीतर रहा गुलाम...

Tuesday, 30 July 2013

"सर्व जाती एकसमान"

By:  संजय सोनवणी
http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_4205.html

वैदिक धर्म आणि शैवप्रधान हिंदू धर्म हे सारत: भिन्न आहेत हे आपण हिंदू धर्माच्या बाबतीत विवेचन करतांना पाहिले आहे. वैदिक धर्म हा उभ्या वर्णव्यवस्थेचे समर्थन करतो हेही उघड आहे. खरे तर वर्णव्यवस्था हेही मुळचे वैदिक धर्माचेही अंग नव्हते हे आपण पुरुषसुक्ताच्या संदर्भात चर्चा करतांना पाहिले आहे. परंतू नंतर कधीतरी ही व्यवस्था जन्माला आली आणि ती वैदिक धर्मियांनी स्वीकारली हेही खरे आहे.

आजच्या विषमतेचे मूळ या वर्णव्यवस्थेकडे जाते. वर्णव्यवस्था हीच मुलात वैदिक असल्याने जे अवैदिक आहेत, म्हणजे ज्यांचा गेली हजारो वर्ष वेदांशी संबंध आलाच नाही त्यांना ती लागू पडत नाही हेही तेवढेच खरे आहे. वेदोक्ताचा अधिकार असनारे आणि नसणारे हे सरळ उभे दोन तट भारतात पडलेले आहेत. वैदिक विरुद्ध अवैदिक हा संघर्ष, वैदिक धर्मियांना हिदू समजल्याने निर्माण झाला आहे व त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे.

थोडक्यात वैदिक धर्मियांना हिंदू धर्मापासून वेगळे समजणे अत्यावश्यक बनलेले आहे. जेंव्हा वेदांचा जन्मही झाला नव्हता त्या काळात, म्हणजे सिंधुपुर्व काळातच लिंगपुजक धर्म अस्तित्वात आला होता. त्याचे भौतिक अवशेषही उपलब्ध आहेत. शैव तत्वज्ञान हे प्राय: लिंगपुजक, प्रतिमा-मुर्तीपूजक असून वैदिक अमूर्त इंद्र-वरुणादि देवतांचे यजन यज्ञातुन आहुती देत केले जात होते. मुर्तीपुजा वैदिक धर्म अस्तित्वात येण्यापुर्वीच्याच काळापासून केली जात होती. आजही ती सर्रास सुरु आहे. किंबहुना प्रचलित धर्म हा सर्वस्वी शैवप्रधान आहे. या धर्मात वर्णव्यवस्थेला कधीही स्थान नव्हते. जे काही अल्प-स्वल्प मिळाले ते वैदिकांच्या सहवासाने. परंतू वैदिक धर्मियांनी वर्णव्यवस्थेतील उच्च स्थान मात्र त्यागले नाही. त्यातुनच उच्च-नीचता सुरू झाली. अनुकरणातून आलेली ही उच्च-नीचता दूर करण्याचे प्रयत्न शैवांनी वारंवार केलेले आपल्याला दहाव्या शतकानंतरच्या इतिहासात दिसतात. पण त्यात अद्याप तरी यश आलेले नाही. याचे कारण म्हणजे वैदिक धर्मही आपल्याच धर्माचा भाग आहे ही भ्रामक समजुत!

परंतु ती समजूत ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावरच आपल्याला दूर करावी लागणार आहे. वेदमाहात्म्य-वेदमान्यता या गोष्टींचे अवदंबर गेली शतकानुशतके माजवले गेले आहे त्यातून बुद्धीभेद होणे स्वाभाविक होते. परंतू ज्या ९५% समाजाला वेदाधिकारच नाही तर ते वैदिक कसे हा प्रश्न समाजाला कधी पडला नाही. आणि जर ते वैदिक नव्हेत तर मग वेदआधारित वर्णव्यवस्था मान्य करण्याचे कारणच काय हाही प्रश्न कधी पडला नाही. प्रत्येक धर्माची आपापली व्यवस्था असते जशी ती वैदिक धर्मियांची होती. ती असूदेत. पण जे त्या धर्माचेच नव्हेत त्यांनी ती व्यवस्था मान्य करण्याचे व त्याआधारीत आपले समाजजीवन ठरवायचे कारण काय?

