संजय सोनवणी,
http://sanjaysonawani.blogspot.in/search/label/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8
१. हिंदू धर्मालाच जातीव्यवस्था मान्य नाही. जी गोष्ट धर्ममान्य नाही व जी अनैतीक आणि कालसुसंगत नाही तिचे पालन करणे हा अधर्म आहे. कोणताही धर्मग्रंथ जातिसंस्थेच्या निर्मितीबाबत विधान करत नाही अथवा समर्थन करत नाही. जाती पाळणे हे अधर्माचे लक्षण आहे. वैदिक धर्मियांची वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेचा काडीइतकाही संबंध नाही. वैदिक धर्म सर्वस्वी वेगळा आहे.
२. हिंदू धर्माला वर्णव्यवस्था मान्य नाही. शैवप्रधान मुर्तीपुजक धर्माचा वैदिक धर्माशी काडीइतकाही संबंध नाही. ऋग्वेदातही वर्णव्यवस्था सांगणारे पुरुषसूक्त नंतर कोणीतरी घुसवले आहे हे सिद्ध झाले आहे. वेद अपौरुषेय आहेत ही एक भाकडकथा आहे. त्यात वारंवार बदल केले गेले आहेत. वेदमहात्म्य मानणारा मुळात हिंदू असूच शकत नाही हे समजावून घेणे आवश्यक आहे.
३. भारतातील बव्हंशी ब्राह्मण समाज वेदमान्यतेचे स्तोम गात असला तरी ते प्रत्यक्ष आचरणात वेदविरोधी...म्हणजे मूर्तीपूजकच असतात. आजच्या वैदिक ब्राह्मण समजणा-यांनी हे समजावून घेणे आवश्यक आहे. स्वत:च्या गैरसमजातून अकारण धर्म प्रदुषित करणा-यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.
४. कोणत्याही समाजात आधी निर्माणकर्ते येतात मग नंतर सेवा देणारे येतात. शेतकरी ते अन्य जीवनोपयोगी उत्पादने निर्माण करणारे आधी येतात तर सेवा देनारे----मग त्या प्रशासकीय, राजकीय, व्यापारी सेवा असोत वा धार्मिक, संरक्षणात्मक अथवा मनोरंजनात्मक सेवा देणारे असोत. हे सर्व एकाच मुळच्या समाजातून आलेले असतात. कोणीही आकाशातुन पडलेला नसतो. त्यामुळे सर्वांचे मूळ एकच आहे. कोणीही अधिकचा शुद्ध आणि कोणी अशुद्ध अशी मुळात वास्तविक परिस्थितीच नसल्याने जाती व त्यानुसारचे भेद हे अशास्त्रीय, असामाजिक आणि निंद्य आहेत.
५. भारतातील जाती म्हणजे आक्रमक आर्यांकडुन हरलेले समूह आहेत या भ्रमातुन प्रथम बाहेर या, कारण ते सत्य नाही. आर्य नांवाचा वंश जगात कधीही अस्तित्वात नव्हता व नाही. भारतीय समाजाला संपुर्ण पराजित करणे प्राचीन काळात एकाही आक्रमकाला कधीही शक्य झालेले नाही. त्यामुळे भारताला तथाकथित आक्रमक आर्यांनी गुलाम करुन जात व संस्कृती दिली असे जे म्हणतात ते प्रथम दर्जाचे देशद्रोही आणि समाजद्रोही खोटारडे आहेत असे पक्के समजून चाला आणि त्यांचा सतत निषेध करत रहा.
६. या देशातील प्रत्येक समाजघटकाचे संस्कृती रचण्यात, ती वाढवण्यात सारखेच मोलाचे योगदान आहे. कोणाहीशिवाय कोणाचेही चालु शकत नव्हते व पुढेही कधी चालणार नाही. त्यामुळे सर्वांचा समान आदर ठेवणे हेच नैसर्गिक वर्तन आहे. त्याविपरीतचे वर्तन हे असामाजिक व विकृत आहे.
७. जातीव्यवस्था टिकव्ण्यात स्वार्थ कोणाचे आहेत ते शोधत रहा व त्यांचा निषेध करत रहा. मग ते राजकारणी असतील वा माथेफिरुंच्या पोटभरु चळवळ्या संघटना. हे कंटक क्षमेच्या योग्यतेचे नाहीत हे पक्के ध्यानात ठेवा!
८. सर्वांनीच सर्वांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतीक उत्थान घडवण्यासाठी एक होत मुळची जातीविरहीत सहिष्णुतेची आणि विजिगिषू वृत्तीची पुन्हा उभारणी करुयात. आमच्या भांडणांत सत्तापिपासुंचा फायदा आहे...स्वार्थ आहे. तेही आपल्यातीलच आहेत...पण त्यांचेही प्रबोधन करत जातीय सत्ताचालनाला पुर्णविराम कसा देता येईल यासाठी प्रयत्न करुयात.
९. हा महान देश आणि हा धर्म एकाच किडीने पोखरला आहे व ती म्हणजे जात. जातीचा जन्म परिस्थितीने केला...आम्हीच केला...आता ती नष्ट करण्याचे ऐतिहासिक कार्यही आपल्यालाच करावे लागणार आहे. जाती अथवा खोटा वर्णाधारीत वर्चस्वतावाद बाळगणा-यांना या देशात ...या समाजात स्थान नाही. देता कामा नये.
१०. कोणतीही जात आम्हीच श्रेष्ठ असा दावा करायला कधीही लायक नव्हती व आजही नाही. आधी समाज आला..समाजाने धर्म निर्माण केला...दैवते-प्रतीके बनवली...गरज म्हणुन पुरोहित बनवावे लागले. समाजाला रक्षणाची व कायद्यांची गरज भासली म्हणुन समाजाने आपल्यातीलच कोणाला राजा बनवले तर कोणाला सैनिक. यातल्या एकालाही परमेश्वराने नव्हे तर समाजाने निर्माण केले आहे...तेही आपल्यातुनच. त्यामुळे आम्ही परमेश्वराच्या तोंडातुन टपकलो आणि कोणी पायातून असे जे मानतात व समजतात त्यांच्यासारखे महामुर्ख आणि अडानी कोणीही नसतील. या मुर्खांच्या गर्दीत सामील होवू नका!
आज आपण स्वत:ला जेही काही समजतो ते पुरेपूर आपल्याच अडाणीपणातून आलेले आहे. अडाण्यांनी सांगितले आणि ते ऐकले त्यातुन आलेले हे अडाणीपण आहे. स्वत:ची बुद्धी वापरुयात...जगातील अत्यंत अनैसर्गिक आणि आपलीच विभाजनी करणारी जातभावना नष्ट करुयात!

No comments:
Post a Comment