नरेंद्र दाभोलकर--सुनिल तांबे
जयंत साळगावकरांच्या निधनाची बातमी ऐकली. दत्तप्रसाद दाभोलकर प्रतिक्रीया देत होते आणि अचानक ब्रेकिंग स्टोरी आली....नरेंद्र दाभोलकरांचा खून. काही क्षण सुन्न झालो. हॉटेलमधून चेकआऊट करायचं होतं. दुसर्याा गावी मिटिंग होती. शो मस्ट गो ऑन...वगैरे क्लिशे आठवले.
नरेंद्र उत्तम कब्बडीपटू होता. म्हणजे मरेपर्यंत तो खेळाडू अर्थात कब्बडीपटू होता. खेळाच्या मैदानावर प्रत्येक क्षण तुम्ही एका उद्दिष्टाला अर्पण केलेला असतो. केवळ जिंकण्यासाठी नाही तर वा किलींग इन्स्टींक्ट म्हणून नाही तर देह आणि विचार ह्यांच्या एकत्वासाठी. त्यासाठी कमालीची एकाग्रता लागते. त्या एकाग्रतेचा अभ्यास करायला लागतो. नरेंद्रने ही खिलाडूवृत्ती आत्मसात केलेली होती. तो कब्बडीपटू होता ही बाब कधीचीच इतिहासजमा झालेली आहे. पण मला माहीत असलेला पन्नाशीतला नरेंद्र चहा यायला वेळ असेल तर कब्बडी-कब्बडी असं पुटपुटत श्वास धरून ठेवायची प्रॅक्टीस करणारा होता. देह हा केवळ सुखोपभोगासाठी नाही तर एका विशिष्ट उद्दिष्टासाठी आहे, त्यासाठी देहाने आणि मनाने तंदुरस्त असायलाच हवं, अशी नरेंद्रची धारणा होती. म्हणूनच प्रत्येक क्षणाचं नियोजन नरेंद्रने केलेलं असायचं. कुणाही व्यक्तीशी बोलताना नरेंद्र कमालीचा सजग असायचा. बोलण्यातून आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे, त्यामुळे व्यक्तीगत नाही तर आपल्या संघटनात्मक वा आंदोलनाच्या संबंधातील भूमिकेचा किती परिपोष होणार आहे, त्यातून कुठल्या प्रश्नाची कितपत तड लागणार आहे वा तो मार्गी लागणार आहे, ह्याबाबतची स्पष्टता नरेंद्रला असायची. मला अनेकदा असं वाटायचं की तो सतत कामाची रंगीत तालीम करत असायचा. एखाद्या कार्यक्रमात एखाद्या व्यक्तीला बाजूला घेऊन चार-पाच मिनिटं नरेंद्र बोलला म्हणजे त्याने एक मिटिंग केली असंच आम्ही म्हणायचो. म्हणजे त्याने त्या मिटिंगमधून त्या व्यक्तीशी केवळ नातं जोडलेलं नसायचं तर निश्चित कार्यक्रम दिलेला असायचा. त्या कार्यक्रमाची यशस्विता कशाच्या आधारावर जोखायची ह्याची मानकंही त्याने निश्चित केलेली असायची आणि ती त्या संबंधीत व्यक्तीला सांगितलेलीही असायची.
नरेंद्रच नाही तर समाजवादी युवक दलातील सर्वच साथींच्या हाडीमाशी खिळलेली ही
सवय आहे. पार्थ पोळके असो की लक्ष्मण माने वा किशोर बेडकिहाळ वा दिनकर झिंब्रे. प्रमोदच त्यातला वेगळा. कारण प्रमोद कवी, कथात्म लेखन करणारा. बाकी सर्व हाडाचेच नाही तर स्नायूंचेही कार्यकर्तेच. ह्या सर्व मित्रांचे नंतरचे मार्ग वेगळे झाले. कधी ते एकमेकांच्या विरोधातही गेले. पण कोणीही, कधीही एकमेकांना घट्ट जोडणारा समाजवादी युवक दलाचा धागा तोडला नाही. आणि मैत्री, खरंतर चांगला शब्द साथी भावना वा सामिलकी त्यांनी सोडली नाही.
ह्या कार्यकर्तापणाचे काही तोटेही झाले. उदाहरणार्थ हे सर्व साथी सतत समाजाच्या चिंतेने पछाडलेले राहीले. व्यक्ती म्हणून काही प्रश्नांचा शोध घ्यायचा असतो. त्यासाठी सामाजिक कार्यक्रम नाही तर वैयक्तीक ध्यासाची कास धरायची असते हे ह्या मित्रांच्या कधी ध्यानीच आलं नाही. आलं असेल तर त्यांनी त्याकडे निष्ठुरपणे वा कठोरपणे दुर्लक्ष केलं. अंधश्रद्धा निर्मूलन वा जादूटोणा विरोधी विधेयकाच्या चळवळीत शक्य तेवढा सहभाग मीही दिला. पण मला सतावणारा मुद्दा वेगळा होता. विज्ञान क्षेत्रात काम करण्यापेक्षा विज्ञानवादी होणं हे भारतात कमालीचं सोपं बनून गेलंय असा माझा मुद्दा होता. म्हणजे असं की सावरकरही विज्ञानवादी होते वगैरे आपण वाचलं वा ऐकलं आहेच. विज्ञानाची संस्कृती या मार्गाने रुजत नसते. निसर्गातील सत्याचा शोध घेण्याची व्यक्तीची प्रेरणा किती सखोल आणि भक्कम आहे, विज्ञानामध्ये त्या व्यक्तीने किती भर टाकली ह्यातून वैज्ञानिक संस्कृती समाजात रुजते. नरेंद्रला हे भान नव्हतं असं म्हणणं धार्ष्ट्याचं ठरेल पण वस्तुस्थिती ही होती की विज्ञानमध्ये काम करण्यापेक्षा विज्ञानाचा प्रसार करण्याच्या कामाला वाहून घेणं ह्याला डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीला अधिक रस होता.
प्रत्येक क्षेत्रात नरेंद्रला सामाजिक-राजकीय कार्यक्रम दिसायचा, त्याचाच तो ध्यास घ्यायचा. पण संस्कृती विशेषतः विवेकवादाची संस्कृती पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये त्यातही पश्चिम युरपमध्ये रुजण्याची कारणं केवळ सामाजिक-राजकीय कार्यक्रमांमध्ये नाहीत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काही व्यक्तींना सत्याचा शोध घेण्याची जी प्रेरणा झाली आणि त्यासाठी त्यांनी जी किंमत दिली, त्यामध्ये आहेत. ही संस्कृती आपण महाराष्ट्रात वा भारतात रुजवायची असेल तर निव्वळ सामाजिक-राजकीय कार्यक्रम उपयोगाचा नाही. ब्रिटीशांच्या आगमनानंतर आपल्याला पाश्चिमात्य विचारधनाचा विशेषतः विवेकवादी विचारसरणीचा जो लाभ झाला त्यामुळे आपली आपल्याकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. त्यातूनच धर्मसुधारणा, सामाजिक सुधारणा ह्यांसाठी आंदोलनं सुरु झाली. पुढचा टप्पा राजकीय हक्कांचा वा सत्तेतील वाट्याचा. महात्मा जोतिराव फुले हे क्रांतदर्शी. त्यांच्या विचाराचा सखोल परिणाम नरेंद्रवर झाला होता. माझ्या माहितीनुसार नरेंद्रची आजी सत्यशोधक समाजाच्या विचारांची होती. तोच वारसा त्याने अखेरपर्यंत सांभाळला.
