पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. कारण त्या दिवशी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस असतो. डॉ.राधाकृष्णन यांच्याच जन्मदिवशी शिक्षक दिन का साजरा करायचा ? या प्रश्नांचे उत्तर देताना सांगितले जाते कि, डॉ.राधाकृष्णन हे उच्च विद्याविभूषित होते, त्यांनी तत्वज्ञानावरील विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिले, शिक्षण क्षेत्रात मोलाचे कार्य केले. शिक्षक-कुलगुरू ते राष्ट्रपती असा त्यांच्या आयुष्याचा चढता आलेख सांगितला जातो. त्यांनी स्वत:चा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. म्हणूनही हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो... या सर्व गोष्टींसोबत खास भर देवून असे ही सांगितले जाते कि, ते एक आदर्श शिक्षक होते. आणि म्हणून त्यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकांचा सन्मान करणे हि निश्चित चांगली बाब आहे. परंतु शिक्षक हा समाजाच्या दृष्टीने जबाबदार घटक असतो. समाजाने शिक्षकाकडून काही चांगल्या अपेक्षा बाळगलेल्या असतात.म्हणून हा सन्मान त्यांचाच होऊ शकतो ज्यांना आपल्या शिक्षक म्हणून असलेल्या जबाबदारीचे भान असते. शिक्षकांकडून अधिकारांचा गैरवापर होण्याची अनेक उदाहरणे आहेत. प्राचीन काळातही ज्ञानसत्तेचा दुरुपयोग करून एकलव्याचा अंगठा तोडणारे द्रोणाचार्य होतेच! शिक्षणावर केल्या जाणार्या खर्चाबाबत स्वातंत्र्योतर काळात पुरोगामी चळवळीने, फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीने आग्रही भूमिका घेतली आहे. डॉ.राधाकृष्णन हे देशातील पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते. त्या नात्याने त्यांनी भारतीय शिक्षणावरील, विशेषतः शिक्षणावर अधिक खर्च विद्यार्थ्यावर व्हावा अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती . डॉ.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला गेला होता. या आयोगाचा मोठा गवगवा केला गेला. त्या शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रीया, शूद्रातिशूद्र, बहुजन,शेतकरी, कष्टकरी यांच्या मुक्तीचे दरवाजे उघडले जावेत यासाठी ठोस अशा कुठल्याही उपाययोजना सुचविल्या गेल्या नाहीत. क्रांतीबा जोतीराव फुले यांनी हंटर कमिशन समोर साक्ष देतांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याविषयी इंग्रज सरकारला सुचविले होते. तर शाहू महाराजांनी १९१७ प्राथमिक शिक्षण मोफत देण्याची घोषणाच केली होती. डॉ.राधाकृष्णन यांचा विचार, उक्ती, कृती, ब्राह्मणी वर्चस्वाच्या हितसंबंधी साठीच होता . भारतीय समाजाची रचना अन्यायमूलक, विषमताजनक आहे, ब्राह्मणी धर्मग्रंथाच्या आधारे ब्राह्मणांचे मात्र संवर्धन केले. परंतु बहुसंख्य शुद्र-अतिशूद्र,शेतकरी, बहुजन आणि स्त्रिया यांना शिक्षणाची बंदी केली. त्यांना वर्षानुवर्षे गुलामीच्या पाशांमध्ये जखडले. क्रांतिसूर्य जोतीराव फुलेंनी हे जाणले. ज्ञानाच्याप्रक्रियेतून मुक्तीला सुरुवात होत असते. ज्ञान हि भौतिक शक्ती आहे. म्हणून प्रथम स्त्रियांसाठी शाळा काढून त्यांना ज्ञान प्रक्रियेशी जोडण्याचा प्रयत्न केला. डॉ.राधाकृष्णन यांच्यावर ब्राह्मणी धर्माचा व धर्मग्रंथाचा प्रभाव होता. त्यामुळेच ते ब्राह्मणांचे प्रतिनिधी ठरले, बहुजनांचे नाहीत. स्त्रीयाना, शुद्रतीशुद्रांना शिक्षण नाकारणार्या ब्राह्मणी धर्माचे कोडकौतुक करणार्या राधाकृष्णन यांनी भारतीय समाजाच्यातळागाळातील घटकांसाठी काहीही केले नाही. १९४७ साली भारतीय स्त्रियांच्यासाक्षरातेचे प्रमाण केवळ ९ % होते आणि त्यातही उच्चजातीच्या स्त्रियांचाच भरणा अधिक होता. या पार्श्वभूमीवर डॉ.राधाकृष्णन याच्या सारख्या तथाकथित आदर्श शिक्षकाने वास्तविक स्त्रियांच्या शिक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवे होते, परंतु त्यांनी शिक्षणासाठी काहीहीकेले नाही. डॉ.राधाकृष्णन राष्ट्रपती होते परंतु मुलींसाठी एखादी शाळा काढण्याचा विचार त्यांच्या मनात कधीही आला नाही. याउलट राधाकृष्णन यांनी आपल्या मुलींचा विवाह ११ व१६ व्या वर्षीच उरकला. अर्थात मुलींचा बालविवाह केला... आणि ब्राम्हणी-पुरुषी मानसिकतेचे प्रदर्शन केले. सेवा प्रवृत्ती हीच स्त्रियांची मूळ प्रवृत्ती असते, असे म्हणत राधाकृष्णन यांनी स्त्रियांच्या गुलामगिरीचे उदात्तीकरण केले. क्रांतीसूर्य जोतीराव फुलेंच्या मते बहुजन समाजाच्या सर्व प्रश्नांचे मूळ अज्ञान, अविद्याच आहे. म्हणूनच ते स्त्रीया व शुद्रतीशुद्रांना शिक्षण देण्याचे कार्य करतात. १९ व्या शतकात अनेक समाजसुधारक होऊन गेले.परंतु क्रांतिसूर्य ज्योतीराव फुलेंचे कार्य सर्वात महत्वाचे ठरले. त्याचे कारण त्यांनी इथल्या मातीशी इमान राखून, समाजातील शोषितांच्या मुक्तीसाठी कार्य केले. स्त्रीया व शुद्रतीशुद्रांवर ज्ञानबंदीच्या माध्यमातून ब्राह्मणी धर्माने बहुजनांना गुलामगिरीत ढकलल्याचे त्यांनी अचूकपणे ओळखले. शेतकर्याची अवनती का झाली? या प्रश्नांची उकल करताना जोतीराव फुले म्हणतात.
