Saturday 30 August 2014

कॉम्रेड शरद् पाटील

सौजन्य: एक रेघ

http://ekregh.blogspot.in/

SATURDAY, MAY 10, 2014

कॉम्रेड शरद् पाटील : अलविदा (राहुल सरवटे यांचा लेख)

भारतीय इतिहासासंबंधी प्रचंड उत्खनन केलेले, डाव्या विचारांच्या चळवळीचे कार्यकर्ते राहिलेले कॉम्रेड शरद् पाटील यांचं १२ एप्रिल रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. अपवाद सोडता, बहुतेक मराठी वर्तमानपत्रांनी एक कॉलम, फारतर दोन कॉलम अशा बातम्यांमधे पाटलांचं प्रकरण संपवलं. एखाद्-दोन ठिकाणी इकडून तिकडून माहिती जमवून लिहून टाकल्यासारखे अग्रलेख आले, बाकी चळवळीतल्या मंडळींचे काही लेखही आले- ते बरेचसे कंटाळवाणे हळवे सूर उगाळणारे आणि पाटलांच्या मूळ कामाचा तोकडा उल्लेख करून संपलेले. पाटलांच्या कामाबद्दल फारच कमी उल्लेख होणं, हे प्रचंड निराशाजनक आहे. इंग्रजी वर्तमानपत्रांमधे साध्या बातम्याही नाहीत, पण तिथं आशेला जागाही नव्हती. पाटील जिवंत असतानाच त्यांच्या कामाबद्दल आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांपर्यंत ते काम तुलनेनं सुलभ पद्धतीनं पोचवण्याचं काम माध्यमांनी करायला हवं होतं. मासिकं, साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, अशी काही रचना टप्प्याटप्प्यानं असं करू शकते. पण आपल्याकडं असली काही रचना नाहीच. मासिकं-साप्ताहिकं कशाला काढतात काय माहीत! आणि- मग्रुरी, आकस, सॉफ्ट टार्गेटांवर सोईनं शेरेबाजी नि जिथं गरजेचं आहे तिथं नांगी टाकून वांगी खाण्याची वृत्ती एवढाच वर्तमानपत्रांचा अवतार राह्यलाय. त्यामुळं पाटील गेल्यावर गोंधळ होणार होताच, तो झालाच. वृत्तवाहिन्यांबद्दल बोलूया का? नकोच. वास्तविक पाटील गेल्यावर तरी त्यांच्या कामाबद्दल खोलवर बोलण्याची भीषण संधी साधायला काय हरकत होती.

असं सगळं असताना ह्या बारक्या कुवतीच्या 'रेघे'वर आपण काय करू शकणारोत? शिवाय पाटलांच्या कामाचा विषय हा आपल्या किमान वाचनाचाच विषय राहिलेला, त्यामुळं पाटलांना अखेरचा सलाम आपण करणार कसा? शिवाय पाटलांच्या कामावर विद्यापीठीय वर्तुळांबाहेर बोलायचं तर कसं बोलायचं? विद्यापीठीय माणूस शोधून 'रेघे'च्या वाचकांपर्यंत त्याचा मजकूर कसा न्यायचा? मुळात एवढं असं करायचंच कशाला? असेही प्रश्न विचारता येतील. ह्या प्रश्नांचं थोडक्यात उत्तर असं : शरद् पाटील यांनी जे काही काम केलं, ते जसं कसं केलं असेल, त्या सगळ्या मागं त्यांचे अपार कष्ट स्पष्ट दिसतात, शिवाय कामावरची निष्ठा नि प्रामाणिकपणा पण त्यांच्या लिखाणात आहे. (दास-शूद्रांची गुलामगिरी हा त्यांचा ग्रंथ ह्या दृष्टीनं खरोखरच झटापट करण्यासारखा आहे). तर, अशा मूल्यांसकट साधारण नव्वद वर्षं आपल्या परिसरात जगलेला माणूस आपल्यातून गेला, तर त्याची किमान बूज ठेवणं, एवढं तरी काम पत्रकारितेकडून अपेक्षित आहेच ना. अनेक माणसं जातात, त्यांची बूज आपण 'रेघे'वर प्रत्येक वेळी ठेवू शकतोच असं नाही. पण प्रयत्न करतो. पाटलांच्या बाबतीतला प्रयत्न महिनाभर केल्यानंतर निराशेतच संपणार होता, पण तेवढ्यात एक मजकूर सापडला.

हा मजकूर राहुल सरवटे यांचा आहे. राहुल हे न्यूयॉर्कमधे कोलंबिया विद्यापीठात '१८४८ ते १९२० ह्या काळातल्या मराठी वैचारिक परंपरेच्या विकासाचा जातिव्यवस्था विषयक आकलनाच्या विशेष संदर्भात अभ्यास' करतायंत. आणि दिल्लीतल्या नवयान प्रकाशनासाठी शरद् पाटलांच्या 'मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही करतायंत. ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाटलांबद्दल लिहिणं योग्य वाटलं. त्यांनी 'नवयान'च्या संकेतस्थळावर यासंबंधी इंग्रजीतून टिपण लिहिलेलं आहेच. शिवाय मराठीतून 'ऐसी अक्षरे' या संकेतस्थळावर त्यांनी काही मजकूर लिहिलेला आहे. या दोन्ही मजकुरांमधून, शिवाय 'ऐसी अक्षरे'वरच्या त्यांच्याच प्रतिक्रियांची भर टाकत एक एकसंध मजकूर राहुल यांच्या परवानगीनं आपण 'रेघे'साठी तयार केला, त्यांनी पडताळल्यानंतर तो आता रेघेवर प्रसिद्ध होतो आहे. राहुल यांचे आभार.

आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांना पाटलांच्या म्हणण्याचा काहीएक प्राथमिक अंदाज यावा, हा रेघेवरच्या या नोंदीचा मुख्य हेतू. या म्हणण्याचं समर्थन, त्यावरची टीका, असा मजकूरही वास्तविक तज्ज्ञ व्यक्तींकडून उभा करायला हवा. आपल्याला रेघेवर सध्या तसं करणं शक्य नाही. शरद् पाटलांना डिबेट घडवायची आस आयुष्यभर राहिली, पण मराठीतल्या अशा डिबेटसाठीच्या जागा खंगून खंगून कधीच मरून गेल्यात. तरीही- वाचूया हा एक लेख.

शरद् पाटील (१७ सप्टेंबर १९२५ - १२ एप्रिल २०१४)
[फोटो : 'नवयान'च्या संकेतस्थळावरून]

शरद् पाटील : महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेचा शेवटचा आवाज
राहुल सरवटे (rahul.sarwate@gmail.com)

डॉ. आंबेडकरोत्तर काळातील कदाचित सर्वश्रेष्ठ जाती-विरोधी विचारवंत/कार्यकर्ता, शरद् पाटील यांचे गेल्या १२ एप्रिल रोजी धुळे मुक्कामी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कार्ल मार्क्सच्या 'दास कापितल' ह्या महाग्रंथातले चुकलेले बीजगणित उलगडून दाखवणारा; बुद्ध आणि मार्क्स ह्या महा-दर्शनिकांचा समन्वय करणारा; जात निर्मूलनासाठी नवे चर्चाविश्व निर्माण करणारा, अवैतनिक जीवनदायी कार्यकर्ता-विचारवंत... शरद् पाटील हे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर ह्याच ओळीत घेता येणारे नाव आहे. महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा प्रबोधनाचा (Enlightenment) वारसा सांगते. ह्यात अनेक ब्राह्मणी - नेमस्त, जहाल, सुधारणावादी, पुनरुज्जीवनवादी आणि अब्राह्मणी, भक्ती मार्गी, अवैदिक, बौद्ध - असे अनेक विचारवंत येतात. त्यांच्या परस्पर झगड्यातून, विमर्शातून मराठी वैचारिक परंपरा घडली. कॉम्रेड पाटील हे ह्या परंपरेला समृद्ध करणारे, तिचा पाया तात्विक दृष्टीने दृढ करणारे कदाचित शेवटचे विचारवंत. आपला आजचा परिवर्तनवाद (मार्क्सवाद/आंबेडकरवाद) प्रबोधन काळातली जाती-निर्मूलनाची भाषा साफ विसरलाय. कॉ. पाटलांचा मृत्यू ह्या अर्थाने एका काळाचा शेवट आहे.

