खेडेकर, मेटे, अजित पवार, आर.आर. मराठा समाजाचे हितकर्ते की वैरी?
पुरूषोत्तम खेडेकर, अजित पवार, आर.आर. पाटील,मेटे यांनी मराठ्यांना आरक्षण तर मिळवून दिले पण राज्यातली मराठा सत्ता कायमची गमावली.
मराठे जोवर व्होटब्यांक म्हणुन गपचुप काम करीत होते, तोवर ओबीसी बेसावध होते.१५ टक्के मराठे ५५ ते ७० टक्के सत्ता कब्ज्यात ठेवीत होते.
कुणबी मराठा खेडेकरांनी ब्रिगेड नी मराठा सेवा संघामार्फत मराठा आरक्षणाचे रान पेटवले.
राज्यात आरक्षणाची आग पेटली.
ओबीसींना असुरक्षित वाटू लागले.
ओबीसी मतदार जागा झाला. संघटित होऊ लागला.
मराठा नेते शरद पवार यांना स्वत:ला ओबीसी बनायचे असल्याने त्यांनी मराठा आरक्षण उचलून धरले.
भुजबळांची कोंडी करण्यात आली. विरोधकांना हाताशी धरून महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळांना यथेच्छ बदनाम करण्यात आले.
नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यात आले.
राणे समितीचा फार्स करण्यात आला. मराठा आरक्षण देण्यात आले.
परिणाम
मराठा आरक्षणाचे म्होरके मेटे, रेखा खेडेकर, पाचपुते, हर्षवर्धन पाटील, मोघे, पुरके, नारायण राणे पराभूत झाले.
पंकज भुजबळ दुसर्यांदा निवडून आले. या मतदार संघात गेल्या ६० वर्षात कोणताही आमदार दोनदा निवडून येत नाही. पंकज भुजबळांनी इतिहास घडवला घडवला.ते दुसर्यांदा निवडून आले. जातीयवादी प्रचार करणार्या मराठा अद्वय हिरेंना त्यांनी चारी मुंड्या चित केले.
No comments:
Post a Comment