पहिली बाब म्हणजे शिव-गणपती, पार्वती ते मुर्ती रुपात अनेक देवतांचे जेही लोक पूजन करतात ते शैवप्रधान हिंदू होत. पुजा ही मुलात अवैदिक आहे. हा शब्द द्राविड भाषेतील आहे. धुप-दीपांनी पुजा केली जात असल्याचे अनेक पुरावे सिंधू संस्कृतीतील उत्खननांनी आता आपल्याला उपलब्ध करुन दिले आहेत. ते मी क्रमश: पुढील भागांत देणारच असल्याने त्याबद्दल येथे एवढेच.

जातीसंस्था ही शैवांची देणगी आहे जी दहाव्या शतकापर्यंत अत्यंत लवचीक होती, नव्या जाती बनत होत्या तर अनेक जाती नष्ट होत होत्या हे मी जातिसंस्थेच्या इतिहासात स्पष्ट केले आहे.  जातीबदल हा सहज होत होता. दहाव्या शतकानंतर आर्थिक, राजकीय संकटे कोसळल्याने क्रमश: जातीसम्स्था बंदिस्त होत गेली हेही मी त्या लेखमालिकेत स्पष्ट केले आहेच. जर जाती नष्ट होत होत्या, नव्या व्यवसायाधारित बनत होत्या तर याचा अर्थ एवढाच आहे कि जाती जशा बनू शकतात तशाच त्या नष्टही होत राहतात. आज पारंपारिक व्यवसाय जवळपास संपुष्टात आलेले आहेत. नवे असंख्य व्यवसाय जन्माला आलेले आहेत. त्यामुळे जन्माधारित जातिसंस्था विसर्जित करण्याची वेळही आलेली आहे. परंतू वर्णव्यवस्थेच्या पगड्यामुळे व सामाजिक सुरक्षेच्या कारणांमुळे लोकांना जात जपणे आवश्यक वाटते. जी गोष्ट आपल्या धर्माची नाही ती जपणे हाच मुळात अधर्म नव्हे काय? जातिसंस्था ही वर्णव्यवस्थेप[रमाणे उभी नसून आडवी संस्था आहे. म्हणजेच सर्व जाती या समान दर्जाच्या आहेत. वर्णव्यवस्था मात्र विषमतादर्शक आहे. ती जे लोक जपतात त्यांनी खुशाल जपावी. परंतू हिंदू धर्मात वैदिक धर्मीय बसत नसल्याने हिंदुंनी वर्णव्यवस्था त्यागली पाहिजे.

जे लोक वेद/ वेदोक्त कर्मकांड/संस्कार व वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवतात व आचरणही करतात ते वैदिक धर्मिय असून जे अवैदिक आहेत, मुर्ती/लिंगपुजक आहेत ते सर्वस्वी अवैदिक असून शैवप्रधान हिंदू धर्मीय आहेत...म्हनजेच एकार्थाने खरे हिंदू आहेत. या धर्मात घुसलेली वैदिक तत्वे अमान्य करणे निकडीचे असून समतेच्या मार्गातील मोठा अडथळा आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

तसेच, आपले लग्न लावायला ज्याप्रमाणे मौलवी अथवा फादर आपण बोलावत नाही त्याच प्रमाने, वैदिक धर्मीय हे स्वतंत्र धर्माचे असल्याने, त्यांना बोलावू नये. गुरव-जंगम यांच्या मार्फत अथवा स्वता:च विवाह लावावेत...पुजा कराव्यात.

वैदिक धर्मात, आधीच सांगितल्याप्रमाणे, मुर्तीपुजेला स्थान नाही. काही वैदिक लोक तेही काम करतात...हा त्यांचा द्वै-धर्मीपणा आहे, जो खरे तर त्यांच्याही धर्माच्या दृष्टीने पाखंडीपणा आहे. हा गोंधळ त्यांचा त्यांनी हटवावा.

वैदिक धर्मीय हिंदू नव्हेत. हिंदू शब्द सिंधुवरुन आला आहे. सिंधू संस्कृती ही आपल्याच पुर्वजांनी निर्माण केली व प्राकृतीक धर्म वाढवला. त्या धर्माचे हजारो वर्ष आपण जतन जोपासना करत आलो आहोत. त्यात कालौघात काही वैदिक पुटे बसलीत पण ती सहज दूर करता येतील.

