Wednesday, 7 May 2014

महाराष्ट्रात दलितांचे हत्याकांड

भाजप आणि शिवसेना जातीयवादी पक्ष आहेत अशी सतत कोल्हेकुई करणारे महाराष्ट्रातील स्वयंघोषित पुरोगामी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोरदार तयारीला लागलेत . विधानसभेच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात दलितांचे हत्याकांड सुरु झाले आहे . आणि यांच्या पाळलेल्या संघटना मुग गिळून गप्प आहेत , उलट अन्यायाची दाद मागणाऱ्या लोकांना दडपण्याचे काम या संघटना नेकीने करत आहेत . प्रचारात यांचे ठळक मुद्दे जातीयवादी शक्तींचा पाडाव करण्यासाठी आमची पुरोगामी आघाडी , शाहू फुलेंची विचारधारा , वगैरे वगैरे आणि यांच्या संघटनेचे विषय , वाघ्या , दादोजी, मनुवादी , शिवाजी , जेम्स लेन , बास्स !
आता खरे म्हणजे शिवसेना आणि भाजपा यांनी दलित अत्याचारांविरोधात मोठी राळ उठवली पाहिजे , (खरा कळवळा सोडा , सत्तेसाठी का होईना !) पण ती तशी करताना दिसत नाही . उलट मनाने अशा घटनात ती ही त्यांना सामिलच आहे. आपल्या मराठी माणसाचा एक गोंधळ असा आहे कि त्याला सवर्ण म्हटले कि फक्त ब्राह्मण दिसतात , आणि सवर्णांना शिवी घातली कि भांडणाची खाजही ब्राह्मण भाईनांच जरा ज्यादा येते. बहुजन नावाखाली मराठा अज्यात सुटतात. ते तिथे वाद घालत नाहीत . ब्राह्मणांनी आणि दलितांनी सवर्ण म्हटले कि फक्त ब्राह्मण हे डोसक्यातून काढले पाहिजे . ते २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय बिःक्षत्रिय हा परशुरामाचा चुतीयापणा आहे . इथे जागजागी राष्ट्रवादी क्षत्रिय आहेत . आता उच्चवर्णीय मराठी माणसाचा दलित म्हटलं कि कायम होणारा गोंधळ म्हणजे महार का ? हो तेच बहुदा . नाहीतरी त्यांचेच लोक ओरडतात ना ? अस्मितेने आणि कर्तव्य बुद्धीने जागा होऊन लढणारा समाज हा आंबेडकरवादी लोकांचा जातनिहाय बौद्ध महार समाज(च) आहे हे खरे आहे . अर्थात तो शाबासकी साठी हे लढे देत नाही . पण लोच्या असा होतोय . मीडियातून घडलेल्या घटनेच्या दलित अत्याचाराची दवंडी फार अर्धवट दिली जाते . पिडीताचा जातनिहाय उल्लेख केला जात नाही. आणि मग तीन मातंग व्यक्तीच्या हत्येनंतर देखील , लक्ष्मण ढोबळे घटनास्थळी फिरकत नाहीत . ही बाब कुणाच्या लक्षात येत नाही . राष्ट्रवादीने दिलेले मंत्रिपदही कुणाला सलत नाही . अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान , जय लहूजी प्रतिष्ठान , किंवा मातंग एकता आंदोलन , कुठे काही चळवळ करताना दिसत नाही . धनगर , चर्मकार समाज संघटनेचे कुठे निषेध मोर्चे वा आंदोलन दिसत नाही . दलित म्हणून अत्याचार सोसणाऱ्या बऱ्याच जातीचे म्होरके निषेधासाठी सरळ पुढे न येता पावण्याच्या चेपलेनं विंचू मरतोय तर मरू द्या लेकाचा म्हणतात . आणि पुन्हा डोळ्यावर न येता लाभासाठी पावणेपाच तयार राहतात !
नंतर कायम टार्गेट आंबेडकरी तरुण ! इथल्या सर्व मागास जातींनी एकत्र येऊन लढा द्यायला पाहिजे , हे न मांडता काही भिकारचोट संशोधक अत्याचाराची पार्श्वभूमी बौद्धसमाज हिंदू देवतेला शिव्या देतो यात आहे असले गांडू निष्कर्ष मांडून पुन्हा आंबेडकरी तरुणालाच टार्गेट करतात . जिथे सवर्ण ३३ कोटी देव मानत नाहीत तिथे आजही मांग ढोर चांभार व्हलार बेलदार आणि अजून बरेच समुह आठवेल तो देव पूजतात तरी त्यांच्यावर अन्याय होतोच कि . एकुणात इथे मागास जातीत एकमेकांना चुतीया समजण्याचे आणि बनण्याचे धंदे फार आधीपासून आहेत आणि इथले सत्ताधारी पाटील लोक जातीयवादी पक्ष म्हणून भेडवत छाताडावर बसून आहे , आता घडलेल्या घटनेत काय कसे न्याय दिले जातात हे पाहून यांचे पुरोगामी आव्हान स्वीकारण्याची वेळ आलेली आहे .
