Monday, 21 April 2014

“डॉक्टर” बाबासाहेब

http://dr-pradip.blogspot.in/2014/04/blog-post_10.html

जीवनगाणे

Thursday, 10 April 2014

डॉक्टर” बाबासाहेब
       “अध्यक्ष महोदयया अर्थसंकल्पातील सार्वजानिकआरोग्यावरील तरतूद किती तोकडी आहे ते पहाएकूणअर्थसंकल्पीय खर्चाच्या अवघी अडीच टक्केआमची खेडीपाण्यासाठी आक्रोश करत आहेतशेकडो गावांना पाणी पुरवठ्याचीकोणतीही व्यवस्था नाहीआमची खेडी म्हणजे निव्वळ उकीरडेझाले आहेतत्यांना गाव म्हणणेच चूक आहे.ग्रामीण भागातसांडपाण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे.मलेरियाने,इतर आजारांनी शेकडो लोक मरणपावताहेत.ग्रामीण भागात क्वचितच एखादा दवाखाना दिसतो आहे.औषध वाटपासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी कोठेही कसलीहीसुविधा दृष्टोत्पत्तीस येत नाहीपिण्याच्या पाण्याअभावीवैद्यकीयमदतीअभावी शेकडो लोक मरताहेत.”
दि मार्च १९३८ रोजी त्यावेळच्या मुंबई प्रांताच्या ऍसेम्ब्लीमध्येडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले हे भाषण ! बाबासाहेब आंतरराष्ट्रीयकीर्तीचे अर्थतज्ञ होते,समाजशास्त्रज्ञ होतेत्यांनी सार्वजानिकआरोग्याचे सामाजिक प्रगतीतील स्थान नेमके ओळखले होते आणिम्हणूनच सार्वजानिक आरोग्याच्या संदर्भातील आपली भूमिकाअधिक विस्ताराने विविध अभ्यासांचे संदर्भ देताना विविधअभ्यासांचे संदर्भ देत ते अनेकवेळा मांडताना दिसतातदेशभरातीलदलित पदद्लित जनसमूह हा बाबासाहेबांच्या विचारांचा केंद्रबिंदूराहिलेला आहे आणि या जनसमूहाला सुखी समाधानी करण्याचीक्षमता असणारा सार्वजानिक आरोग्याचा विषय त्यांच्याजिव्हाळ्याचा होता आणि म्हणूनच या वंचित समाजगटालासार्वजानिक आरोग्य सुविधा पुरवण्यासंदर्भात ते वेळप्रसंगी आक्रमकहोताना दिसतातसार्वजानिक आरोग्यासाठीची आर्थिक तरतूदअत्यंत अपुरी आहेअसे आपण विधीमंडळात सांगत असतानाअर्थमंत्री मात्र हसताना दिसतात आणि बाबासाहेबांचा राग अनावरहोतो, “ माझे सन्माननीय मित्र,मंत्रीमहोदय हसताहेतत्यांनीहसलेच पाहिजेते दुसरं काय करु शकतात?” असे बाबासाहेबसंतापाने म्हणतात.त्यावर दुसरा एक सदस्य खोडकरपणे बोलतो, “मग त्यांनी रडावे का ?”
यावर बाबासाहेब म्हणतात, “ होय त्यांनी रडायला हवेत्यांनारडताना पहायची माझी इच्छा आहे कारण त्यांचे अश्रू त्यांच्याभावना सांगतील,या प्रश्नाबद्दल असणारी त्यांची सहानुभूतीदाखवतीलपण असे संवेदनाशून्य हसू आपणाला कोठे घेऊन जाईल?”
बाबासाहेबांची ही प्रतिक्रिया त्यांचा सार्वजानिक आरोग्यविषयकजिव्हाळा स्पष्ट करतेया जिव्हाळ्यातूनच सार्वजानिकआरोग्यासंदर्भातील अनेक प्रश्नांवर आपल्याला आजही थक्ककरणारी,काळाच्या पुढे जाणारी सुस्पष्ट भूमिका बाबासाहेब घेतानादिसतात.