थोडक्यात वर्णव्यवस्था सर्वस्वी नाकारने व वैदिक पगडा झुगारुन देत आपला मुळचा समतेचा धर्म जोपासत "सर्व जाती एकसमान" हा मुळचा आदर्श जोपासावा.

शैव धर्माची पुरातनता पुढील लेखात देत आहे.
Pls read this also

http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_22.html

Wednesday, 24 July 2013

ज्ञाननिर्मात्या : शर्मिला रेगे




जवळच्या गुणी माणसाचा मृत्यू फार हादरवून सोडतो. मृत्यूपुढे तर्कबुद्धी लुळी पडते. जन्माला आलेला प्रत्येकजण एक ना एक दिवस मरणार आहे हे माहित असलं तरी आप्तजणांचा  मॄत्यू धक्का देतोच.विशेषत: चांगली माणसं जेव्हा लौकर जातात तेव्हा कडा कोसळावा किंवा ढगफुटी व्हावी असं काहीतरी भीषण उत्पाती  होतं. आयुर्मान वाढल्याच्या आजच्या काळात ४८ वर्षे हे काही जाण्याचे वय नाही.प्रा. डा‘. शर्मिला रेगे यांचा जन्म ७ आक्टोबर १९६४ चा. त्यांचे १३जुलै २०१३ रोजी निधन झाले. त्या फारच अकाली गेल्या. जबरदस्त चटका लाऊन गेल्या. बाई मोठ्या धीराच्या. शरीर कर्करोगाने पोखरले तरी शेवटपर्यंत त्या आजाराशी झुंजत राहिल्या. सदैव हसत, खेळत, कामात, लेखनात व्यग्र राहिल्या. कधीही भेटल्या की अत्यंत जिव्हाळ्याने बोलायच्या. अभिजात नम्रता, ऋजुता, सौजन्यशीलता आणि ज्ञानमग्नता ही शर्मिलाताईंची खरी ओळख! सतत हसतमुख आणि स्वागतशील.शर्मिला रेगे म्हणजे अहोरात्र ज्ञाननिर्मिती करण्यात बुडून गेलेली निष्टावंत संशोधक! तरूण विदुषी! मिशनरी झील असलेली हाडाची शिक्षिका.
दलित स्त्रीवादाचे सिद्धांतन, दलित स्त्रीवादी भूमीदृष्टी यांच्या तात्विक मांडणीचा मजबूत पाया त्यांनी घातला. विद्यापिठीय अभ्यासात हा विषय यावा यासाठी त्या झटल्या.देशातील अनेक विद्यापिठात तो त्यांच्यामुळे शिकवला जाऊ लागला.त्यांनीच तो ऎरणीवर आणून देशभर पोचवला.
पुणे विद्यापिठातील कर्मचार्‍यांच्या लहान मुलामुलींसाठी त्यांनी विद्यापिठाला पाळणाघर सुरू करायला लावले. त्याची निगुतीने काळजी घेतली.ते उत्तमरित्या सांभाळले.
त्या समाजशास्त्राच्या एम.ए., एम.फिल.पीएच.डी. होत्या.त्यांनी आपले पीएच.डी.चे संशोधन "फ्रा‘म ए मेनस्ट्रीम सोशिओलोजी टू ए जेंडर सेंसेटिव्ह सोशिओलोजी" या विषयावर केलेले होते. त्यांचे ‘अगेंस्ट द मॅडनेस ऑफ मनू : बी. आर. आंबेडकर्स रायटिंग ऑन ब्राह्मनिकल पॅट्रिअ‍ॅर्ची", " रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर,रिडींग दलित वुमेन्स टेस्टोमोनिज", "सोशिओलोजी आ‘फ जेंडर : दि च‘लेंज ओफ फेमिनिस्ट सोशिओलोजिकल नोलेज", "लोकप्रिय संस्कृती व भारतातील आधुनिकता: लिंगभाव परिप्रेक्ष्यातून","स्त्रीवाद:जागतिक / स्थानिक द्वैताच्या पलिकडे" आदी ग्रंथ विद्वतमान्य ठरले होते.