Monday, 26 August 2013

समीर मणियार.....अंधश्रद्धेचा ऑक्टोपस!

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/column/khabar-maharashtrachi/-/articleshow/22081366.cms...Aug 27, 2013, 02.01AM IST 
Maharashtra Times 27 Aug.2013

डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा बळी गेला असला तरी अंधश्रद्धानिर्मूलनाचा व त्या विरोधातल्या कायद्याचा मार्ग व अंमलसोपा नाही डॉक्टरांच्या बलिदानानंतरही जे राजकारणचालले आहे त्यावरून हेच स्पष्ट होते ...

नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक आठवडा उलटला तरीअजूनही हल्लेखोर सापडलेले नाहीत ही हत्या कोणाच्यासांगण्यावरून झाली त्या कटाचा सूत्रधार कोण अशाप्रश्नांची उत्तरे लोकांना लवकर मिळायला हवीत एक मात्रखरे अडीच दशकात डॉ दाभोलकर यांनी कथित भोंदू ,बाबा महाराज आणि नव्या युगातील मठाधिपती यांच्या विरोधात आघाडी उघडली त्यांच्या चळवळीमुळेअंधश्रद्धांचा बाजार मांडणाऱ्यांचे आर्थिक व वैयक्तिक हितसंबंध दुखावले गेले .
महात्मा गांधींची ज्यांनी हत्या केली त्याच प्रवृत्ती खूनामागे असाव्या अशी शक्यता मुख्यमंत्र्यांनी बोलूनदाखवली गृहमंत्री आर आर पाटील हे तर एकेकाळी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत कार्यकर्ते होते त्यामुळे हातपास नेटाने करण्यासाठी सर्वाधिक पोलिस यात गुंतले मुख्यमंत्र्यांची शक्यता खरी निघाली तर सरकार कितीकठोरपणे त्या प्रवृत्तीच्या मुसक्या आवळते ते दिसेलच .

दाभोलकर व त्यांचे सहकारी १८ वर्षापासून सनदशीर मार्गाने विविध पातळीवर कायद्यासाठी संघर्ष करीत होते .असा कायदा होईल असे लेखी आश्वासन युती सरकारने १९९९ साली विधानसभेत दिले त्यानंतर या कायद्याचामसुदा तयार करणे आणि त्यावर सल्लामसलत अशा कारणांसाठी हे विधेयक १४ वर्षे भिजत पडले तथापि ,दाभोलकर यांच्या हत्येनंतरचा संताप लक्षात घेऊन आघाडी सरकार खडबडून जागे झाले मंत्रिमंडळाने वटहुकूमकाढण्याचा निर्णय घेतला त्यावर राज्यपाल के शंकरनारायणन यांनी शनिवारी स्वाक्षरी केली आता वटहुकूमआला की या अघोरी प्रथा व अंधश्रद्धांना पायबंद बसेल असे नाही पण जरब बसू शकेल गुन्हे आटोक्यातयेण्यास मदत होईल हे मात्र नक्की .

अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी संतांनी जागर केला त्या प्रवृत्तीवर कोरडे ओढले अलिकडे महात्मा फुले राजर्षिशाहू डॉ बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा प्रबोधनकार ठाकरे अशी नावे घेता येतील या शतकातअंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा पाया डॉ अब्राहम कोवूर यांनी घातला केरळात बी प्रेमानंद हा विचार रूजवितहोते सहा दशकांपूर्वी किर्लोस्कर मासिकाने अंधश्रद्धांवर प्रहार करणारे लेखन छापले नंतर ते काहीसे थंडावले .८०च्या दशकात हे काम श्याम मानव यांच्या पुढाकाराने सुरू झाले .

गुप्तधनप्राप्तीच्या उद्देशाने झालेले मानवत हत्याकांड गाजले काही भागात नरबळी डाकीण प्रथा जोर धरत होतीअपत्यहीनांना अघोरी उपचाराने गुण मिळतो किंवा मुलगा हवा तर अमुक बाबांचा उपाय असेही प्रकारउघडकीस येत होते व्यापक परिवर्तनाच्या उद्देशाने १९८०च्या सुमारास राज्यभर काम करणाऱ्या संघटनांचेनेटवर्क होते परदेशी फंडिंगची फॅशन नसताना व तशा पैशापासून चार कोस लांब असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या संघटनांना दानशूर व्यक्ती आणि मध्यमवर्गीय मदत करत असत विषमता निर्मूलन समितीचे काम तसेचचाले या समितीच्या वार्षिक परिषदांच्या निमित्ताने डॉ दाभोलकर हे या कामात ओढले गेले .

परमेश्वर ही संकल्पना नाकारल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन शक्य नाही अशी मांडणी काही विचारवंत करीत तीदाभोलकरांना मान्य नव्हती समितीची भूमिका वेगळी होती घटनेने प्रत्येक व्यक्तीस अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिलेआहे त्यामुळे प्रत्येक नागरिकास मनाजोगते धर्माचे आचरण पूजा धर्मग्रंथांचे पठण सण उत्सव साजरेकरण्यास कायद्याने स्वातंत्र्य आहे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्या काळात बुद्धिप्रामाण्यवादी विचार मंचस्थापला त्यातील बुद्धिप्रामाण्यवाद या शब्दास त्यांची हरकत होती विज्ञाननिष्ठ विवेकवादी विचार अशीत्यांची मांडणी होती कोणत्याही धर्माला विरोध न करता त्यातील बुरसटलेल्या विचारांतून होणाऱ्या शोषण मानसिक गुलामगिरीच्या विरोधात त्यांचा लढा होता धर्म पाळावा पण कालबाह्य रूढीतून समाजाची फसवणूकहोता कामा नये असा त्यांचा विचार होता .