मावळाई प्रकाशन, दुसरी आवृत्ती - २००८
फुले-आंबेडकरांच्या जातिविरोधी विचारांचा मार्क्सवादाशी समन्वय करून मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादाचे तत्त्वज्ञान शरद् पाटलांनी स्थापित केले. ह्या 'मा-फु-आ'वादाने महाराष्ट्रात सत्तरीच्या दशकात बरेच वादळ निर्माण केले. हा वाद मे. पुं. रेगे संपादित 'नवभारत' ह्या नियतकालिकातून सुरू झाला (फेब्रुवारी १९८०), आणि त्यात भारतीय इतिहास, वर्ग आणि जाती ह्यांचा ऐतिहासिक विकास आणि परस्पर संबंध, ब्राह्मणी आणि अब्राह्मणी वैचारिक परंपरा अशा अनेक विषयांवर विमर्श झाला. पाटलांचे ह्या विषयावरील लेख मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद ह्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात एकत्र सापडतात (सुगावा प्रकाशन, १९९३. आता अनुपलब्ध). भारतीय कम्युनिस्ट वर्तुळात आणि जातिविरोधी वर्तुळात ह्या सिद्धांताची बरीच चर्चा झाली.

पाटलांचे आर्ग्युमेन्ट रोचक आहे : त्यांच्या मते, भारतीय मार्क्सवाद ब्राह्मणवादी परंपरेच्या प्रभावाखाली विकसित झाला (इथे ते कॉम्रेड डांग्यावर असलेला इतिहासकार वि. का. राजवाडे आणि लोकमान्य टिळकांचा प्रभाव नोंदवतात. पाटलांच्या दृष्टीने, डांगे यांचा मार्क्सवाद हा वैदिक नेणीव आणि वर्गवादी जाणीव अश्या दोन पातळ्यांवर वावरतो आणि पर्यायाने, जाती विषयक निर्णायक भूमिका घेत नाही). पाटलांच्याच शब्दांत सांगायचे तर - "भारतीय भांडवलदार वर्ग मुख्यतः हिंदू बनिया जातींमधून विकसित झाला तर त्याचा राष्ट्रवादी बुद्धिजीवी ब्राह्मण जातींमधून. दोघांचेही हितसंबंध जातिव्यवस्था अबाधित ठेवण्यात असल्याने व्यक्तिस्वतंत्राधिष्ठित पाश्चात्त्य लोकशाही विचारसरणीचा त्यांनी अव्हेर करणे अपरिहार्य होते. त्यांच्या विरोधात शूद्र जातीय समाजसुधारकांनी ह्या विचारसरणीचा परखड पाठपुरावा करणेही अपरिहार्य होते. पण हा वैचारिक संघर्ष पाश्चात्त्य लोकशाही विचारसरणी अव्हेरणे अथवा स्वीकारणे येथपर्यंत मर्यादित राहू शकत नव्हता. उच्चजातीय विचारवंतांनी वर्णजातिव्यवस्थेचे अधिकृत तत्वज्ञान असलेला वेदान्त राष्ट्रीय चळवळीचे अधिकृत तत्वज्ञान बनवले, तर त्याच्या प्रतिवादार्थ शूद्र जातीय विचारवंतांनी वर्णजातिव्यवस्था विरोधी सांख्य, बौद्ध इत्यादी अब्राह्मणी तत्वज्ञानांचा पुरस्कार केला... टिळकांच्या जातिव्यवस्था समर्थक वेदान्ती राष्ट्रवादी परंपरेत वाढलेल्या उच्चजातीय तरुणांनी भारतीय कम्युनिस्ट चळवळीची उभारणी केली... भारतीय तत्वज्ञान, इतिहास, संस्कृती याकडे ब्राह्मणी दृष्टिकोनातून पाहणारे कम्युनिस्ट नेते व मार्क्सवादी प्राच्यविद्या पंडित मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद भारताला लावण्यात पोथिनिष्ठ राहणे अपरिहार्य होते" (पाटील, १९९३: ११-१२). 

मावळाई प्रकाशन, चौथी आवृत्ती- २०१०
पाटलांची 'ब्राह्मण-अब्राह्मण' विभागणी महात्मा फुल्यांच्या चळवळीत अनुस्यूत 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' विभागणीपेक्षा किंचित वेगळी अहे. ही विभागणी ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य विरुद्ध शूद्र अशी आहे. मुद्दा असा की, एकोणिसाव्या शतकात विकसित झालेला भारतीय राष्ट्रवाद जातिव्यवस्थाविरोधी मूलभूत भूमिका घेत नाही, जी आंबेडकरांनी 'अॅनिहिलेशन ऑफ कास्ट'मध्ये घेतली. इतिहासकार राजवाडे 'राधामाधव विलास चम्पू'च्या विख्यात प्रस्तावनेत लिहितात : "चातुर्वण्याचा इतिहास म्हणजे त्यातील स्त्रिया आणि शूद्र ह्यांचा इतिहास प्रमुख्ये करून आहे. ह्या प्रचंड ऐतिहासिक नाटकात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ही पात्रे एका बाजूला आपली आसने सदैव स्थिर करण्यात गुंतलेली दिसतात आणि ती आसने डळमळविण्याचा भगीरथ प्रयत्न करणारे शूद्र हे पात्र जिवापाड मेहनत घेताना आढळते. ह्या सगळ्यात विजयश्री कधी ब्राह्मणादींच्या गळ्यात माळ घालते व कधी शूद्रावर फिदा होते आणि शेवटी दोन्ही पक्ष हार न खाता, तिसरे पात्र जे स्त्री, त्याच्या द्वारा तडजोडीने भांडण मिटवताना दृष्टीस पडतात.. त्यातील ब्राह्मण हे पात्र सर्वांत प्रधान समजावे. बाकीची दोन्ही पात्रे ब्राह्मणाच्या अनुषंगाने वागणारी होत.." (राजवाडे, राधामाधव विलास चम्पू: १३९). ह्या अर्थाने, पाटील सांगतात की भारतीय राष्ट्रवाद व भारताचा भांडवलदारी वर्ग हे एकमेकांना पूरक भूमिका घेत होते.

ह्या ब्राह्मणी नेणिवेच्या प्रभावातून भारतीय मार्क्सवाद मुक्त करण्यासाठी त्याचा शूद्र तत्त्वज्ञानांशी समन्वय पाटील आवश्यक मानतात. ह्या समन्वयाचे त्यांचे सूत्र आहे - "मार्क्सचे ऐतिहासिक भौतिकवादाचे सूत्र आहे - शोषणशासनाधारित समाजाच्या उदयापासूनचा मानवसमाजाचा इतिहास शोषकशासक व शोषितशासित यांच्या मधील लढ्यांचा आहे; तर भारतीय इतिहासाचे फुल्यांनी दिलेले सूत्र आहे - बळीराजाच्या अंतापासूनचा भारतीय समाजाचा इतिहास आर्य द्विज आणि अनार्य शूद्र यांच्यामधील वर्णजाती लढ्यांचा आहे. ह्या दोन्ही सूत्रांचे विधायक नकारकरण आपल्याला मा-फु-आच्या सूत्राकड़े नेते : शोषणाधारित समाजाच्या उदयापासून वसाहतिक समाजापर्यंतचा भारतीय इतिहास हा वर्ण-जाती-जमाती ह्यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे तर वसाहतिक काळापासूनचा भारतीय इतिहास हा वर्ग-जाती-जमातींच्या लढ्याचा इतिहास आहे" (पाटील १९९३: १५). नकारकरण हा शब्द पाटील sublimationसाठी प्रतिशब्द म्हणून वापरतात. ह्याचा अर्थ 'नकार देणे' असा नसून, ह्या प्रवाहांना 'नव्या रुपात परिवर्तित करणे' असा आहे.