     संततीनियमन हा असाच एक महत्वाचा प्रश्नआज सहजतेनेप्रत्येकाने स्वीकारलेला हा विषय स्वातंत्र्यपूर्व काळातील एक अत्यंतवादग्रस्त विषय होता१९२० सालापासून  धों कर्वे यांनीसंततीनियमनाचा प्रचार आपल्याकडे सुरु केला होता खरे;पण रधोअक्षरशः आगीतून चालत होते१९२१ साली मार्गारेट सॅंगरनेअमेरिकन बर्थ कन्ट्रोल लीग’ स्थापन केली होती१९३५ साली तीभारतात आली होती आणि संततीनियमनासंदर्भात ती .गांधींनाभेटली होती;पण माल्थसपासून .गांधीजींपर्यंत सर्वांची भूमिकाएकच होतीसंततीनियमनाची आवश्यकता त्यांना मान्य होती ;पण त्यासाठीच्या कृत्रिम उपायांना त्यांचा विरोध होता.आत्मसंयमन हा त्यावरील सर्वोत्तम उपाय वाटत होताएक किंवादोन अपत्यप्राप्तीनंतर विवाहातर्गत ब्रम्हचर्य पाळणे हाचगांधीजींच्या संततीनियमनाचा मार्ग होताडॉआंबेडकरांनी याविषयावर घेतलेली भूमिका गांधी आणि माल्थसच्या भूमिकेपेक्षाअधिक व्यवहार्य आहेएकमेकांवर प्रेम करणारे दोन तरुण जीवपती-पत्नी या नात्याने एकत्र रहात असताना आत्मसंयम आणिब्रम्हचर्य या गोष्टी अत्यंत अव्यवहार्य आहेतअसे बाबासाहेबांचेस्पष्ट मत होतेसर्वसामान्य माणसं वासनेला बळी पडतात हेउघड्या डोळ्यांना दिसणारे वास्तव नाकारण्यात काय अर्थ ? १०नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबई प्रांताच्या विधीमंडळात बाबासाहेबांच्यावतीने संतती नियमनविषक ठराव श्री.पी.जे रोहम यांनी मांडलायाठरावात बाबासाहेबांची संततीनियमनविषयक भूमिका सविस्तरपणेयेते.  या प्रश्नाचा बाबासाहेबांनी सर्व बाजूंनी विचार केला आहे हेहीआपल्याला जाणवतेकुटुंब नियोजनाची कृत्रिम साधने वापरणेपाश्चात्य समाजासाठी योग्य आहे;पण आपला समाज हाअध्यात्मिक समाज आहेत्यामुळे आत्मसंयमन आणि ब्रम्हचर्ययांचे महत्व त्याला उमजते अशी अनेकांची भूमिका होतीमुंबईविधीमंडळातील एक सहकारी श्रीमती सरोजिनी मेहता यांनी वाटलेलीपत्रके बाबासाहेब उधृत करतात. ‘ केवळ जग हे माया आहे ही यासारखी वाक्ये पोपटपंची सारखी म्हटल्याने कोणी अध्यात्मिकहोतो का ? असा रास्त प्रश्न विचारुन स्त्री-पुरुष संबंधांतील वास्तवबाबासाहेब मांडतात आणि लोकसंख्या नियंत्रणासाठीची व्यवहार्यभूमिका घेण्याची विनंती करतात.
   संतती नियमनाच्या अभावाचे चटके बाबासाहेबांनी स्वतःच्याजीवनात घेतले होतेते स्वतः त्यांच्या माता-पित्यांचे चौदावेअपत्य होतेकुटुंबाच्या अवाजवी आकारामुळे बसणारे दारिद्र्याचेचटके त्यांनी सोसले होतेमांजरपाटाचे शर्ट,फाटलेला कोटचपलानसणे,अनेकवेळा खिशात दिडकीही नसणे अशा अवस्थेत त्यांनाशिक्षण घ्यावे लागले होतेबाबासाहेबांना स्वतःला पाच मुले झालीहोतीत्यातील चार मूत्यू पावलीराजरत्नाच्या वेळी तर बाबासाहेबधाय मोकलून रडलेया पाच बाळंतपणामुळे त्यांच्या प्रियरमाबाईंची प्रकृती खालावलीत्यातच १९३५ साली त्यांचे निधनझालेबाबासाहेब अत्यंत हळवे होतेआपल्या मुलांच्या मृत्यूबद्दलत्यांनी लिहिले आहे,– “आमच्या चार लहानग्यांचे अंत्यविधीकरण्याचे दुर्दैव आम्हावर ओढवले या विचारांनीच मला गुदमरायलाहोतेमाझा लहानगा राजरत्न तर फारच गोजिरा होतात्याच्याजाण्याने माझे आयुष्य काट्याचे बन झाले आहे.”
