Wednesday, 9 July 2014

पुणे विद्यापीठ नामविस्तार!

आयु.मधुकर रामटॆके यांच्या ब्लो‘गवरून साभार....http://mdramteke.blogspot.in/2014/07/blog-post_9.html

बुधवार, ९ जुलै, २०१४

पुणे विद्यापीठ नामविस्तार!

पुणे विद्यापिठाचे नामविस्तार विधानसभेत पास झाल्यावर काही लोकाना पोटशूळ उठले असून विद्यापिठाना कोणत्याही व्यक्तीचे नाव देऊ नये असा युक्तीवाद करणारे सर्वत्र हिंडताना दिसत आहेत. विद्यापिठाना फक्त स्थलनाम लागू असावा असा यांचा आग्रह आहे पण आजवर नावावरुन अस्तित्वात असलेल्या अनेक विद्यापिठांविरुद्ध या लोकानी कधी ब्र शब्द उच्चरलेला दिसत नाही. अगदी भारतातच नाही तर जगभरात असे दिसून येते की विद्यापिठाना फक्त स्थलनामच नाही तर व्यक्तीचे नाव देण्याची पद्धत आहे. जगातील नंबर दोनचे विद्यापिठ म्हणून ज्याची ख्याती आहे ते अमेरीकेतील प्रसिद्ध विद्यापिठ हारवर्ड युनिव्हर्सिटी हे व्यक्तीनामाचे सर्वज्ञात उदाहरण आहे. अमेरीकेतील प्रसिद्ध उद्योगपती जॉन हारवर्ड यांचे नाव या विद्यापिठाला दिले असून सन १६३६ पासून हे विद्यापिठ अस्तित्वात आहे.  शैक्षणीक वर्ष २०१३-१४ मध्ये जगात ११ क्रमांकावर असलेली अमेरीकेतीलच येले युनिव्हर्सिटी सुद्धा एलिहू येले याच्या नावे आहे. जगात ३५ व्या क्रमांकावर असलेली McGill University,Canada सुद्धा व्यक्तीच्या नावे आहे. जगात ३६ व्या क्रमांकावर असलेली Karolinska InstituteSweden सुद्धा त्यांचा राजा Karl तेरावा याच्या नावे आहे. जगात ६५ व्या क्रमांकावर असणारे Rice University, ही सुद्धा अमेरीकेतील व्यक्तीनाम असलेली युनिव्हर्सिटी आहे. ही तर फक्त टॉप-१०० यादीतली नावं आहेत. जे वरील यादीत मोडत नाहीत अशा सगळ्या विद्यापिठांचा अभ्यास केल्यास शेकडो विद्यापीठं सापडतील जी व्यक्तींच्या नावे आहेत.
खरंतर सावित्रीमाईच्या नावाला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. भारतातील स्त्रीशिक्षणाचा पाया घालणा-या सावित्रीमाईचे नाव पुणे विद्यापिठाले देणे म्हणजे एका अर्थाने विद्यापिठाचा सन्मान करणे होय. युजीसीच्या साईटवर रामानंद तीर्थ, स्वामी विवेकानंद, कोणतातरी आचार्य, कोणीतरी गुरु, कवी कालीदास, चाणक्य, विनोबा भावे पासून अटलबिहारी वाजपेयी व तिकडे दक्षीणेत तर नटांच्या नावा पर्यंत मजल गेलेली दिसते. या सगळ्यांच्या नावाने विद्यापीठ असू शकते. अमेरीकेत उद्योगपतीच्या नावे असू शकते. तर पुण्यात ज्यानी स्त्रीशिक्षणाचा पाया घातला त्या  सावित्रीमाईं नाव पुणे विद्यापिठाला देताना सगळ्याना अभिमान वाटायला हवं होतं, ऊर भरून यायला हवं होतं. माईचं कार्य पाहता त्यांचं नाव देण्यात कोणालाच, कोणतीच अडचण व्हायला नको होती. तरी काहीना मात्र त्रास  होतोय... अन युक्तीवाद काय तर म्हणे व्यक्तीनाम नको...! बरं मग खाली मी ६४ विद्यापिठांची यादी दिली आहे जे स्टेट युनिव्हर्सिटीज असून व्यक्तीच्या नावे आहेत. त्यावर तुम्ही कधी बोललात का? नाही बोललात तर का नाही बोललात? अन एवढे सगळे व्यक्तीनाम असलेले विद्यापीठ देशभर अस्तित्वात असताना नेमक्या सावित्रीमाईच्या वेळीच तुमच्या पोटात का दुखू लागले आहे? असा थेट सवाला आहे.
साधू संत, गुरु-बाबा, भोंदू महाराज व शेंडीधा-यांच्या नावे असलेली विद्यापीठं तुम्हाला भुषणावह वाटतात, पण उदात्त हेतूने समाजात शैक्षणीक क्रांतीचा पाया घालणा-या बहुजन व्यक्तीचे नाव मात्र वर्ज्य...!  का? तर, या व्यक्तीच्या कामाचा अंतीम परिणाम जातीयवाद्यांच्या प्रतिगामी तत्वावर हतोडा चालवित आहे. अनेक पिढ्या पासून बांधलेले सनातनी किल्ले सावित्रीच्या कार्यातून उध्वस्थ होत आहेत. संवर्णांच्या हातून सगळी सत्ता खेचून घेण्याचे व बहुजनांच्या हाती देण्याचे कार्य पार पडत आहे. ही आहेत विरोधाची खरे कारणे. म्हणून काहींच्या पोटात दुखू लागले आहे.  या दुखण्यावर एकच उपाय... जरा जुनी मळमळ ओकून टाका व नव्या विचाराचा स्विकार करा. आहात तसेच रहाल तर त्रास आम्हाला नाही, तुम्हालाच होणार आहे. बघा पटतं का!

भारतात अनेक विद्यापिठाना महान व्यक्तींची नावे दिली आहेत. युजीसी (युनिव्हर्सीटी ग्रांट कमिशन) च्या यादीत खालील विद्यापिठे दिसतात.

सेंट्रल युनिव्हर्सिटीज
१    1   मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सीटी, हैद्राबाद.
       2   हरिसिंग गौर विश्वविद्यालय, सागर (मध्य प्रदेश)
       3   इंदिरा गांधी नॅशनल ट्राईबल युनिव्हर्सीटी, (मध्य प्रदेश)

स्टेट युनिव्हर्सिटीज
       1 Acharaya N.G.Ranga Agricultural University, Hyderabad
       2  Acharaya Nagarjuna University, Guntur
       3 Adikavi Nannaya University, Rajamundry, AP
       4 Damodaram Sanjivayya National Law University, Visakhapattanam.
       5 Dr. N.T.R. University of Health Sciences, Vijaywada.
       6 Dr. Y.S.R. Horticultural Univerity, AP
       7 Jawaharlal Nehru Architecture and Fine Arts University, AP.
       8 Jawaharlal Nehru Technological University, Kukatpalli.
       9 Osmania University, Hyderabad
      10 Kavi Kulguru Kalidas Sanskrit Vishwavidyalaya, Ramtek.
      11 Shivaji University, Kolhapur.
      12 Smt. Nathibai Damodar Thackersey Women's University, Mumbai.
      13 Arybhatta Knowledge University, Patana.
      14 Bhupender Narayan Mandal University, Bihar.
      15 Chanakya National Law University, Patana.
      16 Jai Prakash vishwavidyalaya(university), Patana.
      17 Kameshwar Singh.Darbhanga Sanskrit Vishwavidyalaya, Bihar.
      18 Lalit Narayan Mithila University, Bihar.
      19 Maulana Mazharul Haque Arabic & Persian University, Bihar.
      20 Rajendra Agricultural University, Bihar.
      21 Veer Kunwar Singh University, Bihar.
      22 Dharmsinh Desai University, Gujrat
      23 Hemchandracharya North Gujarat University, Gujrat
      24 Krantiguru Shyamji Krishna Verma Kachchh University, Gujrat.
      25 Krishnakumarsinhji Bhavnagar University, Gujrat.
      26 Chaudhary Sarwan Kumar Himachal Pradesh Krishi Vishvavidyalaya, Himachalpradesh.
      27 Dr. Y.S.Parmar University of Horticulture & Forestry, HP
      28 Vinoba Bhave University, Jharkhand.
      29 Shree Sankaracharaya University of Sanskrit, Kerala.
      30 Thunchath Ezhuthachan Malayalam University, Kerala.
      31 Atal Bihari Vajpayee Hindi Vishwavidyalaya, MP
      32 Awadesh Pratap Singh University, MP
      33 Barkatullaah University, MP
      34 Devi Ahilya Vishwavidyalaya, MP
      35 Mahaishi Panini Sanskrit Vishwavidyalaya, MP
      36 Maharishi Mahesh Yogi Vedic Vishwavidyalaya, MP
      37 Makhanlal Chaturvedi Rahtriya Patrakarita National University of Journalism, MP
      38 Rani Durgavati Vishwavidyalaya, MP
      39 Biju Patnaik University of Technology, Orisa.
      40 Fakir Moham University, Orisa.
      41 Shri Jagannath Sanskrit Vishwavidyalaya, Orisa.
      42 Veer Surendra Sai University of Technology, Orisa.
      43 Bidhan Chandra Krishi Vishwavidyalaya, West Bengal
      44 Kazi Nazrul University, WB
      45 Netaji Shubhash Open University, WB
      46 Rabindra Bharati University, WB
      47 Chandr Shekhar Azad University of Agriculture & Technology, UP
      48 Choudary Charan Singh Univeersity, UP
      49 Deen Dayal Upadhyay Gorakhpur University, UP.
      50 Dr. Ram Manohar Lohia Awadh University, UP.
      51 Dr. Shukantla Mishra Uttar Pradesh Viklang Vishwavidyalaya, UP.
      52 Narendra Deo University of Agriculture & Technology, UP.
      53 Sampurnanand Sanskrit Vishwavidyalaya, UP.
      54 Veer Bahadur Singh Purvanchal University, UP.
      55 Alagappa University, TN
      56 Anna University, TN
      57 Annamalai University, TN
      58 Bharathiar University, TN.
      59 Bharathidasan University, TN.
      60 Mother Teresa Women's University, TN.
      61 Tamilnadu Dr. M.G.R.Medical University, TN.
      62 Rani Channamma University, Karnatka.
      63 Vesveswaraiah Technological University, Karnatka.
      64 Vijayanagara Sri Krishnadevaraya University, Karnatka.

टीप:  वरील सर्व युनिव्हर्सिटीज हे युजीसीच्या साईटवरुन घेतले असून मोजक्याच पाच-सहा स्टेटस मधून काढलेली यादी आहे. तुम्ही स्वत: खालील युजीसीच्या वेबसाईटवर जाऊन बाकी यादी पाहू शकता.

Monday, 19 May 2014

पण लक्षात कोण घेतो?