विद्येविना मती गेली |
मतीविना निती गेली | |
नितीविना गती गेली |
गतीविना वित्त गेले | |
वित्ताविना शुद्र खचले |
एवढे अनर्थ एका अविद्येने केले | |
विद्येविना मती गेली |
मतीविना निती गेली | |
नितीविना गती गेली |
गतीविना वित्त गेले | |
वित्ताविना शुद्र खचले |
एवढे अनर्थ एका अविद्येने केले | |
जोतीराव फुलेंनी हे जाणले होते. म्हणूनच त्यांनी सर्वप्रथम या ज्ञान सत्तेवरील ब्राह्मणी वर्चस्वाला सुरुंग लावण्याचे काम केले.
त्यांनी १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा काढली. हे सांगणे जितके महत्वाचे आहे त्याही पेक्षा त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणास प्राधान्य कादिले हे सांगणे जास्त महत्वाचे ठरेल. कुठलाही समतेवर आधारित समाज स्त्री-पुरुष समतेशिवाय अस्तित्व येऊ शकत नाही व स्त्री पुरुष समता स्त्रियांच्या शिक्षणा शिवाय शक्य नाही स्त्रिया शिकल्या पाहिजेत त्यांनालिहिता, वाचता आले पाहिजे. त्याद्वारे त्यांना समाजाचे समग्र आकलन होईल.या भूमिकेतून क्रांतिसूर्य जोतीराव फुले स्त्रियांच्या शिक्षणाकडे पाहत होते.

एकदा व्हाईट नावाचा एक इंग्रज अधिकारी पुण्याच्या आसपास शाळांची पाहणी करत असतांना एक पंतोजीने टेबलवर छडी शेजारी काही ढेकळे ठेवल्याचे त्याला दिसले. विचारले असता तो पंतोजी म्हणाला या छडीने मी जर शूद्राति शूद्र मुलांना मारले तर ती बाटेल म्हणून त्यांना दुरून फेकून मारण्यासाठी हि ढेकळे ठेवली आहेत. ब्राह्मणां मध्ये एक म्हण लोकप्रिय आहे.
"छडी लागे छमछम ! विद्या येई घमघम!!" शुद्रती शुद्रांना त्यांची छडीही स्पर्श करीत नव्हती तर विद्या मिळणे हि फारच दूरची गोष्ट होती. आणि म्हणून क्रांतिसूर्य जोतीराव फुलेंनी शूद्रातिशूद्रांकरिता मोफत शिक्षण सुरुकेले.१८८२ साली हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात ज्योतीराव फुले म्हणतात."सरकारला मिळणारा महसूल बहुजनांचा आहे. या महसुलावर ब्राह्मण शिक्षण घेतात. पण तेच ब्राह्मण लोक बहुजनांच्या शिक्षणास मात्र विरोध करतात!" असे झणझणीत अंजन फक्त फुलेच घालू शकले. म्हणूनच म्हणावेसे वाटते कि क्रांतिसूर्य फुलेंच्या तुलनेत राधाकृष्णन यांनी असे काय केले कि ज्यामुळे शासनाने त्यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन साजरा करण्याचे फर्मान सोडले? म्हणून ५ सप्टेंबर ऐवजी २८ नोव्हेंबर जोतीराव फुलेंचा स्मृतिदिन खरा शिक्षक दिन साजरा करणे हे बाबासाहेब डॉ. आंबेडकरांच्या शब्दात आधुनिक भारताच्या सर्वश्रेष्ठ शिक्षकास खरे अभिवादन ठरेल...!

ता. क. - या लेखातील " ब्राह्मण " हा शब्द जात, धर्म, वर्ण, वर्ग यांच्या अनुषंगाने वाचू नये. कारण मी वैयक्तिश: जात, धर्म, वर्ण, वर्ग मानत नाही. माणूस ही एकच जात या पृथ्वीतलावर आहे, असं माझं ठाम नि स्पष्ट मत आहे. आणि म्हणूनच उपरोक्त लेखातील " ब्राम्हण " हा शब्द वृत्ती या अर्थाने वाचावा.
डॉ. बी. आर. आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या मतांशी मी सहमत आहे. ते म्हणाले होते की, " आमचा ब्राम्हणांना विरोधनसून ब्राम्हण्यवादाला विरोध आहे..."
डॉ. बी. आर. आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या मतांशी मी सहमत आहे. ते म्हणाले होते की, " आमचा ब्राम्हणांना विरोधनसून ब्राम्हण्यवादाला विरोध आहे..."
No comments:
Post a Comment