संजय सोनवणी,
वाढते व तेही केंद्रीत औद्योगिकरण...चराऊ कुरणांचा नाश...उरलाय त्यांचा खालावत चाललेला दर्जा...जनावरांची उपासमार...पर्यावरणाचा ढासळता समतोल...धनगरांची कुरणांच्या शोधातील वाढती पायपीट...गांवगुंडाची बेसुमार खंडणी-वसूली...
राष्ट्राच्या सकल उत्पादनात अजुनही वाढवता येण्यासारखा मोलाचा वाटा असुनही मेंढपाळांचे मुलभूत अधिकार नाकारणे ही कसली लोकशाही? पर्यावरणाचा खून पाडत प्रगतीच्या गप्पा हाकणे ही कसली प्रगती?
देशाच्या सकल उत्पादनात ९% वाटा (शेतीचा १४% आहे) घसरत जात धनगर व पर्यायाने पशुपालक समाज एक दिवस या संपूर्ण उद्योगातून बाहेर हाकलला जाणार...आजही देशाचे कुरणांबाबत धोरणच नाही...कुरणे बळकावणे सहज सोपे आहे...हजारो वर्ष धनगर वहिवाटीने कुरणांचा वापर शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी करत आहेत...त्यांच्या नैसर्गिक हक्काकडे कोणाचेही लक्ष नाही...
कोणी एक कुरण बळकावले कि दुस-या जागेच्या शोधात वणवण करायची...उघड्यावरचे फिरस्ते संसार..मुलाबाळांना शिक्षण नाही....धरणांखाली, सेझखाली, औद्योगिक वसाहतींखाली....कुरणे चाललीच आहेत...पर्यायी व्यवस्था नाही...चराऊ गवताच्या नव्या सकस जाती शोधण्यासाठी कसलेही प्रयत्न नाहेत...अपारंपारिक वनीकरणाने अधिकच घात केलेला...
इकडे शेती आणि शेतमालासाठी आंदोलने होतात...रक्त सांडते...दुसरीकडे असला जहरी अन्याय...बहुदा पशु आणि पशुपालकांना या व्यवस्थेत स्थानच नसावे...शेळ्या-मेंढरे मूक...धनगर मूक...नेते येथे चरू शकत नसल्याने ते मूक-बधीर...पर्यावरण मरो कि धनगर मरोत...कोणाच्या बापाचे काय जाते?
For more details also see...
No comments:
Post a Comment