http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-article-on-dr-narendra-dabholkar-4355619-NOR.html....
श्रुति गणपत्ये | Aug 24, 2013, 00:36AM IST
योद्धा बुद्धिप्रामाण्यवादी‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या माध्यमातून आकारास आलेल्या चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून करण्यात आलेली हत्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली आहे. पुरोगामी म्हणवून घेणा-या या राज्यात अंधश्रद्धा, देव-धर्म, बुवाबाजी आणि त्यातून जनसामान्यांची होणारी पिळवणूक व शोषण या विरोधात जनजागृतीचे अव्याहत काम करणा-या डॉ. दाभोलकर यांना ठार मारण्यासाठी कुणी हल्ला करू शकतो, अशी कल्पनाच कोणी केली नव्हती. त्यांच्यावर या आधी सनातन्यांनी हल्ले केले होते, मात्र त्याचे स्वरूप एवढे भीषण नव्हते. डॉ. दाभोलकर यांच्यावर कुणी गोळ्या झाडल्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्यांची हत्या हिंदुत्ववादी धर्मांध शक्तींनी घडवून आणल्याचे सिद्ध झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांपेक्षा वेगाने अनेक सुधारणा, बदल झाल्याने आपण पुरोगामी म्हणून मिरवतो; पण देव आणि धर्माचे नाव आले की हे पुरोगामित्व क्षणार्धात गळून पडते. देवाचे अस्तित्व नाकारणारी आणि धर्मातील रूढींना प्रश्न विचारणारी दाभोळकर ही काही पहिली व्यक्ती नव्हती. उलट पूर्वापार चालत आलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांची परंपरा त्यांनी आजच्या काळामध्ये सुरू ठेवली होती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्नही केले होते. देवाच्या अस्तित्वाला आणि धर्मातील रूढी-परंपरांना प्रश्न विचारणा-यांना समाजाच्या रोषाला बळी पडावे लागल्याची उदाहरणे इतिहासात जागोजागी आढळून येतात. अगदी हिंदू धर्मातील वैदिक परंपरांना, रूढींना विरोध करून ‘लोकायत’ची मांडणी करणा-या चार्वाकाला ठार करण्यात आले. वैदिक रूढींच्याच विरोधात उभ्या राहणा-या बळी राजालाही राक्षस ठरवून मारण्यात आले. जातिव्यवस्था मोडून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी महानुभाव पंथाची स्थापना करणा-या चक्रधरस्वामींना ठार मारण्यात आले. संतपरंपरेमध्ये ज्ञानेश्वर असोत किंवा तुकाराम, प्रतिगामी विचाराच्या समाजाकडून त्यांना अपमान, अवहेलना आणि हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या. हिंदू धर्मातील सनातन्यांविरोधात बंड पुकारणा-या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींनाही धर्मांधांकडून अशाच प्रकारची वागणूक मिळाली. ही सगळी उदाहरणे पाहिली की, देव-धर्म आणि अंधश्रद्धांना विरोध करणा-यांना ठार मारण्याची आपली परंपराच आहे का, असे संतापाने विचारावेसे वाटते.
कोणताही बदल समाजात होताना त्याला प्रारंभी विरोध होतो. कालांतराने तो बदल स्वीकारला जातो. मात्र, जेव्हा देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावले जाते किंवा धर्मावर बोट ठेवले जाते, तेव्हा भलेभलेही मागे सरतात. अशा परिस्थितीत ठामपणे उभे राहून आपले मत स्पष्ट मांडण्याचे धाडस डॉ. दाभोलकरांनी दाखवले. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी धागे-गंडे बांधण्यापासून देवदासी बनवणे, नरबळी देणे अशा अनेक घातक प्रथांच्या विरोधात त्यांनी लोकांना जागे केले. अद्भुत, अनाकलनीय, सर्वशक्तिमान अशा कोणत्याही शक्तीचे अस्तित्व त्यांनी नाकारले. धर्माच्या नावाखाली सामान्यांची होणारी लुबाडणूक थांबवण्यासाठी त्यांनी सबंध महाराष्ट्र पालथा घातला. ज्योतिषशास्त्राला त्यांनी कडाडून विरोध केला. उपासतापास, अंगात येणे, भूत लागणे, भानामती, करणी याबद्दलचे प्रत्येक दावे त्यांनी खोडून काढले. चमत्कार सिद्ध करण्यासाठी त्यांनी तर आव्हानच समोर ठेवले. या त्यांच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य, गरीब कुटुंबातून आलेल्या आणि अंधश्रद्धांच्या विरोधात उभे राहू इच्छिणा-या अनेक लोकांना नैतिक बळ मिळाले.