पण लक्षात कोण घेतो?
कुमार केतकर- ज्येष्ठ पत्रकार,यांच्या सौजन्याने
स्वतंत्र भारताच्या राजकारणालाच नव्हे तर गेल्या ६७ वर्षांच्या संरचनेलाच आमूलाग्र कलाटणी मिळाली आहे. ‘राजकीय भूकंप’ वगैरे शब्दयोजना अनेकदा वापरून इतकी गुळगुळीत झाली आहे, की कालच्या निकालाचे वर्णन तसे करता येणार नाही. हा विजय कुणाचा आहे, हा मुद्दा निकालात निघाला आहे. हा विजय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपापेक्षाही नरेंद्र मोदींचा आहे. भाजप आणि रा.स्व. संघ हे २00४ आणि २00९ मध्ये होतेच; पण त्यांना १३८ आणि ११६ जागा अनुक्रमे मिळाल्या होत्या. भाजपाची स्वत:ची संख्या ११६ वरून २७२ पर्यंत गेली, ती अर्थातच नरेंद्र मोदींच्या आक्रमक आणि झंझावाती प्रचारामुळे. कॉँग्रेसने केव्हाच शस्त्रे टाकून दिली होती. गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी विजय मिळाल्याबरोबर जाहीर केले होते, की आता ते दिल्लीच्या दिशेने कूच करणार. निदान तेव्हा, म्हणजे २0१२च्या डिसेंबरमध्ये मोदींनी थेट आव्हान दिल्यानंतर तरी कॉँग्रेसने कोमामधून बाहेर यायला हवे होते; पण नाकातोंडात पाणी जाऊन गटांगळ्या खाण्याची अवस्था आली तरी कॉँग्रेसने हालचाल केली नाही, त्यामुळे याला पराभवही म्हणता येत नाही. ही शरणागती आहे. 
विशेष म्हणजे कॉँग्रेसचे बहुतेक नेते आणि कार्यकर्ते इतके निबर आणि निगरगट्ट झाले होते, की त्यांच्या संवेदनाच नष्ट झाल्या होत्या. खरे म्हणजे २00९मधला २0६ जागांचा विजय मिळाल्यानंतर बहुतेक कॉँग्रेसवाले अशा मानसिकतेत गेले, की 
आता २0१४मध्ये आपण स्वबळावर बहुमत प्राप्त करू. हा त्यांचा भ्रमच होता, त्यामुळेच २0१0मध्ये, म्हणजे वर्षभरानंतरच कॉमनवेल्थ गेम्स, आदर्श वगैरे घोटाळे मीडियातून यायला सुरुवात झाली तेव्हा कॉँग्रेसने वाळूत चोच खुपसून तिकडे 
दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्या पाठोपाठ अण्णा हजारेंचे आंदोलन २0११मध्ये सुरूझाले तेव्हा तर त्यातून निर्माण झालेल्या अराजकाला कसे सामोरे जायचे, हेच कॉँग्रेसप्रणीत यूपीएला कळेनासे झाले. कधी अण्णांना चुचकारायचे, कधी नव्या शतकातील अस्सल गांधीवादी म्हणून त्यांचा गौरव करायचा, तर कधी त्यांना तुरुंगात टाकायचे. रामदेवबाबांसारख्या साधूचे स्वागत करायला चार केंद्रीय मंत्री विमानतळावर काय जातात आणि नंतर कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून त्या ‘योगी पुरुषा’ला अटक काय करतात, हे सर्व पक्षाचे व सरकारचे तोल गेल्याचे लक्षण होते. 
अण्णांच्या आंदोलनापाठोपाठ ‘निर्भया’ आंदोलनाने सरकारला धक्का दिला. म्हणजे एका बाजूला अराजकांच्या अशा आवर्तनांनी सरकारला व पक्षाला घेराव घातला होता आणि दुसर्‍या बाजूला भ्रष्टाचाराची प्रकरणे एकापाठोपाठ मीडियातून येत होती; परंतु सरकार व पक्ष स्वत:हूनच कोमात गेलेले असल्यामुळे त्यातून बाहेर येणे त्यांना शक्यच नव्हते, म्हणजेच या पराभवाला २0१0मध्येच सुरुवात झाली होती. आता तो अधिकृतपणे झाला आहे; परंतु मोदींशिवाय भाजपाला हे यश मिळविणे शक्य नव्हते. अब्जावधी रुपये खर्च करून, टीव्ही चॅनेल्स आणि ट्विटरपासून फेसबुक, व्हॉट्स अँपपर्यंत सगळा डिजिटल मीडिया ओतप्रोत वापरून अगोदरच विकलांग झालेल्या कॉँग्रेसवर, सोनिया व राहुल गांधींवर इतके हिंस्र आघात होत होते; पण त्याचा प्रतिकार करण्याची मानसिक आणि वैचारिक क्षमताच पक्षाच्या कार्यकर्ते व नेत्यांकडे उरली नव्हती. हे सर्व मोदींच्या पथ्यावर पडत होते. लोकसंपर्क नाही, सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण नाही, कामगार शेतकर्‍यांच्या वेदनांचे भान नाही, अशी बधिर अवस्था एका बाजूला आणि उघड-उघड धर्मवादाचा उग्र प्रचार दुसर्‍या बाजूला, अशी ही लढाई होती. 
‘गुजरात मॉडेल’ म्हणून गाजावाजा झालेल्या विकास कार्यक्रमात किती खोटा प्रचार होता, हे अरविंद केजरीवाल यांनी दाखवून दिल्यानंतरही कॉँग्रेसने हातात राजकीय शस्त्रे घेतली नाहीत. या निवडणुकीत ‘तडका’ आला, तो केजरीवालांच्या ‘आप’ पक्षामुळे. ‘आप’ला किती जागा मिळाल्या वा किती टक्के मते मिळाली, हा मुद्दा गौण आहे.
समाजातील ढासळणारी मूल्ये, आदर्शवाद टिकविण्याचा (क्षीण का होईना) प्रयत्न ‘आप’ने केला. दिल्ली विधानसभा जिंकल्यानंतर त्यांच्याही डोक्यात हवा गेली आणि आपणच आता देशात चारित्र्याची प्रस्थापणा करणार, असा गंड त्यांना झाला. म्हणजेच मतदारांनी त्यांचेही गर्वहरण केले. आता त्यांना तो आदर्शवाद टिकविण्यासाठी नम्रपणे पुन्हा प्रयत्न करावा लागेल, त्यांनी खचून जाण्याचे काहीच कारण नाही. ‘आप’चे बहुसंख्य कार्यकर्ते आणि नेते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले नाहीत, तीच जिद्द आणि निष्ठा टिकवून त्यांनी काम केले तर भाजपाच्या (मोदींच्या) उन्मादाला ते वेसण घालू शकतील आणि काँग्रेसला चारित्र्याची गरज पटवून देऊ शकतील. 
काँग्रेसचे चारित्र्य आणि आदर्श दोन्ही लयाला गेले होते. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले तर हे वर्ष पंडित नेहरूंच्या पुण्यतिथीचे पन्नासावे वर्षे आहे, आणि काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचे १३0वे वर्ष यंदा सुरू होत आहे. अशा वर्षात काँग्रेसची अशी धूळधाण व्हावी, हे केवळ दुर्दैवाचे नाही, तर काँग्रेसच्या बेपर्वाइचे लक्षण म्हणावे लागेल. या निकालांना ‘मोदी लाट’ म्हणायचे की ‘मोदी त्सुनामी’ म्हणायचे, हा मुद्दा फक्त (वितंड) वादापुरता ठरला आहे. 
‘मोदी फॅक्टर’ केरळ व बंगाल या दोन एकेकाळच्या कम्युनिस्ट राज्यातही दिसला, हे डाव्यांनीही लक्षात घ्यायला हवे. गेल्या निवडणुकीत डाव्यांची संख्या २00४च्या ६२ जागांवरून ३१वर आली होती. आता तर ते जवळजवळ दिसेनासे होत आहेत. जी अवस्था डाव्यांची झाली तीच आता काँग्रेसची होत आहे; पण कोण लक्षात घेतो? 
भारतातील निवडणुकांमध्ये अनेक लाटा आल्या आणि गेल्या. ‘इंदिरा लाट’ १९७१मध्ये ‘गरिबी’ हटाओ’ घोषणेवर आली; पण दोन वर्षांतच इंदिरा गांधी अडचणीत आल्या. जयप्रकाश आंदोलनाने त्यांना घेरले आणि १९७५मध्ये आणीबाणी जाहीर करून त्यांना कारभार करावा लागला. त्यानंतर १९७७मध्ये जनता लाट आली आणि दोनच वर्षांनी त्यांचे सरकार गडगडले. १९८५मध्ये राजीव गांधींना ४१४ जागा मिळाल्या; पण तेही तीन वर्षांत बोफोर्स आणि अयोध्या आंदोलनाच्या सापळ्यात सापडले आणि ‘राजीव लाट’ही निष्प्रभ झाली. आता आपल्या देशाच्या राजकारणाने, विचारसरणीने, संरचनेने पूर्ण वेगळे वळण घेतले आहे. काँग्रेसला हे विचारसरणीचेही आव्हान आहे, जसे पंडित नेहरूंच्या वारशाचे.!