पाटलांच्या चिकित्सक चौकटीत भारतीय इतिहास हा अश्या प्रकारे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विचारधारांच्या सततच्या संघर्षाचा इतिहास आहे. पुन्हा एकदा त्यांच्याच शब्दांत - "सिंधूसंस्कृतीच्या अंतापासून भारतात अविछिन्नपणे परस्परविरोधात आणि परस्परसमन्वयात वाहत आलेल्या ब्राह्मणी आणि अब्राह्मणी प्रवाहांनी भारतीय इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, साहित्य, कला, इ. सर्व क्षेत्रात जी साधक-बाधक योगदाने केलेली आहेत त्यांचे विधायक नकारकरण केवळ मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादानेच होऊ शकते" (पाटील, १९९३: १६). मा-फु-आ हे अशा प्रकारे नव्या वर्ग-वर्ण-जाती निर्मूलनाचे क्रांतिशास्त्र बनले. (पाटलांच्या खोल आणि व्यापक वाचनाचा पडताळा सतत त्यांच्या लिखाणात दिसतो. उदाहरणार्थ, पतंजलीने केलेल्या पाणिनीवरील टीकेचा संदर्भ देऊन पाटील ही ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विभागणी भारतीय दर्शनशास्त्रातसुद्धा किती मूलभूत भूमिका बजावते ते दाखवतात. नाटकांचे प्रेक्षक कुठल्या भूमिकांना कसा प्रतिसाद देतात ह्यावरून, पाणिनीच्या १. ४. १. ह्या सूत्रावर भाष्य करताना पतंजली भारतीय भूगोलाची ब्राह्मणी देश (अव्रुशलको देशः) आणि अब्राह्मणी देश (अब्रह्मणाको देशः) अशी विभागणी करतो.)

सुगावा प्रकाशन, पहिली आवृत्ती- २००३
परंतु, १९९६ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व' ह्या पुस्तकात त्यांनी ह्या भूमिकेपासून एक नवीन वळण घेतले. पाटलांची समन्वयवादी दृष्टी आता अधिक व्यापक तात्त्विक पातळीवर (epistemological) भारतीय मार्क्सवादाची बौद्ध तत्वज्ञानाच्या सौत्रान्तिक पद्धतीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करताना दिसते. इ. स. पूर्व पाचव्या शतकातला बौद्ध दार्शनिक दिग्नाग ह्याने विकसित केलेल्या नेणिवेच्या सिद्धांताची पाटील मार्क्सवादाच्या परिवर्तनवादाशी सांगड घालतात. पाटलांच्या मते मार्क्सचा जो जग बदलण्याचा आग्रह आहे, त्यासाठी आधी हे जग नेणिवेच्या पातळीवर कसे पाहिले जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. दिग्नागाच्या अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राने कालिदासाच्या ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचा पराभव करण्यासाठी निर्मिलेला नेणिवेचा सिद्धांत पाटील मार्क्सवादाशी जोडून एक नवीन ज्ञानशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. १९८८ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'अब्राह्मणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र' ह्या पुस्तकात ह्या नव्या सौंदर्यशास्त्राची सविस्तर चर्चा आलेली आहे (सुगावा प्रकाशन, आता अनुपलब्ध). ह्याच पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या 'उत्सव' सिनेमाचे परीक्षण वाचून त्या सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश कर्नाड पाटलांना भेटायला स्वतःहून धुळ्याला आले होते. त्यांच्या सविस्तर चर्चेचा संदर्भ कर्नाडांच्या काही मुलाखतींमध्ये येतो.

पाटलांचा जन्म १९२५ साली धुळ्यात एका सत्यशोधक कुटुंबात झाला. १९४५ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत असताना त्यांनी शिक्षणाला राम राम ठोकून विद्यार्थी संपात उडी घेतली आणि पुढे आयुष्यभर मार्क्सवादी चळवळीत काम केले. १९२५ साली स्थापना झालेल्या 'भारतीय कम्युनिस्ट पक्षा'ची १९६४ साली 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष' आणि 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)' अशी दोन पक्षांमध्ये विभागणी झाल्यावर पाटील मार्क्सवादी पक्षात गेले. तिथेही जातीचा अजेंडा काही पक्ष कार्यक्रमात अग्रक्रम मिळवू न शकल्याने, पाटील अखेर १९७८ साली पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली त्याला नाव दिले: 'सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष'. आपल्या नवीन मा-फु-आवादी भूमिकेतून त्यांनी पारंपरिक मार्क्सवाद्यांच्या आणि आंबेडकरवाद्यांच्या अनेक ज्ञानशास्त्रीय आणि ऐतिहासिक गृहितकांवर टीका केली. पारंपरिक मार्क्सवादी दृष्टीकोनाविरोधात, त्यांनी असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की वर्ग (class) ही संस्था वसाहतवादातून जन्माला आलेली असून, त्या आधी ती भारतीय इतिहासात एक कोटी (category) म्हणून वावरत नाही. दुसऱ्या बाजूला जातीचा ऐतिहासिक विकासक्रम उलगडून दाखवताना, पाटील सांगतात की, जात तिच्या उगमाच्या वेळी एक नवीन प्रगतिशील सामाजिक संस्था होती त्यामुळे, गौतम बुद्धाने त्याच्या हयातीत जातिव्यवस्थेला अनुकूल भूमिका घेतली होती. ह्या भूमिकेत डॉ. आंबेडकरांच्या जातीच्या उगमाविषयक संकल्पनेची टीका आहे आणि त्यामुळे पाटलांच्या ह्या भूमिकेचा दलित चळवळीत बराच प्रतिवाद झाला. पाटलांचा दलित आणि बहुजनवादी राजकारणावरचा मुख्य आक्षेप हा राहिला की, ह्या चळवळी जातिसंस्थेचा उच्छेद ह्या मूळ सूत्राशी प्रामाणिक राहिल्या नाहीत.

मावळाई प्रकाशन, पहिली आवृत्ती- २०१२
कुठल्याही अकॅडमिक ट्रेनिंगशिवाय पाटलांनी इतिहासकार, प्राच्च्यविद्या पंडित, व्याकरणकार, आणि तत्वज्ञानी अश्या अनेक भूमिकांतून भरपूर लिखाण केले. ह्याशिवाय १९४७ ते १९४९ मध्ये धुळे ट्रेड युनिअन मध्ये, १९५१ ते १९५६ शेतकरी संघर्षात आणि १९५७ पासून शेवटपर्यंत आदिवासी मुक्ती लढ्यांत ते कार्यरत होते. अंतोनिओ ग्राम्शी हा इतालिअन मार्क्सवादी ज्याला 'ऑरगॅनिक विचारवंत' म्हणतो, त्याचे पाटील प्रामाणिक प्रतिनिधी आहेत.