पण महापुरुष आपली दुःखे कवटाळून बसत नाहीतसमाजाच्याविशाल दुःखाशी त्यांची नाळ जोडतात आणि नव्या परिवर्तनासाठीसंघर्षरत होतात.
    अतिरेकी जन्मदर हाच आपल्या समाजातील वाढत्यादारिद्र्याचे,बालमृत्यु आणि मातामृत्यूचे कारण आहे हे बाबासाहेबांनीनेमके हेरले होते आणि म्हणूनच बाबासाहेबांनी म्हटले आहे- “आपल्याला मूल होऊ द्यावे अथवा नाही हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यप्रत्येक स्त्रीला असले पाहिजे आणि कोणत्याही कारणासाठी जरएखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला तीगर्भधारणाच टाळता येण्याची सुविधा असाली पाहिजे.”
प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे तपासून पाहणारा बाबासाहेबांमधलासमाजशास्त्रज्ञ संततीनियमनावरील या चर्चेत आपल्याला ठळकपणेदिसतोबालविवाह बंद होऊन मुलींच्या विवाहाचे वय वाढल्यानेआपोआपच लोकसंख्या नियंत्रण होईलत्यासाठी संततीनियमनाचीगरज नाही,असे काहींना वाटत होते;पण १९३१च्या जनगणनेवरीलश्री.पी.के वत्तल यांचे जननदरासंबंधीचे अभ्यासपूर्ण संशोधनचबाबासाहेबांनी सभागृहासमोर ठेवले आहेवीस वर्षांच्या नंतर लग्नझालेली मुलगी वीस वर्षांच्या आत लग्न झालेल्या मुलीपेक्षा कमीमुलांना जन्म देते आणि वीस वर्षांनंतर लग्न झालेल्या मुलीलामुलीला झालेली मुले वीस वर्षांच्या आत लग्न झालेल्या मुलीच्याअपत्यांपेक्षा जगण्याची शक्यता जास्त असते. ‘सर्व्हावयल रेट’ असाशब्दप्रयोग बाबासाहेबांनी वापरला आहेम्हणजेच केवळ मुलीच्यालग्नाचे वय वाढून लोकसंख्या नियंत्रण होणार नाहीत्यासाठीसंतती नियमनाच्या पध्दतीच वापराव्या लागतीलहे बाबासाहेबसप्रमाण सिध्द करतातदेशांतर-स्थलांतरसंपत्तीचे समान वाटपकिंवा स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याने आपोआप लोकसंख्यानियंत्रण होणार नाहीत्यासाठी संततीनियमन साधनांचा आधारघ्यावाच लागेलहे बाबासाहेब सोदाहरण स्पष्ट करतातचौथ्याबाळंतपणानंतर माता मृत्यू आणि बालमृत्यू देखील अत्यंत वेगानेवाढतातहे डॉ.मुन्रो यांच्या Maternal Mortality and Morbidity यापुस्तकातील वैद्यकीय वास्तवही ते सभागृहापुढे ठेवतात.
