Monday, 26 August 2013

दाभोलकरांना लोकहिताची श्रद्धांजली...श्याम मानव

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/22037305.cms....
Maharashtra Times, Sunday, Suplyment, 25 Aug.2013

दाभोलकरांना लोकहिताची श्रद्धांजली

dabho.jpg

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनानंतर जागे होत महाराष्ट्र सरकारने जादूटोणा विरोधी बिलाचा वटहुकूम काढला आहे. यावर राज्यपालांनी कालच स्वाक्षरी केली आहे. आता सहा महिन्यांत हे विधेयक विधिमंडळात मंजूर करून घ्यावं लागणार आहे. जादूटोणाविरोधी कायदा आल्यावर इतर अनेक कायद्यांसारखा तो केवळ कागदावरच राहील , अशी शंका अनेकजण व्यक्त करतात , प्रत्यक्षात तो अतिशय प्रभावी, शक्तिशाली आणि समाजावर दूरगामी करणारा कायदा असेल.

श्याम मानव

आमचे चळवळीतील सहकारी , महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे संस्थापक , कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा २० जुलै रोजी सकाळी पुण्यात अमानुष खून झाला आणि साऱ्या महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते , लोकशाही आणि विचारस्वातंत्र्याचा आदर करणारे सारे सामान्य लोक प्रचंड हादरून गेले. महाराष्ट्रभर गावोगाव लोक रस्त्यावर आले. संयमितपणे पण ठामपणे या निर्घृण खूनाचा निषेध केला.
1982 साली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावानं महाराष्ट्रात आणि आजूबाजूच्या प्रांतात या चळवळीला सुरू केली. डॉ. दाभोलकर माझ्या विनंतीवरून (डॉ बाबा आढावांच्या सल्ल्यानुसार) 1987 साली आमच्या चळवळीत सामील झाले. दोन वर्षं आम्ही एकत्र काम केलं. १९९० साली डॉ. दाभोलकरांनी महाराष्ट्र 'अंनिस ' ची स्थापना करत स्वतंत्रपणे काम सुरू केलं. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा म्हणून ते सतत प्रयत्न करत राहिले.

२००५ साली या कायद्याच्या प्रवासात आम्ही एकत्रितपणे सहभागी झालो. १६ डिसेंबर , २००५ ला हिवाळी अधिवेशनात विधानसभेत हे ' जादूटोणाविरोधी बिल ' सरकारने पारित करून घेतले. पुढे ते अडकले. २०११ मध्ये नव्याने मांडूनही बिल पुढे सरकेना. दाभोलकरांचे , आमचे प्रयत्न न हारता सुरूच होते. अनेक स्तरांवर विरोध होत होता , प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष धमक्या येत होत्या पण त्याचा परिणाम कामावर कधीही झाला नाही. सरकारदरबारी पुन्हा- पुन्हा आम्ही पाठपुरावा करत राहिलो.

या दरम्यानच दाभोलकरांचा खून झाला. त्यांच्यासारख्या एका निखळ , सामाजिक कार्यकर्त्याचा या कायद्याचा प्रवासादरम्यान झालेला खून सरकारच्या जिव्हारी लागला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या बिलाचा वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला. कॅबिनेटने संमत करून तो राज्यपालांकडे पाठवला आहे. येत्या दोन तीन दिवसांतच राज्यपालांच्या सहीनंतर तो राजपत्रात प्रसिद्ध होईल. त्या दिवसापासून कायद्याच्या स्वरूपात तो महाराष्ट्र राज्यात लागू होईल. येत्या सहा महिन्यांच्या अवधीत महाराष्ट्र सरकारला तो विधानसभेत आणि विधानपरिषदेत संमत करून घ्यावा लागेल. अन्यथा महाराष्ट्र सरकारमधील राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांचा आणि सरकारचाही तो दारूण पराभव ठरेल.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे , गृहमंत्री आर. आर. पाटील. छगन भुजबळ इत्यादींनी सारी शक्ती एकवटून डॉ. नरेंद्र दाभोळकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यासाठी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे. निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असतानाही, प्रचंड मोठा राजकीय धोका पत्करून महाराष्ट्राच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला , त्याबद्दल महाराष्ट्रातल्या सुबुद्ध जनतेने या निर्णयाच्या पाठिशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे.

