डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवारी सकाळी पुण्यात गोळया झाडून हत्या करण्यात आली . ज्वलंत विषयांवर काम करत असताना असे हल्ले होणारच याची कल्पना डॉ. नरेंद्र दाभोळकरांना होती. जीवे मारण्याची धमकी किंवा घरावर चाल करून येणे, असे प्रकार त्यांच्यासोबत अनेकदा घडले होते. त्यामुळे खचून न जाता त्यांनी पत्नी शैलाला खंबीर रहा, असे प्रकार रोज घडतात असे धैर्य दिले होते.
नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले . 'दिव्य मराठी'ला जुलैमध्ये दिलेल्या मुलाखतीत डॉ. दाभोलकर आणि त्यांची पत्नी शैला यांनी आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला होता. ही मुलाखत जशीच्या तशी येथे देत आहोत. नरेंद्र दाभोलकर यांचा महाविद्यालयीन काळापासून समाजकार्याकडे ओढा होता. वैद्यकीय शिक्षण घेऊन सुद्धा त्यांचे मन त्या क्षेत्रात रमले नाही. 1982 मध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्राला दूर करत समाजसेवेला वाहून घेतले. नरेंद्र यांच्याप्रमाणे शैला यांना देखील समाजसेवा करायची होती. पण लग्नापूर्वीच दाभोलकरांनी घातलेल्या अटीमुळे शैला यांना घराची जबाबदारी स्वीकारावी लागली. ही जबाबदारी त्यांनी योग्य पद्धतीने सांभाळत समाजसेवेचे काम देखील केले आहे. लग्नाआधीपासून दाभोलकर दांपत्यांनी एकमेकांच्या विचारांना समजून घेतले. आणि एक दुसर्याच्या कामाला सांभाळून घेत संसार उभा केला. दाभोलकर दांपत्याला मुक्ता आणि हमीद ही अपत्ये आहे. मुलग्याचे नाव मुस्लिमधाटणीचे ठेवून त्यांनी राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम नावावर लोक भेदभाव करतात.त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करतात. याला तडा बसावा यासाठी दाभोलकरांनी मुलाचे नाव हमिद असे ठेवले. हमिद हा डॉक्टर असून तो व्यसनमुक्तीचे काम करतो. मुक्ता देखील दाभोलकरांच्या सामाजिक कार्यात सहभागी होते. शैला यांचा साताऱ्यातील दवाखान्यासमोरच सोन्याचे दुकान आहे, पण 40 वर्षांपेक्षा जास्त वैवाहिक जीवनात नरेंद्र यांनी शैला यांना एकही दागिना घेऊन दिलेला नाही. शैला स्वत: चांगले कपडे गरजवंतांना देतात. त्यांनी देखील कधी दागिने,साड्यांची हौस जपली नाही. दाभोलकर गेल्या 17 वर्षांपासून साधनाची जबाबदारी सांभाळत आहेत. फिरती चळवळ, अंनिस, व्यसनमुक्तीचे काम किंवा रस्त्यांवर फिरणार्या वेड्यांचे पुनर्वसन, अशा कामात दाभोलकरांनी स्वत:ला गुंतवून घेतले आहे. या कामामुळे त्यांना कुटुंबासाठी जास्त वेळ द्यायला जमत नाही, पण घरचेही त्यांच्या कामाचे महत्त्व जाणून आहेत. राज्यातील अनेक भागांत देवदासींची अघोरी पद्धत आहे. देवदासी महिलांना या जोखडातून मुक्त करण्याच्या कामात शैलाही सहभागी झाल्या आहेत. देवदासींना मुक्त होताना त्यांच्या गळ्यातील माळ दुसर्या महिलेच्या गळ्यात टाकण्याची प्रथा होती. ही प्रथा मोडण्यासाठी शैला यांनी ती माळ स्वत:च्या गळ्यात टाकून घेतली. आज त्यांच्या घरातील माळ्यावर देवदासींच्या या माळांचा ढीग साचला आहे. डॉ. शैला यांचे वडील गुंडोपंत व आई सुधा तेंडोलकर हे गांधीवादी विचारांचे होते. साध्या जीवनशैलीवर त्याचा गाढविश्वास होता. शैला यांना सुखवस्तू घरातील अनेक स्थळ येत असतानाही त्यांनी ती नाकारली. नरेंद्र दाभोलकर यांनी मिरज येथून वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यावेळी ते जनरल प्रॅक्टीस करत होते. नरेंद्र दाभोलकरांच्या घरच्यांनी तेंडोलकरांची मुलगी पाहिली होती. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन महिन्यानंतर तेंडोलकर परिवाराने होकार कळवला होता. मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात दाभोलकरांनी शैला यांना काही अटी घातल्या. त्या मान्य केल्या तरच लग्न करेन, असे त्यांनी सांगितले. मी समाजकार्य करणार असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी पत्नीला उचलावी लागेल. शिवाय मी नोकरी करून घरात पैसे द्यावे, अशी अपेक्षा करायची नाही. या अटींवर शैला यांचीही लग्नासाठी एक अट होती. ती म्हणजे माझे कुटुंब माझ्या सोबत राहील. नरेंद्र व शैला यांनी दोघांनीही एकमेकांच्या अटी मान्य केल्या. एकमेकांची पसंती आणि कल लक्षात आल्यावर दोघेही लग्नास तयार झाले. नरेंद्र आणि शैला यांनी 25 ऑक्टोबर 1971 रोजी बेळगावला नोंदणी पद्धतीने(रजिस्टर