Tuesday, 2 September 2014

जपानमध्ये बोलून मोदींनी औचित्यभंग केला काय?

जे दिल्लीत बोलायचे ते जपानमध्ये बोलून मोदींनी औचित्यभंग केला नाही काय?
१९३२: महात्मा गांधी आणि डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात अनेक मुद्यांवर मतभेद होते. लंडन येथील दुसर्‍या गोलमेज परिषदेत बाबासाहेब गांधीजींवर टिका करतील अशी ब्रिटीशांना खात्री होती. परंतु बाबासाहेबांनी ब्रिटीशांची चामडी सोलली. त्यांना त्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, " आमचे काहीही मतभेद असले तरी तरी ते आम्ही आमच्या देशात पाहून घेऊ. इथे परक्या देशात मी त्यावर बोलणार नाही."
२०१४: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान मध्ये बोलताना म्हणाले, "आमच्या देशातल्या आधीच्या सरकारला जे ५०वर्षात करता आले नाही ते आम्ही १०० दिवसात केले." जे दिल्लीत बोलायचे ते जपानमध्ये बोलून मा. मोदींनी औचित्यभंग केला नाही काय? आपल्याला काय वाटते?

No comments:

Post a Comment