एक छोटासा किस्सा नोंदवून हा लेख आटोपता घेतो: 'जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी पूर्ती' (२००३) ह्या पुस्तकात कॉम्रेड पाटलांनी एक प्रसंग सांगितलाय (हा किस्सा इंग्रजी भाषांतरात मात्र नाहीये!): धुळे जिल्ह्यातल्या वाटोदा नावाच्या गावी एका व्याख्यानानंतर तिथल्या शेतकऱ्यांशी कॉम्रेड पाटील बोलत होते. त्यापैकी काही जण चीनमधील शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी भारत सरकारतर्फे नुकतेच जाऊन आले होते. तिथे त्यांना एक मराठी जाणणारा चिनी दुभाषा मदतनीस म्हणून सोबत दिला होता. त्या दुभाष्याशी ह्या मंडळींची मैत्री झाल्यावर, त्याने विचारले : 'शरद् पाटलांचे कसे काय चालले आहे?' ही मंडळी चाट झाली.

हा प्रसंग अनेक अर्थाने वैशिष्ठ्यपूर्ण आहे..

वैचारिक इतिहासाचे प्रवाह कुठून कुठे वाहत असतात? पाटील ह्या चिनी दुभाष्यापर्यंत कसे पोहोचले? आणि आपल्या मराठी मुख्य धारेतल्या लिखाणात ते का पोहोचले नाहीत? त्यांच्या मृत्यूनंतर देखील भारतीय पातळीवर त्यांच्याबद्दल अवाक्षरसुद्धा उच्चारलं गेलेलं नाही. पाटील त्यांच्या भाषणात आणि लिखाणातही सांगत की त्यांचा बऱ्याच भाषांमध्ये अभ्यास केला जातोय… त्यात भारतीय इंग्रजी का नसावी?
***

वर उल्लेख आलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकातून शरद् पाटील यांच्याबद्दलची थोडक्यात सनावळी-

१९२५ : १७ सप्टेंबर रोजी धुळे येथे सत्यशोधकी शेतकरी कुटुंबात जन्म.
१९४२ : धुळे येथेच मॅट्रिक्युलेशन.
१९४३ : बडोद्याच्या कलाभवनात पेंटिंग कोर्सला प्रवेश.
१९४४ : मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधे दाखल.
१९४५ : पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात सहभागी.
१९४६ : शिक्षण सोडून जीवनदानी कार्यकर्ते. कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतल्या मुख्यालयात चित्रकार.
१९४७ : धुळे येथे ट्रेड युनियन आघाडीवर.
१९४९ : हद्दपारी.
१९५१ : शेतकरी आघाडीवर.
१९५६ : पासून मृत्यूपर्यंत आदिवासी चळवळीत कार्यरत.
१९६४ : कम्युनिस्ट पक्ष दुभंगल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल.
१९६६ : दोन तुरुंगवास भोगून सुटल्यानंतर बडोद्यात संशोधनासाठी व संस्कृत (पाणिनी) व्याकरण शिकण्यासाठी वास्तव्य.
१९७८ : (२७ जुलै) जातिव्यवस्थेविरुद्ध लढायला मा.क.प.ने नकार दिल्याने पक्षाचा राजीनामा.
१९७८ : (१५ ऑक्टोबर) मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादी तत्त्वावर आधारलेला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन.
१९८२ : (ते १९९३) 'सत्यशोधक मार्क्सवादी' मासिकाचे संपादन.
१९८७ : दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त महासभेतर्पे साक्री येथे आंदोलन.
***

पाटलांचं पुस्तक रूपात प्रकाशित साहित्य - 

खंड १ : भाग १ व २ : दास-शूद्रांची गुलामगिरी
खंड १ : भाग ३ : रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष
खंड २ : भाग १ : जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व
खंड २ : भाग २ : शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण - महंमदी की ब्राह्मणी?
खंत ३ : जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती
खंड ४ : प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद
इतर : अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र  मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद  भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत  बुद्ध : भारतीय इतिहासातील लोकशाही  स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्त्रोत  पश्चिम भारतातील स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका  स्त्री-शूद्रांच्या स्वराज्याचा राजा (नाट्यसंहिता)  शोध, मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा की जात्यंतक समतेचा? । नामांतर- औरंगाबाद आणि पुण्याचे.
***

शरद् पाटील यांचं इंटरनेटवर उपलब्ध काही लिखाण-

मराठी :

इंग्रजी :
प्रॉब्लेम ऑफ स्लेव्हरी इन एन्शन्ट इंडिया (सोशल सायन्टिस्ट, जून १९७३)
ऑन अ सर्व्हे ऑफ फेमिन कन्डिशन्स इन साक्री तालुका ऑफ महाराष्ट्र (सोशल सायन्टिस्ट, ऑगस्ट१९७३)
अर्थ मदर (सोशल सायन्टिस्ट, एप्रिल १९७४)
ए मार्क्सिस्ट एक्स्पोझिशन ऑफ इस्लाम (सोशल सायन्टिस्ट, मे १९७६)
***
शरद् पाटील व लोक
('परिवर्तनाचा वाटसरू' पाक्षिकाच्या १६ जुलै २०१३च्या शरद् पाटील विशेषांकातला फोटो.)