Sunday, 18 May 2014

होऊद्यात घुसळण एकदाची...

मी गेले काही दिवस भाजपाच्या अपरंपार विजयाने अस्वस्थ झालेल्या माझ्या समविचारी मित्रांच्या सातत्याने पडणा-या पोस्टस पहातो आहे. मला काही प्रश्न माझ्या मित्रांसाठी मांडायचेत...
१. पुरोगामीत्वाच्या व्याख्येची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. याला कोण तयार आहे?
२. मुलनिवासीवादाच्या पराभूत मानसिकतून विचारवंत आणि अनुयायी कधी बाहेर येणार आहेत?
३. रा. स्व. संघाची विचारधारा ही नेहमीच आक्रमक (राजकीय पराभूत असली तरी) व सांस्कृतिक वर्चस्ववादी राहिलेली आहे. संघटना-उपसंघटना यांचे प्रचंड जाळे त्यांनी निर्माण केले व एकच केंद्रीभूत विचार ते मांडत गेले. त्याला पर्यायी विचारव्यवस्था सबळ करण्यासाठी विचारात्मक व संघटनात्मक कार्य आपल्याकडून काय केले गेले?
४. रा. स्व. संघाने दिर्घकालीन योजना आखुन सैद्धांतिक पातळीवर त्यांच्या तळमळीच्या कार्यकर्त्यांकडून काम करून घेतले. आपल्याकडे असे किती "नि:स्वार्थी" कार्यकर्ते आहेत?
५. हिंदुत्ववाद हा रा. स्व. संघाच्या तत्वज्ञानाचा पाया आहे. तो खरा नाही. पण त्यातील भोंगळपणा ल्क्षात घेत हिंदुवाद विरुद्ध वैदिकवाद यातील तथ्ये समजावून न घेता ब्राह्मण द्वेष म्हणजे पुरोगामीपणा असे कसे समजलात?
६. ब्रिगेड अथवा मराठा सेवा संघ या फालतु, अविचारी आणि तत्वहीण संघटना मराठा जातीच्या प्रतिनिधित्व करत बहुजनवादाचा घोष करत राजकीय अस्तित्वासाठी बामसेफ किंवा तत्सम संघटनांशी नाळ जोडना-या संघटनांना पुरोगामी म्हणत प्रतिगामीपणा दाखवला याबद्दल काय करायचे?
७. जातीय तर रहायचे आणि जात्युच्छेदनाच्या गप्पा हाकायचे, हा कसला पुरोगामीपना?
८. वैदिकवादी सामाजिक जीवनात नेहमीच जिंकत राहिले, राजकारनातही जिंकले कारण समतावादी ख-या अर्थाने समतावादी कधीच नव्हते हे वास्तव काय सांगते?
९. समतावादी नसाल, केवळ आपल्या जातीवर्चस्वाचे (बहुसंख्येमुळे वा तुमच्याही वर्चस्ववादामुळे) तुमचे बुरुज ढासळले असतील तर अश्रू ढाळून काय उपयोग?
१०. निसर्ग सृष्टीला बदलायची संधी देतो...प्रकोपांतून. तुम्हाला याही प्रकोपातून बदलायची इच्छा नसेल, बदलत्या कालाशी जुळवून घेनारे नवे सुसंगत तत्वज्ञान न बनवता कालबाह्य तत्वविचारांना चिकटून बसायचे असेल तर तुम्ही मुळात पुरोगामी कसले? प्रतिगामीच कि!
प्रश्न संतप्त वाटतील.. राग येईल...पण येवू द्यात!
किमान विचार तर कराल? होऊद्यात घुसळण एकदाची...
नको असेल तर जे चाललेय त्यात खुष रहा, उगाचच आपल्या व्यथित मनांच्या शोभा करू नका!
मला माहित आहे, हा लढा खूप मोठा झाला आहे आणि त्याला झोपलेल्या आपल्याच कोशातील रममाण राहिलेल्या लोकांना जाणीव नाही!

विश्लेषणं बाष्कळ आहेत

आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये गोविंद तळवळकर आणि प्रताप आसबे ह्यांचे लेख आहेत.
काँग्रेसचं पानिपत का झालं ह्याचं विश्लेषण दोघांनी आपआपल्या परीने केलं आहे.
दोघांचीही विश्लेषणं बाष्कळ आहेत. काँग्रेसच्या पडझडीचा आढावा घेताना दोघांनीही अनेक महत्वाच्या फॅक्ट्सकडे दुर्लक्ष केलं आहे.
काँग्रेसच्या इतिहासात गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधी ह्यांचे कालखंड महत्वाचे. त्याचा वस्तुनिष्ठ आढावा तळवळकरांकडून अपेक्षित होता पण त्यांनी निराशा केली. गांधी युगात काँग्रेस ग्रामीण भागात पोचली. काँग्रेसचा सामाजिक पाया उच्चवर्णीय, शहरी मध्यमवर्गापुरता मर्यादीत होता. तो विस्तारला. शेतकरी जाती समूह काँग्रेसमध्ये सक्रीय झाले.
नेहरू युगात शेतकरी जातीतून नेतृत्व पुढे आलं.