कठोर शिक्षा 

हा कायदा दखलपात्र व आजामीनपात्र आहे. तक्रार झाल्यास पोलिसांना गुन्हा नोंदवावाच लागेल. यासाठी कमीत कमी ६ महिने कारावास , पाच हजार रुपये दंड , ७ वर्षे कारावास आणि पन्नास हजार रूपये दंडाची शिक्षा ठरवली आहे. हा गुन्हा घडल्यास त्याचा प्रचार , प्रसार करणंही तेवढ्याच कठोर शिक्षेस पात्र ठरवलं आहे. त्यामुळे हा होऊ घातलेला कायदा कडक आहे. कठोर आहे. प्रभावी आहे महाराष्ट्राच्या जनजीवनावर दूरगामी परिणाम करणारा आहे. त्यामुळे तो केवळ कागदावर राहील या भ्रमात कोणी राहू नये.

नव्या प्रारूपात , त्यातील जुनं पाचव्या क्रमांकाचं कंपनी ट्रस्ट संबंधीचं कलम पूर्णतः काढून टाकलं आहे. हे पाचवं कलम काढून टाकल्यानं विधेयक कुठेही कमजोर होत नाही. यातील तेरावं कलमही नव्या प्रारूपात काढून टाकलं आहे. खरं तर आधीच्या सरकारनं तसं मान्यही केलं होतं. कारण हे तेरावं कलम केवळ धार्मिक लोकांची समजूत काढण्यासाठी अगदी शेवटी अंतर्भूत केलं होतं. ते असं होतं... शंका दूर करण्यासाठी याद्वारे असे घोषित करण्यात येते की , ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला शारिरिक , मानसिक , आर्थिक बाधा पोहचत नाही असे कोणतेही धार्मिक विधी व धार्मिक कृत्ये अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणत्याही गोष्टी लागू होणार नाहीत. त्यावेळी विधानपरिषदेत हे विधेयक चर्चेला आलं. ' उद्या आम्ही सत्यनारायण केला तर हे सरकार म्हणेल आमचं आर्थिक नुकसान झालं. आम्हाला ६ महिने जेलमध्ये पाठवतील. आम्ही पंढरपूरच्या वारीला पायी गेलो तर आमचं शारिरीक नुकसान झालं म्हणून ६ महिने जेलात पाठवतील-घरी देवपूजा केली तर म्हणतील तुमचं मानसिक नुकसान झालं , जा ६ महिने जेलमध्ये. '... अशी भडक भाषणं केली गेली. हे प्रसिद्धी माध्यमात छापून आलं. त्यानंतर अंधश्रद्धा वाढवणाऱ्या , मनुस्तीप्रणित चातुर्वर्ण आजही रूजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटना ही पेपरची कात्रणं दाखवून वारकऱ्यांना आणि धार्मिक संस्थांना भकडवू लागल्या. त्यातून वातावरण गढूळ झालं.

गोबेल्सप्रणित हे प्रचारतंत्र सुरूच होतं. म्हणून ते तेरावं कलम काढून टाकणं गरजेचं आहे , असं आम्हा साऱ्यांना वाटतच होतं. शेवटी हे तेरावं कलम पूर्णतः रद्दच केलं आहे. आता एकूण ११ कलमांच्या या कायद्यात केवळ अनुसूचित वर्णन केलेल्या १२ कृती म्हणजेच शिक्षापात्र गोष्टी अहोत. त्या का आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊ.