ही संशोधनात्मक पुस्तके व जातीव्यवस्था आणि लिंगभाव या विषयांवर त्यांनी वेळोवेळी लिहिलेले अनेक शोधनिबंध हा  विचारवंत, अभ्यासक, पुरोगामी कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांसाठी अनमोल खजिनाच आहे. त्यांच्या दलित महिलाविषयक संशोधनाच्या गौरवार्थ त्यांना चेन्नई येथील राष्ट्रीय पातळीवरील "माल्कम आदिशेशैय" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. त्यांनी पुणे विद्यापीठात आणि त्याआधी विविध महाविद्यालयात तसेच आय.आय.टी.पवई, येथे विविध पदांवर अध्यापनाचे सुमारे २३ वर्षे काम केले. 
त्या पुणे विद्यापिठाच्या समाजशास्त्र विभागात प्राध्यापक आणि  प्रमुख होत्या. हा विषय त्यांच्या अपार जिव्हाळ्याचा आणि आवडीचा होता.विभागात त्या रमल्या होत्या. सावित्रीबाई आणि महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या  विचारांवर बाईंची अपार निष्ठा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक प्रा. विद्युत भागवत निवृत झाल्यावर त्या केंद्राची उभारणी करण्यात त्यांच्यासोबत सदैव पुढे असलेल्या शर्मिलाताईंनी काय करावे? मला वाटत नाही, त्यांनी जे काही केले तसे उदाहरण संपूर्ण देशात दुसरे असेल म्हणून! त्यांनी त्या पदासाठी आपल्या प्राध्यापक पदाच्या पगारावर पाणी सोडले, पदाचा राजीनामा दिला  आणि त्या चक्क डिमोशन{पदावनती} स्विकारून रिडर{संचालक} बनल्या. आपल्या दरमहाच्या हजारो रूपयांच्या वेतनावर तळमळ आणि बांधिलकी असल्याशिवाय कोण सहजासहजी असे पाणी सोडील? विद्यापिठीय वर्तुळात मला तरी असे दुसरे उदाहरण माहित नाही.
जेएनयूचे प्रो.विवेककुमार यांना बाईंनी व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते.त्यांची ओळख करून देताना  प्रास्ताविकात बाई त्यांच्या फुले आंबेडकरी आकलनावर  भरभरून बोलल्या. अशी दाद कोण देतो? ज्याचे मन मोठे आणि निर्मळ असते तोच. शर्मिलाताईंनी दुसर्‍याला दाद देताना कधीही हात आखडता घेतला नाही.एव्हढा जिंदादिलपणा विदुषी असूनही त्यांच्यात कुठून आला असावा? 
जातीनिर्मुलनाचा विषय निघाला की, उठताबसता उच्चवर्णियांचा उद्धार करण्याची फेशन आजकाल जोरात आहे. विशेषत: ब्राह्मणांना चारदोन शिव्या हासडल्याशिवाय ह्या विषयावर बोलताच येत नाही अशी बहुतेकांची ठाम समजूत आहे. अर्थात तिथून सुरूवात करायची आणि पुढे तिथेच बैलाच्या घाण्यासारखे फिरत राहायचे, शेवटही तिथेच करायचा असे आजचे सामाजिक वास्तव आहे.रेगे ताई सारस्वत ब्राह्मण होत्या.त्यांनी अनुसुचित जाती,जमाती, भटके विमुक्त आणि ओबीसी मुलामुलींना स्वत:च्या पगारातून जेव्हढी आर्थिक मदत केली तेव्हढी संपुर्ण विद्यापिठातील आणखी कोणीही केली नसेल. भटकया विमुक्त चळवळीतील लेखक प्रा. वैजनाथ कळसे रत्नागिरीच्या त्यांच्या महाविद्यालयातून जातीय आकसातून निलंबित केले गेले. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सगळा भार बाईंनी उचलला.अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील.ही कळकळ कुठून येते?
बाईंनी आंतरजातीय विवाह केलेला होता. बाई हाडाची शिक्षिका, वक्ता आणि लेखिका. मजबूत समाजशास्त्रज्ञ! सच्चा अकादमीशियन.शास्त्रशुद्ध अभ्यासात बाईंची चूक काढणे केवळ अशक्यच. सामाजिक चळवळींवर बाईंची अपार माया.दलित लेखिकांच्या संमेलनात प्रत्येकीच्या स्वागतात आणि मैत्रीत बाई त्यांच्या सखी-आप्तच झालेल्या.उर्मिला पवार, प्रज्ञा दया पवार, हिरा बनसोड, हिरा पवार सार्‍यांना बाईंचे असे अचानक जाणे चटका लावणारे.समकालीन स्त्रीवादाचा ज्ञानकोश म्हणजे शर्मिला.स्त्रीवादावर भक्कम मांड असूनही किंचितही पुरूषद्वेष्टी नसलेली, बहिणपणा आणि भाऊपणाचे प्रतिक असलेली शर्मिला! त्या माझ्या मित्र-तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होत्या.
दिल्लीच्या एन.सी.इ.आर.टी.ने त्यांचे २१ जानेवारी २००९ ला"सावित्रीबाई फुले मेमोरियल लेक्चर" या मालिकेत व्याख्यान ठेवले होते.त्या "एज्युकेशन अ‘ज तृतीय रत्न: टूवर्डस फुले आंबेडकराईट फेमिनिस्ट पेडागोजिकल प्राक्टीस’ या विषयावर छान बोलल्या.त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण आणि तळमळीचे होते. एन.सी.इ.आर.टी प्रथेप्रमाणे त्याचे पुस्तक प्रकाशित करणार होते.संस्थेने त्या पुस्तकात समाविष्ट करण्यासाठी त्यांना सावित्रीबाईंचे चरित्र लिहायला सांगितले. त्यांचा सावित्रीबाईंवर खूप व्यासंग होता. तरिही त्या माझ्याकडे आल्या. म्हणाल्या, सर हे चरित्र तुम्ही लिहा." मी संकोचून गेलो. त्या विद्यापिठात मला सिनियर होत्या. मी हे प्रथेला सोडून असल्याचे सांगताच त्या म्हणाल्या या विषयातील तुमचा अधिकार मला माहित आहे. मी तुमची कोणतीही सबब ऎकून घेणार नाही." मी लिहिलेल्या सावित्रीबाईंच्या चरित्रासह त्त्यांचे हे पुस्तक एन.सी.इ.आर.टी.ने प्रकाशित केले. अशारितीने मला त्यांनी सहलेखक करून घेतले. 
सावित्रीबाईंच्या या लेकीला, अखेरचा निरोप देताना डोळ्यात आज आसवं आहेत.आज माझ्या नात्यातले, कुटुंबातले खूप जवळचे कुणीतरी गेल्याची उदासी मनात साकळून आलीय. स्त्रीवाद आणि जातीव्यवस्था यांची मुलभूत मांडणी करणार्‍या या ज्ञानमार्गी विदुषीला.सामाजिक समतेचा आणि स्त्रीवादाचा अस्सल उद्गार असणार्‍या शर्मिलाताईंना अभिवादन.स्वत:ची जात सोडून बाहेर पडणे ही फार कठीण गोष्ट. खूपच  मोजक्या लोकांना हे जमले.आपल्या देशातील "डीकास्ट" झालेल्या विनायकराव कुलकर्णी,  प्रा. राम बापट, प्रा. गं. बा. सरदार, भा.ल.भोळे  या मोजक्या ज्ञानवंतांच्या अभिमानास्पद मालिकेत, त्यांच्या पंक्तीत बसणार्‍या शर्मिलाताई अशा अचानक जाव्यात हा निसर्गाचा फार मोठा अन्याय आहे.दाद कुठे मागायची? कशी मागायची?