इंदिरा युगात या शेतकरी जातीतील नेतृत्वाला आव्हान मिळालं. ब्राह्मण, दलित आणि अल्पसंख्यांक (अर्थात मुस्लिम) असं नवं समीकरण इंदिरा गांधी ह्यांनी रुजवलं. इंदिरा गांधीना जनमानसात स्थान होतं. त्यामुळे त्यांनी लादलेले भडभुंजे (महाराष्ट्रापुरते नासिकराव तिरपुडे, अ. र. अंतुले, इत्यादी जनाधार नसणारे नेते) काँग्रेसने स्वीकारले. त्यामुळे काँग्रेस पक्षसंघटना शबल झाली.
ह्या साध्या बाबींची नोंद तळवळकरांनी घेतलेली नाही. सोनिया गांधी ह्यांनी नेतृत्व स्वीकारावं ह्यासाठी शरद पवारांनी शिष्टाई केली, ह्याची नोंद करतानाच. सोनिया गांधी पंतप्रधान होऊ नयेत ह्या कारणासाठी शरद पवारांनी काँग्रेसमधून हकालपट्टी ओढवून घेतली आणि भाजपला बळ दिलं, ह्या मुद्द्याकडे गोविंदरावांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे. तळवळकरांना पवारांबद्दल का जवळीक वाटते हे एकदा त्यांनीच जाहीरपणे सांगायला हवं.
प्रताप आसबे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असेपर्यंत ते शरद पवार ह्यांचे कडवे टिकाकार होते. त्यानंतर मात्र ते शरद पवारांचे समर्थक बनले. बाटगा अधिक कडवा असतो. त्यानंतरची त्यांची ओळख स्वतंत्र पत्रकार अशी नसून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांचे प्रवक्ते अशीच आहे.
इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेने छेडलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्या आंदोलनाने केंद्रातील युपीेए सरकारच्या विरोधातील नकारात्मक लाटेला (अँटी इनकम्बन्सी वेव्ह) अभिव्यक्त केलं ही साधी बाब नजरेआड केली. कारण त्या आंदोलनाचं नेतृत्व अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल ह्यांनी केलं होतं. आसबेंना ह्या दोन नेत्यांबद्दल आकस आहे (तळवळकरांनाही). त्यामुळे लोक रस्त्यावर उतरू लागले अशी वाक्यं लिहून, आपली लेखणी विटाळणार नाही, ह्याची काळजी आसबे ह्यांनी घेतली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तीन-तेरा वाजले ह्याचीही दखल त्यांनी त्यामुळेच घेतली नाही.
तळवळकर आणि आसबे ह्यांचे लेख म्हणूनच शहामृगी वृत्तीचे आहेत. वादळाकडे पाठ फिरवून वाळूत तोंड खूपसून कोणी बसला असेल तर त्याबद्दल तक्रार करण्यासारखं काहीच नाही. (शरद पवारांनीही म्हटलंच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला मागच्या वेळपेक्षा कमी जागा मिळालेल्या असल्या तरिही काँग्रेसपेक्षा आमची कामगिरी बरी आहे.) तळवळकर आणि आसबे ह्यांनी आपल्या वैचारिक वा अन्य निष्ठासांठी वस्तुस्थितीकडे डोळेझाक करण्याचा निर्णय घेतला ह्याबद्दल माझी तक्रार आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारात शरद पवार दहा वर्षं कृषीमंत्री होते. ह्या काळात दर अर्ध्या तासाला एक शेतकरी आत्महत्या करत होता आणि दर दिवशी 2000 हजार शेतकरी शहरामध्ये स्थलांतरित होत होते, ह्या आकडेवारीची दखलही या दोन थोर पत्रकारांनी घेतली नाही, ही शरमेची बाब आहे.
मोदी सोडाच, संघ-भाजप परिवाराच्या विरोधातच मी सतत भूमिका घेतली आहे. पण हे करताना काँग्रेस (नेहरू-इंदिरा गांधी) आणि शरद पवार (समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस) ह्यांची तळी उचलण्याचं काहीही कारण नाही. काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांनी केवळ कुटुंबांसाठी राजकीय पक्ष चालवले, विचारधारा, कार्यक्रम हे केवळ नावापुरते होते, ही सामान्य मतदाराला कळलेली वस्तुस्थिती दडपण्याकडेच ह्या दोन्ही आदरणीय पत्रकारांनी आपली लेखणी झिजवावी?
आसबे आणि तळवळकरांनी आपआपल्या लेखण्या म्यान केलेल्या बर्‍या.