एरवी, एकट्याने धर्माच्या विरोधात लढणे किंवा देवाचे अस्तित्व नाकारणे ही गोष्ट सोपी नसते. असे करणा-यांवर कुटुंब, समाज यांच्याकडून सतत दबाव असतो. वाळीत टाकले जाण्याची भीती असते. अशा वेळी माणसाच्या आयुष्यातले देव आणि धर्माचे अवडंबर बाजूला सारून उघडपणे बोलायला धैर्य लागते. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना ते आवश्यक धैर्य देण्याचे काम डॉ. दाभोलकरांनी केले. देवाचे अस्तित्व नाकारणारे लोकही समाजामध्ये सन्मानाने जगू शकतात, अंधश्रद्धांच्या विरोधात आवाज उठवून धर्मामधील त्रुटींवर धैर्याने बोट ठेवता येते, हा आत्मविश्वास त्यांनी सर्वसामान्य लोकांना दिला. त्यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम राज्यातल्या लहान-लहान गावांमध्येही पोहोचू शकले.
डॉ. दाभोलकरांच्या कार्याचा प्रभाव एवढा मोठा होता की, भोंदू-बाबागिरी करून लोकांना फसवून आपला उदरनिर्वाह करणारे काही बाबाही पुढे ‘अंनिस’च्या चळवळीत सहभागी झाले. आपण करत असलेली लोकांची फसवणूक नैतिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे त्यांना पटले आणि आपल्या धंद्याचे गुपित त्यांनी लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. अगदी अलीकडच्या काळामध्ये जादूटोणा व अघोरी मानवी प्रथाविरोधी विधेयक विधिमंडळाने संमत करावे, म्हणून डॉ. दाभोलकरांनी निकराचे प्रयत्न चालवले होते; पण राजकीय इच्छाशक्ती धर्मांध शक्तींना बळी पडल्याने ते विधेयक गेल्या पावसाळी अधिवेशनात मांडले गेले नाही. वारकरी संप्रदाय, जैन समाज, शिवसेना यांच्याकडून या विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला; पण प्रत्यक्षात मात्र हे विधेयक कोणत्याही धर्माच्या नव्हे, तर धर्माचा वापर करून लोकांना फसवणा-या रूढींच्या विरोधात आहे, हे विरोध करणा-यांनी जाणून घेतले नाही. दाभोलकरांच्या हत्येनंतर मात्र सरकारने एका दिवसामध्ये जादूटोणाविरोधी विधेयकाचा वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला. सरकारने ही इच्छाशक्ती आधी दाखवायला हवी होती.
या संपूर्ण प्रकारातून एक बाब प्रामुख्याने पुढे आली आहे, ती म्हणजे धर्मांधांपासून समाजाला असलेला धोका आधुनिक काळातही कायम आहे. तंत्रज्ञानातील आमूलाग्र बदलांमुळे काळ पुढारल्याचे आपण मानतो. गावागावांत लोकांच्या हाती मोबाइल आणि संगणक आल्यामुळे प्रगती झाल्याचे आपण अभिमानाने सांगतो. पण या मोबाइलवरही देवाचा फोटो लावून पूजा करणारे अनेक जण आहेत आणि संगणकावरून जन्मपत्रिका बनवणारेही कमी नाहीत. त्याच वेळी दुस-या बाजूला धर्मातील कट्टरता कायम राहावी म्हणून नवनवीन युक्त्या शोधून धर्मांधता पसरवणा-या ‘सनातन’सारख्या संस्थांचीही आज कमतरता नाही. लोकांच्या असाहाय्यतेचा आणि अगतिकतेचा फायदा उचलून त्यांना धर्माच्या चौकटीत बांधून ठेवणा-या या लोकांचे मनोधैर्य कदाचित डॉ. दाभोलकरांच्या हत्येमुळे वाढलेही असेल; पण बुद्धिप्रामाण्यवादी लोकांनी यातून धोक्याचा इशारा नक्कीच घ्यायला हवा. रूढी-परंपरांच्या जोखडातून समाजाला मुक्त करू इच्छिणा-या लोकांचे अस्तित्व संपवले जात असताना इतरांनी गप्प बसता कामा नये. निरोगी सामाजिक वातावरणामध्ये जीवन जगायचे असेल तर बुद्धिप्रामाण्यवादाला नव्हे, तर अंधश्रद्धेला कडाडून विरोध झाला पाहिजे. त्यातूनच डॉ. दाभोलकरांसारख्या योद्ध्याचे कार्य पुढे चालत राहील.

No comments:
Post a Comment