मॅरेज) विवाह केला. लग्नात कोणताही बडेजाव करण्याचे त्यांनी टाळले. पारंपारिक पद्धतीने लग्न करणे त्यांना पटणारे नव्हते. डॉ. शैला लग्नाच्या आधीपासूनच बेळगावला सरकारी नोकरी करत होत्या. लग्नानंतर सातारा - बेळगाव दरम्यानचा प्रवास आणि होणारी दगदग टाळण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून खासगी प्रॅक्टीस सुरू केली. लग्नानंतर शैला यांना उच्चशिक्षण घ्यायची इच्छा होती. त्यांनी दाभोलकरांशी चर्चा करून स्त्रीरोग विषयात उच्चशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्या साताऱ्यातील पहिल्या स्त्री रोगतज्ज्ञ ठरल्या. महिला रुग्णांनी उपचारासाठी येताना पतीसोबत येण्याची अट त्यांनी ठेवली होती. महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची माहिती पतींना व्हावी यासाठी त्यांनी ही पद्धत स्वीकारली होती. दाभोलकरांनी गावागावात जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरूकेले. त्यांच्या सामाजिक जाणिवेमुळेच त्यांना साने गुरुजींच्या ‘साधना’ साप्ताहिकाच्या संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली. समाजकार्य व लेखणीच्या माध्यमातून नरेंद्र दाभोलकर यांनी समाजात वाईट वृतींविरोधात लढा सुरू केला. दाभोलकरांनी गावागावात फिरून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू केले. या वेळी त्यांना अनेक वाईट अनुभव आले. एकदा नरेंद्र यांची वाट पाहून शैला झोपी गेल्या होत्या. रात्री दाराचा आवाज आला. त्यांनी दार उघडले तर 8-10 लोक उभे होते. त्यांनी नरेंद्र यांना जिवे मारण्याची धमकी दिली. खरंतर शैला थोड्या घाबरल्या, पण स्वत:ला सावरत त्यांनी,‘ तुम्हाला काय करायचे ते करा’ असे सांगत लोकांना पिटाळून लावले. रात्री अडीच वाजता दाभोलकर घरी परतल्यावर त्यांच्या जिवात जीव आला. त्यांनी नरेंद्र यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यावर तू काळजी करू नकोस. असे प्रकार दररोज घडतात, असे सांगून त्यांनी समजूत घातली. शैला यांना सुद्धा समाजसेवा करायची होती. पण लग्नातील अटीप्रमाणे शैला यांनी आपल्या कौटुंबिक कर्तव्याला प्राधान्य दिले. पण त्यांनी दाभोलकरांच्या अनेक चळवळींना वेळोवेळी मदतही केली. देवदासीच्या प्रश्नावर देखील त्यांनी मोठे काम केले आहे. दाभोलकरांचे वडील अच्युत दाभोलकर हे गांधीवादी आणि समाजसेवक होते. त्यांच्याप्रमाणे नरेंद्र यांना देखील समाजसेवेची विशेष आवड. समाजसेवेकडे ओढा असल्याने त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात मन रमले नाही. त्यांनी काही दिवस पत्नीच्या दवाखान्यात प्रिस्क्रीप्शन लिहिण्यास सुरुवात केली, पण त्यातही त्यांचे मन लागेना. शेवटी शैला यांनी त्यांना आवडेल ते काम करण्याचा सल्ला दिला. 1982 पासून त्यांनी स्वत:ला सामाजिक चळवळीत झोकून दिले. समाजकार्याच्या चळवळीत मी माझ्या पत्नीला वेळ देऊ शकलो नाही. याचे मला आजही दु:ख वाटते. दिवसेंदिवस काम वाढत आहे. यामुळे कामाचा ताण वाढतच आहे. कुटुंबीयांना वेळ न देऊ शकल्याबद्दल अपराधीपणाची जाणीव होते. -डॉ. नरेंद्र दाभोलकर समाजसेवेच्या व्रताने झपाटलेल्या व्यक्ती सोबत संसार करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. मनात निर्धार होता. यामुळे मी नरेंद्रला प्रत्येक पावलावर साथ देऊ शकली. - डॉ. शैला दाभोलकर साभार दिव्यमराठी. नरेंद्र दाभोळकर यांचे साहित्य अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - राजहंस प्रकाशन अंधश्रद्धा विनाशाय - राजहंस प्रकाशन ऐसे कैसे झाले भोंदू - मनोविकास प्रकाशन झपाटले ते जाणतेपण - संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ. ठरलं... डोळस व्हायचंय - मनोविकास प्रकाशन तिमिरातुनी तेजाकडे - राजहंस प्रकाशन प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर) - राजहंस प्रकाशन भ्रम आणि निरास - राजहंस प्रकाशन विचार तर कराल? - राजहंस प्रकाशन विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी - दिलीपराज प्रकाशन श्रद्धा-अंधश्रद्धा - राजहंस प्रकाशन (इ.स. २००२ ) मती भानामती (हे अखेरचे पुस्तक ठरले, प्रकाशन जून 2013 मध्ये झाले) |
Monday, 26 August 2013
प्रबोधन- जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवूया
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment