आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये गोविंद तळवळकर आणि प्रताप आसबे ह्यांचे लेख आहेत.
काँग्रेसचं पानिपत का झालं ह्याचं विश्लेषण दोघांनी आपआपल्या परीने केलं आहे.
दोघांचीही विश्लेषणं बाष्कळ आहेत. काँग्रेसच्या पडझडीचा आढावा घेताना दोघांनीही अनेक महत्वाच्या फॅक्ट्सकडे दुर्लक्ष केलं आहे.
काँग्रेसच्या इतिहासात गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधी ह्यांचे कालखंड महत्वाचे. त्याचा वस्तुनिष्ठ आढावा तळवळकरांकडून अपेक्षित होता पण त्यांनी निराशा केली. गांधी युगात काँग्रेस ग्रामीण भागात पोचली. काँग्रेसचा सामाजिक पाया उच्चवर्णीय, शहरी मध्यमवर्गापुरता मर्यादीत होता. तो विस्तारला. शेतकरी जाती समूह काँग्रेसमध्ये सक्रीय झाले.
नेहरू युगात शेतकरी जातीतून नेतृत्व पुढे आलं.
इंदिरा युगात या शेतकरी जातीतील नेतृत्वाला आव्हान मिळालं. ब्राह्मण, दलित आणि अल्पसंख्यांक (अर्थात मुस्लिम) असं नवं समीकरण इंदिरा गांधी ह्यांनी रुजवलं. इंदिरा गांधीना जनमानसात स्थान होतं. त्यामुळे त्यांनी लादलेले भडभुंजे (महाराष्ट्रापुरते नासिकराव तिरपुडे, अ. र. अंतुले, इत्यादी जनाधार नसणारे नेते) काँग्रेसने स्वीकारले. त्यामुळे काँग्रेस पक्षसंघटना शबल झाली.
ह्या साध्या बाबींची नोंद तळवळकरांनी घेतलेली नाही. सोनिया गांधी ह्यांनी नेतृत्व स्वीकारावं ह्यासाठी शरद पवारांनी शिष्टाई केली, ह्याची नोंद करतानाच. सोनिया गांधी पंतप्रधान होऊ नयेत ह्या कारणासाठी शरद पवारांनी काँग्रेसमधून हकालपट्टी ओढवून घेतली आणि भाजपला बळ दिलं, ह्या मुद्द्याकडे गोविंदरावांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे. तळवळकरांना पवारांबद्दल का जवळीक वाटते हे एकदा त्यांनीच जाहीरपणे सांगायला हवं.
प्रताप आसबे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असेपर्यंत ते शरद पवार ह्यांचे कडवे टिकाकार होते. त्यानंतर मात्र ते शरद पवारांचे समर्थक बनले. बाटगा अधिक कडवा असतो. त्यानंतरची त्यांची ओळख स्वतंत्र पत्रकार अशी नसून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांचे प्रवक्ते अशीच आहे.
इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेने छेडलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्या आंदोलनाने केंद्रातील युपीेए सरकारच्या विरोधातील नकारात्मक लाटेला (अँटी इनकम्बन्सी वेव्ह) अभिव्यक्त केलं ही साधी बाब नजरेआड केली. कारण त्या आंदोलनाचं नेतृत्व अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल ह्यांनी केलं होतं. आसबेंना ह्या दोन नेत्यांबद्दल आकस आहे (तळवळकरांनाही). त्यामुळे लोक रस्त्यावर उतरू लागले अशी वाक्यं लिहून, आपली लेखणी विटाळणार नाही, ह्याची काळजी आसबे ह्यांनी घेतली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तीन-तेरा वाजले ह्याचीही दखल त्यांनी त्यामुळेच घेतली नाही.
तळवळकर आणि आसबे ह्यांचे लेख म्हणूनच शहामृगी वृत्तीचे आहेत. वादळाकडे पाठ फिरवून वाळूत तोंड खूपसून कोणी बसला असेल तर त्याबद्दल तक्रार करण्यासारखं काहीच नाही. (शरद पवारांनीही म्हटलंच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला मागच्या वेळपेक्षा कमी जागा मिळालेल्या असल्या तरिही काँग्रेसपेक्षा आमची कामगिरी बरी आहे.) तळवळकर आणि आसबे ह्यांनी आपल्या वैचारिक वा अन्य निष्ठासांठी वस्तुस्थितीकडे डोळेझाक करण्याचा निर्णय घेतला ह्याबद्दल माझी तक्रार आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारात शरद पवार दहा वर्षं कृषीमंत्री होते. ह्या काळात दर अर्ध्या तासाला एक शेतकरी आत्महत्या करत होता आणि दर दिवशी 2000 हजार शेतकरी शहरामध्ये स्थलांतरित होत होते, ह्या आकडेवारीची दखलही या दोन थोर पत्रकारांनी घेतली नाही, ही शरमेची बाब आहे.
मोदी सोडाच, संघ-भाजप परिवाराच्या विरोधातच मी सतत भूमिका घेतली आहे. पण हे करताना काँग्रेस (नेहरू-इंदिरा गांधी) आणि शरद पवार (समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस) ह्यांची तळी उचलण्याचं काहीही कारण नाही. काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांनी केवळ कुटुंबांसाठी राजकीय पक्ष चालवले, विचारधारा, कार्यक्रम हे केवळ नावापुरते होते, ही सामान्य मतदाराला कळलेली वस्तुस्थिती दडपण्याकडेच ह्या दोन्ही आदरणीय पत्रकारांनी आपली लेखणी झिजवावी?
आसबे आणि तळवळकरांनी आपआपल्या लेखण्या म्यान केलेल्या बर्या.

No comments:
Post a Comment