http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/35269506.cms
ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ
May 18, 2014, 12.18AM IST
दिलीप फडके
एका बाजूला सरकार चालवणारे पण कोणाशीही कोणताही संवाद न साधणारे मनमोहनसिंग, तर दुसऱ्या बाजूला कोणतीही जबाबदारी न घेता पण शेरेबाजी करीत नामानिराळे राहणारे राहुल गांधी यांच्या तुलनेने थेट विषयाला भिडणारे, लोकांशी प्रभावी संवाद साधणारे आणि जबाबदारी घेऊन काम करण्याचा दाखला देणारे मोदी यांच्यात लोकांनी मोदींची निवड केली.
देशाच्या राजकारणाला एक पूर्ण नवी दिशा देणारी सोळाव्या लोकसभेसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. सर्वच दृष्टीने ही निवडणूक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व म्हणावी लागेल. तब्बल सव्वा महिना चाललेली नऊ टप्प्यांमधली ही निवडणूक राजकीय पक्ष आणि उमेदवारांची दमवणारी होती आणि आजवरची सर्वांत खर्चिकही अशीही ठरली. प्रचाराच्या काळात अनेक वाद झाले, अनेक वादग्रस्त विधाने केली गेली. एकमेकांवर व्यक्तिगत टीका आणि शब्दांचे जहरी हल्लेही झाले. मोदी पंतप्रधान झाले तर देशाची अवस्था किती भयानक होईल, हे अनेक (तथाकथित) विचारवंत सांगत होते. अनेकांची झोप उडालेली होती. पण सध्याच्या स्थितीत हे कोणतेच मुद्दे फारसे महत्त्वाचे राहिलेले नाहीत. भाजप आणि मोदींनी ही निवडणूक निर्विवादपणाने जिंकलेली आहे आणि आता परिस्थितीत अनपेक्षितपणे काही बदल झाला नाही, तर मोदींचे भाजप सरकार किमान पाच वर्षे राज्य करणार आहे. निवडणुकीचा निकाल असा का लागला आणि ह्या निकालाचा अर्थ काय हे प्रश्न अनेकांना पडलेले आहेत. आणि प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून याची उत्तरे शोधू लागलेला आहे.
काही जणांच्या मताने हा निकाल नकारात्मक आहे. मतदार यूपीएच्या दहा वर्षांच्या कारभाराला कंटाळलेले होते. त्यामुळे त्यांनी यूपीएला नाकारले आहे, पण हे केवळ नकारात्मक मतदान नाही. कारण तसे असते तर भाजपच्या एनडीएला फार तर दोन-अडीचशे जागा मिळाल्या असत्या; तसे झालेले नाही. हे मतदान केवळ नकारात्मक नाही तर ते स्पष्टपणाने भाजप आणि मोदींच्या बाजूने आहे. त्याशिवाय त्यांच्या पारड्यात मतदारांनी इतका सुस्पष्ट निकाल दिला नसता. एका बाजूने शैथिल्य आलेले आणि पूर्णपणाने हताश आणि गलितगात्र झालेले मनमोहनसिंगांचे सरकार आणि त्यांनी लोकांच्या समोर केलेले राहुल गांधींचे कोणताही उत्साह न दाखवणारे भविष्यातले नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूने उत्साहाने लोकांपुढे येणारे, आपल्या वागण्या-बोलण्यातून आत्मविश्वास दाखवणारे मोदींचे नेतृत्व यातून निवड करायची वेळ आल्यावर लोकांनी मोदींना निवडले यात आश्चर्य नाही. त्यातच राहुलने आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी गेल्या दहा वर्षांत थोडाही प्रयत्न केला नाही. कोणत्याही मंत्रिपदाची किंवा कोणतीही प्रशासकीय कामगिरी पाठीशी नसताना राहुल गांधींच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास बसणे शक्यच नव्हते. अशा स्थितीत राहुल विरुद्ध मोदी अशा सरळ सामन्यात राहुलची दाणादाण उडणार होतीच. पण मोदींना केवळ राहुलला नाकारणारे नकारात्मक मतदान झालेले नाही. त्यांनी लोकांच्या समोर मांडलेले विकासाचे विचार त्यांच्या भाषणातून अनेकदा लोकांसमोर आलेले होते. फेब्रुवारी २०१३ मध्ये राष्ट्रीय स्तरावर येण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत मोदींनी दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाची त्यांची कल्पना लोकांच्या समोर मांडली होती. तेव्हापासूनच ज्याला सुशासन असे म्हटले जायला लागले ती कल्पना लोकांच्या पसंतीला येऊ लागलेली होती. त्यांच्या त्या कल्पनेला लोकांनी आता सुस्पष्ट कौल दिला आहे.