3Unlike ·  · 
  • You, Mukesh MachkarSunil Tambe and 82 others like this.
  • Sunil Tambe नेमकी हीच समस्या बसपाला उत्तर प्रदेशात आहे. जाटव मोठ्या प्रमाणावर बसपाच्या पाठिशी आहेत. त्यामुळे कुशवाहा, मल्लाह अशा छोट्या जाती समाजवादी पार्टी, भाजपा ह्यांच्या आश्रयाला जात आहेत. यादव वस्तुतः पिछडे. त्यांना क्षत्रिय होण्यात रस म्हणून तर ते नावापुढे सिंग जोडतात.
    2 hours ago · Like · 7
  • Prasaad Ramakant Joshi बऱ्याचश्या बाबींवर सहमत मास्तर ... 
    पण इतक्या कडवटपणाची सवय झालेली असताना तुझ्याकडून असलं काहीतरी बेरकं आलं की रामदास आठवलेचं कविताविरहीत भाषण आल्यासारखं वाटतं ... 
    See Translation
    2 hours ago · Like · 5
  • Devidas Waghmare असा मूडदा होवून जगन्यापरी देह हा त्यागावा....देह हा त्यागावा नायतर शत्रूला ठेचावा....जो शत्रू ठेचत नाय...त्यानी जयभिम बोलू नई..शहीदांच नीळं सपान....लाल डोळ्यात जागवा...नव्या युगाचा भिम आता नव्याने घडवा...घडवा ना......!!
  • Abhijit Ligde खुप नेमक आणि कडक पण सत्यSee Translation
  • Milind K. Alshi कठीण परिस्थीती झालीय या पुरोगामी म्हाराष्ट्रात सर...See Translation
  • Jayant Diwan सतीश, " शिका , संघटित व्हा, संघर्ष करा" हां संदेश तंतोतंत अमलात आणल्या शिवाय दलिताना तरणोपाय नाही असे मला वाटते! खुप अवघड आहे पण अशक्य नाही! सर्वतोपरी सबल व्हायला पाहिजे आणि त्या साठी पक्की एकजुट हवी!
  • Adv Raaj Jadhav महाराष्ट्रातील वाढते जातीय अत्याचार पाहता, ते रोखण्यासाठी, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी, त्याची कारने शोधुन त्यावर उपाय योजना आणी कडक शासन करण्यासाठी, एटीएसच्या (दहशतवाद विरोधी पथक) धर्तीवर..."राष्ट्रीय जातीय अत्याचार विरोधी पथक"... स्थापन करावे...स्पेशल कोर्ट नियुक्त करावे....जेणेकरुन स्थानिक पोलिस, स्थानिक प्रशासन, स्थानिक नेतेगिरीच्या फसवेगीरीला अळा बसेल...तसेच पिडीताला योग्य न्याय मिळेल...आणी कित्येक वर्षे "बोधीवृक्षाला टांगलेली तलवार" हाती घेण्याची वेळ येणार नाही...!
    - राज जाधव....!
    See Translation
  • Adv Raaj Jadhav ताडा, पोटा, मोक्का, अँन्टी करप्शन प्रमाणे अँस्ट्रोसिटीचे वेगळे आणी फास्टट्रँक कोर्ट नियुक्त व्हावे...त्याचा तपास स्थानिक पोलिसांकडुन न करता विशेष नियुक्त पथकाकडुन व्हावा....!See Translation
  • Milind Pandurnikar Sir, Parat ek Namdeo Dhasal Pahijet.
  • Milind Dhumale सत्ताधार्यांकडून �न्यायाची अपेक्षा करणं म्हणजे कसायाकडून अभयदान मिळेल अशी भाबडी आशा बाळगण्यासारखे आहे .
    खैरलांजी गावाला त्या अमानुष हत्याकांडानंतर 
    निर्लज्ज गृहखात्याने तंटामुक्त गाव पुरस्कार दिला होता 
    ...See More
    See Translation
  • Harshad Sarpotdar अप्रतिम post ! तुमच्या नि माझ्या सकट सगळ्यांच्याच ठसठसत्या जागांवर बोट खुपसलेत ! 

No comments:

Post a Comment