   संतती नियमनामुळे आपल्या वंशाचीधर्माची लोकसंख्या कमीहोऊन आपले बळ घटेल असा भयगंडही अनेक मूलतत्ववाद्यांच्यामनात घर करुन बसला आहेजननदर नव्हे तर सर्व्हावयल रेटमहत्वाचा आहेहे आंबेडकर स्पष्ट करतातवाढत्या जन्मदरासोबतबालमृत्यूदर  मातामृत्यूदरही वाढतोमहायुध्दांमध्ये कमी जननदरअसणा-या राष्ट्रांनी अधिक जननदर असलेल्या राष्ट्रांवर कुरघोडी केलीया इतिहासापासून धडा घेण्यास बाबासाहेब सांगतातआधुनिकयुध्दांना माणसे लागत नाहीतआधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने युध्देखेळली जातात आणि मुळात लोकसंख्या नियंत्रणामुळे दारिद्र्य कमीझाले की युध्दखोरी आपोआपच कमी होते.ऐश्वर्य,संपत्ती,प्रतिष्ठा,संस्कृती या गोष्टी लोकसंख्येवर नव्हे,तरगुणवत्तेवर अवलंबून असतात,हे सांगताना बाबासाहेब आपल्याकडीलपारशी समाजाचे उदाहरण देतात.
   लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व विशद करताना बाबासाहेबांनीअनेक देशांचे दाखले दिले आहेत. ‘एक तृतीयांश अमेरिकननागरिकांना कमी प्रतीच्या अन्नावर गुजराण करावी लागते’ हेत्यावेळच्या अमेरिकन अध्यक्ष रुझवेल्ट याचे उद्गार आंबेडकरांनीउधृत केले आहेतआपल्यापेक्षा कमी जननदर असलेल्या अमेरिकनजनतेला पुरेसे अन्न मिळत नाही,यापासून आपण बोध घ्यायलाहवाप्रत्येक विषयातील बाबासाहेबांचा सूक्ष्म अभ्यास ठायी ठायीदिसून येतोमुंबईचे उदाहरण देत बाबासाहेब सांगतात, “ मुंबईलादर माणशी दररोज एक पिंट(सुमारे अर्धा लिटरदूधाची गरज आहेपण प्रत्यक्षात अवघे सव्वा तोळा दूध मिळते
    संततीनियमनावरील हा बिनसरकारी ठराव विधीमंडळातमांडताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाचे मुंबईविधानसभेतील नेते होतेत्यांचे १४ सहकारीही विधानसभेवर होते.हा ठराव मतदानासाठी मांडताना बाबासाहेब म्हणाले होते, “ मुंबईहे भारताचे प्रवेशव्दार आहेयाच प्रवेशव्दारातून संतती नियमनाचीही चळवळ या प्रांतात प्रवेशली आहेया प्रांतात ही चळवळफोफावायला हवीआपले नाव अमर होईल अशी कृती करण्याचीसंधी व्यक्तीला क्वचितच लाभते.आपल्या प्रांतिक सरकारला ही संधीसंतती नियमनाच्या चळवळीने दिली आहेआमचे प्रांतिक सरकारही संधी हातातून दवडणार नाही.” परंपरेचा पगडा असणा-याविधीमंडळाला बाबासाहेबांची ही कालदर्शी नजर उमजली नाही आणिसंततीनियमनाचा हा ठराव ५२ विरुध्द  एवढ्या प्रचंड फरकानेफेटाळला गेला पण त्यानंतर १३ वर्षांनी म्हणजे १९५१ साली भारतसरकारला बाबासाहेबांनी दाखवलेल्या वाटेनेच जावे लागले आणिपहिल्या पंचवार्षिक योजनेत कुटुंबनियोजन धोरणाचा अवलंबकरण्यात आलाअर्थात बाबासाहेबांना आपल्या जनतेच्याशहाणपणाबद्द्ल पुरेपूर खात्री होती आणि म्हणून ते  १९३८सालीच म्हणाले होते, “ आपले हित कशात आहे हे आपल्यादेशातील अडाणी माणसालाही चांगले कळतेसंततिनियमनाच्यासाधनांच्या शोधाबद्दल  त्यांच्या उपलब्धतेबद्दल माहिती मिळताचते त्याचा पुरेपूर वापर करतील यात मुळीच शंका नाही.”