अनुसूची 

भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून मारहाण , त्याचा विविध प्रकारे छळ , चटके देणे , मूत्र विष्ठा खायला लावणे एखाद्या व्यक्तीने चमत्काराचा प्रयोग करून फसविणे , वगैरे कृत्य करणे. ठकवणे आर्थिक प्राप्ती करणे (कायदा लागू झाल्यानंतर जो चमत्कार करून फसवेल जिवालातोच या कायद्याखाली येईल. आधीच्या लोकांवर कारवाई करता येणार नाही.) धोका निर्माण होतो. अथवा शरीराला जिवघेण्या जखमा होतात , अशा अमानुष अघोरी गुप्तधन , जारण- मारण , करणी , भानामती या नावानेप्रथांचा अवलंब करणे. अतिंद्रिय शक्ती असल्याचेअमानुष अनिष्ट व अघोरी कृत्य करणे , नरबळी देणे. भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे व न ऐकल्यास वाईट परिणामाची धमकी एखादी व्यक्ती करणीदेणे , पसविणे , ठकवणे (केवळ अंगात येणे गुन्हा नाही) करते. जादूटोणा करते , भूत लावते , जनावरांचे दूध आटवते. अपशकुनी आहे. सैतान आहे असे जाहीर करणे (जादूटोण्याच्या संशयापायी संबंधित व्यक्तीला फार त्रास होतो , छळ होतो. बहिष्कार टाकला जातो. अनेकदा शेवट सामुहिक हत्याकांडात होऊ जारण- मारण चेटूक केल्याच्या नावाखालीशकतो. ही खूप गंभीर समस्या आहे.) भूतमारहाण करणे , नग्नावस्थेत धिंड काढणे , रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे. पिशाच्चांना आवाहन करून घबराट निर्माण करणे , मृत्यूची भीती घालणे , कुत्रा , साप , विंचू चावल्यासभूताच्या कोपामुळे शारीरिक इजा झाली सांगणे. व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे किंवा यासारखे उपचार करणे.

बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणे. गर्भवती (क) स्वतःत विशेष शक्तीमहिलांच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे. असल्याचे सांगून , अथवा गेल्या जन्मात पत्नी , प्रेयसी , प्रियकर होता असं सांगून लैंगिक संबंध ठेवणे. (ख) मूल न होणाऱ्या महिलेला अलौकिक शक्तीद्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये (मेंटली रिटार्डेड) अलौकिक शक्तीठेवणे. असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा वापर धंदा व व्यवसायासाठी करणे.

आता अनुसूचीतील या १२ गोष्टींविषयी कृती करणे गुन्हा ठरणार आहे. या बाहेरील एकाही रूढी , परंपरेचा यामध्ये अंर्तभाव असणार नाही. ज्या गोष्टींमुळे सर्वसामान्य माणसांचा जीव जाऊ शकतो. जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. लुबाडणूक , फसवणूक होऊ शकते. अशाच ठिकाणी हा कायदा हस्तक्षेप करणार आहे. अशा कायद्याला कोणताही सुबुद्ध माणूस विरोध करील काय ? माणसांना फसू दे , मरू दे म्हणेल काय ?

हा कायदा अत्यंत प्रभावी आहे. हजारो माणसांचे जीव राखण्याचं , फसवणूक वाचवण्याचं कार्य होणार आहे. महाराष्ट्रात मुंबई आहे. टीव्ही , प्रिंट मिडिया सगळ्यांनाच मुंबईतून सगळ्यात जास्त मिळकत मिळते. भारतीय भाषेतीलच नव्हे तर परदेशी भाषेतील टीव्ही सुद्धा मुंबईत प्रसारित होत असतो. अनुसूचित वर्णन केलेल्या कृत्यांचा प्रचार , प्रसार करणंसुद्धा समान गुन्हा आहे. त्यासाठी कमीत कमी शिक्षा ६ महिन्यांची आहे. त्यामुळं महाराष्ट्रात हे विधेयक लागू झाल्यावर देशभरातल्या प्रसिद्धी माध्यमांना या कायद्याचा अभ्यास करूनच आपलं प्रसारण मुंबईत करावं लागणार आहे. कळत नकळत या कायद्याचा प्रभाव देशावर पडणार आहे. संपूर्ण कायद्यात कुठेही धर्म , श्रद्धा या शब्दांचा उल्लेख नाही. कोणत्याही धर्मात जन्मलेल्या माणसाला वाचवण्यासाठीच हा कायदा आहे.

( लेखक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक , संघटक आहेत)

No comments:

Post a Comment