महाराष्ट्राला म्हटला की पुरोगामी हे विशेषण जोडण्याची सवय बहुतेक मराठी लोकांना आहे. त्याची कारणं अर्थातच इथल्या सामाजिक-राजकीय घडामोडींमध्ये आहेत. उच्चवर्णीय अर्थात ब्राह्मणांचं वर्चस्व झुगारून देऊन ब्राह्मणेतरांना राजकीय प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणणार्याण ज्या चळवळी वा आंदोलनं झाली त्यात महाराष्ट्र अग्रेसर होता. म. फुले, राजर्षी शाहू, डॉ बाबासाहेब आंबेडकर अशी ही परंपरा आहे. ह्या आंदोलनांमुळे इथल्या राजकीय परिवर्तनाला भक्कम प्रबोधनाचा आधार मिळाला. लोकशाहीतील राजकीय संख्याबलापेक्षाही मोठा. म्हणून महाराष्ट्राला पुरोगामी हे विशेषण जोडण्यात आलं. भाजप-सेना युतीने हे विशेषण अभिमानाचं बिरुद म्हणून कधीही मिरवलेलं नाही. कारण ह्या राजकीय प्रवाहाने केवळ काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेस नावाच्या राजकीय पक्षाच्या विरोधातील नव्हे तर भारतीय राष्ट्रवादाच्या विपरीत प्रवाहाशी आपली नाळ जोडली आहे. धर्म, वंश,जात, प्रांत ह्या आधारावर राजकीय विशेषाधिकार मागणारा हा प्रवाह आहे. जो भारतीय राष्ट्रवादाच्या विरोधातला आहे. अनुसूचित जाती-जमातींना देण्यात येणार्याा सवलतींचा पाया सामाजिक न्याय आहे. परंतु सेना-भाजप युतीने ह्याच्याशी नाही तर धर्म, वंश, प्रांत ह्या आधारावरील राजकीय विशेषाधिकार मागणार्या आंदोलनांशी स्वतःला जोडून घेतलं. शिवसेनाप्रमुखांनी जाहीरपणे नथूराम गोडसे ह्यांचं कौतुक केलं होतंच. म्हणजे जे जे भारतीय राष्ट्रवादाला त्याज्य, त्याची जोपासना या राजकीय प्रवाहाने केली. मराठेतर बहुजनसमाजाचं पाठबळ या राजकीय प्रवाहाला लाभलं. अलीकडे तर मराठेही हीच मागणी करू लागल्याने तेही ह्या प्रवाहाशी जुळले तर मला आश्चर्य वाटणार नाही. विनायक दामोदर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोळवळकर गुरूजी ह्यांनी ह्या मांडणीला भक्कम वैचारिक आधार दिला.
भारतीय प्रबोधनाचं आंदोलन (जे सामान्यतः राजा राममोहन रॉय ह्यांनी सुरु केलं असं मानलं जातं.) आणि सध्याचा काळ ह्यांची नाळ आता तुटल्यात जमा आहे. नव्याने जागृत होणारे जातिसमूह भारतीय राष्ट्रवादाशी फारकत घेणार्याआ राजकीय प्रवाहांशी जुळू लागले आहेत. त्यामुळेच सावरकर, रा. स्व. संघ ह्यांच्या विचारधारांना आज समाजात मान्यता मिळू लागली आहे. राजा राममोहन रॉय ( सतीबंदीचा कायदा आणण्यासाठी त्यांनी केलेल्य चळवळीची तुलना दाभोलकरांनी ध्यास घेतलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याशी करता येईल.) ह्यांच्यापासून सुरु झालेली प्रबोधनाची चळवळ हीच सूज होती असं वाटावं अशी आजची परिस्थिती आहे. अविवेकीपणा हाच आपला स्थायीभाव आहे. आपली म्हणजेच हिंदूंची मूळ प्रवृत्ती धर्म, जात, प्रांत ह्यासारख्या संकुचित अस्मितांना गोंजारण्याची आहे. ह्याच प्रवृत्तींनी दाभोलकरांचा बळी घेतला. विवेकशीलतेशी आपला काहीही संबंध उरलेला नाही. मूठभर परिवर्तनवाद्यांना त्यामध्ये रस असेलही पण आपलं समाजकारण आणि राजकारण पूर्णपणे समूहवाद्यांच्या ताब्यात गेलं आहे. धर्म वा जातीच्या आधाराव राजकीय विशेषाधिकांची मागणी करणारं राजकारण आधुनिक आणि सेक्युलर असतं हे इथे ध्यानी ठेवायला हवं.

No comments:
Post a Comment