Wednesday, 17 July 2013

डान्सबार: ’सर्वोच्च’ चपराक

BY: PROF.  HARI NARKE

अखेर सर्वोच्च न्यायालयानं डान्स बारवरची बंदी ऊठवली. खरंतर मुंबई उच्च न्यायालयानं ती सात वर्षांपुर्वीच उठवली होती.सरकारनं त्यासाठी केलेली बा‘म्बे पोलीस कायद्यातील दुरूस्ती या न्यायालयानं फेटाळून लावली होती. त्यावर सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अपिल केलेलं होतं.हा कायदाच मुळात अतिशय विसंगत, कमकुवत आणि पक्षपाती होता. तो न्यायालयात टिकणार नाही हे सरकारलाही चांगलं माहित होतं.या कायद्याला विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व पक्षांचा एकमुखी पाठींबा होता. तरिही ही चपराक का बसली? कारण हा कायदा उघड उघड पक्षपाती होता. सरकारनं जिथं श्रीमंत लोकं जातात त्या थ्री स्टार आणि फाऊव्ह स्टार हाटेलात आणि तत्सम ठिकाणी डान्सबार चालवायला परवानगी दिली होती पण त्यापेक्षा लहान हाटेलात मात्र बंदी घातली होती. असला हा भेदभाव होता.कायद्यापुढे सगळे समान असतात हे मुलभूत तत्वच पायदळी तुडवण्यात आलेलं होतं. घटनेच्या १५ मधील समतेच्या तत्वाचा हा भंग असल्यानं सरकार हरणार ही काळ्या दगडावरची रेघ होती.त्यामुळं आता उर बडवण्यात काहीही अर्थ नाही. सरकार म्हणे आता रिव्ह्यू पिटीशन करणार आहे. फेरविचारासाठी असा कोणता नवा मुद्दा आहे की जो न्यायालयानं विचारात घेतलेला नव्हता किंवा असा कोणता कायद्याचा अर्थ न्यायालयानं चुकीचा लावलेला आहे? तेव्हा फेरविचार याचिका करणे म्हणजे आणखी नाचक्की ओढवून घेणे होय.
डान्सबारमुळं तरूण पिढी बिघडते, गुन्हेगारी वाढते, बारबालांचं लैंगिक शोषण होतं, असे आक्षेप घेतले जातात.ह्यात तथ्यही आहेच.पण प्रश्न एव्हढाच नाही आणि तो इतका सरळही नाही.संविधानाने सर्वांना व्यवसाय स्वातंत्र्य दिलेलं आहे.या व्यवसायात सुमारे ७५ हजार बारबाला गुंतलेल्या आहेत. शिवाय लेडीज सिंगर, लेडीज वेटर तसेच  कुक आणि व्यवस्थापक म्हणून मिळून सुमारे दीड लाख लोकांना रोजगार मिळतो.या बारचं अर्थकारण फार अवाढव्य असतं. एका डान्सबारची वार्षिक उलाढाल सुमारे 20 कोटी रूपये होती. राज्यात सुमारे अडीच हजार बार होते.एकट्या मुंबई परिसरात 1250 डान्स बार होते. डान्स बारमध्ये प्रामुख्याने राजस्थान, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल मधील मुली काम करीत होत्या.त्या बहुधा  सर्वच्या सर्व लोककलाकार जातीतल्या मागासवर्गीय घटकातून आलेल्या आहेत.सगळं कुटुंब त्या पोसतात.गाजलेल्या बारबाला तरन्नूमची एका रात्रीची कमाई 90 लाख रूपये असायची असं सांगितलं जातं.प्रत्येक बारबालेची दररोजची कमाई किमान दोन हजार रूपये असायची. या मुलींच्या रोजगारावर कुर्‍हाडच कोसळली. त्या बेकायदेशीर व्यवसायात ढकलल्या गेल्या. त्यांची वाताहत झाली. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने झटकून टाकली. त्यांना पर्यायी रोजगार देण्याची गरज होती. त्यांना सन्मानाच्या व्यवसायाचं प्रशिक्षण देणं, त्यांचे बचतगट स्थापन करून त्यांना पर्यायी रोजंदारी मिळवून देणं हे या नैतिकतेच्या ठेकेदारांना गरजेचं वाटलं नाही.त्याच्यामतॆ ह्या मुली म्हणजे खलनायिका.तुमची मुलं बिघडू नयेत म्हणून यांचा जगण्याचा हक्क हिरावून घ्यायचा?
दुसरं म्हणजे, आयपीएल मध्ये ज्या चीअर गर्लस नाचतात ते नैतिक असतं? अनेक धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमात तरूणतरूणी जो हैदोस घालतात तो केवळ सभ्य असतो? तिथं नटनट्यांना नाचवणं प्रतिष्ठेचं कसं असतं? आर्केष्ट्रा बारच्या नावावर सद्ध्या जे काही चालूय ते सोज्वळ आहे?