Thursday 28 August 2014

महाड सत्याग्रहाची न्यायालयीन कागदपत्रे नष्ट होण्याच्या मार्गावर

Published: Thursday, August 28, 2014http://www.loksatta.com/mumbai-news/mahad-tank-satyagraha-court-documents-on-way-of-vanished-817042/
बाबासाहेबांचे खंड प्रकाशन निधीअभावी रखडले की?  की कारणे इतर आहेत?
लोकसत्ता दि.२८ ओ‘गष्टच्या बातमीत श्री मधू कांबळे म्हणतात..."
राज्यातील आघाडी सरकार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक न्यायाच्या नावाने प्रसिद्ध करीत असलेल्या जाहिरातींवर कोटय़वधी रुपयांची उधळण करीत आहे. परंतु देशात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला, त्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी निधी मिळेनासा झाला आहे. त्यामुळे महत्प्रयासाने संकलित केलेली महाड सत्याग्रह व त्यासंबंधीच्या न्यायालयीन लढाईतील अत्यंत महत्त्वाची व दुर्मीळ कागदपत्रे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.  
राज्य सरकारच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचे साहित्य प्रकाशित करण्याचा महत्त्वाचा उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी स्वतंत्र तीन समित्या स्थापन केल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री या समित्यांचे पदसिद्ध अध्यक्ष आणि उच्च शिक्षण संचालक निमंत्रक आहेत. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या अंतर्गत गेल्या ३०-३५ वर्षांत डॉ. आंबेडकर लेखन व भाषणांचे २२ आणि चरित्र साधनाचे दोन खंड प्रकाशित झाले आहेत. याच मालिकेतील महाडच्या सत्याग्रहावर आधारित दोन खंड प्रकाशित व्हायचे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने या देशात सामाजिक क्रांतीची लढाई छेडली. १९२४ मध्ये मुंबई विधासभेत सी. के. बोले यांनी सार्वजनिक पाणवठय़ावर अस्पृश्यांना पाणी भरण्याचा अधिकार देणारा ठराव मांडला होता व तो मंजूर झाला होता. त्यानुसार महाड नगर परिषदेने बोले ठरावाच्या अंमलबजावणीचा ठराव मंजूर केला. त्यावेळी सुरभा नाना टिपणीस हे नगर परिषदेचे अध्यक्ष होते. त्याच आधारावर डॉ. आंबेडकरांनी १९२७ मध्ये महाड सत्याग्रहाच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या मुक्तिलढय़ाचे रणशिंग फुंकले. त्यावेळी स्पृश्य व अस्पृश्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. त्यावर एक मोठी ऐतिहासिक न्यायालयीन लढाई झाली. चवदार तळे अस्पृश्यांना खुले करण्यास विरोध करणाऱ्या मंडळींनी डॉ. आंबेडकर व टिपणीस यांना प्रतिवादी केले होते. महाड न्यायालयात सुरू झालेली ही लढाई ठाणे न्यायालयातून मुंबई न्यायालयापर्यंत दहा वर्षे चालली. तिन्ही न्यायालयांचे निकाल बाबासाहेबांच्या बाजूने लागले. या न्यायालयीन लढाईतील वादी-प्रतिवादी यांचे युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्षी आणि सर्व तपशीलवार कामकाजाच्या नोंदी असलेली कागदपत्रे महत्प्रयासाने मिळविली आहेत. त्या आधारावर दोन खंड प्रकाशित करण्यास समितीने दोन वर्षांपूर्वी मंजुरी दिली. त्यासाठी १३ लाख रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली. परंतु गेल्या दोन वर्षांत त्यासाठी निधीच उपलब्ध करून दिला जात नाही, अशी माहिती समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी दिली. ८० वर्षांहून अधिक जुनी कागदपत्रे आधीच जीर्ण झाली आहेत. आणखी काही दिवस ती तशीच राहिली तर एक ऐतिहासिक दस्तऐवज नष्ट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. 
विधानसभा निवडणुकीत मागासवर्गीय समाजाला खूश करण्यासाठी सामाजिक न्यायाच्या नावाने विविध माध्यमांवर जाहिरातींचा नुसता सपाटा लावला आहे. गेल्या दोन महिन्यांत आघाडी सरकारने अशा जाहिरातींवर ९ कोटी ३३ लाख ६८ हजार ८७० रुपयांची उधळण केली आहे. मात्र बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे आणि उच्च शिक्षण संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांच्याशी अनेकदा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.  
शासनाला या कामाची आस्था नाही हे खरेच आहे. परंतु आज शासनाला दोष देणारे पुर्वी मात्र उठसूठ सदस्य सचिव ह्या एका व्यक्तीला टार्गेट करीत असत. आता व्यक्ती बदलली की ती निर्दोष आणि शासन जबाबदार असा दुटप्पीपणा का हे समजेल का? हे दस्तावेज समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी जमा केल्याचे या बातमीत भासवण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे दस्तावेज जमवणारे संशोधक दुसरेच आहेत. ते कोण आहेत? याची माहिती श्री. डोळस व मधू कांबळे यांनी का दडवली आहे?
समितीची पुस्तके छापण्यासाठी शासनाच्या मुद्रणालयाकडे द्यायची असतात. त्याची बिले नंतर बुक एडजस्टमेंट {पुस्तक समायोजन}द्वारे दिली जातात. त्यासाठी शासनाने गेली २ वर्षे प्रत्येकी पाच कोटी रूपये दिलेले होते, ते खर्च न झाल्याने परत गेलेले असताना पैसेच मिळाले नाहीत असा आरोप करणे कितपत उचित आहे? पुस्तकाचे पैसे तर होते, मग नेमके कोणते पैसे मिळाले नाहीत ते जनतेला विश्वासात घेऊन सांगत का नाही? डोळस साहेब या समितीवर गेले ४/५ वर्षे आहेत.{२०१० ते २०१४} याकाळात पहिल्या खंडातील काही मजकूर वेगळा काढून त्याची एक पुस्तिका पुनर्मुद्रीत करून प्रकाशित करण्या व्यतिरिक्त त्यांनी नेमके काय काम केले? याचा लेखाजोखा कोणी तरी विचारील काय?

Sunday 24 August 2014

असा देश हिंदूंना तरी हवा आहे काय ?


> प्रकाश बाळ 

Aug 24, 2014, 12.00AM IST

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/40793483.cms
golwalkar


> प्रकाश बाळ

'आपल्या हातून गेलेलं राज्य परत मिळावं, असं समाजतील एका मोठ्या घटकाला वाटत होतं. पृथ्वीराज चौहान याच्या १२व्या शतकातील अंमलानंतर आता प्रथमच १६ मेच्या निकालानंतर भारताची सूत्रं हिंदूंच्या हाती आली आहेत.' हे उद्गार आहेत, विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांचे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर लगेच काढलेले. विश्व हिंदू परिषदेला ५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं लिहिलेल्या विनय सहस्रबुद्धे व रमेश पतंगे यांच्या लेखांत सिंघल यांच्या या उद्गारांचंच प्रतिबिंब पडलेलं आहे.

'स्वत: हिंदू म्हणवून घेण्यात काही तरी गैर आहे, शरम वाटण्याजोगे आहे, या विकृत भावनेचा परिपोष होणे तरी किमानपक्षी आज थांबले आहे', असं सहस्रबुद्धे म्हणतात, तर 'दुर्दैवानं भारतात हिंदू जीवनमूल्यांना धरून चालणारं शासन १६ मे २०१४ मेपर्यंत नव्हतं', अशी खंत पतंगे यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंतचे भारताचे सर्व पंतपधान हिंदूच होते. तरीही त्यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी वेगळे आहेत, ख‍ऱ्या अर्थानं हिंदू आहेत आणि त्यांचं शासन हिंदू जीवनमूल्यांवर आधारित असेल, असं पतंगे यांना वाटतं, मात्र सहस्रबुद्धे इतकं पुढं जात नाहीत. हा जो काही परक आहे, तो पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानांतही गेल्या काही दिवसांत वारंवार आढळून आला आहे. 'मी देशातील १२५ कोटी लोकांचा प्रधानसेवक आहे, सारे जण माझ्यासाठी सारखेच आहेत, देशात सामाजिक सलोखा व सद्भावना राखली गेली पाहिजे', असं मोदी म्हणतात. उलट 'हिंदुस्तान हा हिंदूंचा देश आहे', असं सरसंघचालक म्हणत असतात. अर्थात असा फरक हा संघाच्या एकूण रणनीतीचा भाग आहे. मोदी हे पंतप्रधानपदी आहेत. त्यांना राज्यघटनेच्या चौकटीतच वागणं व बोलणं आवश्यक आहे. तीच गोष्ट भाजपा नेत्यांची. पण तसं बंधन सरसंघचालक भागवत, सिंघल वा पतंगे यांच्यावर नाही. उलट सहस्रबुद्धे पक्षाचे आता उपाध्यक्ष आणि सरकारच्या एका मंत्रालयाचे सल्लागारही आहेत. म्हणून पतंगे यांच्याइतके ते पुढं जात नाहीत. मात्र त्यामुळं पंतप्रधान मोदी व सहस्रबुद्धे आणि सरसंघचालक भागवत, सिंघल वा पतंगे यांच्या भूमिकांत काही फरक आहे, असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. ही भूमिका काय आहे? गोळवलकर यांनी ते स्पष्ट करून ठेवलं आहे. 'आम्ही कोण?' या आपल्या पुस्तकात गोळवलकर म्हणतात, 'आपण केलेल्या राष्ट्राच्या पंचगुणात्मक घटनेच्या चौकटीत जे लोक बसत नाहीत, त्यांनी आपले राष्ट्रीयत्व सोडून देऊन या हिंदूराष्ट्राच्या धर्म, संस्कृती आणि भाषा यांचा स्वीकार केला पाहिजे आणि येथील राष्ट्रीय वंशाशी पूर्णपणे समरस झाले पाहिजे. जोपर्यंत ते स्वत:चे वांशिक, धार्मिक आणि सांस्कृतिक भिन्नत्व राखू इच्छितात, तोपर्यंत ते पूर्ण परकीय समजले जातील. ते या राष्ट्राचे एक तर मित्र किंवा शत्रू म्हणून या देशात राहू शकतात.' (पृष्ठ ४८-४९) गोळवलकर यांना अभिप्रेत असलेल्या पंचगुणात्मक घटनेच्या चौकटीत धर्म, वंश, भाषा, संस्कृती व देश यांचा समावेश आहे. भारतातील हिंदूजीवन हेच राष्ट्रजीवन असल्यानं त्याच्याशी समरस व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तेही गोळवलकर यांनी सांगून ठेवलं आहे. गोळवलकर म्हणतात-'...त्यांनी एक तर हिंदू संस्कृती व भाषा यांचा स्वीकार करावा, हिंदुधर्माबाबत पुज्यबुद्धी बाळगून त्याचा मान राखण्यास शिकावे. हिंदू वंश व संस्कृतीच्या म्हणजेच हिंदुराष्ट्राच्या उत्कर्षाशिवाय दुसरी कोणतीही कल्पना मनात बाळगू नये. स्वत:चे अस्तित्व विसरून जाऊन हिंदू जातींमध्ये पूर्णत: मिसळून जावे.' (पृष्ठं ५०—५१) असं नाही केलं, तर, काय होईल? गोळवलकर यांनी तेही सांगून ठेवलं आहे. ते म्हणतात- 'कोणत्याही जादा सवलती व हक्क न मागता, नागरिकत्वाचे मूलभूत हक्कही न मागता पूर्णपणे हिंदूराष्ट्राच्या अधीन अशा स्थितीत या देशात राहावं. तिसरा कोणताही मार्ग त्यांना शिल्ल्क राहत नाही किंवा राहू नये.' (पृष्ठ-५१)