लोग भी कितने जालिम है !!


Rajan Sane feeling naughty
17 hrs · 

एक आदमी झूठ बोलने की वजह से
काफी मशहूर हो गया। एक दिन
वह किसी दूसरे शहर मे चला गया।
एक अस्सी साल की बूढ़ी औरत
को पता चला तो डरती हुई
आयी और बोली: बेटा तुम
ही दुनिया के सबसे झूठे
व्यक्ति हो न...
आदमी बोला : लोगों की बात
को दफा करो... मैं
तो आपको देखकर हैरान रह
गया कि इस उम्र में ये हुस्न, ये रंग
और ये दिलकशी ...
.
बूढी औरत (शरमाती हुई ):
या अल्लाह ! लोग भी कितने
जालिम है !! अच्छे भले सच्चे इन्सान
को झूठा कहते हैं।

संघ परिवाराला मोठे करण्याचे काम कॉंग्रेसने केले


कॉंग्रेसची राजवट गेली ह्याचे दुख होण्याचे कारण नाही आणि भाजप आल्याचा आनंद होण्याचे कारण नाही,भाजप आणि संघ परिवाराला मोठे करण्याचे काम कॉंग्रेसने केले आहे,आणि संविधानाची अमलबजावणीआणि लोकशाही खऱ्या अर्थाने रुजण्यासाठीचे कष्ट कॉंग्रेसने घेतले नाही कि पक्ष कार्यकर्त्यांना लोकशाही समाजवाद,धर्मनिरपेक्षताशिकवली नाही जी शिकवली ती फक्त मतान साठी त्याच मुळे कांग्रेस चा जवळपास सर्व कार्यकर्ते हे जे लोकशाही,समाजवाद धर्मनिरपेक्षताहे शब्द बोलण्या साठीच असतात त्याचा आपला काही सबंध नाही हे शब्द बोललेकी दलित,मुस्लीम मत मिळतात अस च मत त्यंच आहे आणि गावोगावचे टगे हाताशी धरले कि निवडणूक जिंकता येते ,त्याच मुळे सामान्य कार्यकर्ता ज्याला हे कळत त्याला काही करायची इच्छा आहे अशी मानस राजकारणातून हद्दपार झाले त्याच मुळे धर्म निरपेक्षते शी वैर असलेली मंडळी कान्ग्रेसला धर्मनिरपेक्ष मानत नाही उलट धर्मनिरपेक्षता हि कशी खोटी गोष्ट आहे हे बिब्विण्यातच ते यशस्वी झालेत .त्यामळे आनंद कशाचा आणि दुख कशाचे ?
 

ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ

victory

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/35269506.cms

ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ

May 18, 2014, 12.18AM IST
दिलीप फडके

एका बाजूला सरकार चालवणारे पण कोणाशीही कोणताही संवाद न साधणारे मनमोहनसिंग, तर दुसऱ्या बाजूला कोणतीही जबाबदारी न घेता पण शेरेबाजी करीत नामानिराळे राहणारे राहुल गांधी यांच्या तुलनेने थेट विषयाला भिडणारे, लोकांशी प्रभावी संवाद साधणारे आणि जबाबदारी घेऊन काम करण्याचा दाखला देणारे मोदी यांच्यात लोकांनी मोदींची निवड केली.