तिसरी गोष्ट बारमधला डान्स बंद झाला तरी सगळे बार मात्र चालूच राहिले. देशी आणि विदेशी दारूची अधिकृत आणि अनधिकृत दुकानं, पब, थ्री आणि फाऊव्ह स्टार हाटेलं यात तरूण आणि बुजुर्ग पिढीचं जे काही वर्तन असतं त्यामुळं संस्कृती संवर्धनाला  हातभार लागतो? चौथी गोष्ट कला केंद्र, तमाशा, आर्केष्ट्रा, वाहिन्यांवरील रियालिटी शोज यातून जे चालतं त्यात आक्षेपार्ह काहीच नसतं का?
राज्याच्या संस्कृतीला न शोभणार्‍या, तरुणाईला चुकीच्या मार्गावर नेणार्‍या आणि कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचे कारण देऊन महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये "डान्स बार'वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 'बॉम्बे पोलिस ऍक्‍ट'मध्ये बदल करण्यात आला होता. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या या धाडसी निर्णयाचं त्या वेळी सर्व थरांतून स्वागत करण्यात आलं होतं. या बंदीला "रेस्टॉरंट आणि बार' चालकांच्या संघटनेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारचा निर्णय रद्दबातल ठरविला होता. या निर्णयाला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. राज्य सरकारची याचिका दाखल करून घेताना सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तात्पुरती  स्थगितीही दिलेली होती. 'डान्स बार'च्या नावाखाली वेश्‍याव्यवसायाचं रॅकेट चालविलं जातं, तिथं होणारी बीभत्स नृत्यं समाजाच्या र्‍हासाला कारणीभूत आहेत, असा युक्तिवाद सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता; तसंच राज्यात परवाने असलेले 345 डान्स बार आहेत, तर 2500 डान्स बार हे अनधिकृतपणे चालत आहेत, अशीही माहिती सरकारनं न्यायालयात दिली होती. "डान्स बार'चालकांच्या वतीनं अनेक संघटनांनी न्यायालयात बाजू मांडली. "बॉम्बे पोलिस ऍक्‍ट'मधील दुरुस्ती बेकायदा असल्याचे उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे; तसंच लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्याचे कार्यक्रम करण्यास परवानगी असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे, असा युक्तिवाद "डान्स बार'चालकांच्या वतीनं करण्यात आला होता. "डान्स बारमध्ये सुमारे ७५ हजार बारबाला काम करतात. बंदीमुळ निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीमुळं अनेक बारबालांनी आत्महत्या केली आहे. या महिलांपैकी 72 टक्के महिला विवाहित असून, 68 टक्के महिला या त्यांच्या घरातील एकमेव कमावत्या व्यक्ती आहेत. राज्य सरकारच्या निर्णयामुळे या सर्वांच्या पोटावर पाय देण्यात आला आहे,'' असाही युक्तिवाद बारचालकांद्वारे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.
या प्रकरणाच्या सर्व बाजूंचा अभ्यास करून डान्स बारवरील बंदी बेकायदा असल्याचं सरन्यायाधीश अल्तमस कबीर आणि न्या. एस. एस. निज्जर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलेला आहे. राज्य सरकारकडून परवाने घेऊन आता पुन्हा डान्स बार सुरू करता येणार आहेत.
"बारमध्ये मुली उदरनिर्वाहासाठी नाचत होत्या. बारवर बंदी आणल्यानं त्यांच्या रोजगाराच्या हक्‍कावरच गदा आणली होती. बारमध्ये नाचण्याचा पर्याय मुली का स्वीकारतात, यावर विचार करून मार्ग न काढता बारबंदीचा सरधोपट निर्णय घेण्यात आला होता असं बारगर्ल असोसिएशनच्या अध्यक्ष, वर्षा काळे यांचं म्हणणं आहे.