संघ परिवार बिगर हिंदुंबाबत समतेऐवजी 'समरसता' हा शब्द का वापरतो, याची फोड गोळवलकर यांच्या या लिखाणात आहे. तसंच, मोदी सरकार आल्यावर 'हिंदी'चा प्रश्न का उफाळून येऊ लागला, तेही या लिखाणातून कळून चुकतं. सहस्रबुद्धे यांच्या लेखातील 'गायपुराण' व पतंगे यांच्या लेखातील विश्व हिंदू परिषदेपुढील आव्हानांत 'ख्रिस्ती मिशनरी व परदेशी संस्कृती'चे आक्रमण हे उल्लेख गोळवलकर यांच्या या मूलभूत सिद्धांताला धरूनच आहेत.

पंतप्रधान मोदी हे गोळवलकर यांचे नि:स्सीम व निष्ठावान भक्त आहेत. विविध १६ राष्ट्रपुरुषांची चरित्रं सांगणारं पुस्तक मोदी यांनी लिहिलं आहे. त्यात सर्वात मोठं प्रकरण हे गोळवलकर यांच्यावर आहे. गांधीहत्येनंतर गोळवलकर तुरूंगात होते. नंतर गोळवलकर यांची सुटका झाली, तेव्हा त्या प्रसंगाचं मोदी यांनी भावनेने ओसंडून जाणारं जे वर्णन केलं आहे, ते त्यांच्या 'गुरूजीं'वरच्या भक्तीचं प्रत्यंतर आणून देतं. अर्थात सर्वच स्वयंसेवक गोळवलकर यांचे भक्त असतात. मात्र आज गोळवलकर यांच्या अशा लिखाणाचा कोणीही उल्लेख करीत नाही; कारण ते राजकीय व सामाजिकदृष्ट्या अडचणीचं आहे. पण संघ परिवाराची वाटचाल याच विचारानं आखून दिलेल्या वाटेवरून होत राहिली आहे, हे विसरून चालणार नाही. अटलबिहारी वाजपेयी हे संघ परिवारातील 'मवाळ' मानले जातात. पण वाजपेयी यांनी १९६७साली भिवंडी दंगलीनंतर संसदेत बोलताना 'अब हिंदू मार नही खायेगा', असं म्हटलंच होतं की! अशोक सिंघल वा प्रवीण तोगडिया रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात हेच म्हणत होते ना! आणि आज सहस्रबुद्धे, 'गर्व से कहो हम हिंदू है' या विश्व हिंदू परिषदेच्या घोषणने कसा बदल घडवून आणला त्याचं वर्णन करतात. मात्र तसा बदल घडवताना देशात भीषण दंगली झाल्या, शेकडो लोक मारले गेले, याचा उल्लेख ते करीत नाहीत आणि करणारही नाहीत; कारण हे सगळं घडलं व घडवून आणण्यात आलं, ते गोळवलकर यांच्या विचाराला अनुसरूनच. हिंदूंना 'गर्व' वाटण्यासाठी ते अपरिहार्यच होतं, असंच सहस्रबुद्धे आणि पतंगे यांना खरं तर म्हणायचं असतं.

नेमका येथेच महात्मा गांधी यांचा संबंध पोचतो. आपण हिंदू आहोत, याची गांधीजींना कधीच लाज वाटत नव्हती. किंबहुना आपण सनातन हिंदू आहोत, असं महात्माजी उघडपणं म्हणत असत. पण आपण हिंदू असण्याचा गांधीजींना 'गर्व' नव्हता. महात्माजींचा हिंदूधर्म त्यांना समावेशकतेची शिकवण देत होता. संघर्षाऐवजी त्यांचा सहजीवनावर भर होता. त्यांची ही भूमिका बहुसंख्य हिंदुंना पटली होती. संघाला तेच खुपत होतं. म्हणून नथुरामनं त्यांचा खून केला. ज्या सरदार पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारायला मोदी निघाले आहेत, त्यांनीही श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणून ठेवलं आहे- 'न्यायालयात काय होईल, ते मला ठाऊक नाही, पण संघानं जो विद्वेषी प्रचार केला, त्याची परिणती अंतिमत: बापुजींच्या हत्येत झाली, याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.'

तात्पर्य, गेल्या सहा दशकांत आपलं 'हिंदूराष्ट्रा'चं उद्दिष्टं उराशी बाळगून संघानं काळानुसार रणनीती बदलत, योग्य वेळ येताच संधी साधत, येथील लोकशाही स्वातंत्र्याचा उपयोग करीत वाटचाल सुरू ठेवली. देशाच्या राजकारणातील उलथापालथी व हिंदुत्ववादाच्या विरोधकांची राजकीय दिवाळखोरी यांमुळं संघाच्या हाती स्वबळावर सत्ता येऊ शकली आहे. साहजिकच आपल्या 'हिंदूराष्ट्रा'च्या उद्दिष्टाकडं संघानं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. तेव्हा असा असहिष्णू, विसंवादी, धार्मिक व सांस्कृतिक श्रेष्ठत्वावर आधारलेला आणि मूळ हिंदूधर्माची व्यापकता व सर्वसमावेशकता यांना छेद देणारा देश 'हिंदूं'ना हवा आहे काय, हा खरा प्रश्न आहे. पुढील निवडणुकीत लोकांना याचा कौल द्यायचा आहे.

Saturday 23 August 2014

Ananthamurthy's death: case against BJP men

http://www.hindustantimes.com/india-news/bjp-activists-booked-for-celebrating-ananthamurthy-s-death/article1-1255620.aspx
Ananthamurthy's death: case against BJP men
Sudipto Mondal, Hindustan Times Bangalore, August 23, 2014
First Published: 14:22 IST(23/8/2014) | Last Updated: 21:31 IST(23/8/2014)
Karnataka Police have registered a case against alleged BJP and Hindu Jagarana Vedike activists who burst crackers to "celebrate" the death of famed writer UR Ananthamurthy.