मोदींचा विजय त्यांच्यासाठी झालेल्या मोठ्या प्रमाणावर प्रसारमाध्यमांच्या वापरामुळे झाला, असा एक दावा काही जणांनी - विशेषतः मोदीविरोधकांनी केलेला दिसतो. मोदींच्या विजयात प्रसारमाध्यमांचा आणि आजच्या युगातल्या सोशल मीडियाचा वाटा नक्कीच आहे. पण त्यांच्या विजयाचे सारे श्रेय प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाला देणे चुकीचे ठरेल. एखाद्या परीक्षेतल्या यशाचे श्रेय कुणी उत्तरपत्रिकेतल्या हस्ताक्षराला किंवा त्यात काढलेल्या चांगल्या आकृत्यांना देत असेल, तर ते योग्य होणारे नाही. भाजपने प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाचा वापर केला हे खरे; पण तसाच वापर इतरांनीही करायचा प्रयत्न केला. त्यांना यश आले नाही. मोदींना ते आले, कारण त्यांचे मुळातले गणित पक्के होते. जे मुद्दे आणि जे विषय मोदींनी प्रचारात आणले ते सगळेच लोकांना भावले. त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. व्यक्तिगत आरोप झाले. पण या सगळ्याचा उलटाच परिणाम झाला. अगदी वाराणसीत त्यांच्या प्रचाराची सभा घेता आली नाही, याचाही उलटा परिणाम झाला. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे मोदींचा आजच्या काळातल्या तरुण मतदारांशी संवाद होऊ लागला. आणि तो स्वतः तरुण असणाऱ्या राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रभावी ठरला. पण तरीही मोदींच्या विजयाचे हे एकमेक वा प्रमुख कारण नाही. फार तर विजयाला सहायभूत झालेला तो एक महत्त्वाचा घटक म्हणता येईल. एका बाजूला सरकार चालवणारे, पण कोणाशीही कोणताही संवाद न साधणारे मनमोहनसिंग तर दुसऱ्या बाजूला कोणतीही जबाबदारी न घेता पण शेरेबाजी करीत नामानिराळे राहणारे राहुल गांधी यांच्या तुलनेने थेट विषयाला भिडणारे, लोकांशी प्रभावी संवाद साधणारे आणि जबाबदारी घेऊन काम करण्याचा दाखला देणारे मोदी यांच्यात लोकांनी मोदींची निवड केली. ही निवडणूक मोदी विरुद्ध इतर सगळे अशी झाली. आपले टीकाकार आणि विरोधक यांनी चर्चेत आणलेले सगळे मुद्दे मोदींनी जणू अंगावर घेतले. प्रचाराचा इतका मोठा झंझावात राहुल गांधीसह इतर कुणालाही पेलवणे शक्य नव्हते. जवळपास तीन लाख किलोमीटरचा प्रवास, हजाराच्या वर सभा , 'चाय पे चर्चा', त्रिमिती सभा यासारखे कल्पक कार्यक्रम इतके सारे स्वतःचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळून करताना मोदींनी जी इर्ष्या आणि कष्ट करण्याची वृत्ती दाखवली, त्याला अलीकडच्या काळातल्या राजकारणात तोड नाही.
