सौजन्य :प्रविण शिंदे
काल शिक्षक दिन बाबत अनेक मते समोर आली ; त्यापैकी एक :
राधाकृष्णन यांनी “माझा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करणे आपल्याला आवडेल” असे म्हटले. आणि हा दिवस शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा होणे सुरूही झाले. ही साधी गोष्ट नसून त्यामागे निश्चितच मोठी अंत:स्थ योजना असावी असे दिसते.
डॉ. राधाकृष्णन यांना शिक्षणतज्ञ म्हटले जाते. पण त्यांनी शिक्षणावर लिहिलेले कोणतेही पुस्तक सापडत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांनी शिक्षणावर एकही पुस्तक लिहिले नाही, असे दिसते. त्यामुळे बी.एड. च्या अभ्यासक्रमात त्यांच्यावरील पाठात त्यांच्या शिक्षणावरील कोणत्याही पुस्तकांचा संदर्भ दिला जात नाही.
अमक्या ठिकाणी ते काय म्हणाले, तमक्या ठिकाणी ते काय बोलले अशी मोघम उदाहरणे देऊन पाठ पूर्ण केलेला असतो. परंतु त्यावरून त्यांचे कोणतेही विशेष व नावीन्यपूर्ण शैक्षणिक तत्वज्ञान उजागर होत नाही.
डॉ. राधाकृष्णन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९८९ मध्ये अहमदाबादच्या एल.डी. इन्स्टिट्यूट ऑफ इंडोलाजी तर्फे एक विशेषांक काढण्यात आला होता. त्यात त्यांच्या धार्मिक तत्वज्ञानावर वारेमाप लेखन केले आहे; परंतु त्यांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाच्या योगदानावर काहीही दिलेले नाही.
यावरूनही त्यांचे शैक्षणिक तत्वज्ञान काही विशेष नव्हते असे दिसून येते. वास्तविकत: त्यांनी लिहिलेली जवळजवळ सर्वच पुस्तके तत्वज्ञानावर आधारीत आहेत.
नाही म्हणायला “एज्युकेशन, पोलिटिक्स अंड वॉर” हे त्यांचे एकमेव पुस्तक शिक्षणाच्या नावाचे असले तरी त्यात शालेय शिक्षणावर तसे काही नाही.
डॉ. राधाकृष्णन हे कोणत्या शाळेत शिक्षक होते? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही
शिक्षक हा शब्द प्रामुख्याने शाळेत अध्यापन करणाऱ्याना योजण्यात येतो. माझ्या माहितीप्रमाणे ते अशा कोणत्याही शाळेत शिक्षक नव्हते.
ते प्राध्यापक होते, पण प्राध्यापक म्हणजे शालेय शिक्षक नव्हे. प्राध्यापकांना शिक्षक म्हटलेले आवडत नाही.
ते पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष होते असे सांगून त्यांच्या शिक्षक दिनाचे समर्थन करण्यात येते.
परंतु तो आयोग उच्च शिक्षणाविषयी होता; शालेय शिक्षणावर नव्हता. त्याशिवाय इतर अनेक आयोग शालेय शिक्षणावर नेमण्यात आले होते व त्यांनी चांगली भरीव कामगिरीही केली होती. उच्च शिक्षणाशी म्हणजेच प्राध्यापकांशी ते जवळचे असल्याने त्यांचा जन्मदिन “प्राध्यापक दिन” म्हणून का पाळला गेला नाही?
इंग्रज असताना आणि ते गेल्यावर येथील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सत्ता येथील जातीच्या उतरंडीवरील वरच्या स्तरावर असलेल्या लोकांकडे होती. त्यांचा राष्ट्रवाद हा अभिजन राष्ट्रवाद म्हणता येईल. त्या वरच्या स्तरावरील गब्बर लोकांचे हितसंबंध अबाधित राहण्यासाठी तो “अभिजन राष्ट्रवाद” टिकवणे आणि जोपासणे आवश्यक होते. त्यामुळे त्यास पोषक अशी प्रतीके निर्माण करून त्याला शासकीय मान्यता देऊन जनमानसात रुजविणे त्यांच्यासाठी जरुरीचे होते. त्या भूमिकेतून ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो .
डॉ. राधाकृष्णन हे शालेय शिक्षक, शिक्षण-शास्त्रज्ञ म्हणून मान्यता पावल्याचे उल्लेखनीय स्वरुपात दिसून येत नसले तरी ते एक ब्राम्हण्यवादी तत्वज्ञानी म्हणून मान्यता पावल्याचे दिसते. त्यांनी तत्वज्ञानावर बरेच लेखन केले असले तरी त्यात त्यांची स्वयंनिर्मिती नसून शंकराचार्यांच्या केवलाद्वैत मतांची पुनर्मांडणी दिसते.
तसेच त्यांची अनेक मते पटण्याजोगी नाहीत. बुद्धाचा अनात्मवाद व वेदांचा ब्रह्मवाद (आत्मावाद) एकच असल्याचे सिद्ध करण्यात त्यांनी व्यर्थ आटापिटा केला.
जडवाद व चार्वाकवाद यांच्याशीसुद्धा ते असेच अवैज्ञानीक वागलेत
असो ते त्यांचे वैयक्तीक मत असू शकते
पण ,जातिव्यवस्थेमुळे हिंदू समाजात काही समस्या निर्माण झाल्या नाहीत उलट हा धर्म टिकून राहिला (संदर्भ- हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ), अशा त्यांच्या विचित्र विचारांचा परखड परामर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “अनिहीलेषण ऑफ कास्ट्स” या ग्रंथात घेतला आहे.
थोडक्यात डॉ. राधाकृष्णन हे आपले दुसरे राष्ट्रपती, भारतरत्न विभूषित महनीय व्यक्तिमत्व असे आपण समजत असतोच.
त्यांचा अधिक्षेप करण्याचा कोणताही हेतू येथे नाही.
परंतु त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून पाळणे यासाठी समर्थनीय आधार मिळत नाही.
उलट त्यांच्या उपलब्ध माहितीवरून हा शिक्षक दिन अनुचित मूल्यांचा संस्कार करणारा आहे. म्हणून हा दिवस शिक्षक दिन असायला नको
त्यांच्या स्वत:च्या मुलाने त्यांचे जे चीत्रण केलेय ते महानपणाला साजेसे नाही
शिक्षक दिन पाळायचाच असेल तर ५ सप्टेंबर ऐवजी; समग्र परिवर्तनासाठी “शिक्षणाचा मुलभूत अधिकार नाकारल्या गेलेल्या येथील बहुसंख्य जनतेला” प्राथमिक शिक्षणाचा आधार देऊन नवीन राष्ट्र, नवीन संस्कृती निर्माण करणाऱ करणाऱ्या महात्मा फुलें सोबतीने खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी “शिक्षक दिन” साजरा करणे समर्पक ठरेल.
महिला त्या काळात शिकत नव्हत्या त्या काळात पतीच्या नववीचारांना कृतीशील साथ देणाऱ्या त्या साठी प्रचंड त्रास छळ सहन करणाऱ्या ,आद्य विद्यार्थीनी,आद्य शिक्षीका ,आद्य प्रिसींपल,आद्य कवयीत्री लेखीका समाजसुधारीका सावीत्रीबाई फुले ह्याच सर्वार्थाने योग्य नाव आहे
महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थीवाला त्यांनी केवळ खांदाच दिला नाही तर अग्नी देण्याचे धाडस दाखवले
अशा थोर सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी रोजी येते तीच आपण शिक्षक दिन म्हणून पाळला पाहीजे
अशा थोर सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी रोजी येते तीच आपण शिक्षक दिन म्हणून पाळला पाहीजे
3जानेवारी शिक्षकदिन म्हणून पाळल्यास तो खरा शिक्षकदिनाचा गौरव असणार आहे .
सावीत्रीबाईंने तेंव्हा आपल्यासाठी हिंमत दाखवली आता आपली वेळ आली आहे
त्या शिवाय लिहा सरकारला पत्र की 3जानेवारी हाच आमचा शिक्षक दिन .
No comments:
Post a Comment