A case was registered by the Mudigere police in Chikmangalur on Saturday against unidentified BJP and Hindu Jagarana Vedike activists under sections of the IPC relating to rioting, causing public nuisance and forming an unlawful assembly. Police sources said that they have footage and photographs of the incident and hope to nab the culprits soon.

The miscreants burst crackers at four places in Mangalore and one spot in Chikmangalur soon after the news of Ananthamurthy's death was announced on Friday evening. Ananthamurthy who was known for his strong anti-BJP views had raised a storm during the Lok Sabha elections by saying he would leave the country if Modi became PM.

This happened even though Prime Minister Narendra Modi was quick to convey his condolences minutes after the death of the Jnanpith and Padma award winning author

Activists of the Youth Congress and various Left parties held a protest in Chikmangalur town to condemn the actions of the Hindutva activists.

Mangalore police commissioner R Hitendra said, "We have registered a case in one incident against unidentified persons."

In Mangalore, over a dozen organisations, including the Dalit Sangharsh Samiti and the Democratic Youth Federation of India, have decided to picket the Deputy Commissioner's office demanding that the police take cognisance of the other three cases as well. In a release to the media, the organisers of the protest said that there was enough video footage and photos to identify the miscreants.

"The actions of the Hindutva activists were clearly aimed at creating communal discord and disaffection toward a celebrated national icon," DYFI president Muneer Katipalla told HT.

Sharan Pumpwell, Bajrang Dal state president, told HT, "The celebrations were not organised by us. Some of our sympathisers might have been carried away. As far as our differences with Ananthamurthy are concerned, they were intellectual, not personal."

BJP state president Prahlad Joshi refused to react to the incident.

विशेष सिद्धहस्त

विशेष

अल्पपरिचय : सिद्धहस्त



http://www.loksatta.com/vishesh-news/homage-to-ur-ananthamoorthy-802145/#.U_gVqxtbUUw.facebook