काही काळ एकत्र काम केल्यानंतर दाभोलकर आणि श्याम मानव यांच्या दोन संघटना झाल्या तरी चळवळीच्याध्येय उद्दिष्टांवरून त्यांच्यात कधी कटुता अथवा भांडणे निर्माण झाली नाहीत धुळ्याचा वादग्रस्त धर्मभास्करवाघ नाणीजचे नरेंद्र महाराज गोडबाबा अशा असंख्य ठिकाणी त्यांनी एल्गार पुकारला सनातन भारतने डॉ .दाभोलकर यांच्या विरोधात १४ खटले आणि जवळपास तितक्याच रकमेचे अब्रुनुकसानीचे दावे कोर्टात केले .त्यास ते तोंड देत होते राज्यात २५० प्रकरणांचा शोध घेऊन त्यांनी तेथील प्रवृत्तींचा भांडाफोड केला अंनिसब्राम्हणी कर्मकांडे ब्राम्हणी बुवा यांच्याबाबत बोलत नाही कारण डॉ दाभोलकर हे जातीने ब्राम्हण आहेत असाआरोप करण्यापर्यंत बामसेफ व मराठा सेवा संघाच्या मंडळीची मजल गेली तथापि दाभोळकरांनी सर्वधर्मातील बाबा बुवा महाराज यांच्या विरोधात आघाडी उघडली अलिकडे नाशिकच्या ऑनर किलींगप्रकरणानंतर जात पंचायतीच्या समांतर न्यायव्यवस्थेवर ते कोरडे ओढत होते त्यामुळे दाभोलकर यांनीअनेकांना दुखावले होते .

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात पुसट लक्ष्मणरेषा असते प्रत्येक व्यक्ती आणि समाजागणिक श्रद्धा व अंधश्रद्धांचेमापदंड बदलत असतात धर्मभावना अलिकडे खूप नाजूक झाल्यामुळे कोणताही राजकारणी व पक्ष त्याविरोधातबोलत नाही कारण लोकांना काय वाटेल मतदार दुखावतील अशी भीती त्यांना वाटते त्यामुळे बाबा ,अवलिया महाराज देवी यांच्या पायावर मस्तक ठेवण्यास सर्वपक्षीय पुढारी पुढे असतात पंडित नेहरू हेआंतर्बाह्य सेक्युलर होते इंदिराजींच्या काळात बुवाबाजी वाढली राजीव यांनी त्यांचे अनुकरण केले हाच कित्तानरसिंहराव चंद्रशेखर व्ही पी सिंग अर्जुनसिंग झैलसिंग शंकरराव चव्हाण आदींनी गिरवला यातूनआधुनिक रासपुतिन चंद्रास्वामी यांचा बोलबाला झाला तो अंधमार्ग गल्लीपासून दिल्लीपर्यंत पुढारी चालतआहेत हे दाभोलकरांचे म्हणणे रास्तच होते .

कोणत्याही जाती व समूह व्यवस्थेच्या अंगाने धर्मचिकित्सा करण्यास तयार नाहीत उलट परस्परांचे गोडवेगाण्याची स्पर्धा आहे नव्वदीच्या नव्या अर्थव्यवस्थेने अनेक सामाजिक आर्थिक प्रश्न निर्माण झाले जगण्या -मरण्याची स्पर्धा तीव्र झाली अशा धकाधकीत मनाला दोन घटका समाधान म्हणून माणसे नवनव्या महाराजांचास्वीकार करत आहेत धर्मवर्तन म्हटले की कोणी त्याबाबत बोलू धजावत नाही वैज्ञानिक दृष्टी बाळगणे ही१९७६ साली केलेली घटनादुरूस्ती आहे मात्र आता कोणत्याच चिकीत्सेला कोणाची तयारी नसते सत्ताकारणव राजकारणातील मंडळी जनतेला खऱ्या प्रश्नापासून दूर नेण्यासाठी अंधश्रद्धेचा गंडा बांधतात दाभोलकरांचेविचार ग्रेट होते पण ते कोणत्याच राजकारण्यांना परवडणारे नाहीत कारण ते मतांची रास बिघडविणारे आहेतत्यामुळे प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा सांगणारे दोन नातू परस्परविरोधी विचार मांडत आहेत राज ठाकरेम्हणतात कायदा ताबडतोब व्हावा तर उद्धव ठाकरे यांचा वटहुकमाला विरोध जमाना बदलला हे डॉक्टरांनासमजले नाही असे म्हणायचे की अंधश्रद्धेचा ऑक्टोपस समाजमनाच्या तळाशी ठाम पाय रोवून आहे हेच खरे ?ही लढाई वाटते तेवढी सोपी नाही .

समीर मणियार

No comments:

Post a Comment