http://maharashtratimes.indiatimes.com/edit/article/polarisation/articleshow/33351661.cms
Apr 7, 2014, 01.26AM IST Maharashtra Times, 07 April, 2014
नरेंद्र मोदींना आव्हान देण्याचे टाळताना काँग्रेसने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींच्या नावाची घोषणा करण्याचे टाळले. मोदींना अपशकून घडवू पाहणारी डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडीही कोलमडून पडली. काँग्रेसशी हातमिळवणी न करता प्रमुख प्रादेशिक पक्ष स्वबळावर लढत आहेत, ही बाब मोदींसाठी पोषक ठरली आहे...
लोकसभा निवडणुकीचा निकाल मतदानाआधीच लागला असून आपण देशाचे पंतप्रधान झालो, अशा आत्मविश्वासाने नरेंद्र मोदी देशभर प्रचार करीत आहेत. मोदी खरोखरीच देशाचे पंतप्रधान होतील या शक्यतेने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी चिंताक्रांत झाल्या आहेत. निवडणुकीच्या मोसमात भविष्यवाणी वर्तविणाऱ्या जनमत सर्वेक्षणांचे निष्कर्ष बकवास असल्याचे सोनियांचे मत असले तरी निकालाचा दिवस जवळ येत चालला तसे सर्वच ओपिनियन पोलमध्ये मोदींची लोकप्रियता वाढत असल्याने त्यांच्या चिंतेत भर पडत आहे. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी हा सर्वोत्तम पर्याय नसला, तरी यंदा त्यांच्याच नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होणार, असे भाकित 'द इकोनॉमिस्ट'नेही वर्तविले आहे. मोदी पंतप्रधान होण्यासाठी आता काही दिवसांचीच प्रतीक्षा आहे, असा समज दृढ करणारी पोस्टर्स दिल्लीत झळकायलाही सुरुवात झाली आहे.
पण सारे संकेत शुभ आणि अनुकूल असले तरी हातातोंडाशी आलेला विजयाचा घास ऐन मोक्याच्या क्षणी हिरावला जाऊ नये म्हणून मोदी व त्यांचे सहकारी अमित शाह सावध झाले आहेत. यूपीए सरकारने केलेल्या साडेआठ लाख कोटींचे घोटाळे आणि भ्रष्टाचारांची अंतहीन यादी, त्रस्त करणारी महागाई, रोषाला जन्म देणारी बेरोजगारी, अर्थव्यवस्थेचे कुव्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा ठप्प झालेला विकास, बाह्य धोका, अंतर्गत सुरक्षा, दहशतवाद, मोडीत निघालेली संरक्षण सज्जता, अपयशी विदेशी धोरण, पंतप्रधानांच्या पदाने गमावलेली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता आदी मुद्यांवरून गेल्या वर्षभरापासून मोदींनी केलेल्या खमंग प्रचाराचा फराळ मतदारांनी दिवाळीत झालेल्या विधानसभा निवडणुकांतच पचवला. या प्रचारामुळे लोकसभा निवडणुकीसाठी अनेकांची मानसिक तयारीही झाली. पण २००९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात मिळालेल्या १९ टक्के मतांत किमान १० टक्क्यांची भर पडत नाही, तोपर्यंत मोदींचे पंतप्रधानपद निश्चित होऊ शकणार नाही.
हवामानातील गारठा संपताच राजकीय पाराही चढू लागला आहे. सत्तेच्या सारीपाटात आपण पराभूत झालो आहोत, याची जाणीव काँग्रेसला नव्या वर्षाच्या प्रारंभीच झाली. त्यामुळेच मोदींना आव्हान देण्याचे टाळताना काँग्रेसने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधींच्या नावाची घोषणा करण्याचे टाळले. मोदींना अपशकून घडवू पाहणारी डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडीही कोलमडून पडली. काँग्रेसशी हातमिळवणी न करता प्रमुख प्रादेशिक पक्ष स्वबळावर लढत आहेत, ही बाब मोदींसाठी पोषक ठरली आहे. काँग्रेसप्रणीत यूपीएविरुद्ध मोदी असाच देशाच्या बहुतांश राज्यांत मतसंग्राम होऊ घातला असून तो एकतर्फी ठरत असल्याचे सर्व निवडणूकपूर्व अंदाजांतून स्पष्ट होत आहे. मात्र मोदींचा अश्वमेध रोखणे अजूनही शक्य आहे, असे काँग्रेसला वाटते. त्यामुळे काँग्रेसने एप्रिल महिन्यात आपली रणनीती बदलली. मोदींसारखा आत्मकेंद्रित निवडणूक प्रचार देशात आजवर कुणीही केलेला नाही, मोदी राष्ट्रनायक नसून खलनायक आहेत, हे प्रसंगी खालच्या स्तरावर जाऊन सिद्ध करण्याचा काँग्रेसचा आटापिटा सुरू झाला.
मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसने हाती घेतलेल्या मोहिमेत पडद्यामागे प्रियंका गांधी वड्राही कार्यरत झाल्या आहेत. रेटून खोटे बोलणारे, स्वतःला भाजपपेक्षा मोठे समजणारे मोदी कमालीचे अहंकारी, हुकुमशाही आणि फॅसिस्ट वृत्तीचे आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर सदैव तिरस्कार, वाणीत कटुता, वृत्तीत संकुचितपणा असतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व पक्षपाती, विभाजनकारी, धुव्रीकरण करणारे आहे, हे जनतेपुढे मांडण्याचा काँग्रेसचा उद्देश आहे. १० वर्षांपूर्वी याच मोदींवरून झालेल्या ध्रुवीकरणामुळे वाजपेयींना केंद्रातील सत्ता गमवावी लागली होती. आता मोदीच रणांगणात उतरल्यामुळे ध्रुवीकरण तर होणारच असा काँग्रेसजनांना साधा तर्क आहे. मोदी पंतप्रधान झाले तर देशात धार्मिक तेढ निर्माण होईल अशी अल्पसंख्याकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या मनसुब्यांना उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे उमेदवार इमरान मसूद यांनी देशव्यापी हवा दिली. देशाचा धर्मनिरपेक्ष चेहरा शाबूत राखण्यासाठी मुस्लिम मतांचे विभाजन होऊ नये, म्हणून काँग्रेसने जामा मशिदीचे शाही इमाम बु्खारी यांना वश केले. पाठोपाठ बाबरीचा विध्वंस उन्मादाच्या भरात नव्हे तर सुनियोजित कटकारस्थानातून घडला हे सांगणारा नवा पैलू उजेडात आणला गेला.
वर्षभरापासून भारतातील एकूणएक राज्यातील बारीकसारीक समस्यांचा तपशीलवार ऊहापोह करीत सर्वसामान्यांना नेत्रदीपक विकासाच्या स्वप्नांमध्ये गुंगवून मतपेढीचा पाया पक्का केल्यानंतर त्यावर यशाचा कळस चढविण्यासाठी आवश्यक असलेला मतांचा स्विंग घडवून आणण्यासाठी मोदीही चोरपावलांनी ध्रुवीकरणाकडे वळले. पश्चिम उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधील जातीय दंगलीतील भाजपच्या तिन्ही आरोपी आमदारांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली. संवेदनशील पूर्वांचलातील लोकसभेच्या ३२ जागांना प्रभावित करण्यासाठी वाराणसीत मोदींच्या उमेदवारी घोषणा होताच 'हर हर मोदी, घर घर मोदी'च्या आक्षेपार्ह जयघोषाने आसमंत दुमदुमले. यूपीए सरकारने देशात पशुवध क्रांती घडवून निर्यात वाढविल्याचा आरोप करीत मोदींनी धार्मिक भावना चाळविण्याचा प्रयत्न केला. पश्चिम उत्तर प्रदेशातील ध्रुवीकरण मोदींच्या पथ्थ्यावर पडावे म्हणून अमित शाहनी बदल्याची भाषा सुरू केली.
भाजपचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात मोदींना स्वारस्य नाही. मोदींची वाणी हाच भाजपचा आणि देशाचा निवडणूक जाहीरनामा आहे, असे सांगून भाजपच्या कथित बड्या नेत्यांनी लाचारीची गाठली. सर्वांगीण विकासाच्या गप्पा करणाऱ्या मोदींच्या मनातील अजेंडा त्यांचे उजवे हात अमित शाह यांच्या तोंडून बाहेर पडला. 'मनुष्य एकवेळ भोजन आणि झोपेशिवाय जगू शकतो. तहानभूक विसरूनही जिवंत राहू शकतो, पण अपमान सहन करून जगू शकत नाही. अपमानाचा बदला तर घ्यावाच लागेल,' असे ते शहाजोगपणे म्हणाले. निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू होण्याची वेळ येताच काँग्रेस व मोदी यांचे देशहिताचे, विकासाचे मुखवटे गळून पडले. ध्रुवीकरण हाच त्यांच्या राजकारणाचा प्राणवायू असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.

No comments:
Post a Comment