       इतिहासतज्ञ,समाजशास्त्रज्ञ,विधीज्ञ,पुरातत्वशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञम्हणून बाबासाहेबांना आपण सारेच ओळखतो पण सार्वजानिकआरोग्याच्या क्षेत्रातील त्यांचे महत्वपूर्ण योगदान लक्षात घ्यावयाचीगरज आहेफेब्रुवारी १९२७ मध्ये मुंबई विधीमंडळात दारु प्रश्नावरबोलताना भारतातील विविध प्रांतात दर डोई दारुवर होणा-याखर्चाचे आकडेच उधृत केले आहेत आणि इतर प्रांताच्या तुलनेतमुंबई प्रांतात दारुवरील दरडोई खर्च अडीचपट आहेहे सांगितलेआहेप्रत्यक्ष खपापेक्षा जास्त दारुचे परवाने का दिले जात आहेतअसा जाब त्यांनी सरकारला विचारला आहे.दारुचे व्यसनसर्वसामान्यांच्या बरबादीचे प्रमुख कारण आहे आणि म्हणूनचबाबासाहेब प्रांतिक सरकारला खडसावतात, “ जनतेची उन्नती हेसरकारचे उद्दिष्ट असले पाहिजेतुम्ही त्यांना भिकारी बनवूनका.जनतेला भिकेस लावणारे सरकार अखेरीस स्वतःच भीक मागूलागते.” बाबासाहेबांचे हे जहाल शब्द सर्वसामान्यांविषयी असलेल्याकळवळ्यातून आले आहेत.
   १९३६ साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना बाबासाहेबांनी केली.कामगारांच्या कामाचे तास  किमान वेतन ठरविण्यासोबतचआजारी रजावृध्दत्व पेन्शन,अपघात नुकसान भरपाई इतरआरोग्य सुविधा या सा-या गोष्टे पक्षाच्या ध्येयधोरणाच्या प्रमुखघटक होत्या.
  स्त्री कामगारांना गरोदरपणात हक्काची पगारी सुट्टीमिळावी,प्रसूतिपूर्व आणि प्रसूतिपश्चातही विश्रांती मिळावी आणि सा-याची आर्थिक जबाबदारी सरकारने घ्यावीही बाबासाहेबांची इच्छाहोती.मजूर मंत्री असताना “मॅटर्निटी बेनेफिट ऍक्ट” लागू होण्यासाठीत्यांनी विशेष प्रयत्न केले.
          सार्वजनिक आरोग्य हा खरे म्हणजे आंतरविद्याशाखीय समज असणा-या प्रज्ञावंतांचा विषय. आणि म्हणूनच इतिहास,अर्थशास्त्र,समाजशास्त्र,कायदा,राज्यशास्त्र या सारख्या विषयात गती असणारे बाबासाहेब जेव्हा सार्वजनिक आरोग्यावर बोलू लागतात तेव्हा ते रुढ अर्थानेही समाजाचे खरेखुरे डॉक्टर आहेत याची खात्री पटते. नाहीतरी एका माणसाच्या दुखण्याचा इलाज कोणा डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये होऊ शकत असेल पण समाजाच्या सामुहिक दुखण्यांसाठीची वाट सामाजिक,आर्थिक आणि राजकीय परिवर्तनातूनच गवसत असते.
बाबासाहेबांबद्दल लिहताना एका कवितेत मी म्हटले आहे-

“आवस माखल्या आभाळाची
लालतांबडी पहाट तू !
न आटणा-या आडाचा
गुणगुणणारा रहाट तू !

कोरड पडलेल्या ओठांसाठी
चवदार तळ्याचे पाणी तू !
माणूस हरविलेल्या दुनियेसाठी
कबिराची वाणी तू !”

सार्वजनिक आरोग्यातील गळाबंद कोटांना आणि एसी सेमिनार रुममधील चर्चांना ही कबीर वाणी  सर्वसामान्यांवरील पेमाचे ढाई अक्षर पाजून प्रत्येक झोपडीच्या दारापर्यंत घेऊन जाईल,यात काय शंका ?
या कबीराची गरज आज कधी नव्हे एवढी सार्वजानिक आरोग्यक्षेत्रात आहे

                         ( दि १८ एप्रिल २०१४ च्या लोकप्रभा मध्ये प्रसिध्द झालेला लेख )

No comments:

Post a Comment