राजकारणापासून स्वतस अलिप्त ठेवणाऱ्या साहित्यिकांची मांदियाळीच सर्वत्र दिसत असतानाच्या काळात कोणत्याही दडपणाखाली न येता आपले राजकीय-सामाजिक विचार व्यक्त करणारे ज्येष्ठ साहित्यिक म्हणून यू. आर. अनंतमूर्ती यांचे नाव घ्यावे लागेल. नातेसंबंधांवर होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या परिणामांचा आपल्या साहित्यातून वेध घेणारा, दुखाकडेही लहान मुलाच्या निरागसतेने पाहणारा हा कसदार 'भारतीय' लेखक कर्नाटकातील नवोदय साहित्य चळवळीचा 'सेनापती' होता.
कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्य़ातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील मेलिगे गावचा त्यांचा जन्म. जन्मतारीख २१ डिसेंबर १९३२. प्राथमिक शिक्षण दुर्वासपुरातल्या संस्कृत शाळेत. अगदी पारंपरिक पद्धतीने. पुढे ते तीर्थहळ्ळी, म्हैसूर येथे शिकले. म्हैसूर विद्यापीठातून एमएची पदवी संपादन केली. तेथून राष्ट्रकुल शिष्यवृत्ती घेऊन ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले. पण खेडय़ातले बालपण आणि संस्कृत शाळेतून झालेले शिक्षण यामुळे अस्सल देशी पंरपरेशी झालेली 'अंतर्बाह्य़' ओळख कधीच पुसली गेली नाही. १९६६ मध्ये त्यांनी बर्मिगहॅम विद्यापीठातून राजकारण आणि साहित्य या विषयावर डॉक्टरेट मिळविली. यातून घडलेली त्यांची विचारमूर्ती त्यांच्या लेखनातून सतत जाणवत राहिली. वेगवेगळ्या परिस्थितीत लोकांची होणारी मानसिक स्थिती, कर्नाटकातील ब्राह्मण कुटुंबांपुढील आव्हाने, कुटुंब व्यवस्थेतील ताणेबाणे, कुटुंबातील नातेसंबंधांवर झालेले बदलत्या राजकीय आणि आर्थिक स्थितीचे  परिणाम, नोकरशहा व राजकारण यांचे संबंध असे अनेक विषय त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी राहिले. सूर्याणा कुदुरे (द ग्रासहॉपर), मोवनी (सायलेंट मॅन), संस्कार, भाव, भारती, पुरा, अवस्थे, बारा (दुष्काळ) या त्यांच्या साहित्यकृती विशेष गाजल्या. विविध भाषांमध्ये त्यांचे साहित्य अनुवादित झाले.
साहित्य क्षेत्राबरोबरच ते शिक्षण क्षेत्रातही रमले. ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतर ते म्हैसूर विद्यापीठातील इंग्रजी विभागात रूजू झाले. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, एबरहार्ड कार्ल्स विद्यापीठ, आयोवा विद्यापीठ, टफ्ट्स विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ येथेही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष (१९९२), साहित्य अकादमीचे अध्यक्ष (१९९३ ) अशी पदेही त्यांनी भूषविली.
साहित्यिक चळवळींप्रमाणेच राजकीय चळवळींमध्येही ते रमले. केवळ वैचारिक पातळीवरच नव्हे, तर प्रत्यक्षात निवडणुकीच्या राजकारणात उतरून त्यांनी राजकीय व्यवस्थेचा अनुभव घेतला. लोकसभा आणि राज्यसभेची निवडणूक त्यांनी लढविली होती. विचाराने ते 'देशी' डावे. तरीही कर्नाटकातील दहा शहरांची नावे बदलावीत. परंपरेने आलेली नावे कायम करावीत अशी सूचना करण्यास ते कचरले नाहीत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर आपण देशांतर करू अशी घोषणा करून वाद अंगावर घेण्यासही ते बिचकले नाहीत. महाभारतातील उल्लेखांनुसार ब्राह्मण गोमांसभक्षण करीत असत, या त्यांच्या विधानाने असाच मोठा वाद झाला होता. ख्यातनाम साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या 'आवरण' या कादंबरीवर त्यांनी सडकून टीका केली. त्यावरून त्यांना स्वतलाही टिकेचे धनी व्हावे लागले. त्या कटू अनुभवामुळे  पुढे त्यांनी साहित्यिक कार्यक्रमांत भाग घेणेच बंद करण्याचा निर्णय घेतला. हीच बंडखोर वृत्ती त्यांच्या खासगी जीवनातही दिसली. १९५६ मध्ये त्यांनी विवाह केला तो जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन इश्टर या ख्रिस्ती तरूणीशी. आपल्या पत्नीसह गेली अनेक वर्षे ते बंगळुरूमध्ये राहात होते. पण त्यांचे प्रेम होते म्हैसूरवर. तेथे गेल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक म्हणून माझी सर्व रूपे आठवतात, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. दहा वर्षे बंगळुरूत राहिल्यानंतर तेथे परतण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती पण ती अपूर्णच राहिली..  
आणि साहित्याची दिशा बदलली..
अनंतमूर्ती यांच्या संस्कार या कादंबरीने तत्कालीन साहित्यविश्वात एकच खळबळ उडवून दिली. एका सनातनी ब्राम्हण घरातील विरोधाभासावर ही कादंबरी बेतली होती. त्या कादंबरीवर अनंतमूर्ती यांनी बालपणात व्यतीत केलेल्या कालखंडाचा प्रभाव होता. त्यामुळेच ती कादंबरी अनुभवाधारित ठरली. पुढे या कादंबरीवर चित्रपटही निघाला. समांतर सिनेविश्वात या चित्रपटाने मानाचे स्थान मिळवले. १९७० साली सवरेत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही या चित्रपटास मिळाला. प्रस्थापित मूल्यांना आव्हानण्याचे धाडस अनंतमूर्ती यांनी आपल्या साहित्यकृतीतून दाखविले. म्हणूनच त्यांना नवोदयवादाचे प्रणेते म्हटले जाई. आपल्या व्यक्तिगत आयुष्यात त्यांनी प्रेम विवाह केला. हा विवाह एका ख्रिश्चन युवतीशी होता. त्यांच्या या आंतरधर्मीय विवाहामुळे त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. अनंतमूर्ती यांनी १९९२ मध्ये नॅशनल बुक ट्रस्टचे अध्क्षपद आणि १९९३ मध्ये साहित्य अकादमीचे अध्यक्षपद भूषविले होते.
पुरस्कार
'१९८४  राज्योत्सव पुरस्कार
'१९९४ ज्ञानपीठ पुरस्कार
'१९९५ मास्ती पुरस्कार
'१९०८ पद्मभूषण
'२००८ नादोजा पुरस्कार (कर्नाटक विद्यापीठ)
'२०११ द हिंदू लिटररी प्राइज
'२०१२ कोलकाता
विद्यापीठाची डी.लिट
लघुकथा संग्रह
एनडेनधिगु मुगियाडा काथे, मौनी, प्रष्टद्धr(२२४)ष्टद्धr(१३८)ो, क्लिप जॉइंट, घट श्रद्धा, आकाशा मट्टू बेक्कू,
इराडू दशाकाडा काटेगालू,
ऐडू दशकडा काटेगालू
कादंबऱ्या
संस्कार, भारतीपुर,
अवस्थे, भाव, दिव्य
नाटके
आवाहने, कवितासंग्रह, १५ पद्यागालू, मिथुना, अजाना हेगाला सुकूगालू, समीक्षा,
प्राजने माथू परिसरा, सन्नीवेशा सनमक्षमा, पूर्वापारा, युदापल्लटा, वाल्मिकीय नेवदल्ली, मातू शोथा भारता, सद्या मट्टू शाश्वता
पत्रकारिता
संपादक- रूजवाथू
कादंबऱ्यांवरील चित्रपट
संस्कार, बारा,
अवस्ते, मौनी, दीक्षा
जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी सॉमरसेट मॉम हे जगभर एक लहानशी वही घेऊन हिंडले तर काफ्का या विचारवंताने याचसाठी एका खोलीत बसून शांतपणे चिंतन करण्याचा पर्याय स्वीकारला असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात, काफ्का यांना गवसलेले जीवनाचे सार अधिक रसरशीत आणि जिवंत होते.
***
मानवाची सर्वोच्च अध्यात्मिक प्रेरणा कोणती या प्रश्नाचं उत्तर: समतेची तीव्र भूक
***
ज्या जबाबदारीने आणि तीव्रतेने आपण आपले प्रेम लपवितो, तितक्याच तीव्रतेने आपण आपली बांधिलकीही लपवायला हवी.
***
समतेच्या माध्यमातूनच उत्तमतेची निर्मिती शक्य आहे. देशातील अनेक जाती, गटांमध्ये असलेला शिक्षणाचा अभाव हेच भारताला कमी नोबेल पारितोषिके मिळण्याचे प्रमुख कारण आहे. शिक्षणाने सर्वागिण बुद्धिमत्तेचा सन्मान राखायला हवा.
श्रद्धांजली..
यु.आर.अनंतमूर्ती यांच्या निधनामुळे कन्नड साहित्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात मनापासून सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
***
अनंतमूर्ती यांच्या निधनाने केवळ कन्नड नाही तर भारतीय साहित्यातील तेजस्वी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व हरपले आहे. ब्राह्मण समाजातील चुकीच्या रूढी व त्यामुळे लोकांची होणारी दयनीय अवस्था यांचे प्रभावी चित्रण त्यांनी लेखनातून केले. पात्रांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण व त्यातून घेतला जाणारा समाजाचा वेध हे त्यांच्या साहित्याचे लक्षणीय रूप होते. समाजवादावरील निष्ठा आणि मूलतत्त्ववादी हिंदुत्ववादाचा विरोध त्यांच्या लेखनातून दिसला. प्रागतिक विचारांवर श्रद्धा आणि समाजाच्या आधुनिकतेची चिंता असल्याने अनंतमूर्ती यांना विशिष्ट गटांचा प्रखर विरोध झाला. तरीही ते आपल्या विचारांपासून ढळले नाहीत.
- चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ समीक्षक  
***
अनंतमूर्ती हे राष्ट्रीय पातळीवर एक अत्यंत महत्त्वाचे लेखक होते. शेवटपर्यंत त्यांनी प्रतिगामी आणि सांप्रदायिक विचारांना प्राणपणाने विरोध केला. आपल्या भूमिकांवर ठाम निष्ठा असणारे फार कमी लेखक असतात. अशा लेखकांपैकी अनंतमूर्ती हे एक महत्त्वाचे लेखक होते. त्यांची नाटके आणि इतर साहित्य हे भारतीय साहित्यविश्वात नवे आदर्श निर्माण करणारे ठरले आहे. त्यांच्या निधनामुळे आज भारतीय साहित्य जगताला मोठे दु:ख झाले आहे.
- नागनाथ कोतापल्ले, ज्येष्ठ साहित्यिक
***
यू. आर. अनंतमूर्ती हे कन्नड साहित्यातील व कर्नाटकातील एक मोठे नाव होते. नव्य साहित्य प्रकार किंवा आधुनिक साहित्यातील गद्य लेखनाचे अध्वर्यू असे त्यांना म्हणावे लागेल. ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यामुळे नवीन प्रवाहाचा त्यांना परिचय होता. बालपण कर्मठ वातावरणात गेल्यामुळे भारतीय संस्कृतीची चांगली माहिती त्यांना होती. काही दोषांचाही त्यांना अनुभव होता. त्यांच्या कथांमधून हे दोषही व्यक्त होतात. कन्नडमध्ये त्यांच्या ३० ते ३५ कथा व पाच-सहा कादंबऱ्या आहेत. त्यांचे साहित्य संख्येने कमी, पण गुणवत्तेने हे साहित्य मोठे आहे. या साहित्याने कन्नड साहित्यावर प्रभाव टाकला. विचारवंत म्हणूनही ते प्रसिद्ध होते. आपले विचार ते निर्भीडपणे मांडत होते. त्यामुळे वाद झाले, त्यांच्यावर टीकाही झाली, पण मनात आलेले विचार त्यांनी सतत निर्भीडपणे मांडले.
 - उमा कुलकर्णी, प्रसिद्ध अनुवादिका

Thursday 7 August 2014

Rape statistics around the world

http://www.indiatribune.com/index.php?option=com_content&view=article&id=10195%3Arape-statistics-arou

Rape statistics around the world


Thursday, Aug 07th
Last update:10:49:12 PM GMT
INDIA TRIBUNE A WEEKLY JOURNAL FOR THINKING INDIANS

E-mailPrintPDF
New Delhi has the highest number of sex crimes among India’s major cities, with a rape reported on average every 18 hours, according to police figures.
•South Africa – It has one of the highest rates, with 277,000 reported cases. The same year a survey by the Medical Research Council found that one in four men admitted to raping someone.
•United States – More than 89,241 rape cases were reported. Criminals face life behind bars, and in some states, castration is an option.
•India – Reported a little more than 21,397 cases.
•United Kingdom – 15,084 cases were reported. A suspect found guilty, faces a maximum conviction of life in prison.
•Mexico – Nearly 14,078 cases were reported. In some parts of the country, penalties may consist of a few hours in jail, or minor fines.
•Germany – Counts the highest number of reported rape cases in Europe, just under 8,000.
•Russia – Almost 5,000 cases were reported, and the crime holds a punishment of 4-10 years in jail.