मोदींना अल्पसंख्याकांचा पाठिंबा मिळणार नाही, असा ही अनेकांचा समज होता. नितीशकुमार किंवा ममता वा नवीन पटनाईक यांनी मोदींशी फटकून निवडणुकीला सामोरे जायचे ठरविले, त्यामागे हेच गणित होते हे उघड होते. पण प्रत्यक्षात मोदींच्या सुशासनाच्या नाऱ्याचा (काही प्रमाणात का होईना) प्रभाव अल्पसंख्याकांवर झाला, हे निकालावरून पाहायला मिळाले. तसे नसेल, तर त्यांना उत्तर प्रदेशात वा बंगालमध्ये जे यश मिळाले त्याचे गणित मांडता येणार नाही. मुस्लिम प्रभाव असणाऱ्या देशभरात ९२ जागा आहेत. त्यातल्या ३५ जागा भाजपला मिळाल्या आहेत. त्यात ३० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार असणाऱ्या जागांची संख्या १९ आहे. इतकेच नव्हे, तर उघडपणाने मोदींच्या समर्थनार्थ काम करणाऱ्या अनेक मुस्लिम संघटना वा मुस्लिम धर्मनेते या वेळी पहायला मिळाले. मोदी निवडून आले तर मुसलमानांना त्रास होईल असा भ्रम निर्माण करून त्या समाजाच्या मनात मोदींबद्दलची भीती निर्माण करून, आपली 'दुकानदारी' चालवणाऱ्या अनेकांना या वेळी मोदींना मिळालेल्या मुस्लिम पाठिंब्यामुळे धका बसावा, अशीच स्थिती आहे. जी गोष्ट मुस्लिम मतांची, तीच वेगवेगळ्या जातींची! पुढारलेल्या जातींप्रमाणेच ओबीसी, मागासवर्गीय आणि अतिमागास जातींमध्येही मोदींचे समर्थन करणारे घटक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे मोदी समर्थक केवळ काही वर्ग वा जातींपुरते मर्यादित आहेत, असे मानणे चुकीचे आहे हे या निकालांनी दाखवून दिलेले आहे.
असाच आणखी एक गैरसमज होता, की भाजप वा मोदींना केवळ हिंदी भाषिक राज्यांमध्येच पाठबळ आहे. या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये मोदींना जे प्रचंड जण समर्थन मिळाले, ते अभूतपूर्व आहे. इतकेच नव्हे तर हिमाचल प्रदेश, हरियाणा, आसाम या राज्यांमध्ये भाजपला व्यापक जनाधार मिळाला आहे. बंगाल, ओडिशा, तमिळनाडूमध्ये भाजपचे यश मर्यादित आहे. तिथल्या राज्यस्तरावरच्या नेत्यांनी आपापले प्रांत सांभाळलेले आहेत, पण त्या ठिकाणीही भाजपचा शिरकाव झालेला आहे हे निश्चित. विशेषतः ह्या राज्यांमध्ये तिथल्या कोणत्याही स्थानिक पक्षांबरोबर समझोता नसताना स्वतःच्या बळावर भाजपला या जागा मिळाल्या आहेत, हे विशेष. तमिळनाडूमध्ये तिथल्या लहान पक्षांशी भाजपचा समझोता आहे, पण तसे ते पक्ष फारसे मोठे नाहीत. तिथे डीएमके व काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही आणि भाजपला एक (का होईना) जागा आहे, हे महत्त्वाचे आहे. केरळमध्ये भाजपला जागा मिळालेली नसली, तरी या वेळच्या मतांची टक्केवारी खूपच वाढलेली आहे. केरळ, सिक्कीम, लक्षद्वीप, पुदुच्चेरी, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड यायासारख्या काही राज्यांचा अपवाद वगळता आज भाजप सर्व देशात पोहोचलेला आहे. याउलट गुजरात, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश, गोवा, तमिळनाडू, ओडिशा, झारखंड, जम्मू-काश्मीर यासारख्या अनेक प्रमुख राज्यांमधून काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही, हे बघण्यासारखे आहे. भाजपचा प्रभाव देशभर वाढत असताना अनेक ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आणि काँग्रेससह सर्व डावे पक्ष, बसपसारखे पक्ष यांना आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करायला लागणार आहे. हाच २०१४ च्या निवडणुकीचा धडा आहे.

No comments:
Post a Comment