देशाच्या राजकारणाला एक पूर्ण नवी दिशा देणारी सोळाव्या लोकसभेसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. सर्वच दृष्टीने ही निवडणूक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व म्हणावी लागेल. तब्बल सव्वा महिना चाललेली नऊ टप्प्यांमधली ही निवडणूक राजकीय पक्ष आणि उमेदवारांची दमवणारी होती आणि आजवरची सर्वांत खर्चिकही अशीही ठरली. प्रचाराच्या काळात अनेक वाद झाले, अनेक वादग्रस्त विधाने केली गेली. एकमेकांवर व्यक्तिगत टीका आणि शब्दांचे जहरी हल्लेही झाले. मोदी पंतप्रधान झाले तर देशाची अवस्था किती भयानक होईल, हे अनेक (तथाकथित) विचारवंत सांगत होते. अनेकांची झोप उडालेली होती. पण सध्याच्या स्थितीत हे कोणतेच मुद्दे फारसे महत्त्वाचे राहिलेले नाहीत. भाजप आणि मोदींनी ही निवडणूक निर्विवादपणाने जिंकलेली आहे आणि आता परिस्थितीत अनपेक्षितपणे काही बदल झाला नाही, तर मोदींचे भाजप सरकार किमान पाच वर्षे राज्य करणार आहे. निवडणुकीचा निकाल असा का लागला आणि ह्या निकालाचा अर्थ काय हे प्रश्न अनेकांना पडलेले आहेत. आणि प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून याची उत्तरे शोधू लागलेला आहे.

काही जणांच्या मताने हा निकाल नकारात्मक आहे. मतदार यूपीएच्या दहा वर्षांच्या कारभाराला कंटाळलेले होते. त्यामुळे त्यांनी यूपीएला नाकारले आहे, पण हे केवळ नकारात्मक मतदान नाही. कारण तसे असते तर भाजपच्या एनडीएला फार तर दोन-अडीचशे जागा मिळाल्या असत्या; तसे झालेले नाही. हे मतदान केवळ नकारात्मक नाही तर ते स्पष्टपणाने भाजप आणि मोदींच्या बाजूने आहे. त्याशिवाय त्यांच्या पारड्यात मतदारांनी इतका सुस्पष्ट निकाल दिला नसता. एका बाजूने शैथिल्य आलेले आणि पूर्णपणाने हताश आणि गलितगात्र झालेले मनमोहनसिंगांचे सरकार आणि त्यांनी लोकांच्या समोर केलेले राहुल गांधींचे कोणताही उत्साह न दाखवणारे भविष्यातले नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूने उत्साहाने लोकांपुढे येणारे, आपल्या वागण्या-बोलण्यातून आत्मविश्वास दाखवणारे मोदींचे नेतृत्व यातून निवड करायची वेळ आल्यावर लोकांनी मोदींना निवडले यात आश्चर्य नाही. त्यातच राहुलने आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी गेल्या दहा वर्षांत थोडाही प्रयत्न केला नाही. कोणत्याही मंत्रिपदाची किंवा कोणतीही प्रशासकीय कामगिरी पाठीशी नसताना राहुल गांधींच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास बसणे शक्यच नव्हते. अशा स्थितीत राहुल विरुद्ध मोदी अशा सरळ सामन्यात राहुलची दाणादाण उडणार होतीच. पण मोदींना केवळ राहुलला नाकारणारे नकारात्मक मतदान झालेले नाही. त्यांनी लोकांच्या समोर मांडलेले विकासाचे विचार त्यांच्या भाषणातून अनेकदा लोकांसमोर आलेले होते. फेब्रुवारी २०१३ मध्ये राष्ट्रीय स्तरावर येण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत मोदींनी दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाची त्यांची कल्पना लोकांच्या समोर मांडली होती. तेव्हापासूनच ज्याला सुशासन असे म्हटले जायला लागले ती कल्पना लोकांच्या पसंतीला येऊ लागलेली होती. त्यांच्या त्या कल्पनेला लोकांनी आता सुस्पष्ट कौल दिला आहे.

मोदींचा विजय त्यांच्यासाठी झालेल्या मोठ्या प्रमाणावर प्रसारमाध्यमांच्या वापरामुळे झाला, असा एक दावा काही जणांनी - विशेषतः मोदीविरोधकांनी केलेला दिसतो. मोदींच्या विजयात प्रसारमाध्यमांचा आणि आजच्या युगातल्या सोशल मीडियाचा वाटा नक्कीच आहे. पण त्यांच्या विजयाचे सारे श्रेय प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाला देणे चुकीचे ठरेल. एखाद्या परीक्षेतल्या यशाचे श्रेय कुणी उत्तरपत्रिकेतल्या हस्ताक्षराला किंवा त्यात काढलेल्या चांगल्या आकृत्यांना देत असेल, तर ते योग्य होणारे नाही. भाजपने प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाचा वापर केला हे खरे; पण तसाच वापर इतरांनीही करायचा प्रयत्न केला. त्यांना यश आले नाही. मोदींना ते आले, कारण त्यांचे मुळातले गणित पक्के होते. जे मुद्दे आणि जे विषय मोदींनी प्रचारात आणले ते सगळेच लोकांना भावले. त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. व्यक्तिगत आरोप झाले. पण या सगळ्याचा उलटाच परिणाम झाला. अगदी वाराणसीत त्यांच्या प्रचाराची सभा घेता आली नाही, याचाही उलटा परिणाम झाला. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे मोदींचा आजच्या काळातल्या तरुण मतदारांशी संवाद होऊ लागला. आणि तो स्वतः तरुण असणाऱ्या राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रभावी ठरला. पण तरीही मोदींच्या विजयाचे हे एकमेक वा प्रमुख कारण नाही. फार तर विजयाला सहायभूत झालेला तो एक महत्त्वाचा घटक म्हणता येईल. एका बाजूला सरकार चालवणारे, पण कोणाशीही कोणताही संवाद न साधणारे मनमोहनसिंग तर दुसऱ्या बाजूला कोणतीही जबाबदारी न घेता पण शेरेबाजी करीत नामानिराळे राहणारे राहुल गांधी यांच्या तुलनेने थेट विषयाला भिडणारे, लोकांशी प्रभावी संवाद साधणारे आणि जबाबदारी घेऊन काम करण्याचा दाखला देणारे मोदी यांच्यात लोकांनी मोदींची निवड केली. ही निवडणूक मोदी विरुद्ध इतर सगळे अशी झाली. आपले टीकाकार आणि विरोधक यांनी चर्चेत आणलेले सगळे मुद्दे मोदींनी जणू अंगावर घेतले. प्रचाराचा इतका मोठा झंझावात राहुल गांधीसह इतर कुणालाही पेलवणे शक्य नव्हते. जवळपास तीन लाख किलोमीटरचा प्रवास, हजाराच्या वर सभा , 'चाय पे चर्चा', त्रिमिती सभा यासारखे कल्पक कार्यक्रम इतके सारे स्वतःचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळून करताना मोदींनी जी इर्ष्या आणि कष्ट करण्याची वृत्ती दाखवली, त्याला अलीकडच्या काळातल्या राजकारणात तोड नाही.

