Wednesday 8 October 2014

जेम्स लेन, भांडारकर आणि निवडणुका




राज्यातील निवडणुकांनी आता जातीसंघर्शाचे उग्र रूप धारण केले आहे. मोदींचा सभांचा धडाका, त्यांच्या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद यामुळे उर्वरित चार पक्ष हतबल झाले आहेत.सत्ता मिळवण्यासाठी काहीही करायची सगळ्यांचीच तयारी आहे. माणिकराव ठाकरे हे सत्ताधारी को‘न्ग्रेसचे तसेच वाचाळवीर आर.आर.पाटील हे राष्ट्रवादीचे  दुय्यम दर्जाचे नेते. पायाखालची वाळू घसरू लागताच या दोघांनी १० वर्षांपुर्वीच्या जेम्स लेनच्या वादाला पुन्हा हात घालून जातीयवादी प्रचाराला सुरुवात केली आहे.
गेल्या १० वर्षात ज्या आर.आर.च्या गृहखात्याला भांडारकरला या वादात क्लीन चीट द्यावी लागलीय, त्याच आर.आर. नी पुन्हा संशय निर्माण करण्याचा हा उद्योग करावा यातून हा माणूस किती पराकोटीचा जातीयवादी आहे हेच दिसून येते.

५ जानेवारी २००४ ला संभाजी ब्रिगेडने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला. जेम्स लेन याने त्याच्या पुस्तकात जिजामाता नी शिवराय यांचे चारित्र्यहनन केल्याच्या रागापोटी हा हल्ला केला गेला असे सांगितले गेले. जेम्स लेनचा भांडारकर संस्थेशी काहीही संबंध नाही. त्याच्या या लेखनाचा भांडारकरने तीव्र निषेध केलेला आहे. एखादा माणूस एखाद्या संस्थेच्या होस्टेलमध्ये  चार दिवस राहिला नी पुढे २५ वर्षांनी त्याने आपल्या पुस्तकात काही चुकीचे लिहिले तर त्याला ती संस्थाच जबाबदार आहे असा जावईशोध लावणे म्हणजे सापसाप म्हणुन भुई धोपटणे होय. खरे तर २००४ साली होणार्‍या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी नामशेष होणार असा गृहखात्याचा अहवाल आल्याने आर.आर. नी हा निवडणूक प्रचारासाठी जातीयवादी पवित्रा घेतल्याचे एव्हाना उघड झाले आहे. तसे ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी जाहीर भाषणातही सांगितले आहे. आजही मराठा विरूद्ध ब्राह्मण हा जातीयवाद हा प्रचाराचा मुद्दा बनवण्यासाठी आर.आर. आणि माणिकराव यांनी हे झाकलेले "माणिक " म्हणून गाडलेला कोळसा उकरून काढला आहे.

जेम्स लेन हा अमेरिकन लेखक १९८० साली पुण्यात आलेला असताना भांडारकरच्या गेस्ट हाऊसवर चार दिवस राहिला होता. त्याने आपल्या २००३ सालच्या पुस्तकात त्याबद्दल भांडारकरचे आभार मानले आहेत. संस्थेतील व बाहेरील अनेक ब्राह्मण नी ब्राह्मणेतर अभ्यासकांचे त्याने आभार मानलेत. संस्थेचे ग्रंथपाल वा.ल.मंजूळ यांच्या एका पुस्तकात लेनचा पाश्च्यात्य अभ्यासक म्हणुन उल्लेख आहे. या तीन गोष्टी एकत्र करून लेनला हे लेखन भांडारकरनेच पुरवले असा आरोप ब्रिगेडकडून केला गेला.

आर.आर.च्या पोलीसांना सखोल चौकशीत या कपोलकल्पित आरोपात तिळमात्र तथ्य आढळले नाही. तरिही खुद्द आर.आर. ह्या आरोपाचा फायद्यासाठी पुन्हापुन्हा वापर करीत आहेत. माध्यमांतील चाणक्य आता तरी आर.आर.ला डोक्यावर घेणे बंद करतील काय?

उलट ब्रिगेडचे सर्वेसर्वा पुरूषोत्तम खेडेकर यांच्या २००३ सालच्या अमेरिका वारीत ते कोणाकोणाला भेटले होते याची चौकशी व्हावी अशी मागणी असताना आर.आर. नी तशी चौकशी कधीही का केली नाही याचे रहस्य आजवर उलगडलेले नाही.

भांडारकर ही जगातील ख्यातनाम संशोधन संस्था आहे. तिला शतकाचा इतिहास आहे. संस्थेत जगातील सर्वात मोठा प्राचीन पोथ्यांचा संग्रह आहे. त्यात सुमारे तीस हजार हस्तलिखिते आहेत. भांडारकरच्या पां.वा. काणे यांना धर्मशास्त्राचा इतिहास लिहिल्याबद्दल "भारत रत्न " मिळाले आहे. जगातील सर्वात मोठा बौद्ध साहित्याचा संग्रह भांडारकर मध्ये आहे. तो जमविण्यसाठी धर्मानंद कोसंबी यांनी सारे आयुष्य वाहून घेतले होते.

छत्रपती संभाजी राजांच्या "बुधभुषण " या ग्रंथाचे प्रकाशन १९२६ साली भांडारकरने केलेले आहे. तो भांडारकरचा ठेवा आहे. तोच नष्ट व्हावा यासाठी संभाजी ब्रिगेडने संस्थेवर हल्ला करावा हे दुर्दैवी आहे.

भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळावर ब्रिगेडचे शंकराचार्य {शिवधर्माचे संस्थापक} डा. आ.ह. साळुंखे यांनी या हल्ल्यानंतर अनेक वर्षे काम केलेले आहे. खेडेकरांचे नागपुरचे नातेवाईक डा.श्रीकांत जिचकार, डा. विजय भटकर आदींनी संस्थेत पदाधिकारी म्हणुन काम केलेले आहे.गेले कित्येक वर्षे ब्रिगेड नी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक {राणे समितीचा मराठा आरक्षणाचा अहवाल लिहिणारे} डा. सदानंद मोरे या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आहेत.

मराठा समाजाचे प्रमुख नेते शामराव सातपुते हे संस्थेत कित्येक वर्षे काम करीत आहेत. मराठा समाजातले असंख्य अभ्यासक भांडारकरशी संबंधीत आहेत.

तरिही निवडणुकीच्या तोंडावर हा वाद उकरून काढणे ही मराठा राज्यकर्त्यांची हातचलाखी आहे. त्याला आपण बळी पडणार का?

ब्रिगेडचे भाजपातील समर्थक मा. विनोद तावडे यांच्या भुमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे....
............................................................................=====......................................................................................................................

No comments:

Post a Comment