Saturday, 6 September 2014

चार लक्ष कोटी रुपयातून बारा लक्ष कोटीं रूपयांचे घोटाळे--- अमित शहा

चार लक्ष कोटी रुपयातून बारा लक्ष कोटीं रूपयांचे घोटाळे--- अमित शहा
काल मुंबईत षन्मुखानंद मधील अमित शहांचे भाषण तडाखेबंद होते. त्यांनी केलेल्या अनेक आरोपांमध्ये तथ्य असले तरी राज्यात गेल्या पंधरा वर्षात अकरा लक्ष अठ्ठ्यांऎंशी हजार कोटीं रुपयांचे घोटाळे नी भ्रष्टाचार झाले असे ते म्हणाले, त्याची चौकशी व्हायला हवी. सत्य पु्ढे यायला हवे.भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा व्हायला हवी. माझ्या माहितीप्रमाणे या पंधरा वर्षातील राज्याचे एकुण बजेट पंधरा लक्ष कोटी रुपयांचे होते. त्यातले सुमारे अकरा लक्ष कोटी रुपये सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारावर आणि नियमित शासकीय खर्चासाठी गेले. खर्च झाले. सुमारे चार लक्ष कोटी रुपये हा योजना खर्च अर्थसंकल्प {प्लान बजेट} होता. त्यातून काही किरकोळ का होईना पण विकासाची कामे झाली असावीत. आणि तरिही या रकमेतून एकूण  अकरा लक्ष अठ्ठ्यांऎंशी हजार कोटीं रुपयांचे घोटाळे नी भ्रष्टाचार झाले, हा आरोप विश्वासार्हतेच्या कक्षेतील वाटतो?
ते पुढे असेही म्हणाले, "महाराष्ट्रातले राज्यकर्ते प्रामाणिक नसल्याने निसर्गाने महाराष्ट्राला शिक्षा करण्यासाठी दुष्काळ  पाडले.भाजपाचे सरकार आणा, आमच्या प्रामाणिकपणामुळे दुष्काळ पडणार नाही."
राज्यकर्ते इमानदार हवेत यात शंकाच नाही.
मात्र त्यावर निसर्गाचे दुष्काळ आणि पावसाचे चक्र अवलंबून असते हे आपल्याला पटते का?

No comments:

Post a Comment