वेश्या व्यवसाय, दारूची दुकानं, गल्लाभरू उद्योग, हे सगळे फार गुंतागुंतीचे विषय आहेत. त्याची सरधोपट, उथळ आणि सोपी उत्तरं नेहमीच चकवा देतात. आपल्याला लोककलेचा फार मोठा वारसा आहे.त्याच्यावर कोट्यावधी लोकांचा उदरनिर्वाह चालतो. बारला ज्यांनी परवाने दिले त्यांनी सरकारला त्यातून महसूल मिळतो याचा विचार केला असणार. त्यातून पोलिस यंत्रणेला आणि राज्यकर्त्यांना मिळणार्‍या रसदीच्या वाटणीतून उद्भवलेल्या वादातून तर या कायद्याचा जन्म झाला नाहीना? त्यालाच नैतिकचा मुखवटा चिकटवून त्याचा गाजावाजा केला नाहीना? जर खरंच डान्सबार बंद करायचे होते तर कायद्यात अशी उघड विसंगती का ठेवली गेली?
 ही बंदी आणता यावी यासाठी मुंबई पोलिस कायद्यात दुरूस्ती करण्यात आली.या कायद्याच्या कलम ३३ मध्ये अ आणि ब या पोटकलमांची २१जुलै २००५ रोजी भर घालण्यात आली.
कलम ३३ (अ) "सरकारकडे रेस्टॉरंट , परमीट रूम अथवा बीअर बार यांच्यातील डान्स प्रकारांबद्दल आलेल्या तक्रारींतून अशा ठिकाणी महिलांची प्रतिष्ठा व सार्वजनिक नीतिमत्ता यांचे हनन होत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी डान्सला प्रतिबंध करण्यात येत आहे. त्याचे उल्लंघन केल्यास दोन लाख रुपये दंड अथवा तीन महिने शिक्षा अथवा दोन्ही शिक्षा देण्यात येतील."
कलम३३(ब)  "कलम ३३(अ) मधील प्रतिबंधात्मक तरतुदी ज्या ठिकाणी "एलिट" {प्रतिष्ठीत} लोक जातात त्या ड्रामा थिएटर, सिनेमा थिएटर,सभागृह,स्पोर्टस् क्लब अथवा जिमखाना, थ्री स्टार अथवा त्याहून अधिक दर्जाची हॉटेल्स,किंवा अन्य सांस्कृतिक उपक्रम यांना लागू नाहीत."
१५ आगस्ट २००५ पासून ही डान्सबार बंदी लागू झाली.१२ एप्रिल, २००६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. एफ. आय. रिबेलो व न्या. रोशन दळवी यांच्या खंडपीठानं राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे "डान्सबारवर बंदी व थ्रीस्टार हॉटेलात मात्र डान्सला अनुमती देण्याचा प्रकार भेदभाव करणारा" असल्याचे स्पष्ट करीत डान्सबारवरील बंदी बेकायदा ठरविली.
सरकारला लहान वयाच्या मुलींना या बारमध्ये नाचण्याला प्रतिबंध करण्यासाठी ज्युवेनाईल जस्टीस आक्ट वापरता आला असता. त्याठिकाणी वेश्या व्यवसाय चालत असेल तर विद्यमान अनैतिक मानवी व्यापार कायद्याअंतर्गत कारवाई करता आली असती.एव्हढे कायदे असताना एक नविन आणि तोही विसंगत कायदा करण्याची खरंच गरज होती का?
मात्र सरकार जर प्रस्थापित कायद्यांची अंमलबजावणी करायला  असमर्थ असेल तर मग सरकारनं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामाचंही खाजगीकरण करायला काय हरकत आहे? नाहीतरी डान्सबार हे खाजगीकरणाचंच अपत्य आहे.त्यातून आलेली संपन्नता, चंगळवाद आणि चैनीच्या भ्रामक कल्पना यातून ह्या उद्योगाची भरभराट झालेली आहे.
खरंतर डान्सबारवर अधिक कठोर बंधनं घालून त्यांची आचारसंहिता लागू करता आली असती. मुळात बंदी हा उपाय सगळीकडेच चालतो की त्याचं कठोर नियमन करणं हा उपाय असतो? जगात हजारो वर्षे वेश्याव्यवसाय, मद्याचा व्यापार आणि कोठ्या आहेत.त्यावर बंदी आणून त्यांचा निपटारा करणं हे मानवी इतिहासात कधीही, कोणत्याही शासनसत्तेला शक्य झालेलं नाही. होणारही नाही.
डान्सबार चालवणं किंवा डान्सबार पुन्हा सुरू करणं हे काहीतरी समाजकार्य असल्याचा तोरा निरर्थक आहे. न्यायालयानं "डान्स बार'वरची बंदी उठवून काही उपकारक पाऊल उचललय असंही नाही. डान्स, दारू,चीयरगर्ल्स आणि वेश्याव्यवसाय यांचा सुटा विचार करून हा प्रश्न सोडवता येणार नाही एव्हढंच.
................................................................