मोदींना अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळणार नाही, असा ही अनेकांचा समज होता. नितीशकुमार किंवा ममता वा नवीन पटनाईक यांनी मोदींशी फटकून निवडणुकीला सामोरे जायचे ठरविले, त्यामागे हेच गणित होते हे उघड होते. पण प्रत्यक्षात मोदींच्या सुशासनाच्या नाऱ्याचा (काही प्रमाणात का होईना) प्रभाव अल्पसंख्याकांवर झाला, हे निकालावरून पाहायला मिळाले. तसे नसेल, तर त्यांना उत्तर प्रदेशात वा बंगालमध्ये जे यश मिळाले त्याचे गणित मांडता येणार नाही. मुस्लिम प्रभाव असणाऱ्या देशभरात ९२ जागा आहेत. त्यातल्या ३५ जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यात ३० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार असणाऱ्या जागांची संख्या १९ आहे. इतकेच नव्हे, तर उघडपणाने मोदींच्या समर्थनार्थ काम करणाऱ्या अनेक मुस्लिम संघटना वा मुस्लिम धर्मनेते या वेळी पहायला मिळाले. मोदी निवडून आले तर मुसलमानांना त्रास होईल असा भ्रम निर्माण करून त्या समाजाच्या मनात मोदींबद्दलची भीती निर्माण करून, आपली 'दुकानदारी' चालवणाऱ्या अनेकांना या वेळी मोदींना मिळालेल्या मुस्लिम पाठिंब्यामुळे धका बसावा, अशीच स्थिती आहे. जी गोष्ट मुस्लिम मतांची, तीच वेगवेगळ्या जातींची! पुढारलेल्या जातींप्रमाणेच ओबीसी, मागासवर्गीय आणि अतिमागास जातींमध्येही मोदींचे समर्थन करणारे घटक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे मोदी समर्थक केवळ काही वर्ग वा जातींपुरते मर्यादित आहेत, असे मानणे चुकीचे आहे हे या निकालांनी दाखवून दिलेले आहे.

असाच आणखी एक गैरसमज होता, की भाजप वा मोदींना केवळ हिंदी भाषिक राज्यांमध्येच पाठबळ आहे. या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये मोदींना जे प्रचंड जण समर्थन मिळाले, ते अभूतपूर्व आहे. इतकेच नव्हे तर हिमाचल प्रदेश, हरियाणा, आसाम या राज्यांमध्ये भाजपला व्यापक जनाधार मिळाला आहे. बंगाल, ओडिशा, तमिळनाडूमध्ये भाजपचे यश मर्यादित आहे. तिथल्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी आपापले प्रांत सांभाळलेले आहेत, पण त्या ठिकाणीही भाजपचा शिरकाव झालेला आहे हे निश्चित. विशेषतः ह्या राज्यांमध्ये तिथल्या कोणत्याही स्थानिक पक्षांबरोबर समझोता नसताना स्वतःच्या बळावर भाजपला या जागा मिळाल्या आहेत, हे विशेष. तमिळनाडूमध्ये तिथल्या लहान पक्षांशी भाजपचा समझोता आहे, पण तसे ते पक्ष फारसे मोठे नाहीत. तिथे डीएमके व काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही आणि भाजपला एक (का होईना) जागा आहे, हे महत्त्वाचे आहे. केरळमध्ये भाजपला जागा मिळालेली नसली, तरी या वेळच्या मतांची टक्केवारी खूपच वाढलेली आहे. केरळ, सिक्कीम, लक्षद्वीप, पुदुच्चेरी, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड यायासारख्या काही राज्यांचा अपवाद वगळता आज भाजप सर्व देशात पोहोचलेला आहे. याउलट गुजरात, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश, गोवा, तमिळनाडू, ओडिशा, झारखंड, जम्मू-काश्मीर यासारख्या अनेक प्रमुख राज्यांमधून काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही, हे बघण्यासारखे आहे. भाजपचा प्रभाव देशभर वाढत असताना अनेक ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आणि काँग्रेससह सर्व डावे पक्ष, बसपसारखे पक्ष यांना आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करायला लागणार आहे. हाच २०१४ च्या निवडणुकीचा धडा आहे.